पाकिस्तान मधील अतिरेकी तळ उध्वस्त

Submitted by विक्रमसिंह on 29 September, 2016 - 04:58

भारताने इतिहासात प्रथमच पकिस्तानातील अतिरेकी अड्डे नष्ट करण्यासाठी यशस्वी कारवाई केली याबद्दल भारत सरकारचे अभिनंदन. या कारवाई मुळे पाकिस्तानला जरब बसेल व त्यातून योग्य तो धडा घेतला जाईल अशी आशा. आपण सर्वांनी यासाठी पाठिंबा दिला पाहिजे व जरूर पडल्यास लागेल ती मदत देण्यास तयार राहीले पाहिजे.

सरकारला व आपणाला पाकिस्तानच्या कारवाया थांबवण्यासाठी अजून काय करता येईल यावर आपली मते या धाग्यावर मांडावीत ही विनंती.

जयहिंद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखाद्या घटनेचा स्वत:च्या सोयीनुसार अर्थ काढुन आपलीच टिमकि वाजवत राहणं हा तथाकथीत निर्बुद्धवादि आणि अविवेकवाद्यांचा स्थायीभाव आहे. आजकाल साला हसु हि येत नाहि त्यांच्या प्रतिक्रियेवर...

http://m.maharashtratimes.com/nation/india-conducted-major-surgical-stri...

कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळातही भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केले होते. पण त्यावेळच्या सरकारने गोपनियता राखत ही बाब सार्वजनिक न करण्याचा निर्णय घेतला होता. जानेवारी २०१३ मध्ये भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा पार करून सर्जिकल स्ट्राइक केले होते, असा दावा माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. 'मेल टुडे' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली

एखाद्या घटनेचा स्वत:च्या सोयीनुसार अर्थ काढुन आपलीच टिमकि वाजवत राहणं हा तथाकथीत निर्बुद्धवादि आणि अविवेकवाद्यांचा स्थायीभाव आहे. आजकाल साला हसु हि येत नाहि त्यांच्या प्रतिक्रियेवर..

<<

सहमत.

<<<<<<< एखाद्या घटनेचा स्वत:च्या सोयीनुसार अर्थ काढुन आपलीच टिमकि वाजवत राहणं हा तथाकथीत निर्बुद्धवादि आणि अविवेकवाद्यांचा स्थायीभाव आहे. आजकाल साला हसु हि येत नाहि त्यांच्या प्रतिक्रियेवर.. >>>>>..

प्रचंड सहमत !!

<<<<<<<जानेवारी २०१३ मध्ये भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा पार करून सर्जिकल स्ट्राइक केले होते, असा दावा माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. >>>>>>>>

या अगोदर सुद्धा ह्याच चिदंबरम साहेबांनी "काँग्रेसने कधीच भ्रष्टाचार केला नाही " असा दावा सुद्धा केलेला होता.

Friend, father & philosopher of black money is Chidambaram
http://www.sunday-guardian.com/analysis/friend-father-a-philosopher-of-b...

Vasan Eye Care Scam: How Express Exposed Chidambaram's Lies
http://www.newindianexpress.com/nation/2016/apr/26/Vasan-Eye-Care-Scam-H...

आताश्या मिडीयात ( उजेडात ) नसल्याने काहीतरी कॉमेंट देऊन लाईमलाईट मध्ये यायचे प्रयत्न चालु आहेत या साहेबांचे !!

>>>> राज | 3 October, 2016 - 19:22

एखाद्या घटनेचा स्वत:च्या सोयीनुसार अर्थ काढुन आपलीच टिमकि वाजवत राहणं हा तथाकथीत निर्बुद्धवादि आणि अविवेकवाद्यांचा स्थायीभाव आहे. आजकाल साला हसु हि येत नाहि त्यांच्या प्रतिक्रियेवर...
<<<<

ह्या विधानातील 'तथाकथित' हा शब्द अनावश्यक आहे.

हा धागा निघाला तेव्हाच एका वाहत्या पानावर मी संभाव्य प्रतिक्रियांची एक यादी दिली होती. ती इतक्या लवकर खरी ठरेल असे मलाही वाटले नव्हते. तर, ती यादी:

१. असे हल्ले आधीही झालेले होते. आम्ही गाजावाजा केला नव्हता.
२. उत्तर प्रदेशच्या निवडणुका समोर असल्यामुळे हे करण्यात आलेले आहे/
३. प्रत्यक्षात असे काहीही झालेले नाही. नुसत्या अफवा आहेत.
४. आपले कित्येक जवान ह्या कारवाईत मेले.
५. कारवाई केली लष्कराने, श्रेय घेतंय सरकार!
६. अफगाणिस्तानातून मास्टर स्ट्रोक मारायला कशाला गेले होते मग?
७. देशात काय चालले आहे ते बघत नाहीत, इतरत्र भटकून भांडत बसतात.
८. पाक ऑक्युपाईड कश्मीर हा पाकिस्तान नव्हे, भारतच आहे. ही एक अंतर्गत कारवाई आहे. (जे टेक्निकली वगैरे बरोबर असले तरी राजकीय व भावनिकदृष्ट्या चुकीचे आहे) (मात्र धाग्याचे शीर्षक बदलायला हवे हे बरोबर)

वगैरे वगैरे!

त्यात एक लेटेस्ट अ‍ॅडिशन!

महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग स्वीकारलेला होता. आपला देश प्रथमच त्या विचारापासून दूर गेलेला दिसत आहे. हे चांगले नाही.

एकुणात काय?

संसद, मुंबई, पठाणकोट वगैरे ठिकाणी होऊदेत हल्ले! फक्त तीव्र निषेध व्यक्त करायचा. फक्त 'भूमीसाठी मेलेल्यांबद्दल आदर' व्यक्त करायचा. 'आत घुसून मारणारे' आदरपात्र नसतात.

गेल्या कैक दशकांत पहिल्यांदा कुठे देशभावना जागृत होत आहे तर हे निगरगट्ट आणि नतद्रष्ट (खरे नतद्रष्ट, लिमये नव्हेत) इथेही घाण करणारच. टण्या म्हणतात तसे 'जाहीर करण्यातून दिला गेलेला संदेश' ह्यांच्यामते चुनावी जुमला!

रणवीर सिंह, अजित डोवाल हे सगळे बेअक्कल आणि स्वतःचा टी आर पी वाढवू पाहणारे!

कारवाई झालीच नाही असे म्हणणार्‍या पाकिस्तानच्या मीडियाच्या घरी परिपक्वता आणि पारदर्शकता पाणी भरतात. भारतीय मीडिया 'विकली' गेलेली!

मोदी सरकारला म्हणाव आंतरराष्ट्रीय राजकारण सोडऊन बटाट्याच्या फॅक्टर्‍या काढा. निदान बेरोजगारी तरी संपेल.

मोदी सरकारला म्हणाव आंतरराष्ट्रीय राजकारण सोडऊन बटाट्याच्या फॅक्टर्‍या काढा. निदान बेरोजगारी तरी संपेल.

<<

याच्याशी अत्यंत सहमत !

रणवीर सिंह, अजित डोवाल हे सगळे बेअक्कल आणि स्वतःचा टी आर पी वाढवू पाहणारे!
<<

प्रचण्ड सहमत!! +१००००००

कारवाई झालीच नाही असे म्हणणार्‍या पाकिस्तानच्या मीडियाच्या घरी परिपक्वता आणि पारदर्शकता पाणी भरतात. भारतीय मीडिया 'विकली' गेलेली!>>>
अरे पण भारतीय मिडिया विकली गेली आहे, प्रेस्टिट्युट इ. तर भक्तां चे कॉपीरायटेड क्लेम्स आहेत ना Wink आता भक्तांना अचानक भारतीय मिडिया पारदर्शक, विश्वास ठेवण्यालायक दिसायला लागली तर द्वेष्ट्यांना भारतीय मिडिया फारसे विश्वासार्ह नसल्याचा साक्षात्कार झाला. Lol
एकुण काय? आपल्या फायद्यापुरते बिंदास वाट्टेल ते आरोप दोन्ही बाजुचे लोक करत असतात. दो न्ही बाजुंना आपापल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण समोरच्याचे कुसळ दिसते. माझे हे निरिक्षण कधी खोटे ठरेल असं वाटत नाही.

युद्धास आतुर असलेल्या भक्तांना सर्वात पहिले सीमेवर पाठ्वले पाहिजे.

>>>> झाडू | 3 October, 2016 - 20:56 नवीन

रणवीर सिंह, अजित डोवाल हे सगळे बेअक्कल आणि स्वतःचा टी आर पी वाढवू पाहणारे!
<<

प्रचण्ड सहमत!! +१००००००
<<<<

येथे उपरोधिकपणे लिहिलेल्या वाक्यांशी सहमती दर्शवून, सीमेपलीकडे जाऊन, प्राणांची पर्वा न करता शत्रूची धुलाई करणार्‍यांवर टीका करण्यात येत आहे. आपण ज्या देशात राहतो त्या देशाच्या सुरक्षिततेसाठी सर्वस्वाचा त्याग करणार्‍यांची छी थू करण्यात येत आहे. असली वक्तव्ये करणार्‍या सदस्यांना कदाचित येथील प्रशासन माफ करेलही, पण असेच लोक ही भूमी अतिरेक्यांना त्यांच्या कारवायांसाठी केव्हाही उपलब्ध आहे हे स्वतःच्याही नकळतपणे सांगत असतात. खेदजनक बाब आहे ही!

किंबहुना, ही वृत्तीच देशात कित्येक अतिरेकी कारवाया घडवून आणण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करते.

झालेल्या घटनेत सहभाग घेण्याची छाती येथे कोणाचीही नाही. पण झालेल्या घटनेवर 'असे काही घडलेच नाही' किंवा 'हे तर केव्हापासून होत होते, कसली आलीय देशभावना' असे प्रतिसाद येणे हे कंप्लीटली अनाकलनीय आहे.

श्रीमती सोनिया गांधींनीही ह्या प्रकरणी अत्यंत योग्य स्टेटमेन्ट दिलेले आहे. मात्र त्यांचे अनुयायी आजही पक्षीय राजकारणापलीकडे विचार करत नाहीत ह्यातून सूज्ञांनी जे समजायचे ते समजून घ्यावे.

वुई शूड बी अ‍ॅक्च्युअली फायटिंग विथ द इन्टर्नल एनिमिज, रादर दॅन पाकिस्तान!

<<<< युद्धास आतुर असलेल्या भक्तांना सर्वात पहिले सीमेवर पाठ्वले पाहिजे. >>>>>>

तेवढा वेळ आहे ? कारण युद्द अगोदरच तुमच्या दारी येउन उभ ठाकल आहे !!
मुंबई , दिल्ली (पार्लमेंटचा हल्ला) झालेल आहेच आता बघु या अजुन कुठल शहर येतय लिस्टवर !

मुंबई , दिल्ली (पार्लमेंटचा हल्ला) झालेल आहेच आता बघु या अजुन कुठल शहर येतय लिस्टवर !>> तुम्हाला कदाचित माझ्यापेक्षा जास्त "आतली" माहिती असेल. पण जरी हे खरं मानलं तरी भक्तांनी आपल्या नोकर्‍याधंदे सोडून सीमेवर जायला काय हरकत आहे? भक्त आणि आर्मी सोडून इतरांना राष्ट्रद्रोही ठरवलेलंच आहे त्यामुळे आता भक्तांनी सीमेवर लढून आपली राष्ट्रभक्ती सिद्ध करावी असं माझं मत आहे.

>>>>भक्तांनी आपल्या नोकर्‍याधंदे सोडून सीमेवर जायला काय हरकत आहे?<<<<

माफ करा, तुमच्या आणि जाधवांच्या चर्चेत पडण्याबद्दल!

पण हे वाक्य आपण 'कुठून' बोलता आहात? 'काय फरक पडतो' नावाच्या देश आणि शहरातून ना?

तुम्ही ज्या देशातून आणि शहरातून बोलता, ते वाचून कोणालाही काहीही फरक पडत नाही. Wink

आपण 'कुठून' बोलता आहात?>>> पर्सनल व्हायची गरज का पडली? मी कुठूनही बोलत असले तरी माझी अपेक्षा काही चुकीची नाही. ज्यांना युद्ध हवे आहे, त्यांची लढायला जायची तयारी हवीच.

>>>>मी कुठूनही बोलत असले तरी माझी अपेक्षा काही चुकीची नाही. ज्यांना युद्ध हवे आहे, त्यांची लढायला जायची तयारी हवीच.<<<<

पर्सनल तुम्ही झालात.

तुमच्या 'पर्सनल' विधानाचा प्रतिवाद करणे हे पर्सनल होणे नाही.

जगातला कोणताही देश तपासा. लढणारे वेगळे असतात आणि देशात गुजराण करणारे वेगळे. लढणार्‍यांचा आदर मात्र व्यवस्थित ठेवला जातो.

'भक्तांनी सीमेवर जावे' हे (वरवर दिसायला जरी एका समूहाबद्दलचे विधान असले, तरीही) सध्या येथील एका सदस्याला उद्देशून केलेले विधान आहे आणि ते वैयक्तीक रोख असलेलेच आहे.

कृपया स्वतः पर्सनल होणे बंद करा अशी विनंती! Happy

सीमेपलीकडे जाऊन, प्राणांची पर्वा न करता शत्रूची धुलाई करणार्‍यांवर टीका करण्यात येत आहे. आपण ज्या देशात राहतो त्या देशाच्या सुरक्षिततेसाठी सर्वस्वाचा त्याग करणार्‍यांची छी थू करण्यात येत आहे. असली वक्तव्ये करणार्‍या सदस्यांना कदाचित येथील प्रशासन माफ करेलही, पण असेच लोक ही>>
बेफिकीर.....इमोशनल drama सोडून बोला हो,

झालेल्या कारवाई ला कोणीच वाईट म्हणत नाही आहे, हि बाब तुम्ही सोयीस्कर पणे नजरे आड करत आहात,
दुसरी गोष्ट म्हणजे, कोणालाही उलट प्रश्न विचारणे म्हणजे त्याची छि थु करणे नव्हे, हे प्लिज समजून घ्या, ( लोंगेवाला च्या लढाईवर पण त्याच लढाईत लढलेल्या पायलट ने शंका व्यक्त केली होती, सो लोकांना शंका विचारायचा पूर्ण अधिकार आहे).
केवळ, ते सैनिक आहेत,देशासाठी प्राण देऊ शकतात म्हणून ते म्हणतील ते बरोबर, आणि सत्य आणि त्यांना शंका विचारणारे ब्लास्फेमी करत आहेत असा आव आणू नका,

सेना आणि सरकार यांच्या निवेदनात मूलभूत फरक आढळले आहेत, त्यामुळे लोकांना शंका येणारच, (त्यात मोदी सरकारच्या खोटे बोलण्याचे ट्रॅक रेकॉर्ड पाहता, अशी शंका येणे justified आहे)

कैच्याकै!
ते तुम्हाला किंवा इतर कोणाही एका व्यक्तीला उद्देशून केलेले विधान नाही. युद्धाला आतूर असणार्‍या भक्तांच्या ऑनलाइन फौजांना उद्देशून केलेले आहे. तुम्हाला हवे तर घ्या पर्सनली. तुमची इच्छा.

>>>>युद्धाला आतूर असणार्‍या भक्तांच्या ऑनलाइन फौजांना उद्देशून केलेले आहे. तुम्हाला हवे तर घ्या पर्सनली.<<<<

'भक्त' हा शब्द कोणाला उद्देशून आहे, ह्या विधानातील?

आणि 'त्या तथाकथित भक्तांशिवाय' कोणालाच असे वाटत नाही की वचपा घ्यावा, असा अर्थ आहे का ह्या प्रतिसादाचा?

========

सिम्बा की जे कोण असाल ते,

'अनुल्लेख'!

(हवे ते लिहीत राहा, असा त्याचा दुसरा अर्थ)

'पहिल्यांदाच असे घडते आहे', पहिल्यांदाच देशभावना जागृत होते आहे' असा 'पहिल्यांदा पहिल्यांदा'चा (खरे तर पहिलटकरणीचा- कारण पहिलटकरणीला सगळीच नवलाई असते.) सूर का लावला जातोय? हे आधीही घडलेले आहे, फक्त गवगवा आणि जयघोष न करता. श्री लिंबूटिंबू यांच्या धाग्यावर चिनूक्स यांनी एकदोन लिंक्सही दिलेल्या आहेत.

>>सेना आणि सरकार यांच्या निवेदनात मूलभूत फरक आढळले आहेत, त्यामुळे लोकांना शंका येणारच,<<

देर यु गो अगेन...

ले.ज. रणबीर सिंग आणि विकास स्वरुप यांचं जाॅइंट स्टेटमेंट काय होतं मग?..

>>>> हे आधीही घडलेले आहे, फक्त गवगवा आणि जयघोष न करता<<<<

हे केव्हाच आणि प्रत्येकवेळी व्हायला हवे होते.

गवगवा, जयघोष, ह्यांचा काही त्रास होत आहे का? देशासाठी केल्या गेलेल्या गोष्टी आहेत ह्या! काही त्रास होत आहे का?

>> हे आधीही घडलेले आहे<<

ते टॅक्टिकल लेवलला. पहिल्यांदाच पोलिटिकल विल नुसार हल्ले झाले हा मुद्दा बराच खटकत आहे का?.. Happy

'भक्त' हा शब्द कोणाला उद्देशून आहे, ह्या विधानातील?>> भक्तांना.

तथाकथित भक्तांशिवाय' कोणालाच असे वाटत नाही की वचपा घ्यावा, असा अर्थ आहे का ह्या प्रतिसादाचा?>>> वाटते सगळ्यांनाच. त्यासाठी इतर स्ट्रेटेजिक उपायही आहेत. मोदी सरकार किंवा कोणतेही सरकार ते नक्कीच आधी विचारात घेईल. पण युद्धाची इतकी विकृत आतूरता भक्तांतच दिसतेय. युद्धामुळे देशाचे होणारे नुकसान, सैनिकांच्या प्राणाचे मोल हे सेल्फ प्रोक्लेम्ड राष्ट्रभक्तांना कळू नये याचे आशचर्य वाटते.

गेल्या कैक दशकांत पहिल्यांदा कुठे देशभावना जागृत होत आहे

हायला ! म्हणजे आमचे आजोबे पणजोबे देशद्रोहीच होते म्हणायचे ! बिच्चारे ! राष्ट्रभावनेशिवायच जगत होते !

२०१४ मे नंतर अचानक देशभावना जागी झाली ! आमची पिढी किती भाग्यवान !

आणि ते संसद हल्ला ... ते नेम्के कोणाच्या कारकिर्दीत घडले होते ?

हायला ! म्हणजे आमचे आजोबे पणजोबे देशद्रोहीच होते म्हणायचे ! बिच्चारे ! राष्ट्रभावनेशिवायच जगत होते !

<<
तीर्थरूप राहिले. त्यांनाही इन्क्लूड करा.

- (परम)भक्त

अनुभव हा अनुभव असतो. कुठे साठ वर्षे आणि कुठे पाच सात वर्षे. त्यानुसार मोदी सरकार तसे खूप अपरिपक्व आहे. लक्ष वेधून घेण्यासाठी छोट्या मोठ्या गोष्टींचा गवगवा करण्याची सवय टीन एज मधल्या नवख्या पोरांना असते. म्हणूनच तर वर्षनुवर्षे गोपनीयता पाळून केले गेलेले हल्ले अचानक देशभरच्या चर्चेचा विषय होतात. कधी नव्हे तो उंट पाहिला अन लोकांना वाटले परमेश्वरच अवतरला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा "हल्ले करणारा देश" अशी होऊ नये म्हणून याबाबत आजवर प्रचंड गोपनीयता पाळली गेली. पण यावर्षी स्वत:ची देशांतर्गत प्रतिमा उजळविणासाठी त्या गोपनीयतेच आणि प्रतीमेचीच होळी केली.

वाचा: युपीए सरकारनेही केले होते सर्जिकल स्ट्राइक: चिदंबरम

नताशा, सहमत.

सिम्बा, अहो शन्का घेणं वा उलट प्रश्न विचारणं याला विरोध नाहीये. पण इथे शन्का कोण घेतंय?सिंग आणि डोवाल हे बेअक्कल आणि टीआरपीच्या मागे असं थेट verdict च दिलं गेलंय..वाचलं नाही का?

Pages