पाकिस्तान मधील अतिरेकी तळ उध्वस्त

Submitted by विक्रमसिंह on 29 September, 2016 - 04:58

भारताने इतिहासात प्रथमच पकिस्तानातील अतिरेकी अड्डे नष्ट करण्यासाठी यशस्वी कारवाई केली याबद्दल भारत सरकारचे अभिनंदन. या कारवाई मुळे पाकिस्तानला जरब बसेल व त्यातून योग्य तो धडा घेतला जाईल अशी आशा. आपण सर्वांनी यासाठी पाठिंबा दिला पाहिजे व जरूर पडल्यास लागेल ती मदत देण्यास तयार राहीले पाहिजे.

सरकारला व आपणाला पाकिस्तानच्या कारवाया थांबवण्यासाठी अजून काय करता येईल यावर आपली मते या धाग्यावर मांडावीत ही विनंती.

जयहिंद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवकी, मजा या शब्दाचा शब्दशा अर्थ का घेत आहात. आपण मजेने मांसाहार करतो त्यातही कोण्या प्राण्याचा जीव जातोच ना. स्वताहून युद्ध करणे कोणाला आवडले आहे ईथे? आपण भारतीयांची ती मानसिकताही नाही. पण एकंदरीतच ऑफिसातले लोकं एक्सायटेड होते आज. तेच भाव पोस्टमध्ये ऊतरले ईतकेच.

भारतीय लष्कर आणि सरकार यांचे अभिनंदन ! कारगिल युध्दाच्या वेळेसही LOC क्रॉस केली नव्हती. धडाकेबाज कामगिरी !! भारतीय जवानांना मारले जात आहे, भारतीय भूमीत दहशतवादी हल्ले होत आहे आणि आपण केवळ निषेध करतो हे दिवस संपले !

'अर्ध्या हळकुन्डाने पिवळे होणे' बास की....! अजुन हिशेब बाकि आहे. २६/११, कन्धार विमान अपहरण, असे अनेक :रागः

सरकारचे अभिनंदन.
काही प्रतिसाद हिस्टेरिकल वाटत आहेत.
भूतकाळात भारत-पाक युद्धात भारतीय सेनेकडून सीमा ओलांडली गेली आहे. अगदी लाहोरलाही धडका दिल्या गेल्या आहेत. कच्छ सीमेवरही सीमा ओलांडली गेली आहे.
शिवाय गुप्त असे अनेक घातपाती हल्ले शांतताकाळात केले गेले आहेत.

मजा या शब्दाचा शब्दशा अर्थ का घेत आहात.>>>>>> शब्दशः नाहीच घेतला.आपण सारेच उत्तेजित झालो आहोत खरे.तरीही तुझा प्रतिसादातील भारतपाक क्रिकेटमधेही मजा आली नव्हती ,होऊ दे खर्च वगैरे भाग अनुचित वाटलाच.
असो.

भारताच्या लष्करी कारवायांचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल रणवीर सिंग यांनी जे निवेदन दिले आहे त्यातली वाक्ये जशीच्या तशी इथे पेस्ट करत आहे:

Some terrorist teams had positioned themselves at launch pads along Line of Control to carryout infiltration and conduct terrorist strikes inside Jammu and Kashmir and in various metros in other states. Indian Army conducted surgical strikes at several of these launch pads to pre-empt infiltration by terrorists. The operations were focused on ensuring that these terrorists do not succeed in their design to cause destruction and endanger the lives of our citizens. During these counter terrorist operations significant casualties were caused to terrorists and those providing support to them.

म्हणजेच, आपल्या सैन्याने लाईन ऑफ कंट्रोल वर जाऊन हल्ले केले आणि त्यातअतिरेक्यांचे गंभीर स्वरूपाचे नुकसान झाले आहे ( significant casualties to terrorists) इतका आणि इतकाच यात उल्लेख आहे. अतिरेक्यांचे तळ उध्वस्त करण्यासाठी लष्कराने असे हल्ले यापूर्वी अनेकदा केलेले आहेत. आणि कॉंग्रेसच्या राजवटीत तर अनेकवेळा केले आहेत.

अमुक इतके अतिरेकी मारले, पाकिस्तानच्या सीमेच्या आत घुसून मारले, पाकिस्तानचे इतके सैनिक मारले इत्यादी कोणतेही उल्लेख डीजीएमओ च्या निवेदनात नाहीत. ह्या सगळ्या माध्यमांनी आणि नेटवर बसलेल्या भक्तांनी बनवून पसरवलेल्या भाकडकथा आहेत. कारण अलीकडे झालेल्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मोदींवर प्रचंड टीका होत होती (निवडणुकी आधी सांगितल्यानुसार पाकिस्तानवर हल्ला करत नाही म्हणून). म्हणून या कारवाईचा असा डांगोरा पिटणे त्यांच्या दृष्टीने आवश्यक होते. ते त्यांनी केले. त्यामुळे यात "मोदी माझा लाडाचा लाडाचा गं" म्हणत आनंदाने हुरळून जाण्यासारखे काहीही नाही. भक्तांचे काम भक्त करत आहेत. भक्त नसलेल्यांनी फालतू उल्लू बनू नका. विषय संपला.

या सर्जरीचा मुख्य उद्देश 'हल्ल्याचा बदला' या पेक्षा भारतातल्या मोदी समर्थकान्ना (domestic audience) समाधान वाटावे असाच आहे असे मी मानतो (चुकतही असेल). तो जर निव्वळ तसाच असेल तर (अ) सार्क परिषद बहिष्कार (ब) सर्जिकल हल्ला ह्या दोन घटनात शरिफान्ना पण सामिल केले गेले आहे.

पुन्हा पाक लष्कर, तसेच आय एस आयवर शरिफान्चे नियन्त्रण नाही. कुठलिही कारवाई केली तर शरिफ एकटे पडणार आहेत, आणि त्यान्ची गच्छन्ती अटळ आहे. ते एकटे पडावे हाच पाक लष्कराचा मुख्य उद्देश आहे. ते किती दिवस श्वास घेणार हे पाक लष्कर ठरवणार...

सर्जिकल हल्ला आहे हे मान्य केले तर त्याला उत्तर हे मिळणारच. त्याची पण तयारी आपण करायला हवी, नव्हे केलेली असेलच. मला तरी याला अन्त दिसत नाही... भारताने प्रत्येक वेळी हल्ला झाल्यावर निव्वळ हात चोळत बसायलाच हवे असे मला वाटत नाही. कुठेतरी हे थाम्बवणे आत्यन्तिक गरजेचे आहे.... पण नुसती वर-वरची मलम पट्टी करु नका...

<< म्हणून या कारवाईचा असा डांगोरा पिटणे त्यांच्या दृष्टीने आवश्यक होते. ते त्यांनी केले. >>
---- तो त्यान्च्या अस्तित्वाच्या लढाईचा प्रश्न आहे... तो तसा आहे हे वाटणे पण दुर्दैवी आहे.

निवृत्त जनरल/एअर मार्शल वगैरे लोकं तर म्हणतात की असे सर्जिकल स्ट्राइक (युद्ध सुरू नसताना एल.ओ.सी. ओलांडून पाकव्याप्त काश्मिरमध्ये जाऊन अतिरेक्यांच्या तळावर हल्ले) केलेले नाहियेत आजवर. ६५,७२ च्या युद्धात सीमा ओलांडून आपण पलिकडे गेलो होतो पण ती फुल ब्लोन युद्धे होते. कारगिल युद्धात ते देखील करणे कटाक्षाने टाळले होते.
आर अँड ए डब्ल्यु गुप्त कारवाया करत असेल पण ते सर्जिकल स्ट्राइक्स नाहीत.
काओ बॉइज ऑफ रॉ व इतर उपलब्ध लेख बघता ९०च्या दशकापासून पुढे आर अँड ए डब्ल्युच्ची कोवर्ट ऑपरेशन क्षमता कमी कमीच करण्यात आली.

हीरा आणि इनामदारांकडे असे काही सोर्स आहेत का जे सर्वसामान्यांना माहिती नाहीत?

असे हल्ले पूर्वी केले असतील तरी असे ओपनली त्याचे समर्थन केले नव्हते. यामुळे नक्कीच सैन्याचे मनोबल वाढले असणार. डांगोरा पिटलाच पाहिजे ! इनामदारांची प्रतिक्रिया आणि पाकिस्तानी मंत्र्यांची प्रतिक्रिया बरीचशी सारखी आहे...

टण्या,
२०१३च्या बातम्या आहेत. 'भारतानं बदला घेतल्याच्या'. मघाशी बेकरीत चिकटवल्या होत्या. आता पुन्हा शोधायचा कंटाळा आला. पाकिस्ताननं भारताविरुद्ध एलओसी ओलांडून १९९८नंतर २०२५ सैनिकांची मुंडकी कापल्याची तक्रारही केली होती. भारतानं अर्थातच हे नाकारलं.

<<काओ बॉइज ऑफ रॉ व इतर उपलब्ध लेख बघता ९०च्या दशकापासून पुढे आर अँड ए डब्ल्युच्ची कोवर्ट ऑपरेशन क्षमता कमी कमीच करण्यात आली.>>

---- इन्दरकुमार गुजराल यान्नी रॉ चे पन्ख कमी केले असे वाचले होते.

'भारतानं बदला घेतल्याच्या'. मघाशी बेकरीत चिकटवल्या होत्या. >>

त्या बातम्या किती विश्वासार्ह्य आहेत?

झी, हिन्दुस्तान टाईम्स, एक्स्प्रेस या तिघांपैकी दोघांवर माझा विश्वास आहे. शिवाय २०१४ साली 'आम्ही धडा शिकवला' हे निवृत्त अधिकार्‍यानेच सांगितलं आहे. ते तर सर्वत्र प्रकाशित झालं होतं.

>>असे हल्ले पूर्वी केले असतील तरी असे ओपनली त्याचे समर्थन केले नव्हते. यामुळे नक्कीच सैन्याचे मनोबल वाढले असणार. डांगोरा पिटलाच पाहिजे ! इनामदारांची प्रतिक्रिया आणि पाकिस्तानी मंत्र्यांची प्रतिक्रिया बरीचशी सारखी आहे...

१. डांगोरा पिटल्याने मनोबल वाढायला ते तुमच्या शिवसेनेचे "सैनिक" वाटले का तुम्हाला?

२. पाकिस्तानी मंत्री काय म्हणतात ते तुम्हाला माहित. मी आपले डीजीएमओ काय म्हणतात ते लिहिले आहे.

१. उरी हल्यानंतर प्रतिउत्तर दिले आणि तसे दिले हे जगाला सांगितले याने मनोबल वाढेल असे मला वाटले.
२. <ह्या सगळ्या माध्यमांनी आणि नेटवर बसलेल्या भक्तांनी बनवून पसरवलेल्या भाकडकथा आहेत. कारण अलीकडे झालेल्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मोदींवर प्रचंड टीका होत होती (निवडणुकी आधी सांगितल्यानुसार पाकिस्तानवर हल्ला करत नाही म्हणून). म्हणून या कारवाईचा असा डांगोरा पिटणे त्यांच्या दृष्टीने आवश्यक होते. ते त्यांनी केले.> हे तुमचे मत आणि पाकिस्तानी मंत्र्यांचे मत सारखे असे आहे असे मी म्हणाले.

त्या बातम्या किती विश्वासार्ह्य आहेत?

घ्या ! २०१३ च्या बातम्या विश्वासार्ह नाहीत पण आताच्या आहेत.
सर्जिकल स्ट्राईक तब भी होते थे मगर उनमे देशभक्ती नही थी !

वरच्या एन्डिटिवी लिंकवरुन साभार -

"We've done it in the past", he said. Mr Singh also added, that earlier, decisions like this were left to the military alone, but this time 'they have been steered by political will' and that 'the scale at which this has unfolded has to be appreciated'.

घ्या ! २०१३ च्या बातम्या विश्वासार्ह नाहीत पण आताच्या आहेत. >> आर्मीच्या डीजीएमओनी पब्लिक ब्रिफींगमध्ये सांगितलेली बातमी कधीही जास्तच विश्वासार्ह का नसेल?! बळंच काहीतरी!

, decisions like this were left to the military alone, but this time 'they have been steered by political will' and that 'the scale at which this has unfolded has to be appreciated'.===

Superb!

सर्जिकल स्ट्राइकच्या बातमीमधे काहीतरी गोन्धल आहे असे वाटते. आपले सैनिक १ ते ३ किमी पर्यन्त पाकिस्तानच्या सरहद्दीत घुसले व त्यानी अतिरेक्यन्चे अड्डे नश्ट केले. अतिरेक्यान्चे अड्डे सरहद्दीपासुन इतके जवळ असतील हे खरे वाटत नाही. अड्डे जर इतके जवळ असतील तर सर्जिकल स्ट्राइकची गरज काय? तोफान्चे गोळे पण इतके दूर पडतात त्यामुळे जवान जखमी झाले नसते व काम पण झाले असते. असो निदान आपल्या लष्कराने तिकडे जाऊन आम्ही पण तुमच्याकडे येऊ शकतो हे दाखवूनत्पाकिस्तन्याना दहशत दिलि हे खरे.

गंमतच आहे सगळी..... काही जण अति आनंदाने बेभान झालेत तर काहीजण पोटदुखीने त्रस्त.

Sadhana, you said it

सगळी मजा चालू आहे. आता हळूहळू एकेक बातम्या बाहेर येऊ लागल्या आहेत. आपला एक जवान त्यांच्या ताब्यात आहे. सीमारेषेच्या जवळपासच ऑपरेशन केले गेले आहे. याआधी सुद्धा असे ऑपरेशनस् बऱ्याचदा केले गेलेत. पण त्यावेळचे पंप्र पाणी पिऊन गाढ झोपी जायचे पण यांनी घोट नाही घेतला.
लोक अतिउत्साहात आहेत. चित्रपट (बॉलिवूडचे) पाहतानाच मेंदू काढून ठेवून मजा घेतात असे नाही तर आता सगळ्याच गोष्टींना असाच अप्रोच आहे.
हे जर राजकारण असेल (आहे हीच दाट शंका) तर अत्यंत हीन दर्जाचे व त्याहून गंभीर, धोकेदायक आहे. आपण माती खातोय आपल्याच हातांनी!

<<झी, हिन्दुस्तान टाईम्स, एक्स्प्रेस या तिघांपैकी दोघांवर माझा विश्वास आहे. शिवाय २०१४ साली 'आम्ही धडा शिकवला' हे निवृत्त अधिकार्‍यानेच सांगितलं आहे. ते तर सर्वत्र प्रकाशित झालं होतं.>>
------- सहमत. कॉन्ग्रेसच्या काळातही प्रत्येक हल्ल्याचा हिशोब चुकता होतच होता. फक्त त्या बातम्या पब्लिक होत नसत (अशी कारवाई आम्ही केली हे जाहिर मान्य न करणे हा त्यान्च्या योजनेचा भागही असेल).

या वेळी DGMO च्या दर्जाच्या अधिकार्‍याने अशी कारवाई केल्याची बातमी जाहिर केली हा मोठा फरक आहे. हे असे जाहिर होणे माझ्यासाठी नविन आहे. पुन्हा असे जाहिर करणे हा नव्या योजनेचा भाग आहे असे समजतो.

असो, कारवाई करुन भविष्यातले हल्ले थाम्बत असतील तर मला आनन्दच आहे. पण हजारोने अतिरेकी तयार होत आहेत (दोन मारले जातात आणि २० तयार होतात), आणि त्यान्ना पाठिम्बा देणारे किव्वा त्यान्च्याबाबत सहानुभुती बाळगणारे (निव्वळ काश्मिरात) लाखो लोक आहेत..... अशा परिस्थितीत निव्वळ लष्करी बळावर फार काळ शान्तता राखता येत नाही.

Pages