पाकिस्तान मधील अतिरेकी तळ उध्वस्त

Submitted by विक्रमसिंह on 29 September, 2016 - 04:58

भारताने इतिहासात प्रथमच पकिस्तानातील अतिरेकी अड्डे नष्ट करण्यासाठी यशस्वी कारवाई केली याबद्दल भारत सरकारचे अभिनंदन. या कारवाई मुळे पाकिस्तानला जरब बसेल व त्यातून योग्य तो धडा घेतला जाईल अशी आशा. आपण सर्वांनी यासाठी पाठिंबा दिला पाहिजे व जरूर पडल्यास लागेल ती मदत देण्यास तयार राहीले पाहिजे.

सरकारला व आपणाला पाकिस्तानच्या कारवाया थांबवण्यासाठी अजून काय करता येईल यावर आपली मते या धाग्यावर मांडावीत ही विनंती.

जयहिंद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईदच्या वेळी एकमेकांवर बॉम्बस्फोट !

तुम्हि आज ज्या मुहूर्ताना हिंदू सण म्हणताय त्याही दिवशी हिंदू हिंदू आपापसात लढून कुणीतरी मेले होते

भारत पाकिस्तान संघर्ष थांबणे गरजेचे आहे.
निष्पाप सैनिकांचे बळी जाणे हे दुःखदायक च आहे.
ज्या घरातील व्यक्ती जात असेल त्यांचे दुखः केवढे मोठे आहे.

<<निष्पाप सैनिकांचे बळी जाणे हे दुःखदायक च आहे.
ज्या घरातील व्यक्ती जात असेल त्यांचे दुखः केवढे मोठे आहे. >.

------ खरे आहे...

इतका अक्कलवान माणूस टॅक्सीच चालवितो अजून? काँग्रेसने त्याला उपाध्यक्षपद नाही दिलं का?

काँग्रेस देऊ शकेल कारण बीजेपीमध्ये चहावाले असतात फक्त. रच्याकने, घराणेशाहीचा आरोप होत असलेल्या काँग्रेसने बाहेरच्या माणसाला काही पद द्यावं अशी अपेक्षा आहे हेच स्तुत्य आहे.

>>तुम्हि आज ज्या मुहूर्ताना हिंदू सण म्हणताय त्याही दिवशी हिंदू हिंदू आपापसात लढून कुणीतरी मेले होते

पानिपतावर हिंदू राजांपैकी किती जण मराट्यांच्या मदतीला आले होते बरं??? का सोईस्कर तेव्हढाच इतिहास बघायचा?

अरे राजकारण्यांचे एक ठीक आहे.... त्यांचा काहीतरी फायदा असतो पण सर्वसामान्य लोक उगा इतिहास उगाळत बसतात तेंव्हा गम्मत वाटते Wink

आज लष्कराचा एक ही जवान धारातीर्थी न पडता ४ अतेरिकी ७२ हुरान ला भेटायला पाठवले गेले .

टोल नाक्यावर थांबवले ल्या ट्रक मधून अतेरिक्या नी गोळीबार करायला सूर वात केल्या नंतर थोड्या वेळाने लष्कराने तो ट्रक च ब्लास्ट करून उडवला !
त्या ट्रक मध्ये वाळूच्या पोत्यांचे बंकर बनवले होते , म्हणजे पूर्ण तयारीने आले होते.
https://twitter.com/MirrorNow/status/1329322310654836739?s=19

भारतीय सीमारेषेजवळ कोणताही गोळीबार झाला नाही असं स्पष्टीकरण भारतीय लष्कराने दिलं आहे. काही प्रसारमाध्यमांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राइक झाल्याचं आणि पिन पॉइंट स्ट्राइक केल्याचं वृत्त दिलं होतं. मात्र असं काहीही घडलं नसल्याचं आता भारतीय लष्कराने स्पष्ट केलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर पिनपॉइंट स्ट्राइक करण्यात येतो आहे. पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी कट रचला जातो आहे त्यामुळे ही कारवाई केल्याचं म्हणण्यात आलं होतं मात्र असं काहीही घडलं नसल्याचं भारतीय लष्कराने म्हटलं आहे

https://www.loksatta.com/desh-videsh-news/there-has-been-no-firing-at-lo...

बरोबरच आहे त्यांचे

अतिरेकी पकडला की मारूनच खल्लास करायचा,

पकडून तुरुंगात ठेवला की भाजपे त्याला सोडून येतील, अतिरेकी पकडून त्याला फाशी द्यायला हे काँग्रेसचे राज्य नाही

Pages