पाकिस्तान मधील अतिरेकी तळ उध्वस्त

Submitted by विक्रमसिंह on 29 September, 2016 - 04:58

भारताने इतिहासात प्रथमच पकिस्तानातील अतिरेकी अड्डे नष्ट करण्यासाठी यशस्वी कारवाई केली याबद्दल भारत सरकारचे अभिनंदन. या कारवाई मुळे पाकिस्तानला जरब बसेल व त्यातून योग्य तो धडा घेतला जाईल अशी आशा. आपण सर्वांनी यासाठी पाठिंबा दिला पाहिजे व जरूर पडल्यास लागेल ती मदत देण्यास तयार राहीले पाहिजे.

सरकारला व आपणाला पाकिस्तानच्या कारवाया थांबवण्यासाठी अजून काय करता येईल यावर आपली मते या धाग्यावर मांडावीत ही विनंती.

जयहिंद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधीच्या पाच सहा लढाया इतिहासातून पुसल्या काय ?>>> प्रत्युत्तरादाखल केलेल्या लढाया आणि अतिरेक्यांच्या विरूध्द आक्रमकपणे केलेली कारवाई यातील फरक कळतो का?

Proud

म्हणजे इतक्यात हुरळून जाण्यात अर्थ नाही. वेट अँड वॉच.
पण बातमीने बरे वाटले.>>>> + १००००

खरचं , एक्दम , " खतरनाक!!!" अशीच रिअ‍ॅक्शन निघाली तोंडातून , बातमी ऐकल्यावर Happy

म्हणजे डिटेल्स कशाला सगळ्यांना दिसले पाहीजेत. पुढील कारवायांच्या वेळी शत्रू सावध नाही का होणार ? >>> + १००

जबरी! चांगली बातमी!

पाक इन्कार करत आहे ते चांगलेच आहे. सहसा अशा वेळेस तक्रार अशी असते की ते "आक्रमण" करत आहेत, किंवा नागरी ठिकाणी हल्ले करत आहेत. असे काही झालेच नाही हे म्हणणे त्यांना त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी आवश्यक आहे. असेच इन्कार करत राहा म्हणावं Happy

लई भारी!

भारतीय लष्कर आणि भारत सरकार यांचं मनापासून अभिनंदन!

पाकिस्तानचा इन्कारच पुरेसा बोलका आहे.

दिनेश,

आज एक सर्वपक्षीय नेत्यांची बैठकही झाली. थोरले पवारसाहेबही घाईघाईत दिल्लीत त्या बैठकीला गेलेले होते.

भारतीय सेना आणि सरकारचं अभिनंदन!

दुध मांगो तो खीर देंगे, कश्मीर मांगो तो चीर देंगे!!

पाक इन्कार करत आहे कारण हा हल्ला भारताने भारताच्या भुभागावर केला आहे ज्यावर पाकिस्तानने अनधिकृत कब्जा केला आहे आणि केला तो सुद्धा अतिरेक्यांविरूध्द नियंत्रितपणे.

सर्व जगाला पाकिस्तानी मनोवृत्ती आणि खोटारडेपणा माहित आहे.

http://www.loksatta.com/desh-videsh-news/surgical-strikes-will-show-nawa... >>>>स्वतःच्या दोन बायका नीट सांभाळता नाही आल्या, त्या पण धुम पळाल्या आणी हे येडं चाल्लय मोदींना धडा शिकवायला. हे पाकडे खालची आग न विझवता दुसरीकडे पाणी का फेकायला जातात देव जाणे.

हल्ला झाला आहे हे मान्य करणं म्हणजेच तिथे अतिरेक्यांचा तळ होता हे मान्य करण्यासारखं होईल. आणि हे पाकिस्तानला नक्कीच गैरसोयीचं आहे. म्हणूनच ते डिनायल मधेच असणार.

इथले मोदीप्रेमी इतके आंधळे आहेत की पाकव्याप्त काश्मिर म्हणजे पाकिस्तान असे संबोधत आहेत .

अरेरे ! कुठे तो नथुराम... जो पाकलाही हिंदुस्तान म्हणायचा.

आणि कुठे इथले हे आयडी जे पीओके ला पाकिस्तान म्हणताहेत !

Sad

सरकारचे व सेनेचे अभिनंदन!

*

@ धागाकर्ते, ते पाकिस्तानचं पीओके करणार का प्लीज?

"पाकव्याप्त" असलं तरी आपण अजून ते पाकिस्तानला डोनेट नाही केलेलं ना?

एका पाकिस्तानी बातमीनुसार - पाकिस्तान म्हणतो हल्ला झालाच नाहि; आता हे अजुन एक सणसणीत ठेऊन देण्याचं आमंत्रण समजायचं का?

दुसर्या पाकिस्तानी बातमीनुसार - भारतीय हल्ला पाकिस्तानी हद्दित झालाच नाहि; म्हणजे हे कबुल करतायत कि यांचे अतिरेकि भारताच्या हद्दित घुसलेत...

काहिहि असो, एक भारतीय म्हणुन सरकार/सेनेच्या या धाडसी कामगिरीचा अभिमान वाटला...

The surgical strikes by the Indian Army on terror launch pads in Pakistan-Occupied-Kashmir (PoK) have generally been welcomed by politicians cutting across party lines. However, Jammu and Kashmir CM Mehbooba Mufti, whose PDP is governing the state in alliance with the BJP, sounded sceptical of the government's move.

Congress president Sonia Gandhi, in a statement, said the party stands with the government in its actions today to protect our country's security and deal with the menace of terrorism from across the border. She congratulated the armed forces on her party's behalf and offered its support to the government in the country's continuing battle against cross-border terrorism.

- साभार

रश्मीजी, हम तो बस एक नाचीज़ शख़्स है | भारतासारख्या स्वतंत्र सार्वभौम देशाच्या महान सैन्याचा अपमान करणारे आम्ही कोण ? ह्या स्वतंत्र सार्वभौम देशाचं सेनादळ किती वंदनीय आहे ते Bofors scam, LTTE-NAVY संबंध ह्यासारख्या घटनांमधून पुढे येत रहातंच की ! Navy च्या recruitment जाहिरातींमधे जे मद्याचे प्याले नाचवले जातात त्यावरूनही बरंच काही स्पष्ट होतं. शाळकरी पोरांचं एक ठीक आहे, रश्मीजी, पण तुम्हीसुद्धा Arms race वाल्यांचं प्रतिनिधित्व करणा-या सेनादळांचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करू शकत नाही हे पटणारं नाही. You must be joking...
http://supersamir.blogspot.in

एखाद्या विषयावरील धागा कसा भरकटवावा किंवा त्या साठी हातभार लावावा अश्या मंडळीची उपस्थिती आणि विषय सोडून दिलेले/धागाकर्त्याला अपेक्षित नसलेले प्रतिसाद पाहता.....

धागा भरकटवणे हे काही आयडींचे/ड्यु आयडींचे मायबोलीवरील उल्लेखनीय योगदान आहे या माझ्या मताचा मला खरंच अभिमान आहे. Happy

एक नंबर बातमी आहे!
आज दिवसभर कामधाम सोडून हाच माहौल होता ऑफिसमध्ये.
कधी अशी मजा भारत-पाक क्रिकेटसामन्यालाही येत नाही.
एखादं युद्ध झालंच छोटं मोठं आणि आपणच पुढाकार घेऊन ते सुरू केले तर घुसून मारू आणि मारून बाहेर येऊ आपण .. होऊ दे खर्चा

कधी अशी मजा भारत-पाक क्रिकेटसामन्यालाही येत नाही.
एखादं युद्ध झालंच छोटं मोठं आणि आपणच पुढाकार घेऊन ते सुरू केले तर घुसून मारू आणि मारून बाहेर येऊ आपण .. होऊ दे खर्चा>>>>>>>> मजा का? बॉर्डरवर जा ना.तिकडच्या नागरिकांचे स्थलांतर चालू आहे.कित्येक जण गाव सोडून जाताना बातम्यात दाखवत होते.

ह्या स्वतंत्र सार्वभौम देशाचं सेनादळ किती वंदनीय आहे ते Bofors scam, LTTE-NAVY संबंध ह्यासारख्या घटनांमधून पुढे येत रहातंच की ! Navy च्या recruitment जाहिरातींमधे जे मद्याचे प्याले नाचवले जातात त्यावरूनही बरंच काही स्पष्ट होतं. >>>>लवकर बरे व्हा. बुडाखालची खुर्ची हादरली की कळेल. सुरक्षीत ठिकाणी बसुन कीबोर्ड बडवायला शौर्य लागत नाही.

Pages