Submitted by आर्फी on 24 February, 2009 - 13:22
अॅडमिन, नमस्कार.
कदाचित हे या आधीही चर्चिले गेले असेल, पण मला जाणवले म्हणून सांगतो.
"Group" देवनागरीत लिहिताना 'गृप' पेक्षा 'ग्रूप' असे बरोबर वाटते.
माझ्यामते English मध्ये 'ऋ' अक्षर नाही. त्यामुळे त्याचे 'गृ' असे जोडाक्षरही बरोबर वाटत नाही.
लोकांचं काय मत आहे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>..आणि
>>..आणि विषयांतर होईल
नक्कीच होईल.
हा शब्दप्रयोग करणारे सामान्यजनच आहेत या मूळ विषयाला मोठ्या शिताफीने बगल देताय हे चूक का?
बगल नाही.
बगल नाही. तसा शब्दप्रयोग न करणारेही सामान्यजनच आहेत - इतकंच सांगत्ये.
सामान्यजन
सामान्यजन कसे? तसा शब्दप्रयोग न करणारे उच्च जात आणि उच्च नसले तरी त्याच्या जवळपासचे शिक्षण, या दोन प्रमुख मर्यादांमधले आहेत हे नक्की. कारण त्याशिवाय "क्यू मधलं टिकीट" त्यांना झेपणं अवघड आहे (अशक्य नाही)
संदर्भ : चाफ्याने दिलेला शुद्धीकरणवाद्यांबद्दलचा राजाध्यक्षांचा उतारा
मग
मग 'क्लासला गेलो', 'ट्रेनमधे चढलो', 'स्कूटरला किक मारली', 'इंग्लंडची टीम' इ. म्हणणारे लोक सामान्यजन नाहीत असं तुमचं म्हणणं आहे का?
<<<< क्ष,
<<<< क्ष, बहुसंख्य इंग्रजी शब्दांबाबत नाही बोलत
मग कुठल्या शब्दांबद्दल बोलतोयस?
>>>> अरे हळू! इतकी घाई नको. हे मी नाही बोलत. समाजातली माणसे त्यांच्या दैनंदिन जीवनात बहुसंख्य इंग्रजी शब्दांबाबत तसे बोलत नाही असे वाक्य आहे ते.
वरची posts
वरची posts वाचून कोण कोणास म्हणाले ची आठवण झाली
>>मग
>>मग 'क्लासला गेलो', 'ट्रेनमधे चढलो', 'स्कूटरला किक मारली', 'इंग्लंडची टीम' इ. म्हणणारे लोक >>सामान्यजन नाहीत असं तुमचं म्हणणं आहे का?
हे चुकीचे शब्दप्रयोग आहेत आणि ते व्याकरणाचे नियम न शिकवले गेल्याने झाले आहेत हे आतापर्यंत कळले असेलच. ते ही न वापरणारे बहुसंख्य आहेत हे थोडं बहुजन समाजाची भाषा ऐकल्यावर कळेलच.
जनसामान्यांची भाषा (संदर्भ : वरील उदाहरण) , सोपी भाषा (संदर्भ : मराठी व्याकरणाचे नियम जनसामान्यांना माहिती आहेत आणि ते परभाषेला लावणे सर्वांनाच सोपे पडेल) आणि प्रवाहाबरोबर जाणारी लवचिक भाषा (संदर्भ : परभाषेतले शब्द वापरावे पण ते मराठी व्याकरणाचे नियम लावून वापरावे हा अस्तित्वात असणारा नियम) वापरावी हे सगळे निकष कसाला लावून सिद्ध झाल्यावर सुद्धा या नियमाला विरोध होत असेल तर हा निव्वळ वादासाठी वाद घातला जात आहे असेच म्हणावे लागेल.
@असाम्या
हे चुकीचे
हे चुकीचे शब्दप्रयोग आहेत आणि ते व्याकरणाचे नियम न शिकवले गेल्याने झाले आहेत हे आतापर्यंत कळले असेलच >>
पण क्षा, चिन्मया अरे मुद्दा तोच आहे की आता बहुसंख्य (९९%) लोक इंग्लडची टिम म्हणतात, इंग्लडाची टिम नाही, आणि तुम्ही सुचवत आहात की बहुसंख्य लोक चुकीचे आहेत, आता उद्यापासून इंग्लडाची टिम म्हणा?
कोण म्हणेल?
इनफॅक्ट आता नियमात सुधारणा होउन तो दोन्हीला लागु झाला पाहिजे. म्हणजे पंपावर पेट्रोल भरतो आणि इंग्लडची टिम दोन्ही बरोबर.
त्यामुळेच लोकं हा मुद्दा वारंवार येतोय.
गप्प बसायचे म्हणले तरी बसता येत नाही, असे झालेय.
>> मराठी
>> मराठी व्याकरणाचे नियम जनसामान्यांना माहिती आहेत
हे भलतंच धाडसी विधान आहे, पण त्याची चर्चा इथे (खरंतर आता कुठेच) नको!
माझ्याकडून आता या (वादासाठी) वादाला पूर्णविराम.
क्ष..
क्ष.. काहिचा काही पोस्ट..
केदार ला अनुमोदन..
>>हे भलतंच
>>हे भलतंच धाडसी विधान आहे
ह्म्म, खरंय .. अगदी काटेकोर नियम माहिती असणारे आणि पाळणारे कमीच (जे इथे दिसतंय :)). पण साधारण नियम तर पाळतातच ना? आता आनी पानी होत असेल पण वाक्यरचना आणि शब्दयोजना करायचे नियम बोलीभाषेतूनच समजतात की सगळ्यांना. त्याच संदर्भाने हे विधान वाचले जावे.
अडम, आता
अडम,
आता तुला कुठली पोस्ट काहीच्या काही वाटली सांग बाबा.
>>उद्यापासून इंग्लडाची टिम म्हणा
केदार, चिन्मयाने दिलेले नियम वाच ना रे बाबा.. यातले बहुतांश मुद्दे नियम करतांना विचारांत घेतले गेलेले आहेत.
संदर्भः चिन्मयाचा २० एप्रिलचा प्रतिसाद
परभाषेतून मराठीत आलेल्या सर्व शब्दांची मराठी शब्दांप्रमाणे सामान्यरुपे करावीत.
मात्र, मराठी व परभाषेतून आलेली देशग्रामशहरादिवाचक अकारान्त विशेषनामे अविकृतांग ठेवतात.
उदा. इंग्लंडचा, इंग्लंडहून, हिंदुस्थानचा, नागपुरचा.
इथे नक्की
इथे नक्की किती जण आधीच्या पोस्टी न वाचता लिहितायत? लोकांना परत परत जुने संदर्भ का द्यावे लागताहेत?
मान्य आहे, अडीचशे पोस्टी पडल्यायत, आणि त्या सगळ्या वाचणे जिकिरीचेही वाटण्याची शक्यता आहे.
एक वेळ संकेतांचे सोडा; पण निदान जिथे नियमांचा दाखला दिला गेला आहे, ज्या गोष्टी व्यक्तिसापेक्ष नाहीत हे उघड उघड दिसतेय, त्यांच्याकडेही दुर्लक्ष कसे केले जाते?
आधीचे न वाचता मध्येच आपली मते लिहिणे म्हणजे 'चर्चा' होत नाही. आधी चर्चिल्या गेलेल्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे इथे इतका वेळ डोकेफोड करणार्या सगळ्यांच्याच कष्ट, वेळ, तळमळ यांना किंमत न देण्यासारखे नाहिये का?
मग हे 'मुद्दाम केले जात आहे', हा "(वादासाठी) वाद" आहे, असे एखाद्यास का वाटू नये? आणि असेच होत राहिले तर याला अंतही उरणार नाही.
अगदी
अगदी काटेकोर नियम माहिती असणारे आणि पाळणारे कमीच >> माहिती असून पाळणारे त्याहूनही कमी आहेत.
>>
अडम,
आता तुला कुठली पोस्ट काहीच्या काही वाटली सांग बाबा. >> ' अडमा' का नाही ?
केदार, चिन्मयाने दिलेले नियम वाच ना रे बाबा.. यातले बहुतांश मुद्दे नियम करतांना विचारांत घेतले गेलेले आहेत. >> केदारा का नाही ?
आर्फी,
आर्फी, अनुमोदन!

मला तुझी दया येत्ये! पण तुझ्यावर हा बीबी उघडल्याबद्दल पश्चात्ताप करायची वेळ अजुन आलेली नाहीये असे मला वाटते
अॅडमिनना सान्गून, तत्काळ पोल (कौलाची) ची सोय करा अन मतदान घ्या
मी कोणत्याही परिस्थितीत, भले मला व्याकरणाचे ज्ञान नसेल, तरीही, नियम पाळण्याच्या बाजुनेच मतदान करणार!
शोनू, मी हे आक्षेप असन्ख्यवेळेस ऐकले/वाचले आहेत, सबब जनसामान्य (?) व त्यान्ची बोली भाषा हेच जर प्रमाण मानायचे असेल तर पहिले छूट या सामान्यजनान्च्या बोलीभाषेत जागोजागी वापरले जाणारे "भ"कारी अन "म"कारी शब्द तुम्ही आम्ही इथे मायबोलीवर वापरण्यास देखिल कुणी हरकत घ्यायला नाही पाहिजे, नाही का?
१. लिंग
१. लिंग निश्चिती सापेक्ष आहे
२. व्याकरणाचे नियम सापेक्ष नाहीत.
३. प्रमाण भाषेत आणि बोली भाषेत फरक असतो कारण बोली भाषेत (ह्यात साहित्यात वापरलेली भाषादेखील अंतर्भूत आहे) व्याकरणाचे सर्व नियम प्रत्येक माणूस पा़ळतोच असे नाही, उपभाषांमुळे काही व्याकरणाचे नियम पाळले जात नाहीत. ह्याचा अर्थ व्याकरणाचे नियम नाहीतच असा नाही.
४. व्याकरणाचे नियम हे कधीच बदलू नयेत अथवा ते अपरावर्तनीय (absolute) आहेत हे विधान चुकीचे ठरेल. व्याकरणाचे नियम हे भाषेच्या व समाजाच्या स्थित्यंतरानुसार तसेच इतर अनेक घटकांप्रमाणे बदलतील. परंतु एखादा नियम पटत नाही म्हणुन तो नियमच नाही असे म्हणणे पूर्णतः चुकीच ठरेल.
बाकी वादासाठी वाद घालता येइलच.
टण्या, (कधी
टण्या, (कधी नव्हे ते
) तुझे पोस्ट मला मुद्देसूद, थोडक्यात, नेमके, अचूक, पटणारे वाटले!
अनुमोदन
० शोनू,
०
शोनू, तुझे म्हणणे बरोबर आहे. (केदारा आणि अडमा वगैरे)
लिंबू भ
लिंबू
भ कारी, म कारी अन इतर कुठलेही शब्द, जे आई वडिलांच्या समोर, मुलांच्या समोर सहसा उच्चारले जात नाहीत ते शब्द, लिहू नयेत असं व्याकरणाच्या नियमात आहे का ?
ते कुठे /केंव्हा वापरावेत याचे संकेत आहेत अन ते संकेत स्थल काल व्यक्ति सापेक्ष आहेतच.
बहुसंख्यांच्या वापरात बदल झाला की ओघाओघाने नियम बदलतात याला तुमचा का विरोध हे मला कळले नाही. अन त्यात जात व राजकारण आणले याचा मी निषेध करते. असे नियमात बदल हे जातपात नसलेल्या संस्कृतींमधे ही होत आले आहेत, अन होत रहातील .
बहुसंख्या
बहुसंख्यांच्या वापरात बदल झाला की ओघाओघाने नियम बदलतात याला तुमचा का विरोध हे मला कळले नाही<<<<<<<
(पुनःपुन्हा लिहायचा कंटाळा आलाय तरी) हे ओघाओघात बदललेले नियम इतर अज्ञ पामरांना समजावेत आणि ते सर्वांनी वापरावेत, म्हणून कुठेतरी लिहून ठेवले असतील की नाही? की प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार नियम बनवून वापरावेत, असे आहे?
चिन्मय आधीपासून अस्तित्वात असलेले नियम (व्याकरणाच्या पुस्तकांत नमूद केलेले) संदर्भासहित देतो आहे. तसे आपणही हे नवीन बदललेले नियम त्या व्याकरणविषयक १८ नियमांत किंवा इतर कुठल्या नियमावलीत आहेत, ते इथे तपशीलवार टाका. मग ते नियम सर्व मिळून पाळू.
चिन्मयाने
चिन्मयाने सांगितलेला नियम नाहीये असं मी म्हटलंय का कुठेही ?
( परभाषेतील शब्द मराठी व्याकरणाप्रमाणे चालवावे - लिंगनिश्चितीकरता नियम नसले तरी जे कुठलं लिंग सोयीचं/ सवयीचं वाटेल त्या प्रमाणेच चालवावेत )
माझा मुद्दा सुरुवातीपासून हा होता की असा नियम असला तरी त्याचं पालन झालेलं दिसत नाही. अनेक शब्द, अनेक पुस्तकांत , आदरणीय, साक्षेपी लेखकांच्या पुस्तकात, नावाजलेल्या प्रकाशनांच्या पुस्तकात या नियमात न बसणार्या रुपात लिहिले आहेत.
या सगळ्यांना काय तो नियम माहीतच नव्हता ? का नाही पाळला गेला हा नियम ? मायबोलीवरचे मूठभर लोक तावातावाने चर्चा करताहेत म्हणून काय सर्व मराठी लेखक/प्रकाशक हा नियम पाळतील ? अवचटांच्या, पु ल अन सुनिता देशपांड्यांच्या,जी ए कुलकर्ण्यांच्या , सु शींच्या पुस्तकांच्या ज्या नव्या आवृत्ती निघतील त्यात हे सगळे बदल होतील ?
या पेक्षा तो नियम बदलण्याकरता प्रयत्न का करु नयेत ?
<माझा
<माझा मुद्दा सुरुवातीपासून हा होता की असा नियम असला तरी त्याचं पालन झालेलं दिसत नाही. अनेक शब्द, अनेक पुस्तकांत , आदरणीय, साक्षेपी लेखकांच्या पुस्तकात, नावाजलेल्या प्रकाशनांच्या पुस्तकात या नियमात न बसणार्या रुपात लिहिले आहेत.
या सगळ्यांना काय तो नियम माहीतच नव्हता ? का नाही पाळला गेला हा नियम ? मायबोलीवरचे मूठभर लोक तावातावाने चर्चा करताहेत म्हणून काय सर्व मराठी लेखक/प्रकाशक हा नियम पाळतील ? अवचटांच्या, पु ल अन सुनिता देशपांड्यांच्या,जी ए कुलकर्ण्यांच्या , सु शींच्या पुस्तकांच्या ज्या नव्या आवृत्ती निघतील त्यात हे सगळे बदल होतील ?
या पेक्षा तो नियम बदलण्याकरता प्रयत्न का करु नयेत ?
<>>
या सर्वांचा अस्तित्वात असलेल्या नियम न पाळण्याशी काय संबंध? आणि ज्यांनी तो नियम पाळलेला नाही, त्यांनी ते मान्य केले आहे ना? पुढच्या आवृत्त्यांत सुधारणा केल्या जातील, हेही त्यांनी कबूल केले आहे. अजून काय हवं आहे? आणि त्यांनी नियम पाळले नाहीत म्हणून आपण ते पाळू नयेत असं आहे का? त्यांनी चुका केल्या म्हणून आपणही त्याच करायच्या? अजबच तर्कशास्त्र आहे हे.
आणि राजहंस प्रकाशन, डॉ. कर्वे, डॉ. ढेरे यांनी ते मान्य केले याबद्दल तू काहीच कशी बोलत नाहीस?
शोनू,
इथे या चर्चेदरम्यान धादांत चुकीची उदाहरणं दिली गेली. व्याकरणाचे वाट्टेल ते दाखले दिले गेले. त्याबद्दल तू काहीच का बोलली नाहीस मग? हे तुला वैयक्तिक वाटत असेल, तर क्षमस्व.
>>>>
>>>> बहुसंख्यांच्या वापरात बदल झाला की ओघाओघाने नियम बदलतात याला तुमचा का विरोध>>>
बोली"भाषा" बदलते (काही शब्द गाळले जातात, काही नविन बनतात्/परभाषेतून येतात), पण व्याकरणाचे नियम बदलत नाहीत! गेल्या हजारो वर्षात सन्स्कृतचे नियम बदलल्याचे वा बदलावे लागल्याचे ऐकिवात नाही, निदान माझ्यातरी!
अगदी, माणुस दोन पायान्वर चालतो, हा जितका अलिखित नियम, तितकेच कठोर व्याकरणाचे नियम अस्तात! ज्या भाषेला हे नियम अस्तात, त्या राजमान्य भाषा म्हणून अखिल विश्वात मान्यता पावतात! मात्र सध्याची परिस्थिती बघता, मराठीला लौकरच येथिल जन्ता, आफ्रिकन वा अन्य तुरळक जमातीन्च्या भाषेसारखी अवकळा आणुन ठेवेल यात शन्का नाही!
(भाषा आहे तर लिपी नाही, लिपी आहे तर व्याकरण नाही, व्याकरण आहे तर परभाषेची/आक्रमकान्च्या भाषेची सरभेसळ आहे, इत्यादी इत्यादी, ती अवकळा! पण हेच मान्य नसेल तर सोडून द्या!)
अन आम्ही पामर कुठला हो विरोध करणार???
ज्यान्नी जीवापाड जमेल तितक्या पिढ्या सन्स्कृत टिकवुन ठेवली, त्यान्चाच कित्ता येथिल काहीजण (मी नाही, कारण मी तज्ञ नाही) गिरवू पाहून मराठी भाषेच्या व्याकरणाची "तोडफोड" थाम्बवू पहात आहेत, नाहि थाम्बवता आली तर निदान शिल्लक तरी राखू पहात आहेत, किन्वा निदान जाणिव निर्माण करु पहात आहेत!
जात आणि राजकारण याबद्दल माझा निषेध करुन काय उपयोग? मी फक्त वास्तव मान्डले! अर्थात याकरता आपण एक वेगळा बीबी उघडून त्यात निषेध्/मोर्चे/सम्प/जाळपोळ्/तोडफोड्/सामुहिक हल्ले वगैरे करू किन्वा झालेले पाहू, इथे नको, चालेल ना?
>>माझा
>>माझा मुद्दा सुरुवातीपासून हा होता की असा नियम असला तरी त्याचं पालन झालेलं दिसत नाही.
याचं पालन न होण्यासाठीचे कारण पण लक्षात आले असेलच आता.
संदर्भः चिन्मयाची ही प्रतिक्रिया. (पान क्रमांक ६ वर हा प्रतिसाद, व्याकरणाच्या नियमासह, आहे)
इंग्रजी शब्दांची सामान्यरुपे व्हावीत, हा नियम आहे. मग तो पाळला का जात नाही?
याविषयी श्री. अशोक केळकर यांच्याशी बोललो. त्यांच्या मते आळस, व्याकरणाच्या नियमांची आपण अनेक वर्षं केलेली हेळसांड, ही यामागील कारणे आहेत. शिवाय गेल्या पंचवीस - तीस वर्षांतच इंग्रजी शब्दांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला. हे शब्द मराठीत कसे बसवायचे, याचे ज्ञान सामान्यजनांना कोणीच दिले नाही. परिणामी, इंग्रजी शब्दांचा सुयोग्य वापर आपण कधीच केला नाही.
>>या पेक्षा तो नियम बदलण्याकरता प्रयत्न का करु नयेत ?
या पेक्षा तो नियम पाळण्याकरता प्रयत्न का करु नयेत?
चिन्मयाने
चिन्मयाने दिलेली दोन उदाहरणे:
१. 'ऊर्जेच्या शोधात' हे पुस्तक ज्यांचं आहे (लेखिकेचे नाव विसरले!) त्यांनी 'ग्रुपामध्ये' असा बदल स्वतःच्या पुस्तकात करण्याचे मान्य केले आहे.
२. डॉ. अरुणा ढेर्यांनी 'माझ्याही पुस्तकांत चुका असतील त्या पुढल्या आवृत्तीत सुधारेन' असे म्हटले आहे.
केवळ मायबोलीवरील मूठभर लोक चर्चा करत नसून वरील काही मंडळीही त्यात सामील आहेतच की.
या सगळ्यांना काय तो नियम माहीतच नव्हता ?<<<
पाळला गेला नाही त्याअर्थी नसावा माहीत. प्रत्येकाच्या व्याकरणविषयक जाणिवा अचूक आणि एकसमान असतील असं नाही. बरं, त्यांनी नियम पाळला नाही म्हणून आपणही तो पाळू नये, यामागे नक्की काय भूमिका आहे?
या पेक्षा तो नियम बदलण्याकरता प्रयत्न का करु नयेत ?<<<
प्रयत्न जरूर करावा आणि रीतसर मार्गाने प्रयत्न करून, बहुसंख्यांनी आपलासा केलेला बदल झाला तर चांगलेच. पण तोवर आहेत त्या नियमांप्रमाणे भाषा का वापरू नये? किंबहुना, आपलाच प्रश्न थोडासा बदलून- "नवे नियम अधिकृत होत नाहीत तोवर जुन्या नियमांना विरोध का?"
****जियो****
****जियो**** चिन्मया, क्षा, लिंबूटिंबू, श्रद्धे!

>>केदार ला अनुमोदन..
इथे 'केदाराला' अनुमोदन का नाही?
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
'ऊर्जेच्या
'ऊर्जेच्या शोधात' या पुस्तकाच्या लेखिका डॉ. प्रियदर्शिनी कर्वे व त्यांचे पिता डॉ. आनंद कर्वे हे जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ आहेत. डॉ. आनंद कर्वे यांच्या भगिनी जाई निंबकर यांनी मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिले आहे. अमेरिकन सेंटरसाठी. या पुस्तकाची प्रत दुर्दैवाने सध्या उपलब्ध नाही. मात्र डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांनी जाई निंबकर यांच्याशी संपर्क साधून आम्ही आग्रह धरत असलेल्या नियमाची शहानिशा करून घेतली आहे.
मला तरी
मला तरी चिन्मयाचा मुद्दा पटला. जर इंग्रजी शब्द मराठी व्याकरणाशी सुसंगत न रहाता बोलीभाषेत रुळले असतील आणि काही लेखक, प्रकाशक इ. मंडळींनी ते आपल्या साहित्यामधे नियमांची खातरजमा न करता वापरले असतील तर तेच आपणही ऐकण्याला आणि बोलण्याला सुसह्य आहेत म्हणून नियम कळल्यानंतरही वापरणे आततायीपणाचे ठरेल.
अर्थात नियम किंवा संकेत पाळावेत की नाही आणि कितपत हे स्वातंत्र्य त्रिकालाबाधित व्यक्तीसापेक्षच रहाणार.
'अरे रुमाल टेबलवर होता'....हेच जर उद्या बहूसंख्य जनता 'अरे रुमाल ऑनटेबल होता' असे म्हणू लागली किंवा बोलीभाषेत तसे रुळले तर इंग्रजी शब्दांबरोबरच इंग्रजी क्रियापदे, विशेषनामे, अव्यये घुसडल्याने मराठी भाषा कितपत व्याकरण सुसंगत राहील...?
याचेच पुढे 'अरे रुमाल वॉज ऑनटेबल' आणि असे बरेच काही होणार. ज्या वेगाने भाषा बदलते (मराठी बाबतीत तरी हा बदलाचा वेग फारच आहे, उर्दू बोलणारे माझे पाकिस्तानी मित्र आपसात बोलतांना मला अगदी फार क्वचितच आणि एखादाच इंग्रजी शब्द बोलतांना अढळतात...हे एक ढोबळ निरिक्षण)...त्या वेगाने व्याकरणाचे नियम बदलणे किंवा त्यातील बदलांना अधिकृत करणे, हा मेळ साधणे अशक्य आहे आणि तसे करणे भाषा आणि तिचे व्याकरण टिकवण्यास कितपत हितकारक ठरणार.?
तर मग सध्या अधिकृत असेलेले नियम आणि संकेत केवळ वृत्तपत्र, साहित्य (मायबोली देखील) आणि तत्सम लोकाभिमुख माध्यमांद्वारेच आत्मसात आणि प्रसारित करणे शक्य असल्यास बोलीभाषेच्या रेट्याचा बडगा दाखवून त्या नियमांबद्दल आखडता हात का घ्यावा हे कळले नाही.
'इंग्रजी शब्द मराठीत स्वीकारतांना त्यासाठी मराठी व्याकरणाच्या नियमांकडे डोळेझाक करता येते किंवा केली तरी चालते' निदान असा समज तरी जनमानसात रुजू नये.
जनमानसात
जनमानसात रुजू नये. >>>>> कोणत्या जनमानसात???? मराठी न बोलणार्या किंवा न कळणार्या लोकांना काहीच फरक पडणार नाही... बहुतांश मराठी जनमानस ( including बरेच मान्यवर) ते नियम वापरत नाहीत (अगदी पुस्तकात असले तरी !) हे वर शोनू आणि चाफ्यानी बर्याच उदाहरणांसह स्पष्ट केलं आहे...
दुसरं म्हणजे बर्याचजणांना ते नियम माहितच नाहीत..
त्यामूळे शोनू म्हणते तसं नियम का बदलू नये???
प्रयत्न जरूर करावा आणि रीतसर मार्गाने प्रयत्न करून, बहुसंख्यांनी आपलासा केलेला बदल झाला तर चांगलेच. पण तोवर आहेत त्या नियमांप्रमाणे भाषा का वापरू नये? >>>> हा म्हणजे आणखीनच गोंधळ.. मुठभर लोकं "पोस्टे आली" म्हणणार (आणि त्याप्रमाणे इतरांच्या लेखनामधल्या "चूका" प्रतिक्रियांमधे दाखवत रहाणार) .. तरी सामान्य लोकं "पोस्ट आले" असच म्हणतं रहाणार.. म्हणजे परत नवे वाद... आणि एव्हडं सगळं होऊन रितसर मार्गानी किंवा कशाही पध्द्तीने तो नियम बदललाच जाणार आहे....
तेव्हा मुठभर लोकांनीच सामान्यांसारखं का वागू नये??
p.s. हे मत फक्त ह्या नियमाबद्दल आहे..! बाकीचे शुध्दलेखनाचे नियम पाळू नका असं मी म्हणत नाहिये..
आडमा, अरे,
आडमा,
अरे, मराठी भाषेत नामांना विभक्ती प्रत्यय लावताना त्यांचा विकार होत नाही का? मग फक्त इंग्रजी शब्दांनाच वेगळा न्याय का, हा प्रश्न मी परत विचारतो.
Pages