क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण गोलंदाजी खराब केली तर त्याला खेळपत्टी काय करणार . शर्मा एकदा ही लेन्थ वर व्यवस्थित टाकली नाही.
स्मिथ ला आपण बेस्ट बॉलिंग टाकलेली त्यानंतर मात्र आपण निराशा केली

काल टीम इंडीया ने फाईट दिलेली पाहून बरं वाटलं. अर्थात, अजुन खूप मोठा पल्ला गाठायचाय. दुसर्या इनिंग मधे बॅट्समेन नी चॅलेंजिंग स्कोअर उभा करून ह्या प्रयत्नांना जोड द्यायला हवी.

आता ऑस्ट्रेलिया जेवढे मारतील तेवढेच आपल्याला तिसर्‍या इनिंगला मारावे लागतील तर किमान त्यांना शेवटच्या इनिंगला २०० चे टारगेट देता येईल. ते टारगेट पुरेसे ठरू शकते, प्रश्न आहे ३०० च्या आसपास धावा आपण मारू का? जर नाही जमले तर उद्या दिवसअखेरीस आपण सामन्याबाहेर फेकलो गेलो असू.. पण जर तसे नसेल तर मंगळवारी सुट्टीच टाकतो Happy

स्त फिरली मॅच. ५ ओव्हर्स मधे ३ विकेटस !>>>

ओकेफी आणि लायन आहेत आता नाचवायला! ८७ धावांची पिछाडी भरून वरती किती बनवतात हे पहाणे मनोरंजक ठरेल!
आता द्रविड- लक्ष्मण नाहीत मधल्या फळीत...

ओकेफी आणि लायन आहेत आता नाचवायला!>>> पोस्ट केल्यावर हेच जाणवलं, म्हणून एडिट करे पर्यंत ही पोस्ट आली Happy

ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्स ची लेंथ बिघडली किंवा आपल्या लोकांना बॅटींगची नॅक सापडली... नॉट आऊट ३८ म्हणजे फार होतायेत.

नजर नको लावूस रे!>>>
हो ना!!
केवळ १० षटके झालीत आणि स्पीनरची ४..
अजून लांबचा पल्ला!! काय होईल कसं होईल!!

जडजेला ते कुठल्या हिल्स तिकडे बुकिंगला जायचे होते टीम साठी म्हणून त्याला आधी पाठविलेले बॅटिंगला!

४ बाद ३३ अशी दुसर्‍या डावाची निव्वळ धावसंख्या!

हुश्श्श्श! इतका वेळ रोखून ठेवलेला मोठ्ठा श्वास सोडला. रहाणे आणि पुजाराने हळूहळू आपल्याला थोडे पुढे नेले आहे. असेच खेळत रहा म्हणावं. एक सिरीज होती. त्यातली पहिली मॅच आपण हरलो होतो, मग दुसर्‍या मॅचमध्येही जातो की काय असं वाटत असताना आपल्या दुसर्‍या डावात नं. ३ आणि नं. ६ बॅट्समेननी ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड घातली होती. तसंच खेळा. Wink

वेल प्लेड रहाणे आणि पुजारा. >>>>>> +१

या सिरीजमध्ये पहिल्यांदा आपण र००+ रन्स केल्या. एकुण लीड आता १२६ रन्सचा आहे. अजून किमान दिडशे ते दोनशे रन्स उद्या आपल्याला कराव्या लागतील असे मला तरी वाटते. उद्याचा दिवस या मॅचचा खर्‍या अर्थाने महत्वाचा दिवस ठरणार.

जडेजाला पुढे का पाठविले असावे?? >> कदाचित लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन साठी.. असेही सध्या तो सोडल्यास दुसरा कोणी लेफ्टी नाहीये.

अगदीच हुश्श झालंय..

मी परत पोस्ट टाकणार होतो पण मोह आवरला

शर्मापेक्षा जाडेजाला जास्त वापरला असता तर लीड कमी मिळाली असती... कोहली चुका फार करतोय शांत डोकं ठेवायला हवे

मग काय!
बॉलिंगमध्ये मागे ठेवला आणि बॅटींगला पुढे पाठवला.... क्या कर क्या रहा है तू कोहली?

वाह! ही फायटींग स्पिरीट पहिल्या टेस्ट मधे दिसलं नव्हतं, जे काल दिसलं. शाब्बास! पण अजुन मोठा पल्ला गाठायचा आहे. ह्या जोडीने आणी खालच्या उरलेल्या बॅट्समेन ने मिळून अजून किमान १२५ रन्स काढायला हव्या. मग चौथी इनिंग जास्त चॅलेंजिंग होईल.

भा, त्या ३ आणी ६ नंबरच्या आणी ह्या ३ आणी ६ नंबरच्या भागीदारीत (अजून २००+ धावांचा फरक आहे) एअ साम्यस्थळ म्हणजे तो ६ नंबरचा खेळाडू आऊट ऑफ फॉर्म होता म्हणून त्याला डिमोट केलं होतं आणी ते त्याला जिव्हारी लागलं होतं, जे त्याच्या खेळीतून त्यानं दाखवून दिलं. काल सुद्धा आऊट ऑफ फॉर्म असलेला आणी (फॉर व्हॉटेव्हर रिझन्स) डिमोट केलेला खेळाडूच ६ व्या नंबर वर बॅटींग ला आलाय. Wink

अजून १००-१५० केले तर मजा येइल.

हा आजचा स्कोअर पाहून कलकत्ता-२००१ ची आठवण आली. तिसर्‍या दिवसअखेर साधारण अशीच स्थिती होती. यावेळचे लक्ष्मण-द्रविड कोण असतील? Happy

उद्या पहिला तास विकेट नाही पडली तर आपण झपकन सामन्यात फेव्हरेट होऊ..

आज व्हॉटसप ग्रूपवर बेंगलोरचा एक मित्र बोल्ला की तिथे पाऊस पडतोय आणि पळून गेला...
खरेच पडला का? पडतोय का?
त्या परीस्थितीत पिचची परिस्थिती काय असेल अंदाज करणे कठीण ..

पण पिच आहे तसाच राहिला तर २२५ चौथ्या डावात.. फार कठीण जाणार ऑस्ट्रेलियाला.. त्यांनीही आतापर्यंत जवळपास २५० च्या आसपासचेच स्कोअर टाकले आहेत, प्रेशर तर येणारच. अ‍ॅटेक करायचा की वेटींग गेम खेळायचा. २२५ चे टारगेट धमाल आणू शकते सामन्यात. हायलाईटस पाहिल्या मगाशी. खेळपट्टीची करामत दिसत होती. ४ विकेटमध्ये एक जडेजा म्हणजे साडेतीन विकेट गेल्या आहेत असे पकडले तर आपण सध्या खूप चांगल्या पोजिशनमध्ये आहोत. फक्त आपल्या शेवटच्या चार विकेट या मालिकेत धडाधड पडत आहेत त्याचे एक टेंशन आहे. आपले शेपूट उद्याही ते सहज गुंडाळतील याचीच शक्यता जास्त आहे. म्हणून ती वेळ यायच्या आधीच रहाणे, पूजारा, नायर या तिघांनी मिळूनच २२५ च्या टारगेटच्या जवळ पोहोचवायला हवे.

बाकी नायरवर उद्या अपेक्षा आहेत. पहिल्या इनिंगला चांगल्या टचमध्ये दिसत होता, पुढे येत बाद व्हायचा मुर्खपणा केला तेवढाच . यावेळी तो टाळला आणि तीच इनिंग कंटिन्यू केली तर ४०-५० महत्वाच्या धावा सहज जोडू शकतो.

सामन्याच्या पहिल्या दिवशी पुजारा म्हणाला होता कि पिचमधे डँप नेस असल्यामूळे बाऊन्स बदलता होता. त्यामूळे विकेट्स जाण्याचे प्रमाण वाढले. पुढच्या इनिंग मधे तसे होणार नाही. काल राहुल म्हणाला कि त्याचे होम पिच असल्यामूळे त्याला अंदाज आहे कि दुसरा नि तिसरा दिवस बॅटींग साठी चांगले असतात. चौथ्या दिवसानंतर स्लो होईल नि बाऊन्स बदलता होईल. प्रश्न असा कि मग चौथ्या इनिंगमधे काय होईल नि आपण पहिली बॅटींग का घेतली असेल ? कदाचित आपण पहिला दिवस राईड करू शकू असा विश्वास वाटला असावा नि चौथी इनिंग खेळणे अधिक कठीण असेल असा कयास असावा.

पावसाचं माहीत नाही, पण ह्याच खेळपट्टीवर २५० जिंकणारी धावसंख्या आणि २०० असतील तर समान संधी असं वाटतंय. २२५चं लक्ष्य थोडं भारताकडे झुकणारं वाटतंय. उद्याचं पहिलं सत्र अर्थातच महत्वाचं.

Pages