क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परत तेच. एकच इनिंग नाहीच ती. भरपूर पॅटर्न आहे. दे हॅव बीन फेलिंग इन शॉर्ट अमाऊंट्स, नॉट जस्ट अ‍ॅज कॅटॅस्ट्रॉफिकली, बीकॉज अश्विन/जडेजा/जयंत ह्यापैकी कोणीतरी खेळून वेळ मारून नेली, असे होत होते. ह्यावर उपाय केला गेला नाही असे म्हणतो, कारण तो पॅटर्न सस्टेन्ड ओव्हर थ्री डिफरंट सीरीज आहे, आणि कोणी त्याविषयी काही म्हणतानाही दिसलेले नाही. मेंटल कॉन्सन्ट्रेशन कोहली वगळता बाकीच्यांचे तेवढे होत नाही, असे मला वाटते. जे स्पेशली प्रेशर सिच्युएशनमध्ये दिसते आहे. रहाणे अर्ली इनिंगमध्ये टेंटेटिव्ह असणे नित्याचे आहेच. विजयचा माँकनेस सध्या तेवढा दिसत नाही. त्याचे स्कोअर्स इंग्लंडच्या सिरीजमध्ये १२६, ३१, २०, ३, १२, ०, १३६, २९ (नॉट टेकिंग बांग्लादेश इन अकाऊंट, दे डोन्ट हॅव द बोलिंग) असे आहेत. त्यातले १२६ राजकोटच्या पहिल्या इनिंगमध्ये रनफेस्टमध्ये आहेत. त्यानंतर एक सेंच्युरी मुंबईतली वगळता त्याची कामगिरी काही खास नाहीये. बट नोवन रेजेस अ क्वेश्चन अबाऊट इट. तू नुसत्या 'धावा काढल्या आहेत', 'मोठी इनिंग खेळत आहेत' असे म्हणणे हा परसेप्शनचा भाग झाला. बट इट हॅज टू बी बॅक्ड बाय देअर अ‍ॅक्च्युअल नंबर्स, जे मी वरती दिलेले आहेत. स्पेशली डेड रबर्समध्ये फेदरबेड्सवर मोठ्या इनिंग खेळणे, आणि सिरीजच्या पहिल्या टेस्टमध्ये ताज्यातवान्या बोलर्ससमोर चॅलेंजिंग पिचवर सेकंड आणि फोर्थ इनिंग खेळणे ह्यात खूप फरक आहे. इंग्लंडसमोर राजकोटमध्ये फोर्थ इनिंगमध्ये तेच झाले. इथे आता सेकंडमध्ये तेच. जर पाच बोलर्स असतील, तर टॉप ऑर्डरने जास्त अ‍ॅप्लिकेशनने खेळलेच पाहिजे. ते अ‍ॅप्लिकेशन काही ह्या परफॉर्मन्सेसमधून दिसत नाही.

तू नक्की माझ्या कुठल्या मुद्द्यावर वाद घालतो आहेस तेच मला कळत नाहीये. मी "टॉप ऑर्डर पारटनर्शिप करत नाहिये किंवा जर पाच बोलर्स असतील, तर टॉप ऑर्डरने जास्त अ‍ॅप्लिकेशनने खेळलेच पाहिजे" हे मान्य आहे हे वर लिहिलेले आहे पण तू म्हणतोस तसे as a batsman they are failing हे मान्य नाही हे वरती दिलय जे तुझ्याच पोस्ट मधल्या (perception बाजूला ठेवून) त्यांनी लोअर ऑर्डर बरोबर धावा काढल्या आहेत ह्या विधानावारच आधारून. कोहली, विजय, पुजारा, राहुल सर्वांनी धावा काढलेल्या आहेत. तू विजयबद्दल ८ इनिंग्स लिहून फक्त दोन शतके मारली अशा आकडेवारी मधे जातोयस तर पुजारा नि विजय नि किती वेळा कोहलीला नवा बॉल खेळण्यापासून वाचवलेले आहे हेही बघ. त्या दोघांनी खालेला वेळ बघ. Top Order चा भाग म्हणून त्याचे मह्त्व धावांमधे कसे धरशील ? ( नुसत्या धावा फसव्या असतात असे तू कोहली रूट विल्यिअम्सन ह्यांच्या तुलनेच्या वेळी म्हणत होतास.) नायर नि साहा हे बॅट्समन म्हणून पण (हा साहासाठी) संघात आहेत त्यांच्या धावाही मह्त्वाच्या आहेत. हि इनिंग इतर इनिंगपेक्षा वेगळी ह्या कारणामूळे म्हणतोय कारण ह्या वेळी दोन्ही orders ची घसरगुंडी झाली आहे. पण हे असे बर्‍याच काळानंतर झाले आहे. त्यमूळे ह्या इनिंगसारखाच पॅटर्न प्रत्येक सामन्यात दिसेल अशी पॅनिकी परिस्थिती नाहि हा माझा मूळ मुद्दा आहे. (माझ्याकडे crystal ball नसल्यामूळे हे perception च आहे Happy ) माझे पहिले पोस्ट ज्याचे एकमेव वाक्य घेऊन तू पुढे लिहितोयस ते परत बघ.

"ह्या वेळी रांग लागली म्हणून दर वेळी लागेलच असे धरून का बसायचे ?" - असामी, ह्या ईनिंग मधे झालेल्या पडझडीबद्दलच चर्चा सुरू होती (भास्कराचार्यांनी वेगळा मुद्दा उपस्थित करेपर्यंत - ज्याच्याशी, बाय द वे, मी सहमत आहे). दर वेळी असं होईलच अशा अर्थाचं कुणी काही म्हटलं असेल, तर मी ते मिस केलं.

भास्कराचार्य, सहमत आहे. हा पॅटर्न जाणवला सुद्धा होता. विजय-पुजारा भागीदारी, कोहली चा individual brilliance, लोअर ऑर्डर चं रेस्क्यू ऑपरेशन आणी मग स्पिनर्स चं जाळं हा पॅटर्न कधीतरी, कुणीतरी ब्रेक करणार होतच. आता उत्सुकता ही आहे की ह्याला आपण प्रत्त्युत्तर कसे देतो.

भास्कराचार्यांनी वेगळा मुद्दा उपस्थित करेपर्यं >> धन्यवाद फेफे. तो मुद्दा वेगळा आहे हे नमूद केल्याबद्दल. माझ्या पहिले पोस्ट आधी अमोल, नंद्या ह्यांच्या पोस्टला अनुसरून मी लिहिले होते. "दर वेळ" चा मुद्दा पुढे भा च्या पॅटर्न वरून आला. मला ११ मधले ९-१० जण बॅटींग मधे सपशेल फेल गेल्याचा पॅटर्न गेल्या दोन सीझन मधला तरी आठवत नाहीये त्यामूळे इतरर कुठल्याही पॅटर्न वरून ह्याबद्दल अनुमान बांधणे धाडसी वाटते.

त्यांनी धावा केलेल्याच नाहीत. २००/६, १०० च्या आत ४ गडी बाद होणे कन्सिस्टंटली मीन्स ते धावा करत नाहीयेत. ह्या मुद्द्यावर मी वाद घालतो आहे. तू नुसतेच म्हणतो आहेस 'धावा करतात' म्हणून. कसोटीमध्ये ४००+ करायचे असतील सेफ्टी एनशुअर करायला, तर ३००/५ इज मोअर लाईक इट. होम पिचेसवर वॉर्नर आणि स्मिथ अपोझिशनला जे तोडतात, ते बघता आपला परफॉर्मन्स वीक आहे. अगदी त्या लेव्हलला नाही, तरी ओपनर्सनी हाफ सेंच्युरी मारावी, विकेटलेस लंचपर्यंत घेऊन जावे, असे फार घडलेले नाही. विजयच्या सेंच्युर्‍या सोडता त्याचा हायेस्ट स्कोअर ३१ आहे.

<<तर पुजारा नि विजय नि किती वेळा कोहलीला नवा बॉल खेळण्यापासून वाचवलेले आहे हेही बघ. त्या दोघांनी खालेला वेळ बघ.>> हे तू मला आकड्यांत सांग. मी तुझा मुद्दा स्वतःलाच कसा समजावून देऊ?! तुला वेळ मिळेल तेव्हा सांग. Happy पण तुझ्या पर्सेप्शनमधून आलेल्या फक्त क्वालिटेटिव्ह बोलण्यापेक्षा मी ६ विकेट डाऊन झाल्या तेव्हा स्कोअर किती होता? (आणि किती बॉल खाल्ले? फॉर युवर मुद्दा) अशा आकड्यांनी मला जास्त माहिती मिळते. आता विजयचा हायेस्ट नॉन-सेंच्युरी स्कोअर ३१ असेल, तर त्याने असे किती बॉल खाल्ले असतील? त्याच्यासमोर राहुल असेल, तर तो तर बॉल खाण्याबद्दल प्रसिद्धही नाही.

त्याचबरोबर डेड रबर सिच्युएशनमध्ये फ्रीली रन करणारे लोक टॉप ऑर्डरमध्ये असले, तरी चॅलेंजिंग पिच आणि गेम सिच्युएशनविरुद्ध आपल्या टॉप ऑर्डर लोकांचे अ‍ॅप्लिकेशन वीक आहे, ह्या मुद्द्यावर मी वाद घालतो आहे. त्याबद्दलही तू काहीच म्हटलेले नाहीस.

बेसिकली, लोअर ऑर्डर टॉपला सारखी बेल करायला लागता कामा नये, जे कन्सिस्टंटली होते आहे. तू सोडून बाकीच्यांना हे बर्‍यापैकी पटते आहे. Happy तुला लोक आज पॅनिक झाले आहेत, असे वाटते आहे. पण लोक कन्सर्न्ड होण्यासाठी आधीच्या सिरीजमध्येही रिझन्स इनफ आहेत, फक्त ती जिंकण्यामुळे इतके प्रकर्षाने जाणवत नव्हती, असे मला फा च्या कमेंटवरून वाटले.

कोहली रूट इ. मुद्द्यावर - सातत्याने धावा करणार्‍या चार ग्रेट्समध्ये कोण श्रेष्ठ ही तुलना करणे, आणि धावाच कन्सिस्टंटली न करणारी टॉप ऑर्डर ह्यांच्या परफॉर्मन्सचे मूल्यमापन, हे दोन्ही समान आहेत, असे मला वाटत नाही. Happy

नायर नि साहा हे बॅट्समन म्हणून पण >> नायर? तो तर दोनच मॅचेस खेळून आता बाहेरही आहे. साहा बॅट्समन म्हणून असला, तरी त्याच्याकडून गिलख्रिस्ट बनण्याची अपेक्षा न ठेवता मी टॉप ऑर्डरचे अ‍ॅप्लिकेशन ऑफ माईंड बघेन. आय वुड रादर साहा टेक्स ब्रिलियंट कॅचेस लाइक द वन येस्टरडे. त्याने करायला हवी बॅटिंग, पण अ‍ॅज अ डिमांड एव्हरी गेम म्हणून नाही. ते बघण्याची जबाबदारी वरच्या लोकांनी घ्यायला हवी. एनीवे मला ह्या कमेंटचा रिलेव्हन्स जरा कळला नाही.

'दर वेळी रांग लागेल' ह्यात आता रांग म्हणजे काय ते सब्जेक्टिव्ह आहे, व लेव्हल ऑफ फीअर सब्जेक्टिव्ह आहे. जर तुम्ही ९/१० बॅट्समेनची रांग इतके स्पेसिफिक म्हणत असाल, तर ते दर वेळी होणार नाही, हे मी मान्य करतो. पण अगेन्स्ट बेटर बॉलर्स कॅपेबल ऑफ अप्लायिंग द स्क्वीझ अ‍ॅन्ड ट्राय फॉर विकेट्स, १५०/५ होणे हे काही फार चांगले नाही. ९/१० बॅट्समेनचा कोलॅप्स न होताही सिरीज ०-४ हरता येऊ शकते.

ओके, स्पेसिफिक प्रतिसादांना उद्देशून होती कमेंट. Happy सॉरी ते नाही कळले मला. एनीवे, आपल्याकडे आता काय उत्तर असेल बघू.

पुजारा नि विजय पार्टरनर शिप च्या मह्त्वाबद्दल, तुझ्या वरच्या पोस्टच्या वर आलेले फे फे नि माझे पोस्ट बघ. आम्ही दोघे एकमेकांना ओळखतही नसताना त्याचा उल्लेख झालाय. क्रिकैंफो वर संबित बाल किंवा कोणत्या तर regular लिहिणार्‍या देशी ऑथरचा ह्यावर बांग्लादेश सिरीजच्या आधी लेख (आकडेवारीसकट) होता. तू शोधू शकतोस. मला वेळ मिळाला कि लिंक शोधून देईन.

भा मी हे लिहिपर्यंत तुझी वरची पोस्ट आली म्हणून इथले बाकीचे उडवतोय. आपले मुद्दे एकमेकांना लक्षात आलेत असे दिसतेय.

आता क्रिकइन्फो वर मागचे स्कोअर्स पाहावे लागतील. बिग-५ च्या जमान्यात मागच्या काही टेस्ट्स मधे सर्वांचे पॅटर्न पाठ असत Happy

भा, मला वाटतं, विजय आणी राहूल ची एकही (कि गेल्या अनेक मॅचेस मधे एकही) ५० ची पार्टनरशीप नाहीये. टेस्ट साठी चांगली, कन्सिस्टंट ओपनिंग हवी, ज्यात मोठ्या स्कोअर चा पाया रचणं, मधल्या फळीवरचा दबाव कमी करणं, बॉल जुना करणं आणी बॉलर्स ना दमवणं हे सगळे हेतू आहेत.

विजय आणी राहूल नि धवन (पार्थीव) ह्यांच्यामधे विंडीज टूरपासून काहि ना काही कारणांसाठी सूरपाट्या सुरू आहेत.

भाचा, आपले पहिले पाच त्यांच्या क्षमतेप्रमाणे सातत्याने बॅटिंग करत नाहीयेत (कोहली सोडून) ह्या मुद्द्याला +१
रच्याकने, तो स्मिथ कसला तुडतुडा आहे, एक सेकंद स्थिर राहत नाही एका जागी... Happy

भारताच्या पहिल्या डावातील एकूण धावसंखेपेक्षा जास्त स्मिथ च्या एकट्याच्या तिसऱ्या डावात धावा! स्मिथ आपल्या पेक्षा चांगले स्पीन खेळू शकतो किंवा आपले स्पीनर ओकेफे पेक्षा निकृष्ट आहेत!!

भा, मला वाटतं, विजय आणी राहूल ची एकही (कि गेल्या अनेक मॅचेस मधे एकही) ५० ची पार्टनरशीप नाहीये. टेस्ट साठी चांगली, कन्सिस्टंट ओपनिंग हवी, ज्यात मोठ्या स्कोअर चा पाया रचणं, मधल्या फळीवरचा दबाव कमी करणं, बॉल जुना करणं आणी बॉलर्स ना दमवणं हे सगळे हेतू आहेत. >> एक्झॅक्टली फेफ.

भारताच्या पहिल्या डावातील एकूण धावसंखेपेक्षा जास्त स्मिथ च्या एकट्याच्या तिसऱ्या डावात धावा! स्मिथ आपल्या पेक्षा चांगले स्पीन खेळू शकतो >> आय थिंक ह्या सिरीजमध्ये कोहली विरुद्ध स्मिथ ही डिबेट सध्या काही काळापुरती सेटल होईल. ह्या पिचवर स्मिथने भारतीय स्पिनर्ससमोर जी कामगिरी केली आहे, त्यामुळे पारडे त्याच्या बाजूने खूपच झुकले आहे. मितचे म्हणणे बरोबर आहे. एकदम एजाईल प्लेयर आहे स्मिथ. खूपच एफिशियंट. त्यातून त्याला ४ जीवदानेही दिली आपल्या लोकांनी सढळ हाताने.

राहुलने चेन्नईच्या पिचवर १९९ मारुन घेतल्याने त्याला काही म्हणता येत नाही. बट रिसेंटली आय हॅव बीन वंडरींग की पार्थिवला प्युअर ओपनिंगच्या पोझिशनला घेतले जाऊ शकते का. लेफ्ट-राईट काँबिनेशनही होऊन जाईल लगे हाथ.

ही मॅच हारलो आहोत.
फक्त किती धावांनी हारणार आहे हे फक्त निश्चित व्हायचे बाकी आहे.

बेसिकली २०१२ इंग्लंड सिरीज आणि ही मॅच ह्यातून असे दिसते, की पोस्ट-बिग ४ एरामध्ये खूप स्पिन फ्रेंडली पिचेस आणली, की त्याचा परिणाम उलटाच अपोझिशन स्पिनर्सना गेममध्ये आणण्यात होतो, तर आपले स्पिनर्स त्यांच्या नॅचरल स्पिनमुळे चेंडू गरजेपेक्षा जास्त वळवायला लागतात, ज्यामुळे बॅट बीट होते, पण विकेट्स मिळत नाहीत. आणि आपल्या सध्याच्या बॅट्समेनकडे टफ पिरीयड्स खेळून काढण्याचे अ‍ॅप्लिकेशन अजून नाही. त्यामुळे ह्या सिरीजमध्ये पुढे नॉर्मल इंडियन बॅटिंग पिचेस असली, तरच आपल्याला काही फायदा होऊ शकेल. फाईंड वेज ऑफ गेटींग वॉर्नर अ‍ॅण्ड स्मिथ ऑन नॉर्मल हेल्पफुल पिचेस रादर दॅन एक्स्पेक्टींग द पिच टू डू इट फॉर यू.

६/९९

पहिल्या डावातील सातत्य राखले ४ तासात डाव संपेल!!

६/९९

पहिल्या डावातील सातत्य राखले ४ तासात डाव संपेल!! >> येस. असामी कहाँ है? कहाँ है असामी? Proud Light 1 (हे वाक्य गब्बरच्या आवाजात वाचावे.)

Pages