Submitted by आर्फी on 24 February, 2009 - 13:22
अॅडमिन, नमस्कार.
कदाचित हे या आधीही चर्चिले गेले असेल, पण मला जाणवले म्हणून सांगतो.
"Group" देवनागरीत लिहिताना 'गृप' पेक्षा 'ग्रूप' असे बरोबर वाटते.
माझ्यामते English मध्ये 'ऋ' अक्षर नाही. त्यामुळे त्याचे 'गृ' असे जोडाक्षरही बरोबर वाटत नाही.
लोकांचं काय मत आहे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अॅडमा, ज्य
अॅडमा,
ज्यांना नियमांची माहिती नाही आणि ज्यांनी आपल्या साहित्यात अजाणता विसंगत विभक्ती प्रत्यय वापरले त्यांच्याबद्दलचा मुद्दा बोलून केव्हाचा संपलाय.
पण ज्यांच्या मनात नियम कळल्यानंतरही त्यांच्या अनुसरणाबाबत किंतू आहे किंवा ज्यांना भाषेच्या सरलतेसाठी व्याकरणातील नियमांचा अंकुश अमान्य आहे त्यांच्या संदर्भात लिहिले होते मी आणि तसे नमूद ही केले होते.
मी ही
मी ही चर्चा सुरू झाल्यापासून वाचत आहे. आता खरं तर गोंधळच उडालाय माझा,कोण काय बोलतंय, आणि कोणाची काय मतं!..
मी प्रत्यक्षात तर या जन्मात अशी हाक मारणार नाही/ माझ्याकडून अशी हाक मारली जाणार नाही!)
पण तरीही असं वाटतं की नियम वगैरे ज्यांना माहीत आहेत त्यांच्यासाठीच! आणि त्यातही ज्यांना माहीत आहे तेही "सगळेजण" तो वापरत असतील हे मला जरा अशक्य वाटते.
माझं उदाहरण घ्यायचं झाले तर मला स्वत:ला हा नियम लावून वापरलेले बरेच शब्द विचित्र आणि कृत्रिम वाटतात...(म्हणजेच कानाला बरे वाटत नाहीत !) त्यामुळे माझ्याकडून हा नियम पूर्णपणे, प्रत्येक शब्दाला पाळला जाईल असे मला आत्तातरी वाटत नाही.
प्रत्येकाने असा विचार करून पाहीला तर तो नियम किती वापरण्या-योग्य आहे, हे आरामात कळेल.
बाकी, एडीएम(किंवा अॅडम) च्या पोस्टशी सहमत. ( केवळ नियम आहे म्हणून अॅडमा म्हणणे हे माझ्या विचारकक्षेबाहेरचे आहे.. तसेच केदारा म्हणणे.. अगदी "केशवा.. माधवा..." म्हणून देवाला आर्त हाक मारल्यासारखं वाटतं!
www.bhagyashree.co.cc
>>आणि
>>आणि एव्हडं सगळं होऊन रितसर मार्गानी किंवा कशाही पध्द्तीने तो नियम बदललाच जाणार आहे....
ऑ!! हे तुला कुणी सांगितलं बाबा? मंडळाचा छुपा आदमी आहेस की काय..
>>तेव्हा मुठभर लोकांनीच सामान्यांसारखं का वागू नये??
असं जर झालं असतं तर आज जितका काही प्रतिभांचा आविष्कार, कुठल्याही क्षेत्रात, दिसतोय तो दिसला नसता आणि सगळं जग एकसुरी, नीरस झालं असतं.
असो. विषयांतर केल्याबद्दल क्षमस्व पण राहवलं नाही म्हणून हे विधान.
क्ष, आता
क्ष, आता विषयांतर केलच आहेस तर..
इथे कोणालाही कसल्याही प्रतिभांचे आविष्कार घडवायचे नाहियेत... श्र म्हणत्ये रीतसर मार्गांनी नियम बदला पण तोपर्यंत तो वापरा ( जो आज फारच कमी प्रमाणात वापरला जातोय...) आता बदलायचाच आहे तर वापरायचा अट्टाहास कशाला???
असो...
चिन्मय, तुझ्या मुद्द्यावर अगोदरच बरीच चर्चा झालेली आहे..
>>आता
>>आता बदलायचाच आहे तर वापरायचा अट्टाहास कशाला???
अडमा, काहीच्या काही पोस्ट याला म्हणतात हो!
बाकी विषयांतराचा अर्थ माहिती असेलच तुला. तो विषय इथे चर्चिला जात नाहीये पण (स्वातीची माफी मागून तिचंच वाक्य पुढे) तुझं ते विधान भलतंच धाडसी होतं!
>>तेव्हा
>>तेव्हा मुठभर लोकांनीच सामान्यांसारखं का वागू नये??
असं जर झालं असतं तर आज जितका काही प्रतिभांचा आविष्कार, कुठल्याही क्षेत्रात, दिसतोय तो दिसला नसता आणि सगळं जग एकसुरी, नीरस झालं असतं.
>>>>
मायबोलीवरच्या लेखनात हा नियम पाळलाच पाहिजे या बाजूने वाद घालणारे मूठ भर अडमाला अपेक्षित असावेत. अन जनसामान्यांसारखं वागणं हे देखील फक्त नियम पाळणे किंवा त्यांचा पाठपुरावा करणे याबाबत तो म्हणत असावा. त्यांनी सामान्यांचं अनुकरण या नियमाच्या बाबतीत केलं तर हे तुम्ही म्हणताय ते सगळं होईल ? खरंच ?
लेखन सोडून इतर कलाप्रांतात लोकांनी नवे प्रयोग केलेच नाहीयेत का ? सगळ्यांनी सर्व नियम पाळूनच निर्मिती केली आहे का ? एखाद्या रागात असलेले स्वर वगळून, नसलेले स्वर घालून, घराण्यांच्या पद्धतींची सरमिसळ करुन गाणारे, यशस्वीपणे गाणारे / वाजवणारे कोणीही नाहीत ?
हे वरचं जग एकसुरी व नीरस होणार हेच विधान मला धाडसी दिसत आहे
अमेरिकन सेंटरसाठी. >> सेंटरासाठी का नाही ?
बरोबर.
बरोबर. सेंटरासाठी असंच हवं.
>>हे वरचं जग
>>हे वरचं जग एकसुरी व नीरस होणार हेच विधान मला धाडसी दिसत आहे
शोनू, परत सांगतो. ते विषयांतर होतं आणि मी तसं तिकडे लिहिलंही आहे. त्याचा इकडे संबंध जोडू नका. आणि होय, जे प्रतिभावंत होते त्यांतल्या बहुतेकांनी सर्वमान्य जे काही असेल त्याचा विचार करुन त्याच प्रवाहात सामील व्हायचे कबूल केले नाही. सर्वसाधारण व्यक्तिंच्या व्याख्येत त्यांतल्या बहुतांशी लोकांना बसवता येणार नाहीच. आणि तो माझ्या त्या वाक्यामागचा आशय होता आणि तोच अजूनही राहील.
>>मायबोलीवरच्या लेखनात हा नियम पाळलाच पाहिजे या बाजूने वाद घालणारे मूठ भर अडमाला अपेक्षित असावेत. अन जनसामान्यांसारखं वागणं हे देखील फक्त नियम पाळणे किंवा त्यांचा पाठपुरावा करणे याबाबत तो म्हणत असावा. त्यांनी सामान्यांचं अनुकरण या नियमाच्या बाबतीत केलं तर हे
तुम्ही म्हणताय ते सगळं होईल ? खरंच ?
मला पूर्णपणे समजलं अडमाचं म्हणणं काय होतं ते. या विषयाच्या संदर्भात सामान्यांचं अनुकरण केलं तर जग नीरस आणि एकसुरी होईल असे मी कुठे म्हणालो आहे ते सांगा. आणि अडमाने मुद्दा मांडला त्यावर जास्त काही प्रतिक्रिया द्यायची माझी इच्छा नाही कारण हे नियम का पाळले पाहिजेत याचा संदर्भ पूर्ण वेगळा आहे आणि अडमाने मांडलेल्या या मुद्यावर (आणि इतरही बर्याचशा मुद्यांवर) आधी चर्चा झालेली आहे (आणि तुम्ही, अडमाने काही अंशी त्यांत भागही घेतलेला आहे) त्यामुळे परत परत त्यांच विषयावर गुर्हाळ चालवणं होतंय असं तुम्हाला वाटत नाही? त्यांतही सर्वसामान्यांची व्याख्या फक्त जे "क्यू मध्ये उभे राहून कार्डवर टिकीट्स घेतात" इतकीच नाही तर "लायनीत उभे राहून कार्डावर तिकिटं घेणारे" पण त्यांत आहेत हे कोणीच लक्षात घेत नाही.
बाकी तुमच्या प्रतिक्रियेवरून घेतलेल्या काही नोंदी,
.
या गदारोळात तुमच्या २२ एप्रिलच्या (पान क्रमांक ९ वर असलेल्या) प्रतिक्रियेवर मी, श्रद्धा आणि चिन्मयाने विचारलेल्या प्रश्नांना तुम्ही मोठ्या सोयीस्कररित्या उत्तर देण्याचे टाळले हे लक्षात आले.
.
त्याच वेळेस अडमाच्या
>>श्र म्हणत्ये रीतसर मार्गांनी नियम बदला पण तोपर्यंत तो वापरा ( जो आज फारच कमी प्रमाणात वापरला जातोय...) आता बदलायचाच आहे तर वापरायचा अट्टाहास कशाला???
या विषयाशी संदर्भ असलेल्या हास्यास्पद मुद्यावर तुम्ही काहीच वक्तव्य केले नाहीत (मी तुम्ही किंवा कोणीही हे करायलाच पाहिजे असे म्हणत नाही) पण त्याच वेळी विषयाशी संदर्भ नसलेल्या, आणि तसे स्पष्ट केलेल्या, माझ्या मुद्यावरुन हा प्रश्न विचारता आहात, यावरून "तुम्हाला फक्त एका निश्चित गटाशी वाद घालण्याची इच्छा आहे, या मुद्यांवर सारासार विचार करण्याची नाही" असा निष्कर्ष का काढला जाऊ नये हे ही सांगा?
शोनू, मी
शोनू,
मी विचारलेल्या प्रश्नांनाही अनेकांनी इथे उत्तरे दिलेली नाहीत. त्यांच्या चुका लक्षात आणून दिल्यावर त्या मान्यही केलेल्या नाहीत.
(मी) रोज(च)
(मी) रोज(च) वाचते आहे. जमल्यास आणि समजले नसल्यास पुन्हा पुन्हा वाचते आहे. या निमीत्ताने जी अभ्यासपूर्ण चर्चा झाली ती आवडली. मायबोलीवर (क. न. ते. म्हणत नाही पण ब-याच दिवसांनी) चर्चा म्हणण्यालायक चर्चा (किंवा वाद म्हणा हवं तर) झाली/झाला आहे. माझ्या स्वतःच्या ज्ञानात दोन्ही बाजूंच्या भुमिकेमुळे खरोखर भर पडलेली आहे. आपला वेळ आणि शाई खर्चून नवनवीन (आणी जुनेही) मुद्दे उपस्थीत करुन चिकाटीने लिहीणा-यांना सर्वांनाच सलाम.
आता फक्त समारोप भांडी आपटून/ किंवा ब्याट फेकून होऊ नये अशी मनापासून आणि कळकळीची सदिच्छा.
उच्चारांव
उच्चारांविषयी मी लिहिलं नाही कारण त्याबाबत काही लिहिण्या इतकं माझं निरीक्षण नाही. एका अतिशय मर्यादित परीघापलिकडे उच्चारांचा अनुभव नाही. त्याबाबतीत मी काय लिहिणार ( कप्पाळ )?
एकाचवेळी अनेक मुद्दे घेउन वाद घालणं मला जमत नाही. मी केदाराच्या विचारपुशीत देखील लिहिलं होतं.
नियम बदलण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील याची मला अजिबात कल्पना नाही. कोणी मार्गदर्शन केल्यास मी मदत करायला तयार आहे.
नियम बदलेपर्यंत आहे तोच नियम वापरायला काय हरकत आहे? ही पोझिशन जरा आहे कोड्यात टाकणारी आहे खरी. ( हास्यास्पद मी म्हणणार नाही ) - लेखक, प्रकाशक, मुद्रितशोधक आपल्या सवयी बदलून नव्या सवयी तात्पुरत्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न करतील का? का करतील ? शिवाय जर लोकांनी या नव्या सवयी अंगिकारल्या तर नियम बदलायची आवश्यकता काय ?
हा नियम बदलल्याचं सर्व लोकांपर्यंत कसं पोचवता येईल ?
अनेक दशके अस्तित्त्वात असलेला नियम कंसिस्टंटली पाळला जात नाही तर तो बदलून काय फरक पडणार आहे > हे देखील प्रश्न आहेतच ?
हा मुद्दा (बहुतेक अडमाने मांडलेला ) माझ्या कालच ध्यानात आला. त्याविषयी लिहायचं होतंच. इतर व्यवधानांमधे ( पार्ले बी बी नव्हे ) ते राहिलंच.
बाकी विशिष्ट गट वगैरे हे तुमचे निष्कर्ष आहेत. त्याबाबत इथे बोलणं हेही विषयांतरच नाही का
शोनू, <लेखक,
शोनू,
<लेखक, प्रकाशक, मुद्रितशोधक आपल्या सवयी बदलून नव्या सवयी तात्पुरत्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न करतील का? का करतील ?<>>
याबद्दल मी अगोदरच लिहिलं आहे. केवळ एका आठवड्याच्या काळात दोन मान्यवर लेखक व मराठीतील सर्वांत मोठी प्रकाशनसंस्था नियम पाळण्यास तयार होते, याबद्दल तुला काहीच म्हणायचं नाही का?
आणि या सवयी 'तात्पुरत्या' का म्हणून? अनेक नियम बदलूनसुद्धा हा नियम बदललेला नाही. कारण एकच. इंग्रजी शब्दांना विशेष सूट नाही.
>>बाकी
>>बाकी विशिष्ट गट वगैरे हे तुमचे निष्कर्ष आहेत. त्याबाबत इथे बोलणं हेही विषयांतरच नाही का
सपशेल मान्य. पण असा निष्कर्ष निघण्याइतपत संदर्भ सोडला गेला म्हणून ते वक्तव्य. पुनःश्च मी तरी विषयांतर करणार नाहीच. असो.
>>नियम बदलेपर्यंत आहे तोच नियम वापरायला काय हरकत आहे. ही पोझिशन जरा आहे कोड्यात टाकणारी आहे खरी.( हास्यास्पद मी म्हणणार नाही )
एक मिनिट, गोंधळ होतोय. या मुद्याला मी हास्यास्पद म्हणालो नव्हतो. घटनाक्रम असा,
१. तुम्ही (आणि बर्याच जणांनी) मुद्दा मांडला की नियम आहे पण बरेच जण तो पाळत नाहीत तर नियम बदलू का नये.
२. श्रद्धेच्या पोस्टीनुसार नियम बदलायला काहीच हरकत नाही पण आहे तो नियम धुडकावला जाऊ नये.
३. अडमाचा यावरुन निष्कर्ष असा की जर असा नियम बदलणारच आहे (हे गृहितक) तर तो पाळायचाच कशाला!
आणि यालाच मी हास्यास्पद म्हणालो. असो. तो काय म्हणाला आणि मी बरोबर कसा हे सांगण्यासाठी ही प्रतिक्रिया नसून फक्त गैरसमज होऊ नये म्हणून आहे हे लक्षात घ्यावे. यांत अडमाला किंवा तुम्हाला व्यक्तिशः मला काहीही म्हणायचे नाही.
>>हा नियम बदलल्याचं सर्व लोकांपर्यंत कसं पोचवता येईल ? अनेक दशके अस्तित्त्वात असलेला नियम कंसिस्टंटली पाळला जात नाही तर तो बदलून काय फरक पडणार आहे
एकदम कळीचा मुद्दा. जर नियम बदलला आणि बदललेला नियमही शिकवला गेला नाही तर पुढे काय? भाषा प्रवाही, लवचिक असावी वगैरे मान्य आहे पण कुठवर? हा प्रश्न आहेच. वैविध्य जपण्याइतकी की कणा मोडून नष्ट होण्याइतकी? (भाषा नष्ट होण्यासाठी एक महत्वाचं कारण तिची जागा दुसर्या भाषेने घेणं हे आहे)
मी असे म्हणत नाही की ७ कोटी लोक (कोणत्याही स्वरुपात का होईना) वापरत असलेली मराठी भाषा नष्ट होऊ लागली आहे. पण ती नष्ट व्हायची सुरूवात होऊ नये यावर चांगला पर्याय हाच की अशा बाबींमध्ये व्याकरणाचे नियम पाळून त्या परभाषेला महत्व न देता, त्या "भाषेला" रुजू न देता, प्राथमिक महत्व मराठीला देणे पण त्याचबरोबर तो शब्द आपलासा करणे, मराठी शब्दसंपदा वाढविणे.
आजवर परभाषांचे आघात मराठीने पचवले आहेत ते यांच निकषांवर हे दिसून येते. पंपावर, बोटीमध्ये हे शब्द मराठी वाटण्याइतपत का बदलले याचे कारण ते नियमांत बसवले गेले हेच आहे असे मानायला काहीच हरकत नसावी. जर तो शब्द व्याकरणदृष्ट्या बदलला नाही, नियमांप्रमाणे चालला नाही तर तो कायम "इंग्लिश" भाषेतलाच शब्द राहील, त्याने मराठी शब्दसंपदा वाढून तो आपल्या भाषेत समाविष्ट होणार नाही. तिथेच आपण भाषेच्या प्रवाहीपणाला, लवचिकपणाला खिळ घालू!
अडमाचा
अडमाचा यावरुन निष्कर्ष असा की जर असा नियम बदलणारच आहे (हे गृहितक) तर तो पाळायचाच कशाला! >>>> ते गृहितक नव्हतं... श्र च्या पोस्ट च्या संदर्भात होतं... ती असं म्हणतं होती की बदला पण रीतसर मार्गानी.. पण तोपर्यंत पाळा..
जर बदालायचाच आहे शेवटी तर पाळायचा कशाला?? आपलं न वापरणं "official" नंतर होणारच आहे.. हा मुद्दा होता..
असो... !
क्षा, उत्तम
क्षा,
उत्तम पोस्ट.
<जर बदालायचाच आहे शेवटी तर पाळायचा कशाला??<>
परत एकदा एक मुद्दा अधोरेखीत करायचा आहे.
व्याकरणाची दामले, सामंत, अर्जुनवाडकर यांची पुस्तकं वाचली तर लक्षात येईल की या मंडळींनी भाषेचा, भाषेतील प्रवाहांचा पुरेसा सखोल अभ्यास केला आहे. भाषेच्या प्रत्येक अंगावर विचार केला आहे. 'परभाषेतील शब्दांना मराठीचे नियम लावावेत' हा अतिशय सोपा व तर्काला पटणारा नियम आहे.
गेल्या ८० वर्षांत एकाही व्याकरणकाराला तो बदलावासा का वाटला नाही? अनेक नियम बदलले गेले, उच्चार बदलले, लिहिण्याच्या पद्धती बदलल्या. हा नियम मात्र सर्वांनीच कायम ठेवला. कारण, परभाषेतून आलेल्या शब्दांना वेगळे नियम का लावायचे? तुम्ही लिहिताय व बोलताय ती भाषा मराठी आहे. त्या वाक्यांत कर्ता, कर्म, क्रियापद, विभक्ती इ. सर्व मराठी भाषेतील नियम पाळतात. मग एखाद्याच परभाषी शब्दाला वेगळी वागणूक का व कशी द्यायची, असाच विचार त्यामागे होता, हे निश्चित.
एक लक्षात घ्यायला हवं. मी उल्लेखलेले भाषातज्ज्ञ हे आपल्या सर्वांपेक्षा भाषेला बर्याच गांभीर्याने घेतात. त्या नियमांचं पालन झालं नाही, हे खरं आहे. मात्र या नियमांचा मान राखूनच काही लेखक व प्रकाशनसंस्था आपल्या चुका दुरुस्त करायला लगेच तयार झाल्या, त्याचं काय?
प्रकाशनसंस्था हा शब्द वापरला याचं कारण चिनार व मनोविकास प्रकाशन यांनीही हा नियम यापुढे पाळू, असं आश्वासन दिलं आहे. डॉ. मृणालिनी गडकरी या साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळवणार्या ख्यातनाम अनुवादकार आहेत. मला बंगाली भाषा यांनीच शिकवली. तस्लिमा नासरीन व सुनील गंगोपाध्याय यांची सर्व पुस्तकं गडकरीबाईंनीच अनुवादीत केली आहेत. त्यांनीही असा नियम आहे, हे मान्य करून आपल्या पुढच्या आवृत्त्यांत बदल करण्यास मान्यता दिली आहे. मेहता प्रकाशनाने ही बहुतेक सर्व पुस्तकं प्रकाशित केली आहेत. त्यांचे अतिथी संपादक असणारे श्री. पंडीत यांनीही या नियमाला दुजोरा दिला आहे.
जाता जाता, बंगाली भाषेत सर्व परभाषी शब्द हे बंगाली रूप घेऊनच येतात.
(आरफी, सर्व
(आरफी, सर्व चर्चा वाचली.
)
हे क्ष यांच्या एका मुद्द्याबद्दल-
>>पंपावर, बोटीमध्ये हे शब्द मराठी वाटण्याइतपत का बदलले याचे कारण ते नियमांत बसवले गेले हेच आहे असे मानायला काहीच हरकत नसावी. जर तो शब्द व्याकरणदृष्ट्या बदलला नाही, नियमांप्रमाणे चालला नाही तर तो कायम "इंग्लिश" भाषेतलाच शब्द राहील, त्याने मराठी शब्दसंपदा वाढून तो आपल्या भाषेत समाविष्ट होणार नाही. तिथेच आपण भाषेच्या प्रवाहीपणाला, लवचिकपणाला खिळ घालू>>>>
हे परकीय शब्द नियमांत बसवले गेले त्यामुळे त्याला पर्यायी मराठी शब्द होते ते मागे पडले आणि या परकीय शब्दान्चे आक्रमण झाले असे वाटत नाही का? नियमामुळे ते मराठी वाटण्याइतपत बदलले पण 'होडी' कोणी वापरेना. जिथे पर्यायी शब्दच नसेल किन्वा असेल तरी तो ती संकल्पना नीट स्पष्ट करत नसेल तरच असे परकीय नवीन शब्द येऊदेत. आता 'सेन्टरावर' केल्याने तो मराठीत रुळणार असेल तर 'केन्द्रावर' चे काय होणार? त्यापेक्षा इन्ग्रजी आहे तसाच ठेवून तो "इन्ग्रजी" असल्याची वापरताना जाणीव झालेली बरी. त्यामुळे उपलब्ध असेल तर मराठी पर्याय वापरावा किन्वा नसेल तर शोधावा असे तरी वाटेल.
इथल्या दोन्ही बाजूच्या मतांचा आदर आहे पण मलाही हा नियम पाळणे शक्य होणार नाही.
गेल्या ८०
गेल्या ८० वर्षांत एकाही व्याकरणकाराला तो बदलावासा का वाटला नाही? अनेक नियम बदलले गेले, उच्चार बदलले, लिहिण्याच्या पद्धती बदलल्या. >>>>>
एखाद्या गोष्टीत बदल हवा की नाही हे ती गोष्ट वापरल्याशिवाय कळत नाही.... बाकीचे बरेच नियम काटेकोरपणे पाळले गेले आणि त्यावरूनच त्यात काही बदल करावे असं लक्षात आलं.. हा नियम फारच कमी प्रमाणात वापरला जातोय हे शोनूने दिलेल्या उदाहरणांवरून तसच तू ज्या प्रकाशनसंस्थांशी संपर्क साधलास त्यांनी सांगितल्या नुसार स्पष्ट झालय... ( यापुढे ते वापरतील हा भाग वेगळा.. पण आत्तापर्यंत वापरला गेला नाही हे आहेच ना??)
तो नियम वापरलाच न गेल्याने "बशीतून प्रवास करतो" इ. अर्थाच्या दृष्टीने बरोबर वाटतय का? / कानांना योग्य वाटतय का? / जनमानसात पटतय किंवा वापरलं जातय का? हे प्रश्ण पडलेलेच नसण्याची शक्यता नाकारता येत नाही.. ज्यानी काहीच फरक पडत नाही.. काहीच फायदा-तोटा नाही त्याकडे कोण कशाला लक्ष देईल... त्यामूळे कोणत्याही व्याकरणकाराला तो बदलावा असं वाटलच नसेल..
मी उल्लेखलेले भाषातज्ज्ञ हे आपल्या सर्वांपेक्षा भाषेला बर्याच गांभीर्याने घेतात. >>>>> ह्या बद्दल ह्या चर्चेत भाग घेणार्या कोणाचं दुमत आहे असं मला वाटत नाही.. तसच चाफा वर म्हणाल्याप्रमाणे मतभेद व्यक्त करणे आणि अनादर करणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत...
त्या नियमांचं पालन झालं नाही, हे खरं आहे. मात्र या नियमांचा मान राखूनच काही लेखक व प्रकाशनसंस्था आपल्या चुका दुरुस्त करायला लगेच तयार झाल्या, त्याचं काय? >>>>> असं काय आहे की ह्या विशिष्ठ नियमाचं पालन न झाल्याने आत्तापर्यंतच्या आवृत्त्यामधे साध्य झालं नव्हतं ते आता होणार आहे? इतके दिवस हा नियम न वापरूनही ह्या प्रकाशन संस्थांना काहीच फरक पडला नव्हता ना? एकूण ह्या गोष्टीला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं जातय असं मला आता वाटायला लागलं आहे..
परत एकदा.. ही सगळी मतं ह्या नियमाबद्दल आहेत.. व्याकरणाचे नियम अजिबात वापरूच नका असं मी कुठेही म्हंटलेलं नाही...
>>नियमामुळे
>>नियमामुळे ते मराठी वाटण्याइतपत बदलले पण 'होडी' कोणी वापरेना.
मला थोडी शंका आहे याबाबत. होडी शब्द साधारण वापरात आहेच. जंजिर्याला जायला होडीत बसून गेलो हाच शब्दप्रयोग मी ऐकला आहे. शिडाच्या होडीला बोट म्हणताना मी ऐकलेले नाही. पण तुमचा मुद्दा समजला.
>>त्यापेक्षा इन्ग्रजी आहे तसाच ठेवून तो "इन्ग्रजी" असल्याची वापरताना जाणीव झालेली बरी.
जाणीव होते खरी, पण तो वापर तसाच राहतो त्याचं काय? उलट आपल्याकडे ते भूषणावह वाटतं लोकांना! उगाचच वाक्यात इंग्लिश शब्द घालायची हौस काही नवी नाही.
>>त्यामुळे उपलब्ध असेल तर मराठी पर्याय वापरावा किन्वा नसेल तर शोधावा असे तरी वाटेल.
ते तर आम्हीही म्हणतोच. माझं स्वतःच मत बर्यापैकी हेच आहे. पण हे कितीही आदर्शवादी असलं तरी सत्यस्थिती वेगळी आहे (त्याकरता बर्यापैकी हा शब्दप्रयोग). जागतिकीकरणाचा झपाटा इतका मोठा आहे की त्यामुळे दशकापूर्वी माहिती नसणारे काही शब्द घराघरांतून घुसले आहेत. इंग्लिश शब्द हे काहीही झालं तरी बोलण्यात येणारच. उदा. बँकांना मराठीत काय म्हणणार? काही इंग्लिश शब्द इतके आपल्या दैनंदिन वापरात आहेत ते बाहेर हुसकावून काढणं शक्य नाही. तो आग्रह धरणे अतिरेकाचे होईल. तिथे भाषेचा लवचिकपणा आणि प्रवाहीपणा हे जे चाफ्याने मुद्दे मांडले आहेत ते अगदी योग्य आहेत. पण ते शब्द हा नियम पाळला तर आपलेसे करुन पुढे जाता येईल. परके ठेवले तर संघर्ष ठरलेला आहेच.
'होडी' शब्द
'होडी' शब्द जगात कोणीच वापरत नाही असा त्याचा अर्थ नव्हता. मुद्दा कळला हे बरे झाले.
पुढची दोन वाक्ये तुम्ही वेगळी केली, ती वेगळी नाहीत. 'जाणीव झाली तर पर्याय शोधावा वाटेल' असे मत.
जे भूषण वाटते म्हणून इन्ग्रजी शब्द वापरतात त्यांच्याबद्दल इथे काही बोलण्यात अर्थ नाही. कारण 'इन्ग्रजी शब्द वापरा पण हे मराठीचे नियम त्याला लावा' हे त्यांना सान्गून काय उपयोग?
पुन्हा नियम लावला की ते 'आपलेसे' होतील म्हणजे काही वर्षानी ते शब्द मराठीच समजले जातील का?
>>परके ठेवले तर संघर्ष ठरलेला आहेच.
हे मला कळले नाही.
मी मराठी पर्यायी शब्दाचा आग्रह धरलेला नाही. "जिथे पर्यायी शब्दच नसेल किन्वा असेल तरी तो ती संकल्पना नीट स्पष्ट करत नसेल तरच असे परकीय नवीन शब्द येऊदेत" हे मी वर लिहिले आहे. ते काही लोक जसेच्या तसे वापरतील काही नियमाप्रमाणे वापरतील.(पण नियम माहित आहे म्हणून, असे नाही. मी टेबलवर, टेबलावर दोन्ही ऐकले/वापरले आहे. दोन्ही कानाला खटकले नाही. (हे आलेच पुन्हा
)याबद्दलचा नियम माहित नव्हता)
१. >>जाणीव
१. >>जाणीव झाली तर पर्याय शोधावा वाटेल
वाक्य वेगळी केली तरी अर्थ कळला. पण सांगायचे तेच आहे, जाणीव झाली तरी पर्याय शोधण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. व्याकरणाचे नियम हे माझ्या आधीच्या एका प्रतिसादात म्हणालो त्याप्रमाणे पहिल्यापासून शिकवले नाहीत तरी कळतात, रुजवले जातात. वाक्यांत इंग्लिश शब्द हौसेने घातलां तरी सामान्यवचने, कर्ता क्रियापदादिकांचा योग्य (किंवा आपल्याला लहानपणापासून शिकवला गेला तसा) उपयोग आपण करतोच. तसाच अंगवळणी पडलेल्या इंग्लिश शब्दांचा व्याकरणासह उपयोग झाला तर ते आपलेसे होतील हा मुद्दा आहे. आणि नमुन्यादाखल दिलेल्या शब्दांकडे बघितलं तर हे शब्द अगदी मराठी वाटावेत इतपत रुळलेले आहेत हे नक्की. पण फारसीतून आलेले किंवा संस्कृतातून आलेले शब्द जसे मूळ भाषेचा संदर्भ सोडत नाहीत तसे हे शब्दही तो संदर्भ सोडणार नाहीच. पण त्यामुळे भाषेचे काही अडेल असे वाटत नाही. झालेच तर शब्दसंपदा वाढायला एक प्रकारे मदतच होईल. संगणकीय क्षेत्रात हे विशेषत्वाने जाणवेल. त्या शब्दांना मराठी प्रतिशब्द शोधणे एक स्वतंत्र उपक्रम होईल आणि तो कोणी करेलसे वाटत नाही.
२. "परके ठेवले तर संघर्ष आहेच"
याचा संदर्भ तुमच्या पहिल्या मुद्याला धरुनच येतो. जोपर्यंत तो शब्द परका आहे, दुसर्या भाषेचे बीज रोवण्यास मदत करत आहे तोवर अशी भाषा बोलणारे त्या परक्या भाषेचे लांगुलचालन करीत आहेत असे वाटेल, ते वाक्यप्रयोगच परके वाटतील. इंग्लिश शब्द भाषेत येणार हे निर्विवाद सत्य आहे. पण ते वापरले तर धेडगुजरी भाषा वापरण्याबद्दल आरोप करणारे भरपूर आहेत (आणि त्यांत बर्याच अंशी त्यांची चूक नाही) आपण आत्ता मराठी वापरण्याबद्दल आग्रह करता आहात त्याच्यापुढे जाऊन दुराग्रह करणारे कमी नाहीत. आणि असा संघर्ष झाला तर त्यामुळे भाषा समृद्ध होण्यापेक्षा ती वापरण्यापासून लोक परावृत्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (जसे १९२०-४० या काळांत संस्कृतप्रचुर मराठीचे अजीर्ण झाल्यामुळेच रविकिरण मंडळाच्या कवींनी अर्वाचीन मराठी साहित्य पुढे आणले. *अर्थात त्याचेही पुढे अती झाले ही गोष्ट वेगळी*) पण मुद्याची गोष्ट अशी की फक्त मराठी वापरा अशी घोषणा देणे वेगळे आणि इंग्लिशीच्या प्रचंड झंझावातात ते खरेच अमलांत आणणे वेगळे. आणि हाच त्या संघर्ष शब्दामागे संदर्भ होता.
>>आपण आत्ता
>>आपण आत्ता मराठी वापरण्याबद्दल आग्रह करता आहात
नाही. माझा कसलाच आग्रह नाही. प्रतिशब्द शोधण्याचाही आग्रह नाही. इंग्रजी शब्द वापरले तर नियमाप्रमाणे वापरा, किंवा तसे वापरु नका असाही नाही.
'आपलेसे' ची तुमची व्याख्या काय माहित नाही. पण 'इंग्लिशीच्या झंझावातात' ऐवजी 'इंग्रजीच्या झंझावातात' किंवा 'इन्ग्लिशच्या झंझावातात' हे मला 'आपलेसे' वाटते.
>>त्याच्यापुढे जाऊन दुराग्रह करणारे कमी नाहीत. आणि असा संघर्ष झाला तर त्यामुळे भाषा समृद्ध होण्यापेक्षा ती वापरण्यापासून लोक परावृत्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मराठीच्या वापराबद्दल दुराग्रह नको, तसेच तिच्या एखाद्या आत्तापर्यन्त काही लोकाना माहितही नसलेल्या दुय्यम नियमाबद्दलही नको.
मी
मी उल्लेखलेले भाषातज्ज्ञ हे आपल्या सर्वांपेक्षा भाषेला बर्याच गांभीर्याने घेतात >> पण या भाषातज्ञांनी या नियमाच्या पालनबाबत जाहीर, सातत्याने पाठपुरावा केलाय का ? केला असल्यास त्यातून काय निष्पन्न झालं ? चिन्मयाशी झालेल्या संवादामुळे लेखक , प्रकाशक जर हे नियम यापुढे पाळायला तयार झाले तर याआधी इतर कोणीही असा प्रयत्न का केला नाही ?
सहज, असामी
सहज, असामी च्या विपु मधे खरडलेली माझी पोस्ट इथे देतो आहे! बाकी आमची चर्चा (?) हवे तर आमच्या विपुमधे बघू शकता
24 एप्रिल, 2009 - 08:53
limbutimbu
>>>>> "ते" म्हणताहेत कि नियम आहे हे ठिक आहे पण कोणी पाळत नाहि. १०० वर्ष झाली तरी कोणी पाळत नाहि, मग नियम का बदलू नये ?
एक उदाहरण देतो! सोने चोविस कॅरटचे म्हणजे शुद्धतेची परिसीमा मानली जाते! मला वाटते की यात वाद नसावा, तर व्याकरणासहित, लिपिबद्ध भाषा ही मुलतः चोविस कॅरेट सोन्यासारखीच अस्ते!
जस परवडत नाही म्हणून वा आवडत म्हणुन हल्ली "जनसामान्य" बहुसन्ख्य लोक बेन्टेक्स वा अन्य कमी कॅरेटचे वेळेस एखाददोन ग्रॅमचे दागिने देखिल वापरतात, तसेच, बोलीभाषेबद्दल होते! जनसामान्य, अन या "सामान्य" शब्दातच सगळे सार दडले आहे, ते सामान्य अस्तात म्हणूनच कमी कॅरेट, ताम्बेमिश्रित, किन्वा केवळ सोन्याचे पॉलिश केलेले दागिने वापरतात, हौस म्हणून, सोय म्हणून, परवडत म्हणून किन्वा काहीही कारणाने!
पण ते तसे वापारतात म्हणून उद्या जर कोणी सोन्याच्या चोविस कॅरेटचा नियमच रद्द करा असे म्हणू लागले तर कसे शक्य आहे?
मला तर हे "कम्युनिस्ट क्रान्ती (?)" पेक्षाही पुढचे पाऊल वाटते!
आख्खी दुनिया, सोन्याचे कसलेही कशाही प्रकारचे, भेसळसरभेसळीचे दागिने वापरूदे, चोविस कॅरेट सोन्याचे महत्व अबाधितच रहाणार अस्ते! व निवडक लोक ते महत्व पाळतात, नव्हे, तर शुद्धतेच्या प्रमाणाचा शिक्काही हल्ली दागिन्यावर मारुन मिळतो!
हाच प्रकार भाषेबाबतही होते, सामान्य लोक जे काय सन्वादासाठी बोलतात, आवाज काढतात, ओरडतात, किन्चाळतात, कधी गातात, कधी नाकात तर कधी घोगरे बोलतात, पण सन्वादासाठी जी काय भाषा ते वापरतात, ती व्यक्ति तितक्या प्रकृती या नियमास धरुन वेगवेगळी असू शकते, तिच्यात निरनिराळ्या भाषेतील शब्दान्ची भेसळ असू शकते, क्रियापदान्ची मोडतोड असू शकते, र्हस्वदीर्घ उच्चार व हेल याप्रमाणे बदलू शकते, पण म्हणून काय प्रमाण भाषेचे महत्व नाकारता येईल काय? प्रमाण भाषेच्या नियमात, उगाच कोणतीही झुन्ड वा कम्पू वा समुह म्हणतो म्हणून नियम बदलून चालेल काय? नियम बदलण्याची ही मागणीच मला अनाकलनीय वाटते!
देवाला रिटायर करा ही मागणी जेवढी आततायी तेवढेच, प्रमाण भाषेचे वर्षानूवर्षे चालत आलेले शास्त्रशुद्ध नियम "रिटायर करा" वा "बदला' ही मागणी आततायी वाटते!
>>>>>> जर भाषा लोकांसाठी असते हे मान्य झाले तर नियम सर्वसामान्य भाषेला include करू शकेल असा बदलायलाका हरकत आहे ?
पुन्हा तेच, वरील उदाहरण, हलक्या प्रतीच्या सोन्याकरता उच्चप्रतीचे सोने देखिल केवळ "जनसामान्यान्ची डिमाण्ड" म्हणून "खालच्या पातळीवर" आणून ठेवावे का? जनसामान्न्याना त्यान्ची भाषा वापरण्यास बन्दी नाहीये! पण एका प्रमाण भाषेत व्यवहार करावयाचा असल्यास, व तशी भाषा व्यवहारास आवश्यक असल्याने, ती विशिष्ट न बदलू शकणार्या नियमान्नीच युक्त असावी लागते, तशि ती आहे!
अजुन एक उदाहरण, मी भारतात राहून इन्ग्रजी शिकलो! जी काय मला तोडकी मोडकी येते, त्याच भाषेत मला इन्ग्रल्न्डात जाऊन देखिल व्यवहार करायचा असे समजू! मी तेथे जाऊन माझि इन्ग्रजीची तोडफोड तिथे केली, तरी इन्ग्रज लोक वेळेस व्यवहारापुरता सन्वाद साधण्यासाठि ते खपवुन घेतिल, पण मी, सामान्य माणुस, तशी इन्ग्रजी बोलतो, म्हणून ते त्यान्ची इन्ग्रजी माझ्यासारखी करतील काय? इन्ग्लन्डात तरी मला हे शक्य वाटत नाही! (अर्थात कालौघात काहिही शक्य आहे) पण अमेरिकेत मात्र हे शक्य होईल!
भारतातील महाराष्ट्रात, मराठी भाषेकरता काय करायचे हे ज्याचे तो ठरवतच अस्तो, पण भाषातज्ञ मात्र शुद्ध, व्याकरणाच्या नियमान्सहीतच्या भाषेचाच आग्रह धरणार, हे ही तितकेच खरे! असे तज्ञ अर्थातच, सन्ख्येने तुरळक अस्तील, पण तसेही, चोविस कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यान्नी लगडलेली स्त्रीया तरी आता कितिशा शिल्लक आहेत?
असो.
...;
***** या राष्ट्रास निधर्मी म्हणून घोषित करणे व पुरुषासारख्या पुरुषाने स्वतःस हिजडा म्हणवुन घेऊन तसे वागणे या दोन्हीत अर्थाअर्थी, मला तरि फरक वाटत नाही! ****
प्रमाण
प्रमाण भाषेच्या नियमात, उगाच कोणतीही झुन्ड वा कम्पू वा समुह म्हणतो म्हणून नियम बदलून चालेल काय? नियम बदलण्याची ही मागणीच मला अनाकलनीय वाटते!
देवाला रिटायर करा ही मागणी जेवढी आततायी तेवढेच, प्रमाण भाषेचे वर्षानूवर्षे चालत आलेले शास्त्रशुद्ध नियम "रिटायर करा" वा "बदला' ही मागणी आततायी वाटते! >>
प्रमाण भाषेचे नियम , वर्षानुवर्षे चालत आलेले नियम ?? कुठली प्रमाण भाषा म्हणताय तुम्ही - ज्ञानेश्वरांची, तुकोबाची, समर्थांची भाषा आता वापरतंय का कोणी ? त्याकाळातले व्याकरणाचे, शुद्धलेखनाचे नियम लिहिलेले जरी नसतील तरी त्याकाळच्या साहित्याच्या निरिक्षणानून ते डिड्युस करणे शक्य आहे. तेच नियम आज अस्तित्त्वात आहेत का ? मग त्यांची भाषा त्याकाळात प्रमाण नव्हती का ?
नियमाचा आग्रह धरणारे व्याकरणशास्त्री अन नियमाच्या सातत्याने होणार्या उल्लंघनाचा आधार घेऊन तो का बदलू नये असे विचारणारे मात्र झुंड वा कंपूबाज ? अन जे सातत्याने उल्लंघन करत आले आहेत त्यांचा अनुल्लेख ?
भौतिकशास्त्राचे नियम माणसाने बनवलेले नाहीत, निरीक्षणातून, प्रयोगातून जाणुन घेतलेले आहेत. त्यात बदल कोण करू शकेल. भाषेचे नियम, कायदे, रीतीभाती, देवाधर्माच्या - पापपुण्यच्या संकल्पना माणसाने केलेले आहे. त्यात कालौघात बदल होत आला आहे अन होत राहील. कोणी हवे म्हटले म्हणून बदल जास्त किंवा लवकर होतील असं नाही अन कोणी अजिबात होऊ नये म्हटले म्हणून ते व्हायचे पूर्णपणे थांबणार नाहीत.
रस्त्याच्या बाजूने : चोवीस कॅरट सोन्याची बांगडी जर खरोखर हातात घातली तर घालता घालता तिचा आकार बदलून जातो. सर्वसाधारण पणे दागिने २२ कॅरट सोन्याचे बनतात .
म्हणून ते त्यान्ची इन्ग्रजी माझ्यासारखी करतील काय? इन्ग्लन्डात तरी मला हे शक्य वाटत नाही! (अर्थात कालौघात काहिही शक्य आहे) पण अमेरिकेत मात्र हे शक्य होईल! >> अमेरिकेत पिढ्यानुपिढ्या राहिलेले लोक भारतीय इंग्रजीची रूपे आपलीशी करतील असं ( खरंच ) म्हणताय का तुम्ही ? कशावरून ? असे अमेरिकन लोक मला किंवा माझ्या ओळखीच्या कुठल्याही इमिग्रंटला आजवर का दिसले नाहीत ?
काय ग शोनू,
काय ग शोनू, तू यायची वेळ ती आमची निघायची गडबडीची वेळ अस्ते!

चालेल ना?
असो! आता याविषयावर तुमचा आख्खा दिवस चान्गला जाऊदे!
तो वर मी झोपुन घेतो, ताजातवाना होतो, नि उद्या सकाळी पुन्हा एक पोस्ट खरडतो हातभर!
लिंब्या
लिंब्या विपू मधे दिलेले उत्तर वाच.
वाचले रे
वाचले रे भो!
अन आता माझ्यात त्राण उरले नाही या विषयावर काही लिहीण्याचे!
जस परवडत
जस परवडत नाही म्हणून वा आवडत म्हणुन हल्ली "जनसामान्य" बहुसन्ख्य लोक बेन्टेक्स वा अन्य कमी कॅरेटचे वेळेस एखाददोन ग्रॅमचे दागिने देखिल वापरतात, तसेच, बोलीभाषेबद्दल होते! जनसामान्य, अन या "सामान्य" शब्दातच सगळे सार दडले आहे, ते सामान्य अस्तात म्हणूनच कमी कॅरेट, ताम्बेमिश्रित, किन्वा केवळ सोन्याचे पॉलिश केलेले दागिने वापरतात, हौस म्हणून, सोय म्हणून, परवडत म्हणून किन्वा काहीही कारणाने!
२४ कॅरेटचे सोने म्हनजे १००% शुद्ध सोने् हा बेंच्मार्क आहे. त्यानुसार २२ कॅरेट , २० केरेट असे शब्द त्या त्या प्रमाणातील इतर धातूंच्या मिश्रणाप्रमाणे वापरतात. उदा; २० कॅ रेट म्हण्जे २० भागिले २४ गुणिले१०० =क्ष टक्के सोने असलेले मिश्रण. हे मिश्रण परवडणे आणि आवडणे यावर अवलम्बून नसून त्याचे कारण वेगळे आहे. शुद्ध सोने हे मऊ असून लवकर झिजते आणि वाकतेही. दागिण्याच्या वापराप्रमाणे ही झीज , वाकणे कमिजास्त असते. त्यामुळे त्याला काठिण्य येण्यासाठी त्यात काही कठीण धातू उदा. ताम्बे ई मिसळणे अत्यावश्यक असते. दागिना किती कठीण हवा यावर हे मिश्रण अवलम्बून असते.शिवाय काही ठिकाणी जोड देन्यासाठीही असे करणे आवश्यक असते. अर्थात ही माहिती एवढ्यापुरतेच आहे. मूळ विशयात मला अद्याप काहीही मतप्रदर्शन करावयाचे नाही सबब बाकीचे तुमचे चालू द्या......
>>देवाला
>>देवाला रिटायर करा ही मागणी जेवढी आततायी तेवढेच,
अरेरे, उगाच का त्या श्रीराम लागूंना मध्ये ओढतोस?
>>प्रमाण भाषेचे वर्षानूवर्षे चालत आलेले शास्त्रशुद्ध नियम "रिटायर करा" वा "बदला' ही मागणी आततायी वाटते!
माझ्या लहानपणी नांव, पांच ,गुरुं असे लिहायचे नियम होते. नांव आणी नाव हे दोन वेगळे,
स्वतन्त्र अर्थाचे शब्द होते. त्यामुळे नियम बदलूच नयेत हा आग्रह योग्य नाही. अर्थात मूळ विषय हा असलेले नियम काटेकोरपणे पाळावेत का हा आहे.
रॉबिनहूड प्रमाणेच मूळ विषयात मला अद्याप काहीही मतप्रदर्शन करावयाचे नाही सबब बाकीचे तुमचे चालू द्या.
शोनू, माझ्य
शोनू,
माझ्या या प्रश्नाचे उत्तर देशील का?
(पण त्या आधी काही स्पष्टीकरण)
>>माझा मुद्दा सुरुवातीपासून हा होता की असा नियम असला तरी त्याचं पालन झालेलं दिसत नाही.
नियमाचं पालन न होण्यासाठीचे कारण
संदर्भः चिन्मयाची ही प्रतिक्रिया. (पान क्रमांक ६ वर हा प्रतिसाद, व्याकरणाच्या नियमासह, आहे)
इंग्रजी शब्दांची सामान्यरुपे व्हावीत, हा नियम आहे. मग तो पाळला का जात नाही?
याविषयी श्री. अशोक केळकर यांच्यामते आळस, व्याकरणाच्या नियमांची आपण अनेक वर्षं केलेली हेळसांड, ही यामागील कारणे आहेत. शिवाय गेल्या पंचवीस - तीस वर्षांतच इंग्रजी शब्दांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला. हे शब्द मराठीत कसे बसवायचे, याचे ज्ञान सामान्यजनांना कोणीच दिले नाही. परिणामी, इंग्रजी शब्दांचा सुयोग्य वापर आपण कधीच केला नाही.
मराठी भाषेच्या अशा तर्हेच्या उपेक्षेविषयी श्री. अरुण साधू यांचे त्यांच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असताना केलेल्या भाषणांतले हे मत बर्याच गोष्टी सांगते. ते इथे संक्षेपाने देत आहे. (त्यांचे हे मत चर्चिल्या जाणार्या व्याकरणाच्या नियमाविषयी नाही, मराठी भाषेच्या उपेक्षेबद्दलचे आहे आणि त्याचा संबंध श्री अशोक केळकरांच्या वरच्या प्रतिक्रियेशी येतो)
जो तो तक्रारखोर साहित्यिक वा मराठीप्रेमी फक्त सरकारकडे बोटे दाखवून स्वतः नामानिराळा राहत होता. मराठीची उपेक्षा मराठी माणूसच करतो आहे. मराठी माणसाचे स्वभाषेविषयी प्रेम ढोंगी आहे, त्याची अस्मिता बेगडी आहे आणि भाषेविषयीचा अभिमान पोकळ आहे. हे असे होण्यामागे पुष्कळ ऐतिहासिक, समाजशास्त्रीय, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक कारणे असू शकतील.
मराठी समाजाचा मूलभूत न्यूनगंड, व्यापार-उद्यम व संपत्ती साधनेविषयीची उदासीनता, अतिरेकी सहिष्णुता व फाजील आत्मविश्वास यांचे जालीम मिश्रण; हिंदी भाषकांचे गेल्या वीस-पंचवीस वर्षांत महाराष्ट्राच्या खेड्यांसह सर्व भागांत वेगाने होत असलेले स्थलांतर; जागतिकीकरणाची प्रक्रिया, डिजीटल तंत्रज्ञान, दळणवळणाची साधने, चित्रवाणी वाहिन्या यांमधील प्रगतीमुळे जगाचे जवळ येणे व परस्परावलंबन वाढणे; कल्पनातीत वेगाने होणारे जगाचे सांस्कृतिक सपाटीकरण; भाषारक्षणासाठी, अस्मितारक्षणासाठी, एव्हढेच नव्हे तर घटनेने दिलेले भाषिक अधिकार बजावण्यासाठीदेखील शासकीय पातळीवर आणि मराठी भाषा अभ्यासकांमध्ये व साहित्यिकांमध्ये गांभीर्याचा, चिंतेचा, इच्छाशक्तीचा, जिद्दीचा आणि रचनात्मक धोरणांचा अभाव. या शक्ती मराठी भाषेवर प्रभाव टाकत आहेत.
>>या पेक्षा तो नियम बदलण्याकरता प्रयत्न का करु नयेत ?
प्रश्नः या पेक्षा तो नियम पाळण्याकरता प्रयत्न का करु नयेत?
अजून खुलासा करुन, जर पाळणारे आणि न पाळणारे साधारणत: सारख्याच संख्येने असतील आणि ही संदिग्धता नियम शिकवला न गेल्यामुळे (आणि न पाळला गेल्याने) असेल तर तो नियम पाळण्याचा प्रयत्न का करु नये? नियम बदलूच नयेत या मताचे मी कधीच समर्थन करणार नाही. पण त्या नियमाचा संबंध भाषेची लवचिकता आणि तिचा प्रवाहीपणा सांभाळण्याशी आहे याची चर्चा देखील झालेली आहे. (संदर्भ: मागच्या काही प्रतिसादांमध्ये क्लिओशी झालेली चर्चा) त्यामुळे हा नियम बदलून आपण गोंधळास कारण निर्माण करणार आहोत (संदर्भः शोनूचा मुद्दा - नियम बदलून सुद्धा तो पाळला नाही गेला तर काय? उत्तर- गोंधळ).
Pages