महाराष्ट्रात कुठल्या शहरातल्या लोकांना गावाचा फुकाचा स्वाभिमान असेल तर तो पुण्यातल्या लोकांना आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पुणे तिथे काय उणे ही म्हण पुणेत्तर लोकांनी निर्माण केली नसून ती कुठल्यातरी असाच फुका स्वाभिमान असणार्या पुणेकराने मारलेली लोणकढी थाप आहे.
तर निमित्त झाले ते ६४ व्या सवाई गंधर्व महोत्सवाला जाण्याचे,तसे पुणे हे मला आवडत नाही ,पण गेलो.संध्याकाळची वेळ ,हडपसरपासुन पुण्याचे दळभद्री ट्रॅफिक लागले.या ट्रॅफिकला ना शिस्त ना काही नियम.कुणी कसाही आडवा तिडवा गाडी चालवत होता.त्यात बीआरटी हा पुणेकरांनी लावलेला शोध आडवा तिडवा येत होता.मधुन बस सुसाट जातयेत व कार कुर्मगतीने धावतेय असा प्रकार चालू होता.स्वारगेट चौकात तर परिसराला अवकळा येईल असा प्रकार होता.गाडी टिळक रोडला घ्यायची होती तर त्याला दहा मिनीटं लागली, इतकं बेशिस्त ट्रॅफीक.सवाईला गेलो तर तिथे आत शिस्तप्रिय पुणेकरांनी जागा अडवून धरल्या होत्या.लक्ष्यमोहन व आयुष मोहन गुप्ता यांची जुगलबंदी चालू होती ,छान वाटत होते ऐकायला.पण एका जागेवर बसतील ते पुणेकर कसले .आजुबाजुचे पुणेकर आपल्या देहाचे पिठुळ गाठोडे उचलुन सतत बाहेर ये जा करत होते.कशासाठी? तर मागे लागलेल्या स्टॉलवर हादडून येत होते,व येताना बराच जामामीना घेऊन बसलेल्यांना तुडवत येत होते .तोंडाचा आवाज करुन खात होते ,मध्येच दिली तर गायनाला दाद देत होते.चांगल्या मैफीलीचा रसभंग कसा करायचा हे शिकावे तर पुणेकारांकडूनच.पाठीमागे जाऊन बघितले तर मैफीलीला न्हवती एव्हढी गर्दी पाठीमागे खादाडीला आली होती.मी फक्त हात जोडायचा बाकी होतो.बर्याच घार्या गोर्या अनुनासिक स्वरात खिचडी ,थालीपीठं हे घरात मिळणारे पदार्थ स्टॉलवर मिळावेत म्हणून चित्कारत होत्या.काय भंकस आहे राव कळले नाहि.
तर या पुण्याचं आणखी एक दुर्गुण म्हणजे या जुन्या पुण्यातल्या चिंचोळ्या आणि अवकळा आलेल्या पेठा.साधी पिएमटी घुसली तर रस्ता जाम होतो ,आणि हे पुणे म्हणे ग्लोबल सिटी होणार आहे.या नारायण ,सदाशिव पेठातले वाडे बघितले तर हडप्पा मोहोंजदारोचे अवशेष जास्त सुंदर असावेत याची खात्री पटते.
तर अश्या ह्या पुण्याचा जो काही विकास झाला आहे तो बाहेरच्या व्यक्तींकडूनच.सुप्रसिद्ध डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापणा टिळक आणि आगरकरांनी केली.टिळक रत्नागिरीचे तर आगरकर आमच्या सातारचे.आजही पुण्यात उभी असलेली विद्यापिठं ,जसे भारती विद्यापीठ ,डि.वाय पाटील ,हे अनुक्रमे सांगली आणि कोल्हापुरच्या व्यक्तींनी स्थापण करुन मोठी केलेली आहेत.महाराष्ट्रातले आद्य समाज सुधारक, ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात केलि ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे दांपत्य आमच्या सातारा जिल्हातील कटगुणचे .पैकी सावित्रिबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला दिले गेले कारण तितक्या ताकदीचा कुणी मुळ पुणेकर सापडला नाही. तर स्वतःच्या बुद्धीमत्तेची शेखी मिरवणार्या पुणेकरांसाठी इतकी उदाहरणं पुरी आहेत.
पुण्यात जो काही पैसा आला आहे त्याची सुरवात झाली ती आयटीमुळे .इन्फोसीस पुण्यात स्थापण झाली असली तरी स्थापण करणारा बेंगलोरचा होता.पुढे उपरोक्त विद्यापिठांमधुन तयार होणारे मनुष्यबळाला काम मिळावे यासाठी आयटी पार्क स्थापण केले ते शरद पवार व पतंगराव कदमांनी.दोघेही पुणेकर नाहीत.राज्यावर व केंद्रात छाप पाडेल असा एकही नेता आजवर पुण्याने महाराष्ट्राला दिलेला नाही.
आता पुणेरी पाट्यांकडे वळुयात.बालिशपणे काहीतरी स्वतःच्या गेटवर डकवणार्या या भंकस पाट्या पुणेकरांनीच प्रसिद्ध केल्या आहेत."आमच्याकडे अनारसे ,चकल्या आणि परकर मिळतील " असल्या पाट्या दुकाणात लावणार्या पुणेकरांच्या कल्पनादारीद्य्राची कीवही करावीशी वाटत नाही."आमची कोठेही शाखा नाही " हे मराठी लोकांना खरेतर लाज वाटावी असे बिरुद पुणेकरांनीच महाराष्ट्राच्या माथी मारले आहे. मारामारी करायची धमक नसल्याने " सभ्य भाषेत पुणेरी अपमान' हा प्रकारही या लोकांनी भलताच हाईप केला आहे .प्रत्यक्षात असा अपमान करण्याचे गट्स फार कमी लोकांत आहेत. ज्यांच्यात आहेत ते पुणेकर नाहीत ,बाहेरचे आहेत.
खादाडीच्या बाबतीतही पुणेकर दरिद्रीच आहेत.मिसळ हा कोल्हापुरचा प्र्कार ,बेडेकर मिसळ गोड असते हे माझे निरिक्षण नसुन पुणेकरांचेच आहे.मिसळ खायला हे खास कोल्हापुरी ठिकाणीच जातात.सदाशिव पेठ,कोथरुड ह्या व इतर ठिकाणी प्रसिद्ध ठिकाणं कोणती तर,' कोल्हापुरी रस्सा मंडळ ' ," पुरेपुर कोल्हापुर्". म्हणजे यातही पुण्याचे काही योगदान नाही.
तर पुणेकरांनो तुमच्या शहराचा जो काही थोडाफर विकास झाला आहे तो बाहेरुन आलेल्या लोकांनी केलेला आहे हे तुम्हाला आता कळले असेलच .याचे कारण तुम्ही एकतर मठ्ठ आहात किंवा १ ते ४ झोपा काढून दिवसाचे महत्वाचे तास वाया घालवायची तुमची प्रवृत्ती आहे.पुणे तिथे सर्व उणे अशी खरेतर म्हण प्रचलीत असायला हवी. असो.
कधीतरी तुमच्या चिंचोळ्या गल्ल्या आणि कोंदट वाडे ,बेसुमार वाढलेले अस्ताव्यस्त पुणे सोडून( पुण्याचा फुका अभिमानदेखील) जरा बाहेर सातारा कोल्हापुरात या ! कळेल मोकळं ढाकळं आणि प्रशस्त कसं जगता येतं ते.
धन्यवाद.
पुणे शहराचे स्तोम का माजवले जात आहे?????
Submitted by सिंथेटिक जिनियस on 12 December, 2016 - 10:23
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
सगळे पुणेकर सव्वाचारची चहा
सगळे पुणेकर सव्वाचारची चहा मारून जमलेत वाटते ईथे
त्या वाघाच्या मित्राचे नाव
त्या वाघाच्या मित्राचे नाव काय "शुध्दोधन" दुर्योधनचा सावत्र भाऊ का?>>
शुद्धोधन हे भगवान गौतम बुद्धांच्या पित्याचे नांव होते!
सव्वाचारची चहा नाही.....
सव्वाचारची चहा नाही..... सव्वाचारचा चहा...
आणि चहा मारून नाही.... चहा घेऊन
पण आता वाजले किती.. हा
पण आता वाजले किती.. हा सांगतोय किती
काही का असेना, तुम्ही चाय
काही का असेना, तुम्ही चाय पिली ना. मग बास झाला.
अतरंगी नशीब माझ्या चहाचे चाय
अतरंगी नशीब माझ्या चहाचे चाय नाही केलेत. किती तो भाषा शुद्धीकरणाचे स्तोम माजवता?
प्रसादक, मुंबईला पुण्यापेक्षा
प्रसादक, मुंबईला पुण्यापेक्षा सुर्य जरा उशीरा उगवतो.
आज तर मायबोलीवरही उशीराच
आज तर मायबोलीवरही उशीराच उगवलाय
आज जुम्मा आहे. आज तर चंद्र
आज जुम्मा आहे. आज तर चंद्र उगवणार
आता हा जुम्मा चुम्मा दे दे
आता हा जुम्मा चुम्मा दे दे करत पुन्हा असमाधानाकडे जाणार वाटते.
आज जुम्मा आहे. आज तर चंद्र
आज जुम्मा आहे. आज तर चंद्र उगवणार पण जुम्मेरात कालच झाली की
भा
अरे हो पण आज ही चंद्र उगवणार
अरे हो पण आज ही चंद्र उगवणार ना. आणि चांदण्या बघायला जाणार ना.
तो चंद्र शनिवारचा... आता हा
तो चंद्र शनिवारचा...
आता हा जुम्मा चुम्मा दे दे करत पुन्हा असमाधानाकडे जाणार वाटते.

भाचा त्याच्या असमाधानाची आठवण करून दिली की तुला अगदी अतीव समाधान मिळताना दिसतंय
किती तो भाषा शुद्धीकरणाचे
किती तो भाषा शुद्धीकरणाचे स्तोम माजवता?>>>>>>
किती ते भाषा शुद्धीकरणाचे स्तोम माजवता?
असे हवे ना ?
हर्पेन त्याची आठवण झाली, की
हर्पेन
त्याची आठवण झाली, की त्यालाच जे समाधान मिळते, त्यात मला समाधान वाटते हो. 
मला का असे वाटतेय की आता ईथे
मला का असे वाटतेय की आता ईथे माझ्या लैंगिक असमाधानाची टिंगल उडवली जात आहे.
जर खरेच तसे असेल तर खेदजनक आहे. हे देखील एक प्रकारचे लैंगिक शोषणच आहे एवढेच म्हणू इच्छितो.
नाही रे ऋ, सर्व माबोकर तुझ्या
नाही रे ऋ, सर्व माबोकर तुझ्या दु:खात सहभागी आहेत. हो की नाही हर्पेन?
अतरंगी, अहो मी काय चाणक्य
अतरंगी, अहो मी काय चाणक्य किंवा कालिदासाला शेजारी घेऊन बसत नाही हो. थोडा शब्द ईकडचा तिकडे होतो माझा.
एक प्रकारचे लैंगिक शोषणच आहे
एक प्रकारचे लैंगिक शोषणच आहे एवढेच म्हणू इच्छितो. <<<
हळू बोल जरा. ऑनलाईन लैंगिक शोषण असा कायदा आला नाही अजून
{{{ ऋन्मेऽऽष | 16 December,
{{{ ऋन्मेऽऽष | 16 December, 2016 - 18:12 नवीन
मला का असे वाटतेय की आता ईथे माझ्या लैंगिक असमाधानाची टिंगल उडवली जात आहे. }}}
मला तर वाटते की तो स्तोम माजवत आहेत.
ईथे लोकं ऑनलाईन लैंगिक समाधान
ईथे लोकं ऑनलाईन लैंगिक समाधान मिळवू शकत नाहीत आणि सरकार ऑनलाईन बॅन्कीगची अपेक्षा ठेवतेय.. रेडीक्युलस !
मी चहा पिऊन येतो !
(आजचा धडा)
नाही रे ऋ, सर्व माबोकर तुझ्या
नाही रे ऋ, सर्व माबोकर तुझ्या दु:खात सहभागी आहेत. हो की नाही हर्पेन?
अलबत मी तर तिकडे त्या विरोधाभासाच्या धाग्यावर माझ्या अल्पमती नुसार सोल्युशन पण सुचवून आलोय
इतकी काळजी आम्हाला आणि हा इथे म्हणतो शोषण म्हणून किती तो विरोधाभास!
काळ कठीण आला, घोर कलियुग !
हे वाचा प्लिज गुगल ने मज्जा
हे वाचा प्लिज
गुगल ने मज्जा आणली राव.
The city of Pune is majavale too much ?????
If the State in which the people of the city, the pride of the village Fuca need to tell people that made them different from the Pune punettara minus the saying is a lie that there nahipune lonakadhi brutally punekarane with some pride itself Fuca.
The reason was that the 64th Sawai Gandharva festival to go to, so I do not like Pune, but gelosandhyakalaci time, no discipline, no traffic hadapasarapasuna aka dalabhadri traffic lagaleya niyamakuni howsoever rate soundly train running hotatyata BRT is Pune Search stamped transverse coming zag fashion.
Bus and car kurmagatine dhavateya susata jatayeta occasionally take on that type of road hotasvarageta the area that will be in the court while he was in town Tilak type hotagadi ten minutes, but there is so much space inside the spartan Pune went indiscipline trephikasavaila were being falsely. Ayush Gupta and Mohan was laksyamohana of this duet, it was nice to sit in one place and re aikayalapana what
Go out of your flesh constantly re not around to hotekasa pithula bundle ucaluna? If the fire was coming hadaduna stall behind, and was eating up the tondaca voice was taking a long jamamina say .However, if in the middle of the singing and appreciating the hotecangalya maiphilica learn how to look and how to rasabhanga punekarankadunacapathimage Please contact the maiphilila sized crowd I just want to rest behind the khadadila hotimi hand.
Many gharya white nasal tone medley, thalipitham is blowing hotyakaya bhankasa believer in getting food stalls Rao has not realized the house.
The Pune Pune pethasadhi another vice of the old town and the road cincolya piemati Kaljat the jam, and it will be convinced that the Global City, including Pune Narayan said, Sadashiva pethatale Wade looked to be the remains of Harappa mohonjadaroce more beautiful .
If it is at this Pune that some progress was made out of Tilak and Agarkar kelitilaka vyaktinkadunacasuprasiddha Deccan Education Society to establish standing in Pune, Ratnagiri if Agarkar vidyapitham our sataraceajahi, such as Bharti University, divaya Patil, Sangli and Kolhapur respectively this and to establish the people are great.
Maharashtra pioneering social reformer, who started her education in sport and Mahatma Phule and Savitribai this couple did not find anyone because they gave our native Pune Satara district katagunace .Location savitribaince strength as the name of University of Pune. If so, are his own intelligence boasting miravanarya Pune Puri examples.
Pune Pune to establish that there was real and she was beginning to have some money to establish who was ayatimule inphosisa Bangalore.
This marked the establishment of IT parks that might be ready to work above vidyapithammadhuna manpower to run and leader Sharad Pawar and Patangrao kadamannidoghehi re nahitarajya the impression that the heat is not the center of Pune in Maharashtra so far.
Now puneri patyankade valuyatabalisapane have published something on his own gate dakavanarya or bhankasa tables punekarannica.
आता हा जुम्मा चुम्मा दे दे
आता हा जुम्मा चुम्मा दे दे करत पुन्हा असमाधानाकडे जाणार वाटते.

>>>
भारीये हे
ऋन्मेष, चहा पिली
मुळात तुला चहा ला 'ती' करायचंच असेल तर किमान प्यायली तरी म्हण
एका दमात हा धागा वाचून
एका दमात हा धागा वाचून काढला.
धागाकर्त्याने मला फुले मंडईच्या पाठीमागे (मंडई गणपतीच्या खोक्याजवळ) असलेल्या बुरूड गल्लीत सवड काढून भेटावे. बघतोच कसे मिळत नाहीत पोकळ बांबू (गुढीसाठी), पण त्यासाठी पुण्यात यावे लागेल

सातारा, कोल्हापूर पेक्षा सणसणीत मिळतील.
अवांतर : हर्पेनच्या प्रतिसादांचे फार स्तोम माजवले आहे सर्वांनी
पटवर्धन बाग, एरंडवणा येथे 100
पटवर्धन बाग, एरंडवणा येथे 100 फुटी डीपी रोडला लागून जे हॉटेल आहे त्याचे नाव "हॉटेल आमची" आहे. ते देवनागरीत लिहिले आहे
याचा अर्थ काय आहे?
एरडवण्यात असून हॉटेलच्या नावावरून धरणे कार्यक्रम झालेला नाही त्यावरून एकतर स्थानिकांचे नावाबाबत समाधान झाले असावे.
नाहीतर मग एरंडवण्यातले नागरिक उर्वरित शहरापेक्षा अधिक सहिष्णु असावेत.
Pages