महाराष्ट्रात कुठल्या शहरातल्या लोकांना गावाचा फुकाचा स्वाभिमान असेल तर तो पुण्यातल्या लोकांना आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पुणे तिथे काय उणे ही म्हण पुणेत्तर लोकांनी निर्माण केली नसून ती कुठल्यातरी असाच फुका स्वाभिमान असणार्या पुणेकराने मारलेली लोणकढी थाप आहे.
तर निमित्त झाले ते ६४ व्या सवाई गंधर्व महोत्सवाला जाण्याचे,तसे पुणे हे मला आवडत नाही ,पण गेलो.संध्याकाळची वेळ ,हडपसरपासुन पुण्याचे दळभद्री ट्रॅफिक लागले.या ट्रॅफिकला ना शिस्त ना काही नियम.कुणी कसाही आडवा तिडवा गाडी चालवत होता.त्यात बीआरटी हा पुणेकरांनी लावलेला शोध आडवा तिडवा येत होता.मधुन बस सुसाट जातयेत व कार कुर्मगतीने धावतेय असा प्रकार चालू होता.स्वारगेट चौकात तर परिसराला अवकळा येईल असा प्रकार होता.गाडी टिळक रोडला घ्यायची होती तर त्याला दहा मिनीटं लागली, इतकं बेशिस्त ट्रॅफीक.सवाईला गेलो तर तिथे आत शिस्तप्रिय पुणेकरांनी जागा अडवून धरल्या होत्या.लक्ष्यमोहन व आयुष मोहन गुप्ता यांची जुगलबंदी चालू होती ,छान वाटत होते ऐकायला.पण एका जागेवर बसतील ते पुणेकर कसले .आजुबाजुचे पुणेकर आपल्या देहाचे पिठुळ गाठोडे उचलुन सतत बाहेर ये जा करत होते.कशासाठी? तर मागे लागलेल्या स्टॉलवर हादडून येत होते,व येताना बराच जामामीना घेऊन बसलेल्यांना तुडवत येत होते .तोंडाचा आवाज करुन खात होते ,मध्येच दिली तर गायनाला दाद देत होते.चांगल्या मैफीलीचा रसभंग कसा करायचा हे शिकावे तर पुणेकारांकडूनच.पाठीमागे जाऊन बघितले तर मैफीलीला न्हवती एव्हढी गर्दी पाठीमागे खादाडीला आली होती.मी फक्त हात जोडायचा बाकी होतो.बर्याच घार्या गोर्या अनुनासिक स्वरात खिचडी ,थालीपीठं हे घरात मिळणारे पदार्थ स्टॉलवर मिळावेत म्हणून चित्कारत होत्या.काय भंकस आहे राव कळले नाहि.
तर या पुण्याचं आणखी एक दुर्गुण म्हणजे या जुन्या पुण्यातल्या चिंचोळ्या आणि अवकळा आलेल्या पेठा.साधी पिएमटी घुसली तर रस्ता जाम होतो ,आणि हे पुणे म्हणे ग्लोबल सिटी होणार आहे.या नारायण ,सदाशिव पेठातले वाडे बघितले तर हडप्पा मोहोंजदारोचे अवशेष जास्त सुंदर असावेत याची खात्री पटते.
तर अश्या ह्या पुण्याचा जो काही विकास झाला आहे तो बाहेरच्या व्यक्तींकडूनच.सुप्रसिद्ध डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापणा टिळक आणि आगरकरांनी केली.टिळक रत्नागिरीचे तर आगरकर आमच्या सातारचे.आजही पुण्यात उभी असलेली विद्यापिठं ,जसे भारती विद्यापीठ ,डि.वाय पाटील ,हे अनुक्रमे सांगली आणि कोल्हापुरच्या व्यक्तींनी स्थापण करुन मोठी केलेली आहेत.महाराष्ट्रातले आद्य समाज सुधारक, ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात केलि ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे दांपत्य आमच्या सातारा जिल्हातील कटगुणचे .पैकी सावित्रिबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला दिले गेले कारण तितक्या ताकदीचा कुणी मुळ पुणेकर सापडला नाही. तर स्वतःच्या बुद्धीमत्तेची शेखी मिरवणार्या पुणेकरांसाठी इतकी उदाहरणं पुरी आहेत.
पुण्यात जो काही पैसा आला आहे त्याची सुरवात झाली ती आयटीमुळे .इन्फोसीस पुण्यात स्थापण झाली असली तरी स्थापण करणारा बेंगलोरचा होता.पुढे उपरोक्त विद्यापिठांमधुन तयार होणारे मनुष्यबळाला काम मिळावे यासाठी आयटी पार्क स्थापण केले ते शरद पवार व पतंगराव कदमांनी.दोघेही पुणेकर नाहीत.राज्यावर व केंद्रात छाप पाडेल असा एकही नेता आजवर पुण्याने महाराष्ट्राला दिलेला नाही.
आता पुणेरी पाट्यांकडे वळुयात.बालिशपणे काहीतरी स्वतःच्या गेटवर डकवणार्या या भंकस पाट्या पुणेकरांनीच प्रसिद्ध केल्या आहेत."आमच्याकडे अनारसे ,चकल्या आणि परकर मिळतील " असल्या पाट्या दुकाणात लावणार्या पुणेकरांच्या कल्पनादारीद्य्राची कीवही करावीशी वाटत नाही."आमची कोठेही शाखा नाही " हे मराठी लोकांना खरेतर लाज वाटावी असे बिरुद पुणेकरांनीच महाराष्ट्राच्या माथी मारले आहे. मारामारी करायची धमक नसल्याने " सभ्य भाषेत पुणेरी अपमान' हा प्रकारही या लोकांनी भलताच हाईप केला आहे .प्रत्यक्षात असा अपमान करण्याचे गट्स फार कमी लोकांत आहेत. ज्यांच्यात आहेत ते पुणेकर नाहीत ,बाहेरचे आहेत.
खादाडीच्या बाबतीतही पुणेकर दरिद्रीच आहेत.मिसळ हा कोल्हापुरचा प्र्कार ,बेडेकर मिसळ गोड असते हे माझे निरिक्षण नसुन पुणेकरांचेच आहे.मिसळ खायला हे खास कोल्हापुरी ठिकाणीच जातात.सदाशिव पेठ,कोथरुड ह्या व इतर ठिकाणी प्रसिद्ध ठिकाणं कोणती तर,' कोल्हापुरी रस्सा मंडळ ' ," पुरेपुर कोल्हापुर्". म्हणजे यातही पुण्याचे काही योगदान नाही.
तर पुणेकरांनो तुमच्या शहराचा जो काही थोडाफर विकास झाला आहे तो बाहेरुन आलेल्या लोकांनी केलेला आहे हे तुम्हाला आता कळले असेलच .याचे कारण तुम्ही एकतर मठ्ठ आहात किंवा १ ते ४ झोपा काढून दिवसाचे महत्वाचे तास वाया घालवायची तुमची प्रवृत्ती आहे.पुणे तिथे सर्व उणे अशी खरेतर म्हण प्रचलीत असायला हवी. असो.
कधीतरी तुमच्या चिंचोळ्या गल्ल्या आणि कोंदट वाडे ,बेसुमार वाढलेले अस्ताव्यस्त पुणे सोडून( पुण्याचा फुका अभिमानदेखील) जरा बाहेर सातारा कोल्हापुरात या ! कळेल मोकळं ढाकळं आणि प्रशस्त कसं जगता येतं ते.
धन्यवाद.
पुणे शहराचे स्तोम का माजवले जात आहे?????
Submitted by सिंथेटिक जिनियस on 12 December, 2016 - 10:23
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
{{{ येऊन बघायला हरकत नाही,
{{{ येऊन बघायला हरकत नाही, तुमचा फायदा नाही झाला तर पुणेकरांचा होईल. }}}
जस्ट टु अॅड
सध्या रामलाल बेरोजगारीच आयुष्य जगत आहेत पुण्यात असं म्हणतात
बिचार्यास जुन्या धन्याकडे जुनाच रोजगार मिळेल
ऋन्मेष,हर्पेन आणि इतर यांनी
ऋन्मेष,हर्पेन आणि इतर यांनी धमाल चालवलीय.
सध्या रामलाल बेरोजगारीच
सध्या रामलाल बेरोजगारीच आयुष्य जगत आहेत पुण्यात असं म्हणतात
बिचार्यास जुन्या धन्याकडे जुनाच रोजगार मिळेल>>>>
हे एपिक आहे.

>>>> अदित्य सिंग | 14
>>>> अदित्य सिंग | 14 December, 2016 - 19:08
{{{ येऊन बघायला हरकत नाही, तुमचा फायदा नाही झाला तर पुणेकरांचा होईल. }}}
जस्ट टु अॅड
सध्या रामलाल बेरोजगारीच आयुष्य जगत आहेत पुण्यात असं म्हणतात
बिचार्यास जुन्या धन्याकडे जुनाच रोजगार मिळेल
<<<<
??
हे काय? कशाबद्दल आहे? विचारायचे कारण म्हणजे मी नोकरी करत नाही ह्यावरून खूप पर्सनल रिमार्क्स वाचून झालेले आहेत आजवर! त्याच विषयावर हाही रिमार्क आहे का? थेट लिहायचे नाही म्हणून रामलाल वगैरे, असे काही?
>>हे काय? कशाबद्दल आहे?
>>हे काय? कशाबद्दल आहे? <<
"शोले" चा संदर्भ त्यात असावा...
ओके.
ओके.
सिंथेटीक जिनीयस, असा घाऊक
सिंथेटीक जिनीयस, असा घाऊक प्रमाणात ५८ लाख लोकांना दोष देणं किंवा त्यांचं गुणगान करणं हे खूप अपरिपक्व मतप्रदर्शन आहे. उडदामाजी काळे-गोरे सगळीकडे असतात. ती काही चांदोबातली गोष्ट नाही की एका गावात सगळे सज्जन/दुर्जन लोक रहात असतात. आपला मुद्दा सिद्ध करायला आपण नेहेमीच स्वतःच्या सोयीची उदाहरणं पहातो.
तुम्हाला आलेले अनुभव, झालेला त्रास आणी मनस्ताप खरा असेल, पण तो प्रातिनिधीक नाही.
दुसर्या महायुद्धाच्या वेळी जर्मन सैन्याने पी.जी. वूडहाऊस ला अटक केली आणी त्या कैदेत त्याचे बरेच हाल झाले. त्याच्या सुटकेनंतर त्याला जेव्हा विचारलं की तू जर्मन लोकांचा तिरस्कार करतोस का, तेव्हा तो म्हणाला , 'my friend, i don't hate in plurals'. असो, ईतकी प्रतिक्रिया पुष्कळ झाली.
अरे, चवथ्या व पाचव्या पानांवर
अरे, चवथ्या व पाचव्या पानांवर काय भयानक हसवुन ठेवलंय तुम्ही लोकांनी


लिंबुंनी हे इतकच एवढंच लिहिल?? , पार्वती >>>
उरलेल नंतर वाचते.
तसे बघायला गेले तर सर्वर
तसे बघायला गेले तर सर्वर मायबोलीचा अमेरिकेत आहे मग काय सत्कार स्टॅच्यु ऑफ लिबर्टी जवळ करणार? अ ओ, आता काय करायचं
आमच्याकडे शीव आहे म्हणून मला वाटले तुमच्याकडे पार्वती असेल.
पुण्यात वेगळ्या वस्तुसंग्रहालयाची गरज काय? >>> मुंबईत राणीबागेची आहे तेवढीच. फिदीफिदी
बगलेचा मोठेपणा खराच असणार इतके प्राणी पाळायचे म्हण्जे डोळा मारा
मी लैंगिकदृष्ट्या असमाधानी आहे हे काही आता माबोकरांपासून लपलेले नाही.>
पुण्यात पराकोटीची स्पर्धा असते सर्वच क्षेत्रात. त्यामुळे जिथे आहात तिथेच स्पर्धेत उतरुन यश मिळवा.
पुण्यातील लोकं फारच रिझर्व्हड अस्तात, अन या क्षेत्रात तुमच्या त्या "बाकीच्या रिझर्वेशनचा" तसा उपयोगही नाही...
लिंबाजीपंत आले खिंड लढवायला. काड्यांचे स्तोम माजवून ठेवले आहे. मिपावर १२३ प्रितीसाद आले.
मी तुळशीबागेपत्तोर जाउन येते.
म हा न. अशक्य हसवलंय तुम्ही लोकांनी. हा धागा बहुधा हॉल ऑफ फेम मध्ये हलवायला लागणार.
ऋन्मेष, खास मैत्रिणीला का
ऋन्मेष, खास मैत्रिणीला का नाही विचारत लै.स. बद्दल?
हर्पेन ....
भ यं क र आवडलेत प्रतिसाद
भ यं क र आवडलेत प्रतिसाद
हर्पेन, भा, ऋ __/\__
यू मेड माय डे
मामीच्या धाग्यात टाकायला हवं याला
टिप : मामीच्या धाग्याचं स्तोम माजवत नाहीये
मी मिसला होता हा धागा हहगोल
मी मिसला होता हा धागा हहगोल
फेरफटका धाग्याच्या
फेरफटका धाग्याच्या लायकीप्रमाणे प्रतिसाद द्या. तुमचा वरिल प्रतिसाद फाऊल धरण्यात आला आहे.:-)
नशीब, घरी आल्यावर मग वाचले
नशीब, घरी आल्यावर मग वाचले प्रतिसाद. ऑफिसमधे वाचून ह.ह.ग.लो. असते तर पुण्याला परत धाडलं असतं बॉसनी.
(No subject)
कंदी पेढ्यावर कधी बोलताय?
कंदी पेढ्यावर कधी बोलताय?
ए काय हे? गप्प बसा रे
ए काय हे? गप्प बसा रे सगळ्यांनी

शेवटी ठरले काय? जायचे की नाही
शेवटी ठरले काय? जायचे की नाही
"फेरफटका धाग्याच्या
"फेरफटका धाग्याच्या लायकीप्रमाणे प्रतिसाद द्या. तुमचा वरिल प्रतिसाद फाऊल धरण्यात आला आहे" -
फेरफटका तुम्ही या धाग्यावर
फेरफटका तुम्ही या धाग्यावर फेरफटका मारलात म्हणून तुमच्यासाठी क्रिकेट आणूया धाग्यावर.
सुरुवातीच्या काही प्रतिसादांत आढळून आले की बाहेरच्या लोकांनी पुण्यात येऊन कर्तुत्व गाजवले याचा मोठेपणा पुण्याकडेच घेण्याची चढाओढ पुणेकरांमध्ये लागली होती.
पण आयपीएलमध्ये पुण्याच्या क्रिकेट टीमने जे हरी हरी गोपाळा उटी उटी चंदना केले त्या नामुष्कीची जबाबदारी झटकायची घाई मी कैक पुणेकरांमध्ये पाहिली आहे.
या पुणे आयपीएल संघात एकही पुणेकर नाही (जसे सचिन कांबळी गावस्कर वेंगसरकर आगरकर रहाणे आदी मंडळी यांच्या पुण्याचीच होती) म्हणत या पुणे संघाशी आमचा काही एक संबंध नाही. पुन्हा पुन्हा येऊन स्कोअर काय झाला असे विचारू नये, अन्यथा अपमान करण्यात येईल..... अश्या आशयाच्य कैक फेसबूक पाट्या माझ्या पुणेकर मित्रांना फिरवताना पाहिले आहे.
तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही लोकं फक्त आपल्या यशाचेच स्तोम का माजवता?
पुणेकरांना अपयश कुठे माहीत
पुणेकरांना अपयश कुठे माहीत आहे ? ते सुसाट सुटलेले असतात. अगदी सिग्नललाही थांबत नाहीत.
सिग्नलवरून आठवले, जगात दोन
सिग्नलवरून आठवले,
जगात दोन प्रकारची माणसे असतात. एक ती, जी लाल रंग पाहिल्यावर थांबतात. एक ती, जी लाल रंग पाहिल्यावर उधळतात.
* हा असाच डायलॉग सुचला, मारला. धाग्याशी संबंध जोडून स्तोम माजवू नका.
हर्पेन, भा, ऋ लिंबुंनी हे
हर्पेन, भा, ऋ
लिंबुंनी हे इतकच एवढंच लिहिल?? .. हे महान आहे.
फेरफटका तुम्ही या धाग्यावर फेरफटका मारलात म्हणून तुमच्यासाठी क्रिकेट आणूया धाग्यावर. >> फे फे चे स्तोम माजवू नकोस
भारतात क्रिकेटचे स्तोम का
भारतात क्रिकेटचे स्तोम का माजवले जात आहे???
ऑन सिरिअस नोट ऋन्मेष! अपयश
ऑन सिरिअस नोट ऋन्मेष!
अपयश एंजॉय करणारे वगैरे फक्त सिनेमात असतात. नाही तर सगळेच यशाचंच स्तोम माजवतात, अपयश कोणालाच आवडत नाही.
अभिनंदनाला विरुद्धार्थी शब्द सांग बरं ??
अभिनंदनाला विरुद्धार्थी शब्द
अभिनंदनाला विरुद्धार्थी शब्द सांग बरं ?? >> रीया आता तो अजून एक बाफ काढेल
अरे बाफ काढण्याचे स्तोम का
अरे बाफ काढण्याचे स्तोम का माजवून ठेवले आहे??? काढू दे बाफ, होऊ दे खर्च!
(No subject)
भा, तू स्तोम माजवण्याचे पण
भा, तू स्तोम माजवण्याचे पण स्तोम माजवून ठेवले आहेस
काढू दे बाफ, होऊ दे खर्च!
काढू दे बाफ, होऊ दे खर्च! >>>>> भा: तू खर्चाचं स्तोम माजवू नकोस हां ............
Pages