महाराष्ट्रात कुठल्या शहरातल्या लोकांना गावाचा फुकाचा स्वाभिमान असेल तर तो पुण्यातल्या लोकांना आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पुणे तिथे काय उणे ही म्हण पुणेत्तर लोकांनी निर्माण केली नसून ती कुठल्यातरी असाच फुका स्वाभिमान असणार्या पुणेकराने मारलेली लोणकढी थाप आहे.
तर निमित्त झाले ते ६४ व्या सवाई गंधर्व महोत्सवाला जाण्याचे,तसे पुणे हे मला आवडत नाही ,पण गेलो.संध्याकाळची वेळ ,हडपसरपासुन पुण्याचे दळभद्री ट्रॅफिक लागले.या ट्रॅफिकला ना शिस्त ना काही नियम.कुणी कसाही आडवा तिडवा गाडी चालवत होता.त्यात बीआरटी हा पुणेकरांनी लावलेला शोध आडवा तिडवा येत होता.मधुन बस सुसाट जातयेत व कार कुर्मगतीने धावतेय असा प्रकार चालू होता.स्वारगेट चौकात तर परिसराला अवकळा येईल असा प्रकार होता.गाडी टिळक रोडला घ्यायची होती तर त्याला दहा मिनीटं लागली, इतकं बेशिस्त ट्रॅफीक.सवाईला गेलो तर तिथे आत शिस्तप्रिय पुणेकरांनी जागा अडवून धरल्या होत्या.लक्ष्यमोहन व आयुष मोहन गुप्ता यांची जुगलबंदी चालू होती ,छान वाटत होते ऐकायला.पण एका जागेवर बसतील ते पुणेकर कसले .आजुबाजुचे पुणेकर आपल्या देहाचे पिठुळ गाठोडे उचलुन सतत बाहेर ये जा करत होते.कशासाठी? तर मागे लागलेल्या स्टॉलवर हादडून येत होते,व येताना बराच जामामीना घेऊन बसलेल्यांना तुडवत येत होते .तोंडाचा आवाज करुन खात होते ,मध्येच दिली तर गायनाला दाद देत होते.चांगल्या मैफीलीचा रसभंग कसा करायचा हे शिकावे तर पुणेकारांकडूनच.पाठीमागे जाऊन बघितले तर मैफीलीला न्हवती एव्हढी गर्दी पाठीमागे खादाडीला आली होती.मी फक्त हात जोडायचा बाकी होतो.बर्याच घार्या गोर्या अनुनासिक स्वरात खिचडी ,थालीपीठं हे घरात मिळणारे पदार्थ स्टॉलवर मिळावेत म्हणून चित्कारत होत्या.काय भंकस आहे राव कळले नाहि.
तर या पुण्याचं आणखी एक दुर्गुण म्हणजे या जुन्या पुण्यातल्या चिंचोळ्या आणि अवकळा आलेल्या पेठा.साधी पिएमटी घुसली तर रस्ता जाम होतो ,आणि हे पुणे म्हणे ग्लोबल सिटी होणार आहे.या नारायण ,सदाशिव पेठातले वाडे बघितले तर हडप्पा मोहोंजदारोचे अवशेष जास्त सुंदर असावेत याची खात्री पटते.
तर अश्या ह्या पुण्याचा जो काही विकास झाला आहे तो बाहेरच्या व्यक्तींकडूनच.सुप्रसिद्ध डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापणा टिळक आणि आगरकरांनी केली.टिळक रत्नागिरीचे तर आगरकर आमच्या सातारचे.आजही पुण्यात उभी असलेली विद्यापिठं ,जसे भारती विद्यापीठ ,डि.वाय पाटील ,हे अनुक्रमे सांगली आणि कोल्हापुरच्या व्यक्तींनी स्थापण करुन मोठी केलेली आहेत.महाराष्ट्रातले आद्य समाज सुधारक, ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात केलि ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे दांपत्य आमच्या सातारा जिल्हातील कटगुणचे .पैकी सावित्रिबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला दिले गेले कारण तितक्या ताकदीचा कुणी मुळ पुणेकर सापडला नाही. तर स्वतःच्या बुद्धीमत्तेची शेखी मिरवणार्या पुणेकरांसाठी इतकी उदाहरणं पुरी आहेत.
पुण्यात जो काही पैसा आला आहे त्याची सुरवात झाली ती आयटीमुळे .इन्फोसीस पुण्यात स्थापण झाली असली तरी स्थापण करणारा बेंगलोरचा होता.पुढे उपरोक्त विद्यापिठांमधुन तयार होणारे मनुष्यबळाला काम मिळावे यासाठी आयटी पार्क स्थापण केले ते शरद पवार व पतंगराव कदमांनी.दोघेही पुणेकर नाहीत.राज्यावर व केंद्रात छाप पाडेल असा एकही नेता आजवर पुण्याने महाराष्ट्राला दिलेला नाही.
आता पुणेरी पाट्यांकडे वळुयात.बालिशपणे काहीतरी स्वतःच्या गेटवर डकवणार्या या भंकस पाट्या पुणेकरांनीच प्रसिद्ध केल्या आहेत."आमच्याकडे अनारसे ,चकल्या आणि परकर मिळतील " असल्या पाट्या दुकाणात लावणार्या पुणेकरांच्या कल्पनादारीद्य्राची कीवही करावीशी वाटत नाही."आमची कोठेही शाखा नाही " हे मराठी लोकांना खरेतर लाज वाटावी असे बिरुद पुणेकरांनीच महाराष्ट्राच्या माथी मारले आहे. मारामारी करायची धमक नसल्याने " सभ्य भाषेत पुणेरी अपमान' हा प्रकारही या लोकांनी भलताच हाईप केला आहे .प्रत्यक्षात असा अपमान करण्याचे गट्स फार कमी लोकांत आहेत. ज्यांच्यात आहेत ते पुणेकर नाहीत ,बाहेरचे आहेत.
खादाडीच्या बाबतीतही पुणेकर दरिद्रीच आहेत.मिसळ हा कोल्हापुरचा प्र्कार ,बेडेकर मिसळ गोड असते हे माझे निरिक्षण नसुन पुणेकरांचेच आहे.मिसळ खायला हे खास कोल्हापुरी ठिकाणीच जातात.सदाशिव पेठ,कोथरुड ह्या व इतर ठिकाणी प्रसिद्ध ठिकाणं कोणती तर,' कोल्हापुरी रस्सा मंडळ ' ," पुरेपुर कोल्हापुर्". म्हणजे यातही पुण्याचे काही योगदान नाही.
तर पुणेकरांनो तुमच्या शहराचा जो काही थोडाफर विकास झाला आहे तो बाहेरुन आलेल्या लोकांनी केलेला आहे हे तुम्हाला आता कळले असेलच .याचे कारण तुम्ही एकतर मठ्ठ आहात किंवा १ ते ४ झोपा काढून दिवसाचे महत्वाचे तास वाया घालवायची तुमची प्रवृत्ती आहे.पुणे तिथे सर्व उणे अशी खरेतर म्हण प्रचलीत असायला हवी. असो.
कधीतरी तुमच्या चिंचोळ्या गल्ल्या आणि कोंदट वाडे ,बेसुमार वाढलेले अस्ताव्यस्त पुणे सोडून( पुण्याचा फुका अभिमानदेखील) जरा बाहेर सातारा कोल्हापुरात या ! कळेल मोकळं ढाकळं आणि प्रशस्त कसं जगता येतं ते.
धन्यवाद.
पुणे शहराचे स्तोम का माजवले जात आहे?????
Submitted by सिंथेटिक जिनियस on 12 December, 2016 - 10:23
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
बेफिकीर, पेठांवर मूळ हक्क
बेफिकीर, पेठांवर मूळ हक्क धागाकर्त्याचा आहे. पुण्यानं पेठांची कल्पना उचललेली आहे.
ज्या कुठ्ल्या स्वर्गात हे
ज्या कुठ्ल्या स्वर्गात हे रहातात, तो सोडून हे बहुतेक पुण्य नगरी बघायला आले, काहितरी गोंधळ घातले आणि
सडकून आपमान पावले.
असं वाट्टय खरं लेख वाचून
ह्या धाग्यावर धागाकर्त्याला
ह्या धाग्यावर धागाकर्त्याला पुणेकरांचे आलेले अनुभव पाहून त्याची पुण्याविषयीची भावना अधिकच दृढ होईल, की काय.
धागाकर्त्याला पुण्याचे काहीच
धागाकर्त्याला पुण्याचे काहीच नाही आवडले , असे कसे ?
येरवड्याला गेले असते तर काही न काही उपयोगाचे दिसले असते.. कदाचित पायच निघाला नसता तिथून, खरे तर यांना सोडलेच नसते, आग्रहाने ठेवून घेतले असते हा लेख वाचून !!
धागाकर्त्याला पुणेकरांचे
धागाकर्त्याला पुणेकरांचे आलेले अनुभव पाहून त्याची पुण्याविषयीची भावना अधिकच दृढ होईल, की काय >>>
व्हायलाच हवी! म्हणजे ते आणि त्यांच्याच विचारांचे अनेकजण पुण्यात पाय ठेवणार नाहीत.
मागचे कि ??
मागचे कि ??
>>>>पेठांवर मूळ हक्क
>>>>पेठांवर मूळ हक्क धागाकर्त्याचा आहे. पुण्यानं पेठांची कल्पना उचललेली आहे.<<<< ओह ओके.
धन्स चिनूक्स!
>>>>येरवड्याला गेले असते तर काही न काही उपयोगाचे दिसले असते.. कदाचित पायच निघाला नसता तिथून, खरे तर यांना सोडलेच नसते, आग्रहाने ठेवून घेतले असते हा लेख वाचून !!<<<<
>>>>व्हायलाच हवी! म्हणजे ते आणि त्यांच्याच विचारांचे अनेकजण पुण्यात पाय ठेवणार नाहीत.<<<
पण चिनूक्स, पेठेची मजा खर्या
पण चिनूक्स,
पेठेची मजा खर्या पुणेकरालाच माहीत, भले ती संकल्पना उचललेली का असेनात
'कुठूनही हवे तिथे आणि नको तिथे जाणे शक्य होणे' ही पेठांनी पुरवलेल्या अनेक क्षमतांपैकी एक आहे
जाज्वल्य अभिमान हे शब्द लेखात
जाज्वल्य अभिमान हे शब्द लेखात न आल्याने पुणे शहराबद्दलचा हा लेख ऑफ् स्पेक (आउट ऑफ स्पेसिफिकेशन ) क्याटेगरीत मोडतो. या लेखाची खरी जागा मायबोलीवर नाही. सकाळ मधील मुक्तपीठवर हा लेख टाकला तर या लेखाचे खरे मूल्यमापन होईल.
प्रतिसादकर्त्यांचे आभार.
प्रतिसादकर्त्यांचे आभार.
पुण्याबद्दलचा एक प्रश्न आहे.
पुण्याबद्दलचा एक प्रश्न आहे. ईथेच विचारू का..
चितळेची बाकरवडी जी पुण्याला चितळेंच्या दुकानात मिळते ती आणि ईथे जी मुंबईत पाकिटात मिळते ती.. या दोघांच्या क्वालिटीत फरक असतो का?
मुंबईत जी बाकरवडी मिळते, ती
मुंबईत जी बाकरवडी मिळते, ती जास्त चांगली असते. ती रांगेत उभं न राहता मिळते, आणि संपत नाही.
मुंबईत जी बाकरवडी मिळते, ती
मुंबईत जी बाकरवडी मिळते, ती जास्त चांगली असते. ती रांगेत उभं न राहता मिळते, आणि संपत नाही. >>> दुपारी १ ते ४ या वेळेत पण मिळत असणार. उगाच आळशी पुणेकरांसारखे नसणार.
भास्कराचार्य, संपत नाही
भास्कराचार्य, संपत नाही म्हणजे दुकानातली संपत नाही की घरची खाऊन संपत नाही ..
बाकी माझ्या काही मद्यप्राशन करणारया मित्रांमध्ये ती चकणा आयटम म्हणून जाम फेमस झाली आहे. सोबत हिरवी चटणी नसली तरी चालते.
बरोबर गिरीकंद!
बरोबर गिरीकंद!
आमच्याकडेही काही दुकाने 1 ते
आमच्याकडेही काही दुकाने 1 ते 4 बंद असतात. आम्ही त्यांना सलून बोलतो. तिथे केस कापले जातात. का बंद असतात समजत नाही. दुपारी कोणाला केस दाढी करायचा मूड होत नाही का?
दुकानातली संपत नाही की घरची
दुकानातली संपत नाही की घरची खाऊन संपत नाही >> घरातली खाऊन न संपायला पुणेकरांनी/चितळ्यांनी द्रौपदीच्या अक्षय थाळीसारखी अक्षय बाकरवडी इन्व्हेन्ट केली असेल, तर कल्पना नाही.
मी दुकानातली म्हणत होतो.
मुंबईतल्या दुकानदारांना मधे
मुंबईतल्या दुकानदारांना मधे दुपारी दुकान उघडायला बंद करायला नको.... आळस त्याला म्हणतात.
हर्पेन
हर्पेन
आम्ही त्यांना सलून बोलतो. >>
आम्ही त्यांना सलून बोलतो. >> तुला काय असे सलते, म्हणून तू त्यांना बोलतोस?
दुपारी कोणाला केस दाढी करायचा मूड होत नाही का? >> दुपारी त्या कारागिरांना झोपायचा मूड होत असेल.
हर्पेन तुम्ही त्या आद्य
हर्पेन
तुम्ही त्या आद्य पेठेतले वगैरे की काय? 
अरे पण दुकान उघडे ठेवून झोपा
अरे पण दुकान उघडे ठेवून झोपा ना. फक्त सामान टेबलवर मांडून ठेवा. तुम्ही अगदीच गाढ झोपेत दिसलात तर आमची आम्ही करून घेऊ. पण कस्टमरला फॅसिलिटी तर द्या.
भा, ऑलमोस्ट देअर पण तिकडे
भा, ऑलमोस्ट देअर पण तिकडे असंच घेत नाही कुणाला म्हणून प्रयत्न करतोय
पुणेकरांनी उगाच चितळेंचे
पुणेकरांनी उगाच चितळेंचे स्तोम माजवुन ठेवले आहे.
Aaj dukan ughade theva
Aaj dukan ughade theva mhaNtoys. Udya karagiranna mhaNshil.
रुनम्या मी ती बाकरवडी
रुनम्या मी ती बाकरवडी पहिल्यांदा दुकानात इंट्रोड्यूस झाली तेव्हा लायनीत उभे राहून घेतली आहे. अर्धा अ र्धा किलो. ताज्या बाव अश्या ट्रे भर भरून यायच्या आणि वजन करताना प्लास्टिकच्या पिशवीला वाफ धरायची. सर्व दुकानात दरवळ भरून. पाच सहा बाकरवड्या आणि मग दोन आंबा बर्फी चे तुकडे खाल्ले की असले बाफ काढावे लागत नाहीत निवांत २ - ४ झोप येते.
इथे बाकरव्डी चाट रेसीपी आहे ती करून घाल मित्रांना. ट्रिपल शेजवान घ्रेवी घालू नकोस.
हजामत करायला उगाच सलूनचे
हजामत करायला उगाच सलूनचे स्तोम माजवून ठेवले आहे. मायबोलीवर काही प्रकारचे धागे काढले, की ती फुकट होते.
अरे का विषय भरकटवत आहात? किती
अरे का विषय भरकटवत आहात?
किती साधा प्रश्न होता. माझ्या माहितीप्रमाणे बाकरवडी मशीनवर बनते. तरी दोन्हीकडच्या बाकरवडीत फरक असतो का? म्हणजे पाकिटातील जास्त टिकावी म्हणून तिच्यात काही रासायनिल द्रव्ये घातली जातात का?
अमा, बाकरवडी चाट शोधतो.
तिच्यात काही रासायनिल द्रव्ये
तिच्यात काही रासायनिल द्रव्ये घातली जातात का? >>> हितं तितं विचारन्यापेक्षा पाकीट घे आन त्यावरची Ingredients वाच म्हन्जे आपोआप कळंल.
ऋन्मेष तू चितळ्यांच्या
ऋन्मेष तू चितळ्यांच्या बाकरवडीचं स्तोम माजवतोयस
Pages