Submitted by विक्रमसिंह on 29 September, 2016 - 04:58
भारताने इतिहासात प्रथमच पकिस्तानातील अतिरेकी अड्डे नष्ट करण्यासाठी यशस्वी कारवाई केली याबद्दल भारत सरकारचे अभिनंदन. या कारवाई मुळे पाकिस्तानला जरब बसेल व त्यातून योग्य तो धडा घेतला जाईल अशी आशा. आपण सर्वांनी यासाठी पाठिंबा दिला पाहिजे व जरूर पडल्यास लागेल ती मदत देण्यास तयार राहीले पाहिजे.
सरकारला व आपणाला पाकिस्तानच्या कारवाया थांबवण्यासाठी अजून काय करता येईल यावर आपली मते या धाग्यावर मांडावीत ही विनंती.
जयहिंद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जर सैनिक ऑन ग्राउंड loc
जर सैनिक ऑन ग्राउंड loc क्रॉस करून गेले असे राठोड म्हणत आहेत, तर हेलिकॉप्टर मधून दे वर पॅराड्रॉप असे का म्हंटले जात आहे?
<<<<चकमक पीओके मध्ये झालीय तर
<<<<चकमक पीओके मध्ये झालीय तर पाकिस्तानचा उल्लेख का केला जातोय? >>>> अनिल चेंबुरकर डोक्यावर पडले आहेत त्याचा अजुन एक पुरावा.
पिओके : पाक अॉक्युपाईड कॕश्मिर !!
हो ..... पण पीओकेत चकमक केली
हो ..... पण पीओकेत चकमक केली तर ती पाकिस्तानात घुसुन केली, असा अर्थ होतो का?
धागाकर्त्याचे वाक्य
धागाकर्त्याचे वाक्य पहा...
भारताने इतिहासात प्रथमच पकिस्तानातील अतिरेकी अड्डे नष्ट करण्यासाठी यशस्वी कारवाई केली
आमच्या काँग्र्सच्या काळात पीओकेला पीओकेच म्हणत.
पण भाजपावाले तर त्या प्रांताला पाकिस्तानच म्हणू लागलेत !
पीओकेचा तो भाग कापून भारताचे नकाशे आले तर चालतात का? नाही ना ? तर धागाकर्त्याने त्या प्रांताचा उल्लेख पाकिस्तान असा केलाय हे ना त्याना खटकते ना तुम्हाला !
anilchembur यान्च्याशी या
anilchembur यान्च्याशी या मुद्द्यावर पुर्ण सहमत. शिर्षकात पाकिस्तान असणे म्हणजे आपण पि ओ के आणि पाक यात फरक करत नाही किव्वा त्या दोन शब्दानमधे फरक आहे हेच आपल्यालाला माहित नाही असा अर्थ होतो.
दुसरा मुद्दा अतिरेकी अड्डे.... ते अड्डे नव्हते, लॉन्च पॅड होते. दोन मधे फरक आहे.
परिस्थिती - हे अड्डे पाक व्याप्त काश्मीरमधे तसेच पाकमधे इतरत्र सर्वत्र पसरलेले आहेत. हे अड्डे LOC पासुन केवळ ३ कि. मी. एव्हढ्या जवळ नसावेत. कारण २० ते २४ कि मी अधिक अन्तरावर भारताचे तोफगोळे आरामात पोहोचतात हे अतिरेक्यान्ना माहित नसेल पण त्यान्ची पाठशाळा चालवाणार्यान्ना माहित आहे..
मी दिलेली लिंक मुद्दामच वाहून
मी दिलेली लिंक मुद्दामच वाहून जाणार्या धाग्यावर दिलेली होती. इथे परत देतो.
https://en.dailypakistan.com.pk/world/india-comforts-cranky-citizens-wit...
ती विनोदी/सॅटायर प्रकारातली आहे. पाकिस्तानी मिडिया भारतीय मिडियापेक्षा थोडासा पोक्त आहे.
नरेंद्र मोदींचा सिंहात मॉर्फ होणारा फोटो, बराक ओबामांचे भारताचे अभिनंदन करणारे खोटे ट्वीट, मेलेल्या अतिरेक्यांचे खोटे फोटो वगैरे पाहून सर्जिकल स्ट्राईक नको, व्हॉटसॅप आवर म्हणायची वेळ आली आहे. या सर्जिकल स्ट्राईक चा टार्गेट ऑडियन्स भारतातील व्हॉटसॅप अंकल्सच होते की काय अशीही शंका येते.
आर्णब सारख्यांकडून तारतम्याची अपेक्षाच नाही पण म्यनमार च्या फियास्को नंतर यावेळी स्तंभलेखक तरी ताक फुंकुन पीतील ही अपेक्षाही फोल ठरली.
मदारी चित्रपटात एक वाक्य आहे "जो कहानी सच्ची होती है तो अच्छी नही लगती और जो अच्छी लगती होती है वो सच्ची नही होती"
अमूक गोष्ट घडावी असे आपल्याला मनोमन वाटत असेल व तीच घटना घडली तर मग आपण शहानिशा न करता विश्वास ठेवतो व पुढे पाठवतो. एखाद्या खेड्यातल्या अकरावीच्या मुलाला थेट नासातून आलेले आमंत्रण, रामार पिल्लाई ने झाडपाल्यापासून केलेले पेट्रोल, रोहतक च्या दोन मुलींनी रोड रोमियोंना केलेली मारहाण ( याबबत शंका उपस्थित केल्याबद्दल मलाही इथे झापले गेले होते.). गुजरात पोलिसांनी मोदी, अडवाणी व तोगडिया यांची हत्या करण्यासाठी आलेल्या लषकर ए तोयबांच्या क्रूर अतिरेक्यांचा शूर पणे केलेला खातमा ( या शं उ के म इ झा गे हो) एखाद्या गरीब मुलाचे आय ए एस मध्ये झालेले सिलेक्शन अशी अनेक उदाहरणे आहेत. , पूर्वी इंटरनेट नव्हते तेव्हा आमच्या एका गावच्या मुलाने माझी स्केटींग ऑलिम्पिक मध्ये निवड झाली आहे असे सांगून विमान प्रवासा साठी पैसे गोळा केले होते. त्यावेळी लोक इतके श्रीमंत नव्हते. मध्यम वर्गीय घरात एकोणतीस तारखेला चप्पल तुटली तर एक तारखेलाच दुरुस्त करत. तरीही लोकांनी पैसे दिले. वी वांट टू बिलीव्ह!
विकु, दृष्ट काढावी असा
विकु, दृष्ट काढावी असा प्रतिसाद!!
ती विनोदी/सॅटायर प्रकारातली
ती विनोदी/सॅटायर प्रकारातली आहे. पाकिस्तानी मिडिया भारतीय मिडियापेक्षा थोडासा पोक्त आहे.
हा तुमच स्टेटमेंट म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेल्या स्टेटमेंट जशी सारवासारव करतात तसच वाटल !!
पाकिस्तानी मिडिया भारतीय मिडियापेक्षा थोडासा पोक्त आहे. हे तुमच वाक्य ईतक पटल की
आता खर्या बातम्यासाठी लोकांनी भारतीय मिडीया बघुच नये !!
विकु, शंभर टक्के बरोबर आहे.
विकु,
शंभर टक्के बरोबर आहे. पण इथल्या उन्मादग्रस्तांना कोण सांगणार?
विकु, उरीत १९ जवान मारले
विकु,
उरीत १९ जवान मारले गेले, त्या पुर्वी, पठाण कोट, त्या पुर्वी मुंबई, त्या पुर्वी अक्षरधाम त्या पुर्वी पार्लमेंट !!
ज्याने भोगल आहे त्याला त्याच दुखः कळेल जो अमेरिकेतल्या एसी रुम मध्ये बसुन दुनिया भरच्या मिडीया बघुन आपली मत बनवतो त्याला काय कळणार !!
जर तुमच्या मते भारताने काहीही कारवाई केली नसेलच आणी ही सगळी कथा कुंभाड रचली असेल तर त्याच भ्रमात तुम्ही खुष रहा !!
भारत जिंकला की अजुनही भारतात क्रिकेट न खेळणारे फटाके फोडतात !! ते सग़ळे क्रिकेट खेळणारे नसतात एवढच काय तर काही बॅट सुद्धा हातात कधीही न पकडलेले असतात !
पुर्वी पाकिस्तान क्रिकेट मध्ये भारताविरुद्ध जिंकला की काही लोक भारतात फटाके फोडत असत !! पण आता
फुटणार नाहीत !!
बाकी अमेरिकेत राहुन
बाकी
अमेरिकेत राहुन पाकिस्तान्याची वाहवा करा पण रस्त्यावर जाताना काळजी घ्याच कारण तीन आठवड्या आधीही एका पाकिस्तान्याने तिथे बाँब फोडले आहेत.
vijaykulkarni, पाॅंइंट काय
vijaykulkarni, पाॅंइंट काय आहे तुमचा? सर्जिकल स्ट्राईक झालाच नाहि? सरकार/सेनेने दिलेल्या जाॅइंट प्रेस काॅंफरंस/स्टेटमेंट वर विश्वास ठेवायचा कि तुम्हि गुगलवरुन काढलेल्या निष्कर्शावर?...
आमचे म्हणणे इतकेच आहे...
आमचे म्हणणे इतकेच आहे...
पीओकेला पीओकेच म्हणा, पाकिस्तान म्हणू नका.
मोदीनी पाकिस्तानला घरात घुसुन मारले वगैरे थापा मारुन भारतभूचा अपमान करु नका. ती भूमी भारतच आहे, पाकिस्तान नाही.
जामोप्या, तुमचा काय समज आहे
जामोप्या, तुमचा काय समज आहे पिओके बाबत? चेंबुरच्या डायमंड गार्डन मध्ये संध्याकाळी फिरायला जाता येतं तसा काहि प्रकार वाटला का? पिओके मध्ये पाकिस्तानचे मिलिटरी कॅंप्स आहेत, एलोसी ओलांडणे आणि हार्बर लाइनचे रुळ ओलांडणे या दोन्हित जीव जाण्याचा धोका असला तरी खुप फरक आहे...
हो . पण पीओके म्हणजे पीओकेच,
हो . पण पीओके म्हणजे पीओकेच, पाकिस्तान नव्हे , हे येतय का लक्षात ?
च्यामारी, आॅक्युपायचा अर्थ
च्यामारी, आॅक्युपायचा अर्थ आता सांगत बसु का?..
मिलिंद जाधव | 2 October, 2016
मिलिंद जाधव | 2 October, 2016 - 20:50
60373 धाग्यावर माझ्या प्रश्नावर विकु याम्नी नेहेमी प्रमाणे सारवासारव केलेली आहे !!
काँग्रेस पक्षाच प्रशिक्षण आहे ना !!
या पुर्वीही असे हल्ले होत असत
या पुर्वीही असे हल्ले होत असत हे काही मोजकेअ निवृत्त अधिकारी म्हणत आहेत. बहुसंख्य अधिकारी सरकारचे अभिनंदन करताना दिसले. तरीही असे हल्ले होत असत हे गृहीत धरूनः
१. या पुर्वीचे हल्ले हे छुपे होते व त्यातून राजकीय/डिप्लोमॅटिक संदेश दिला जात होता का? थोडक्यात ते हल्ले रेग्युलर ऑप्स अंतर्गत केलेले हल्ले होते. ते हल्ले भारतावर झालेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणुन 'अधिकृत उत्तर' नव्हते हे नक्की.
२. मुंबई २००८ व इतर हल्ल्यांनंतर असे हल्ले करण्यात आले नाहीत. ते तत्कालिन परिस्थिती व तत्कालिन सरकारचे धोरण यांस अनुसरून होते.
३. या सरकारने मागल्या आठवड्यातले हल्ले हे भारताचे 'अधिकृत उत्तर' आहे असे जवळपास जाहीर केले आहे. त्याच बरोबर इतर विधाने (पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय राजकारणात एकटे पाडण्याचे प्रयत्न करू असे जाहीर करणे, पाणी कराराबद्दल विचार करू हे जाहीर करणे, बलोच फुटीरतावाद्यांना जाहीर आमंत्रण देणे वगैरे) या सरकारची दिशा स्पष्ट करत आहेत.
तुम्ही सरकारच्या या धोरणांचा विरोध नक्कीच करू शकता. याच सरकारातील अनेकांनी भारताच्या आजवरच्या धोरणांचा निषेध केलेला आहेच. अगदी नेहरुंच्या पंचशीलापासून वाजपेयींच्या ऑप. पराक्रमापर्यंत. पण एकूण इथल्या आंधळ्या द्वेषकरांचे पोस्टी बघता विरोधासाठी विरोध इतकेच दुर्दैवाने दिसते. असे काही झालेच नाहिये, जे केले आहे त्यात काही विशेष नाही, जे केले ते फक्त अंतर्गत कन्झम्प्शनसाठी केले वगैरे वगैरे विधाने पुन्हा पुन्हा इथे दिली जात आहेत.
तसेच विकुंसारख्याने पाकिस्तानी मेडीया अधिक प्रगल्भ आहे म्हणणे म्हणजे फक्त इन्डियन एक्स्प्रेस वाचून भारतातील वर्तमानपत्रे नि:पक्षपाती व वैचारीक सदरेच चालवतात म्हणण्यासारखे किंवा न्युयॉर्क टाइम्स वाचून अमेरिकेतील प्रसारमाध्यमे केवळ विवेकवादास अनुसरून बातम्या देतात म्हणण्यासारखे आहे.
आंधळे भक्त हे गिव्हन आहे कारण भक्तिच मुळात आंधळी असते.
आंधळा द्वेष हा जास्त धोकादायक असतो. तोसुद्धा जर विवेकवादी लोकांनी केला तर. त्याने एकुणच विचारधारेच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका उपस्थित होतात. विचारजंतूसारखी विशेषणे बाजूला सारणे कमी होते. माबोच्या विवेकवादी अड्ड्यावर देखील मी मागे एकदा लिहिले होते, आंधळ्या पाठिराख्यांपेक्षा अप्रामाणिक विवेकवाद्यांनी विवेकवादाचे व पर्यायाने समाजाचे अधिक नुकसान केले आहे.
टण्या, http://m.thehindu.com/
टण्या,
http://m.thehindu.com/news/national/back-in-the-day-crossloc-hit-and-run...
या बातमीनुसार असे हल्ले हे प्रत्युत्तर म्हणून केले गेले होते. हल्ला केला हे जाहीर करणं, हा बदल स्वागतार्हच आहे.
असो. बारामुल्ल्याच्या तळावर हल्ला झाला आहे.
Tanya +10000 I couldn't have
Tanya +10000
I couldn't have said it better.
Now you have officially declared your "chhupi vicharsarani", so be ready for the game ahead.
टण्या, चांगली पोस्ट! विकु व
टण्या, चांगली पोस्ट!
विकु व चिनूक्स यांनी एक सातत्याने भूमिका घेतली आहे, ती पटो वा न पटो, आदर आहे.
पण काही इतर लोकांच्या बाबतीत - जेव्हा पठाणकोट, उरी हल्ले झाले तेव्हा हेच लोक इथे 'आता कुठे गेली ५६ इंची छाती', मोदी घाबरतात का पाकिस्तानला, इतकं झालं तरी हे शरीफांशी बोलणी करतायत' असं लिहित होते. आता सर्जिकल स्ट्राईकनन्तर हेच लोक 'अशी कारवाई गुप्तच ठेवायची असते' 'हिंसाचाराने काय प्रश्न सुटतात का' असं लिहित आहेत.
म्हणजे मोदींनी एक गोष्ट केली नाही तर 'का करत नाहीत' म्हणून रडायला बसायचं. मोदीनी तोच निर्णय घेतला की 'असं का केलं' म्हणूनही हेच लोक विरोध करणार! विरोधासाठी विरोध, सोयीनुसार मतं बदलणार! विवेकवादी कसले, जातीयवादात हे अल्ट्रा उजव्यांपेक्षा जराही कमी नाहीत!
"यापूर्वी हल्ल्यांना
"यापूर्वी हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलं जात नव्हतं असं म्हणणं," म्हणजे तेव्हाची सरकारं आर्मीचे हात बांधून ठेवायची असं म्हणण्यासारखं आहे. दुर्दैवाने काही निवृत्त अधिकारीही असं म्हणताना दिसताहेत. पण लष्करी अधिकारीही पक्षीय राजकारणापासून किंवा आयडियॉलॉजीपासून हातभर दूर असतातच असं नाही. या सरकारातच दोन माजी लष्करी अधिकारी मंत्रीपदावर आहेत.
"हल्ल्यांचं चोख, जशास तसं, प्रत्युत्तर दिलं गेलं," असं, एका भारतीय सैनिकाच्या शिरकाण आणि भारतीय हद्दीत घुसून गस्ती तुकडीतल्या दहा सैनिकांच्या हत्या प्रकरणी, त्यावेळच्या लष्करप्रमुखांनी म्हटलेलं आहे. "अशा गोष्टी लोकल कमांडरच आपल्या पातळीवर हाताळतो, अगदी लष्करप्रमुखालाही त्यात पडायची गरज भासत नाही," असंही ते म्हणाले." पाककडून आगळीक झाली, तेव्हा याचं उत्तर आम्ही आम्हाला हवं तेव्हा, आम्हाला हवं तिथे, हवं तसं देऊ," असं ते म्हणाले होते.
आता या प्रत्युत्तरांची बातमी त्या त्या वेळी केली गेली नाही, हा दोन सरकारांमधील धोरणाचा फरक आहे. अशा प्रत्युत्तरांचा गाजावाजा करणं हा भाग भारतीय जनतेसाठीच आहे, हे तर उघड आहे. कारण आताच्या सत्ताधारी पक्षाच्या निवडणूक प्रचाराचाच तो भाग होता, की आधीचं सरकार कसं नेभळट होतं.
आता असा गाजावाजा केल्याने (लक्षात घ्या, प्रत्युत्तर आधीही दिलं जात असे) असे हल्ले बंद होणार असतील तर आनंद आहे. याऊपर या धोरणबदलाबद्दल बोलण्यासारखं काही नाही.
पुन्हा हा बायस्ड रिपोर्टिंग म्हणजे हल्ल्याची बातमी देण्या न देण्याचा भाग नाही, कारण ही दोन्ही त्या वेळच्या लष्करप्रमुखांची वक्तव्य आहेत. अवतरणात आहेत. एकाचा व्हिडियोही आहे.
इथे काही मंडळी आपले शब्द दुसर्यांच्या तोंडात कोंबायचे प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी हे लिहावे लागत आहेत.
हल्ले झाल्यावर अनेकांनी मोदींच्या आणि अन्य भाजप नेत्यांच्या विरोधी पक्षात असताना केलेल्या वक्तव्याची आठवण करून दिलेली. त्यातलं एक वक्तव्य हे होतं की "त्या वेळच्या नेभळट सरकारमुळे भारतावर हल्ले होतात, चीनी सैन्य घुसखोरी करतंय. एकदा मोदींचं सरकार आलं की भारताकडे वाकडी नजर करून पाहायची कोणाची हिंमत होणार नाही." अगदी १६ मे २०१४ ते शपथविधी होईपर्यंतच्या दहाबारा दिवसांत नितीन गडकरींनी एका टीव्ही कार्यक्रमात पॅनेलवरच्या पाकिस्तान्याला, "आता मनमोहन सिंग नाहीत, नरेंद्र मोदी आहेत हे लक्षात ठेवा," असा सज्जड दम दिला होता. हे बायस्ड रिपोर्टिंग नाही. कारण गडकरी स्वतः बोललेलेच दाखवले होते.
पण मोदी सरकार सत्तेवर आल्यावर आतापर्यंत तीन मोठे अतिरेकी हल्ले झालेत. गुरुदासपूर, पठाणकोट आणि उरी.
हे हल्ले सुरक्षा यंत्रणांवर झालेत.
चीनच्या घुसखोरीबाबतही या सरकारने "आधी व्हायच्या त्या कुरापती", आणि आता होते ती "सीमारेषा स्पष्ट नसल्याने झालेली चूक". "No Chinese incursion only transgression" अशी भूमिका घेतलेली आहे. (याला सोयीनुसार मत बदलणं म्हणतात का हे ज्याचं त्याने ठरवावे)
अशा वेळी मोदींच्या विरोधी पक्षात असतानाच्या, "हल्ले , घुसखोरी कमजोर सरकारमुळेच होतात, हे सरकार त्यावर काहीही करत नाही, मी आलो तर कोणाची हिंमत होणार नाही", या वक्तव्यांची आठवण का होऊ नये?
हल्ल्यांबद्दल गुप्तता पाळायची की नाही, हे लिहिण्याइतकी पात्रता माझ्याकडे नाही. उलट पाकिस्तानप्रकरणी ती पाळायची जराही गरज नाही, असंच मला वाटतं. पण अशा हल्ल्यांबद्दल ती राखणं उचित असं मत काही निवृत्त आय एफ एस ऑफिसर्सनी म्यानमार हल्ल्याच्या वेळी व्यक्त केलं होतं, हे नोंदवायला हवं.
बाकी, विकू आणि चिनूक्स यांनी मांडलेली मतं, अन्य काहींनी मांडलेल्या मतांपेक्षा वेगळी नसताना, त्यांच्या मतांचा तेवढा आदर ठेवायचा आणि बाकीच्यांनी तीच मतं मांडली, तरीही त्यांना तेवढं जातीयवादी (भारत पाक संबंध आणि लष्करी कारवाईत जातीयवाद कुठून आला, ते यांचा देवच जाणे) म्हणून झोडपायचं, याला नक्की काय म्हणायचं?
"हिंसाचाराने प्रश्न सुटत नाहीत", असं मायबोलीवर कोणी लिहिल्याचं मला तरी दिसलेलं नाही. मेधा पाटकरांचं हे कथित वक्तव्य, आपल्याला काही मायबोलीकर आवडत नाहीत, म्हणून त्यांच्या तोंडी कोंबायचं याला काय म्हणायचं, तेही कळत नाही.
पण आता हे असंच होत जाणार ,एकाने धरलेली ही लाईन आणखीही लोक धरणार, हे गेल्या दिवसांपासून दिसलेलं आहे, त्यामुळे त्याची सवय करून घ्यायला हवी.
शेलक्या विशेषणांपासून वंचित राहिल्याबद्दल विकू आणि चिनूक्सना टुकटुक.
भरत, परफेक्ट व संयत उत्तर.
भरत,
परफेक्ट व संयत उत्तर.
आता बारामुल्ला झालंय. हे एस्केलेशन कुठवर जातेय ते आता पहायचं. लोकांना युद्धाची भीती का वाटत नाही कुणास ठाऊक...
भरत सुरेख प्रतिसाद
भरत सुरेख प्रतिसाद
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/india-is-not-akramanakhor/...
भारत हा आक्रमक देश नसून भारताने कोणत्याही देशावर आक्रमण केलेले नाही.. नरेंद्र मोदी.
म्हणजे तो भूभाग पाकिस्तान नाही, असे स्वतः देवाने सांगितले आहे, आता तरी देवाचे भक्तलोक पीओके/ पाकिस्तान शब्द नीट वापरतील.
डी ज़्री एम ओ ने फ़क्त असा
डी ज़्री एम ओ ने फ़क्त असा हल्ला केला आहे एवढेच सांगितले आहे. बाकी जे काही येते आहे ते मिडीयाने सांगितले आहे. त्यावरुन एवढा वाद का?
भरत या पूर्वि असे हल्ले झालेले आहेत पण या वेळी सरकारने अधिकृत भुमिका घेतलेली आहे आणि त्यावर आंतर राष्ट्रीय समुदायाने भारतावर कोणताही दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला नाही हीच वेगळी गोष्ट आहे.
या पूर्वि झालेल्या हल्ल्या बद्दल ऑपरशन पराक्रम बद्दल भारतिय जनरल्स चे काय मत आहे ते बघुन घ्या म्हणजे सरकारने घेतलेल्या अधिकृत भूमिकेचे महत्व कळेल.
"हल्ल्यांबद्दल गुप्तता
"हल्ल्यांबद्दल गुप्तता पाळायची की नाही, हे लिहिण्याइतकी पात्रता माझ्याकडे नाही. उलट पाकिस्तानप्रकरणी ती पाळायची जराही गरज नाही, असंच मला वाटतं" हे वाचलंत का?
http://www.loksatta.com/lal-k
http://www.loksatta.com/lal-killa-news/narendra-modi-prime-minister-of-i...
सीमापार घुसण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी आपण त्यांना अनेकवार धडा शिकविलेला आहे, अगदी ऑक्टोबर २०१४ मध्ये मोदी आल्या आल्या. तेव्हा भारताने २७ दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले होते, पण त्याबाबत ब्रही काढला नव्हता. एक वरिष्ठ लष्करी अधिकारी सांगत होते, ‘‘या वेळचा सर्वात गुणात्मक फरक होता तो राजकीय नेतृत्वाच्या स्पष्टतेचा. सर्वसाधारणपणे अशा कारवाईची उघड जबाबदारी घेण्यास राजकीय नेतृत्व तयार नसते. मोहिमेत काही गडबड झालीच तर ते सरळ लष्करावर ढकलून देत असल्याचा आमचा अनुभव आहे. त्यामुळे राजकीय आदेश कधीच स्पष्ट नसतात. या वेळी मात्र अपवाद होता. एवढी स्पष्टता आम्ही अनुभवलेली नाही..’’
वाचल; पण गुप्तता न पाळणे
वाचल; पण गुप्तता न पाळणे म्हणजे स्वत:ची पाठ थोपटुन घेणे असा आरडा ओरडा पण चालु आहे ना.
भक्त मंडळी म्हणजे भारत सरकार आहे का?
युरो, इथे अकांडतांडवभजन
युरो,
इथे अकांडतांडवभजन भगतगणच करीत आहेत. भारत सरकार नव्हे. तेव्हा उत्तर भक्तांच्या उन्मादालाच आहे. भारत सरकारला पाठिंबा कधीच दिलेला आहे.
Pages