पाकिस्तान मधील अतिरेकी तळ उध्वस्त

Submitted by विक्रमसिंह on 29 September, 2016 - 04:58

भारताने इतिहासात प्रथमच पकिस्तानातील अतिरेकी अड्डे नष्ट करण्यासाठी यशस्वी कारवाई केली याबद्दल भारत सरकारचे अभिनंदन. या कारवाई मुळे पाकिस्तानला जरब बसेल व त्यातून योग्य तो धडा घेतला जाईल अशी आशा. आपण सर्वांनी यासाठी पाठिंबा दिला पाहिजे व जरूर पडल्यास लागेल ती मदत देण्यास तयार राहीले पाहिजे.

सरकारला व आपणाला पाकिस्तानच्या कारवाया थांबवण्यासाठी अजून काय करता येईल यावर आपली मते या धाग्यावर मांडावीत ही विनंती.

जयहिंद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< पण बलाकोट strike हल्ल्यानंतर पाकिस्तान च्या राजदूत ची भूमिका राहुल गांधी पार पाडत होता , आपल्याच देशातील सरकार ला पाकिस्तानच्या वतीने प्रश्न विचारून भंडावून सोडत होता , ' तो ' कॉमन सेन्स या येड्या गाबळ्यात तर नव्हताच तर किमान त्याच्या चेल्या चापट्यानी तरी त्याला शहाणे करावे ना ! तर ते ही त्या येड्या च्या सुरात सूर मिसळून ओरडत होते . >>

------ बालाकोट चा हल्ला..... ३०० अतिरेकी ठार झाले तो ?

पुलवामाचा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी बालाकोट हल्ला झाला होता. पुलवाम्याच्या हल्ल्यात देशाचे ४५ जवान हकनाक मारल्या गेलेत. पुलवामा येथे ३०० किलोचा स्फोट झाला. काही तासांतच कुठल्ही चौकशी न होता हल्ला जैशनेच केला असे जाहिर झाले. पण पुढे काही चौकशी ?
एव्हढे मोठे (३०० किलो असे सरकारने काही तासातच सांगितले होते) स्फोटके देशात आतवर आलेच कसे? जवानांचा भला मोठा ताफा ज्या मार्गावरुन जाणार होता त्या मार्गाची, आणि मार्गक्रमणाच्या वेळापत्रकाची गुप्त माहिती बाहेर कशी गेली ? पुढे काही महिन्यांनी, त्या क्षेत्रात काम करणारे देवेंद्रसिंग करणारे (DSP), अतिरेक्यांच्या सोबत पकडले गेले होते, त्यांना आता जामिन मिळाला आहे.

ण बलाकोट strike हल्ल्यानंतर पाकिस्तान च्या राजदूत ची भूमिका राहुल गांधी पार पाडत होता , आपल्याच देशातील सरकार ला पाकिस्तानच्या वतीने प्रश्न विचारून भंडावून सोडत होता , ' तो ' कॉमन सेन्स या येड्या गाबळ्यात तर नव्हताच तर किमान त्याच्या चेल्या चापट्यानी तरी त्याला शहाणे करावे ना ! तर ते ही त्या येड्या च्या सुरात सूर मिसळून ओरडत होते .

आणि भरीस भर अभिंदन ला सोडले त्या निमित्ताने मोदी पेक्षा वरचढ इम्रान ला प्रोजेक्ट करण्याचा केविलवाणा प्रयत्न तमाम काँग्री आणि कम्युनिस्ट लोकांनी चालवला होता !
त्यात सर्वात संताप दायक म्हणजे बरखा , रवीश ,शेखर गुप्ता या आणि इतर लिब्री गैग मध्ये इम्रान ला शांततेचे नोबेल देण्यात यावे यासाठी ट्विट करण्याची फुल्ल स्पर्धा लागली होती .
या सगळ्यांची थोबाड अभिनंदन वेळी पाकि परिस्थिती चे वर्णन करून त्या पाकी खासदार ने मस्त फोडली
आहेत .
वैचारिक स्वातंत्र्याचा गैर उपयोग कसा करू नये हे या सगळ्या लिब्रिनी वारंवार दाखवले .>>>>> सही ! प्पण कितीही वेळा थोबाड फुटले तरी हे काय सुधरत नाहीत. गिरे तो भी टांग उप्पर ! Raga_0.jpg

उदय, याची चौकशी झालीच पाहीजे, व गुन्हेगारांना योग्य ते शासन मिळालेच पाहीजे. मी याबाबतीत तुमच्याशी सहमत आहे. पण काल पाकी मंत्री स्पष्टपणे बोलले ते पुरेसे नाही का ? डायरेक्ट युद्ध पाकींना परवडणार नाही ( एका क्षणात हे भिकारी होत्याचे नव्हते होतील ) म्हणूनच हे चालले आहे.

पपुला लोक बोलतात कारण त्याचा फुल बळीचा बकरा केला गेलाय. कुठे काय बोलावे ही समज देशातल्या साध्या साध्या तरुणांना आहे. पण पपुला हे कळतच नाही. कसलाच अनूभव पाठिशे नाही, मुरब्बीपणाचा अभाव, नो दुरदृष्टी. ज्योतिरादीत्य व सचीन पायलट अशा अनुभवी व अभ्यासु खासदारांना जो पक्ष किंमत देत नाही त्याचे दिवाळे पपुच वाजवणार, भाजपा वा इतरांना त्याची गरज नाही.

श्री. राहुल गांधी यांच्यात भारताचे भावी पंतप्रधान अशी भरल्या डोळ्यांनी आशा लावुन बघणार्‍यांचे मला खरच मनापासुन खुप कौतुक वाटते.
देव करो २०२४ मधे सगळे भाजपाच्या उमेदवारांचे डिपॉझिटच जप्त होवो.

या सगळ्यांची थोबाड अभिनंदन वेळी पाकि परिस्थिती चे वर्णन करून त्या पाकी खासदार ने मस्त फोडली आहेत .>>> तरीहि अजून वटवट चालूच आहे. यान्च्यात मोदीद्वेश घट्ट बसला आहे तो जाणे शक्य आहे असे मला तरी वाटत नाही.

>>>>>>> एव्हढे मोठे (३०० किलो असे सरकारने काही तासातच सांगितले होते) स्फोटके देशात आतवर आलेच कसे? जवानांचा भला मोठा ताफा ज्या मार्गावरुन जाणार होता त्या मार्गाची, आणि मार्गक्रमणाच्या वेळापत्रकाची गुप्त माहिती बाहेर कशी गेली ? >>>>>
हे असले प्रश्न गल्ली ते दिल्ली मधील राहुल ची सर्व चाहते मंडळी विचारतात , पण या अशा मूळे आपण आपल्या च देशाची मानहानी करतोय हे त्यांना लक्षात येत नाही . सत्ताधारी पक्ष चुकत असेल तर देश हितासाठी विरोधी पक्षाने अवश्य टीका करावी पण त्याचा फायदा शत्रू राष्ट्रांना होता कामा नये .
त्या पाक मंत्र्याचे स्टेटमेंट अत्यंत विश्वसनीय अशा the print ने प्रसिध्दी केले आहे , त्या मुळे ते खरे असण्याची शक्यता खूपच असणार .
सोबत प्रिंट ची लिंक पण आहे, तरी पण पुलवामा केस मध्ये मोदी आणि भाजपचीच कशी चूक होती हे सिद्ध करण्यासाठी अजून काही पॉइंट भेटतात का ते बघा !

" Humne Hindustan ko ghus ke mara hai… wahaan pe. Pulwama main jo humari kamyabi hai, woh Imran Khan ki leadership mein is kaum ki kamyabi hai "
https://theprint.in/india/pakistan-minister-says-we-entered-india-and-ki...
आता हा मंत्री च भर संसदेत मान्य करतोय ' पुलवामा हमने किया '
तरी पण त्यातील अर्थ न समजणाऱ्या पप्पू शेठ ना आणि त्यांच्या चाहत्यांना सादर प्रणाम /\

काल तर राजदीप ने कहर केला !
त्या मंत्र्याला एनडीटीव्ही वर पुलवामा हल्ला मधून पाकिस्तान ला क्लीन चिट देण्यासाठी राजदीप ची चाललेली धडपड ओंगळवाणी वाटत होती !

हे नासके नारळ आपल्या इथे सुखाने नांदत असतात , आणि देशातील जनता असहायपणे त्यांचे मतप्रदर्शन बघत असते .
पण पाक किंवा इतर मुस्लिम देशात यांना आत्तापर्यंत कोठडी दिली गेली असती .....

>>>>>>> एव्हढे मोठे (३०० किलो असे सरकारने काही तासातच सांगितले होते) स्फोटके देशात आतवर आलेच कसे? जवानांचा भला मोठा ताफा ज्या मार्गावरुन जाणार होता त्या मार्गाची, आणि मार्गक्रमणाच्या वेळापत्रकाची गुप्त माहिती बाहेर कशी गेली ? >>>>>

हा प्रश्न २६.११.२००८ मुंबई हल्ल्याच्या वेळी न विचारणारे.....

२६/ ११ च कशाला ? अगदी ९३ सालापासुन ( तसे त्याच्या आधीपासुन आहेच) जे काही घडले ( कोणीतरी दाऊदच्या बहीण आणी आईला देशाबाहेर जाऊ द्यायला मदत केली ) त्या विषयी चकार शब्द निघत नाही. साप्ताहीक सकाळ हे मासिक सकाळ समुहाचे आहे. त्यातच नामवंत पत्रकारांचे लेख व अनुवादीत मुलाखती यायच्या. ( सध्या बर्‍याच वर्षात न वाचल्याने आताचे माहीत नाही ) खुशवंत सिंग कोहली पासुन बर्‍याच लेखकांचे लेख वाचलेत. यांच्या पत्रकारीतेपुढे हे दळभद्री राजदीप, बरखा वगैरे जाम खुजे आहेत,.

प्रश्न कुठल्या पक्षाचा नाही. काँग्रेस मध्ये खूप अनूभवी, अभ्यासु, जनतेत खर्‍या अर्थाने मिक्स होणारे नेते आहेत. पण या गांधी घराण्याच्या कुलदिपकापुढे यांचे तेजच निष्प्रभ होते. कशाला भाव देतात या माणसाला कळत नाही. अनूभवी लोकांनी बंड केले की बाई बिथरतात. आपल्या दिवट्याचे पुढे काय भविष्य आहे हे जाणवल्याने त्या जाम फ्रस्ट्रेट आहेत. त्यामुळे मोदी आणी भाजपाला कसे हैराण करावे हे यांना कधीच कळणार नाही. अभ्यास लागतो हो त्याला, नुसती टिवटीव काय कामाची.

इथे उठल्या बरोबर लोकांना स्वतः चे पोट कसे भरेल ह्या साठी संघर्ष करावा लागत आहेत ते पाकिस्तान शी लढण्यास कधी वेळ काढणार.
जगातील सर्वात जास्त गरीब लोकांची संख्या असलेला देश म्हणजे भारत.
जनते कडून काही अपेक्षा ठेवू नका..
तुम्ही च तुमची लाल करा.

हो ना !
मग पुलवामा वरून भाजप वर खोटे आरोप करून गोंधळ माजविणारे आणि इम्रान ला शांती दुत मानणाऱ्या लेफ्टी गैंग ला आदर्श मानणारे नक्कीच उच्चभ्रू वर्गातील असतील .
आणि सुशांत आणि कंगना च्या केस मध्ये तर आम्ही रोजगार पोट पूजा विसरून गेलो होतोच !

ते कायपण बोलतील
अजून कुणीतरी कुणाच्या तरी नकाशातून काय तरी कापले आहे , भक्ताडे नाचत आहेत , किती हा पराक्रम म्हणून

असे बोलून आणि कागद रंगवून होत असते तर मग मोदींनी राफेल काय खणडे नवमीला पुजायला आणले काय ?

नरेंद्र मोदी ना पाकिस्तान घाबरला असा गोड गैरसमज फक्त भक्त च करून घेवू शकतात.>>>>>>

बरोबर. आणी पाकिस्तान सगळ्यत मोठा भक्त आहे असे कालच ऐकले.

<< उदय, याची चौकशी झालीच पाहीजे, व गुन्हेगारांना योग्य ते शासन मिळालेच पाहीजे. मी याबाबतीत तुमच्याशी सहमत आहे. पण काल पाकी मंत्री स्पष्टपणे बोलले ते पुरेसे नाही का ? डायरेक्ट युद्ध पाकींना परवडणार नाही ( एका क्षणात हे भिकारी होत्याचे नव्हते होतील ) म्हणूनच हे चालले आहे. >>

------- पाकच्या मंत्र्यांचे स्पष्टीकरण, किंवा जैशने जबाबदारी स्विकारली हे असले पुरावे यापेक्षा भारताच्या गृहमंत्रालयाने या स्फोटाची सखोल चौकशी केली आहे का? भारताच्या गृहमंत्रालयाचा अहवाल अत्यंत महत्वाचा आहे.

<< पपुला लोक बोलतात कारण त्याचा फुल बळीचा बकरा केला गेलाय. कुठे काय बोलावे ही समज देशातल्या साध्या साध्या तरुणांना आहे. पण पपुला हे कळतच नाही. कसलाच अनूभव पाठिशे नाही, मुरब्बीपणाचा अभाव, नो दुरदृष्टी. ज्योतिरादीत्य व सचीन पायलट अशा अनुभवी व अभ्यासु खासदारांना जो पक्ष किंमत देत नाही त्याचे दिवाळे पपुच वाजवणार, भाजपा वा इतरांना त्याची गरज नाही. >>

------ अगदी हेच मोदी यांच्या बाबतही तंतोतंत लागू आहे.
आता तर त्यांनी अप्रियतेचा एव्हढा मोठा धसका घेतला का ते थम्स डाऊनचा पर्यायच काढून टाकला आहे. हजारो आय टी सेवक अहोरात्र काम करत आहे पण काही तासात दहा लाखाचे थम्स डाऊन मिळतात.

लडाख पासून अरुणाचला पर्यंत चीन मस्त हात पाय पसरत आहे.... आधी डोकलाम मधे सशर्त माघार, मग मे २०२० आणि जून २०२० मधे भारताच्या जवानांवर प्राणाघातक हल्ले. मैनी प्रधानमंत्री चीनचे साधे नाव घ्यायलाही घाबरतात. चीन चे साधे नाव तोंडातून बाहेर पडू नये? त त प प .... आणि म्हणे देशाचे रक्षण करणार चौकीदार.

<< श्री. राहुल गांधी यांच्यात भारताचे भावी पंतप्रधान अशी भरल्या डोळ्यांनी आशा लावुन बघणार्‍यांचे मला खरच मनापासुन खुप कौतुक वाटते.
देव करो २०२४ मधे सगळे भाजपाच्या उमेदवारांचे डिपॉझिटच जप्त होवो. >>

------ निवडणूका मुक्त वातावरणात, कुठल्याही दडपणा शिवाय व्हायला हव्यात एव्हढे केले तरी खूप आहे... free and fair
पंतप्रधान पदावर कुणाला विराजमान करायचे हे लोकसभेतला मोठा पक्ष ठरवेल.

निवडणूका तोंडावर आल्यावरच पुलवामा घडवले जात असेल आणि त्या हल्ल्याची चौकशी पण होत नसेल. त्या भौगोलिक क्षेत्रात काम करणारा एक वरिष्ठ दर्जाचा पोलिस अधिकारी, DSP, अतिरेक्यांसोबत रंगेहात पकडला जातो हे धोक्याचे आहे, पुढे त्याला जामिन पण मिळतो.

वर्ष झाले पण पुलवामाचा स्फोट कुणी घडवला , का घडविला, कसा घडविला, साथीदार कोण होते, मास्टर माईंड कोण असे अनेक प्रश्न अनुत्तरितच रहातात. बालाकोटच्या दुरवड्यात, पुलवामा स्फोटाच्या चौकशीची मागणी पण होताना दिसत नाही.

<< एव्हढे मोठे (३०० किलो असे सरकारने काही तासातच सांगितले होते) स्फोटके देशात आतवर आलेच कसे? जवानांचा भला मोठा ताफा ज्या मार्गावरुन जाणार होता त्या मार्गाची, आणि मार्गक्रमणाच्या वेळापत्रकाची गुप्त माहिती बाहेर कशी गेली ? >>>>>
हे असले प्रश्न गल्ली ते दिल्ली मधील राहुल ची सर्व चाहते मंडळी विचारतात , पण या अशा मूळे आपण आपल्या च देशाची मानहानी करतोय हे त्यांना लक्षात येत नाही . सत्ताधारी पक्ष चुकत असेल तर देश हितासाठी विरोधी पक्षाने अवश्य टीका करावी पण त्याचा फायदा शत्रू राष्ट्रांना होता कामा नये . >>

------ ४४ जवान मृत्यु मुखी पडल्यावर त्या हल्ल्याची संपुर्ण चौकशीची अपेक्षा ठेवणे याने देशाची मानहानी कशी होते ?

निवडणूकीच्या तोंडावर अशा स्फोटाच्या घटना घडणे आणि त्याची साधी चौकशी पण न होणेम, आत्मपरिक्षण न करणे, हे जरुर मानहानीकारक आहे.

<< >>>>>>> एव्हढे मोठे (३०० किलो असे सरकारने काही तासातच सांगितले होते) स्फोटके देशात आतवर आलेच कसे? जवानांचा भला मोठा ताफा ज्या मार्गावरुन जाणार होता त्या मार्गाची, आणि मार्गक्रमणाच्या वेळापत्रकाची गुप्त माहिती बाहेर कशी गेली ? >>>>>

हा प्रश्न २६.११.२००८ मुंबई हल्ल्याच्या वेळी न विचारणारे.....
>.

------ चौकशी झाली, आरोपीला भारताच्या न्यायव्यावस्थे पुढे उभे केले गेले... न्यायालयाने शिक्षा बजावली आणि न्यायालयाने ठोठविलेल्या शिक्षेचा अंमल पण झाला.

तेव्हा पण प्रश्न विचारले होतेच...

ह्या मध्ये एकाच वाईट घडते.
वरच्या लेवल नी होणाऱ्या राजकारणात आणि डावपेचात ,गरीब सैनिकाचा जीव जातो.
बाकी 300 kg rdx येतेच कसे हा प्रश्न महत्त्वाचा आहेच.
सैनिक च्या गुप्त हालचाली ची माहिती बाहेर जाते च कशी हा प्रश्न पण महत्वाचा आहे.

<काल तर राजदीप ने कहर केला !
त्या मंत्र्याला एनडीटीव्ही वर पुलवामा हल्ला मधून पाकिस्तान ला क्लीन चिट देण्यासाठी राजदीप ची चाललेली धडपड ओंगळवाणी वाटत होती !>

तुमच्या टीव्हीत राजदीप अजून एन डी टीव्ही वर दिसतो?

बर. पाकिस्तानचा मंत्री संसदेत मान्य करतोय की पुलवामा हल्ला पाकिस्तानने केला. पाक पुरुस्कृत दहशतवाद्यांनी नाही. त्याचं उत्तर आपण काय दिलं? पी ओ के (म्हणजे मुंबई नाही हं कंगना. काश्मीरचा पाकिस्तानव्याप्त भाग) मधल्या बाकालोट येथील अतिरेकी तळावर हल्ला केला. तोही प्रिएम्प्टिव्ह् स्ट्राइक होता. जर हा हल्ला पाकिस्तानने = पाक सैन्याने पाक सरकारच्या परवानगीने केला होता, तर प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानवर आणि पाक सैन्यावर हल्ला करायला हवा होता.

>>मैनी प्रधानमंत्री चीनचे साधे नाव घ्यायलाही घाबरतात. चीन चे साधे नाव तोंडातून बाहेर पडू नये? त त प प .... <<

अरे काय ह्या बालिश अपेक्षा या लोकांच्या?
नाव घ्या नाव घ्या Uhoh
इकडे सोशल प्लॅटफॉर्मवर खऱ्याखोट्या नावाने पोस्टी खरडणे वेगळे आणि पंतप्रधान म्हणून जबाबदारीने एखादे विधान करणे वेगळे!

whatsapp वर काहितरी वाचायचे आणि इकडे उगाच आपले काहीतरी गुऱ्हाळ चालवायचे Proud

काही भारतीय सो कॉल्ड पत्रकारांना पाकिस्तानी खासदार संसदेत "मोदी मोदी" असं ओरडत असल्याचं ऐकू आलं आणि हे वाचून काहींनी सुखाने माना डोलावल्या. फेक न्युजच्या शेणात पाय #

https://www.bbc.com/news/world-asia-54732525

पाकिस्तान च्या सत्ताधारी पक्षाची आणि भारतातल्या सत्ताधारी पक्षाची भाषा एकसारखीच आहे.
इम्रानची पार्टी नवाझच्या पार्टीला उद्देशून " मोदी का जो यार है, गद्दार है गद्दार है," अशा घोषणा देत होता.

उदय, सगळ्या प्रतिसादांना +१
४४ जवान मृत्यु मुखी पडल्यावर त्या हल्ल्याची संपुर्ण चौकशीची अपेक्षा ठेवणे याने देशाची मानहानी कशी होते ?+१००.

ती स्फोटके सैनिकांच्या जाण्याच्या मार्गावर कशी पोचली? पुलवामाचा त्यावेळी मुख्य असलेला आणि ज्याचे आधी अफझल गुरूशी संबंध होते असा बडा पोलिस अधिकारी दविंदर सिंग दहशतवाद्यांसोबत कसा सापडला? त्याच्या चौकशीचे काय झाले?

>>पाकिस्तान च्या सत्ताधारी पक्षाची <<
त्या हिशोबाने महाराष्ट्रातल्या सरकारबद्दल काय मत आहे Wink

मी बऱ्याच वेळा न्यूज चॅनल पाहायचं टाळले आहे ! अपवाद झी न्यूज डी एन ए !
राजदीप ची बायस बडबड सोईनुसर फक्त ट्विटर वर बघणे चालू असते .

वा वा. न्यूज न बघता कोण कुठल्या channel वर काय बोलला हे छातीठोकपणे सांगायचा confidence आवडला.

https://twitter.com/Natsecjeff/status/1322150717306580992?s=19
फ्रान्स मध्ये एका शिक्षकाचे आणि महिलेचे शिर छाटले गेले त्याचे प्रत्याक्षिक पाकिस्तान मधील एका शांतीदूत महिलेने शाळेतील लहान मुलींना करून दाखवले .

Pages