'फॅण्ड्री' च्या शेवटी जब्या आणि त्याचं पूर्ण कुटुंब डुक्कराच्या मागे लागलेले दाखवले आहेत. त्यांची आणि डुक्कराची ती धडपड, पळापळ बराच वेळ चालते. पळून पळून जब्याचा बाप इतका दमतो की त्याच्या अक्षरश: छातीचा भाता होतो. ही सगळी पळापळ हळूहळू करत जब्याच्या शाळेभोवतीच्या परिसरात येते. मग जब्या त्याचे सवंगडी आणि 'ती'च्यापासून स्वत:चं तोंड लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतो. त्या प्रयत्नात १-२ वेळा पकडता येऊ शकणारं डुक्कर निसटतं. बाप खूप शिव्या घालतो. अखेरीस जब्या परिस्थितीला शरण जातो आणि आपलं हे अस्तित्व स्वीकारतो. त्याची लव्ह स्टोरी त्याच्या कधीही न वाचल्या जाऊ शकणाऱ्या एका कागदोपत्री फुटकळ इतिहासात जमा होते आणि त्या लव्ह स्टोरीचा पूर्णविराम म्हणून तो एक दगड थेट आपल्याकडे - कॅमेऱ्याच्या दिशेने - फेकतो. कहाणी संपते. बराच वेळ चाललेला डुक्कर पकडण्याचा प्रसंग ठळकपणे लक्षात राहतो. लक्षात राहते जब्याची केविलवाणी धडपड आणि त्याच्याहीपेक्षा केविलवाणा त्याचा बाप. 'फॅण्ड्री' मधला हा शेवटचा प्रसंग चालतो बराच वेळ, पण तरी तो लांबलेला वाटत नाही. किंबहुना 'फॅण्ड्री' एकूणच ची लांबी हे त्याचं एक बलस्थानच होतं. जेमतेम शंभर मिनिटं - साधारण पावणे दोन तास फक्त - चालते ती कहाणी.
'फॅण्ड्री' चं अजून एक बलस्थान होतं 'नाविन्य'. ती एक अशी कहाणी होती, जी कुणी कधी ह्यापूर्वी सांगितली नव्हती. कुणाला ते कदाचित पेलणारंच नव्हतं. 'हे दाखवून काय मिळणार आहे', असाच विचार त्यामागे असावा, कारण ती कहाणी कुणाला माहित नव्हती किंवा कुणी पाहिलेली नव्हती, असं तर नक्कीच नव्हतं. नागराज मंजुळेंनी ते आव्हान पेललं. मी असं म्हणणार नाही की, 'त्यांनी तो धोका पत्करला.' त्यांना त्यात धोका वगैरे वाटायचा प्रश्नच नव्हता. कारण काही कमवण्यासाठी ती कलाकृती नव्हतीच, त्यामुळे काही गमवण्याचा किंवा न कमवण्याचा धोकाच उद्भवत नाही.
'फॅण्ड्री'मध्ये मला काय आवडलं असं मला कुणी विचारलं, तर उत्तर सोपं आहे. 'उत्कटता.' आणि ही जी उत्कटता 'फॅण्ड्री'त आहे, ती माझ्या मते तरी वरील दोन कारणांमुळे आहे.

'सैराट' ह्याच दोन बाबतींत 'फॅण्ड्री'समोर खूपच कमी पडतो.
तब्बल तीन तासांची लांबी, 'सैराट'ला खऱ्या अर्थाने पसरट करते. सुरुवातीच्या कमीत कमी एक तासाच्या चित्रपटाला जर पूर्णपणे कापून टाकलं असतं, तर काय झालं असतं, असा एक विचार मनात येतो. हा एक तास - सव्वा तासाचा सिनेमा चक्क रवी जाधवांनी केलेला वाटतो. ह्या तास - सव्वा तासात मिसरूड फुटलेली पोरं टवाळक्या करतात. समवयस्क मुलींवर लाईन मारतात. ह्या तास - सव्वा तासात किती तरी वेळा नायक-नायिका एकमेकांशी फुल्ल फिल्मी नजरानजर करतात. म्हणजे बाजूनी जाता जाता नजरा भिडवणे वगैरे..! लव्ह लेटर्स दिली जातात आणि टाका भिडतो.
मग अजय-अतुलच्या ट्रेडमार्क स्टाईलच्या बुंगाट गाण्यावर पब्लिक झिंगाट नाचतं आणि त्यानंतर खरा सिनेमा सुरु होतो.
इथून पुढचा सिनेमा क़यामत से क़यामत तक़, इशक़जादे, साथिया अश्या काही सिनेमांचं 'सुधारित मिश्रण' आहे. QSQT मध्ये खानदानी दुष्मनी असते, इथे जातीय भेद. QSQT मध्ये नायिकेकडच्या एका कौटुंबिक सोहळ्याच्या वेळी प्रेम प्रकरण उघडकीला येतं, इथेही तसंच. QSQT मध्ये दोघे जण पळून जातात आणि एका तात्पुरत्या घरात आश्रय घेतात, तेव्हा समजतं, नायिकेला तर चहासुद्धा करता येत नाही, इथेही तसंच. मग जसं 'साथिया'मध्ये नायक-नायिकेत अहंकार आड येऊन दुरावा निर्माण होतो, तसा इथेही काही मिनिटांसाठी होतं. कहाणी अपेक्षित वळणांनी अपेक्षित शेवटापर्यंत जाते. ह्या सगळ्या प्रवासात छोटे-छोटे फिल्मी योगायोगही बरेच जुळून आलेले आहेत. पळून जाण्यासाठी किनाऱ्यावर एक unattended मोटारबोट तयारच असणं, (पहिल्या वेळेस) भरपूर चोप मिळालेला असतानाही कुठे जखमा नसणं, (दुसऱ्या वेळेस) गुरासारखा मार खाऊनही किरकोळ जखमांसह पळ काढू शकणं, ज्या रस्त्याने गाडी जाणार आहे, त्याच्या बाजूलाच पोरांना बदडणं की अगदी लगेच दिसून यावं, वगैरे.
'सैराट'च्या संगीताचीही एक हवा आहे. 'अजय-अतुल' ने धूम मचवली असली, तरी सगळ्याच गाण्यांवर त्यांच्याच कुठल्या न कुठल्या गाण्याची (नेहमीप्रमाणे) छाप दिसतेच. 'झिंगाट' गाण्यावर बेभान होऊन नाचणारं अख्खं सिनेमागृह मी पाहून आलो आहे. अनेक दिवसांनंतर अशी जादू कुणी केली आहे. ह्या 'X-factor' बद्दल तर वादच नाही. गाण्यांचं संयोजनही केवळ अफलातून झालं आहे. 'हॉलीवूड'मध्ये संगीत संयोजन केलं गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. भरमसाट वाद्यांचा मेळ कसा असतो, हे समजून घेण्यासाठी भन्साळीने इकडे शिकवणी लावावी म्हणतो ! कुठेही कर्णकर्कश्य न होताही सांगीतिक भव्यता कशी असते, हे 'सैराट'ची गाणी दाखवतात. खास करून 'सैराट झालं' आणि 'याड लागलं' मधला वाद्यमेळ तर ऐकावाच.
'ऑनर किलिंग' ही उत्तर भारताच्या बऱ्याच भागांतली एक भीषण समस्या आहे. गुन्हेगारी जगतातल्या सत्यघटनांवर आधारित एका कार्यक्रमात अशीच एक कहाणी मागे पाहिली होती. 'सैराट'चं कथानक त्या सत्यघटनेवर बेतलेलं आहे. कहाणीतली सगळी वळणं आधीच कळून येतात. शेवटही माहितच असतो, पण अचूक नेम साधून शेवटाचा दगड थेट भिरकावण्याचं नागराज मंजुळेंचं कौशल्य व्यावसायिकतेचा कीडा चावल्यावरही अबाधित आहे. हा शेवट पायाखालची जमीन, डोक्यावरचं छप्पर, बुडाखालची खुर्ची सगळं बाजूला करतो. पोटातली आतडी पिळवटतो आणि डोक्यातला मेंदू बधीर करतो. डोळे थिजतात, हात-पाय गारठतात आणि ओठांना कंप सुटतो. केवळ ह्या शेवटासाठी दिग्दर्शक मंजुळे हवे होते, बाकीच्या पसाऱ्यासाठी कुणीही, अगदी कुणीही चाललं असतं.
समजा, हा चित्रपट 'फॅण्ड्री' वाल्याचा नसता, दुसऱ्या कुणाचा असता तर ?
तर हा एक महान चित्रपट असता. कितीही काहीही म्हणा, कुणी केलंय ह्यावर त्याचं मूल्यमापन ठरतंच ठरतं. जो मुलगा अभ्यासूच आहे, तो जर पहिल्या ऐवजी दुसऱ्या क्रमांकावर आला तर ते जास्त धक्कादायक असतं आणि काठावर पास होणारं एखादं दिवटं टपकलं, तरी विशेष काही घडलेलं नसतंच ! मंजुळेंचा दुसरा क्रमांक आला आहे, हे धक्कादायक आहे.
तीन तासांपैकी फक्त पाच मिनिटं मंजुळे दिसतात, एरव्ही दिसत नाहीत ही चित्रपटाची दुसरी शोकांतिका आहे. 'नागराज कमर्शियल मंजुळे' मला तरी पाहायचा नव्हता, इथून पुढेही पाहायचा नाहीय. त्यासाठी त्यांना किशोरवयीन प्रेम ह्या आजच्या मराठी चित्रपटाच्या जिव्हाळ्याच्या विषयापासून जरा वेगळं व्हावं लागेल. कारण आत्तापर्यंतच्या त्यांच्या दोन्ही चित्रपटांत हा समान धागा आहे.
नवीन चेहरे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू आश्वासक आहेत. नायिकेच्या भूमिकेसाठी एखादा चिकना चेहरा न निवडता रफ अॅण्ड टफ रिंकू निवडणं हा मास्टरस्ट्रोक होता. आकाश ठोसरसुद्धा एकदम मातीतला वाटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची निरागसता आहे. दोघेही फ्रेश असल्यामुळे कुठेही ते व्यक्तिरेखेच्या पुढ्यात येत नाहीत. नायकाच्या मित्रांच्या भूमिकेतल्या दोघांची नावं नीट कळू शकली नाहीत. (क्षमस्व) सुरेश विश्वकर्मा, सुरज पवार आणि तानाजी गालगुंडे ह्यांपैकी दोघे असावेत आणि उरलेला नायिकेचा भाऊ ! दोघा मित्रांची कामंही जबरदस्त झाली आहेत. खासकरून लंगड्या प्रदीपचं काम खूपच मस्त !
'सैराट' एकदा पाहण्यासारखा आहे. पण नागराज मंजुळेंचा चित्रपट म्हणून पाहिल्यास अपेक्षाभंग हमखास आहे. काही वेळेस संवेदनशील मनाला व्यावसायिकतेचीही एक दुसरी बाजू असते, हे एक नव्याने शिकता येऊ शकेल.
रेटिंग - * * १/२
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/04/movie-review-sairat.html
Sadhana, khup vaaeeT
Sadhana, khup vaaeeT vaTale.
maajhya don maamebhavanee Maratha Bauddh ashee lagne kelee. kaahihee virodh jhala naahee. gavachya gharee aaNi gaavaatahee naahee.
आमच्या ऑफिसमधल्या बौद्ध
आमच्या ऑफिसमधल्या बौद्ध शिपायाच्या मुलीने आतेभावाबरोबर प्रेमलग्न केले.ही शिपाई मुंबईत रहाते.कोकणातल्या तिच्या गावच्या जातपंचायतीने "मुलीने पळून जाऊन लग्न केले.हिचे पाहून आमच्या मुली बिघडतील" म्हणून आईला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.मी म्हटले,अहो तुम्ही हा दंड का भरता?.नाही भरत म्हणून सांगा.तुमच्या मुलीच्या पाठी तुम्ही उभ्या रहा.हे ५ हजार रुपये पंचांच्या दारु-जेवणामधे जातील.नाही मॅडम, असे नाही करु शकत.ते पैसे भरायलाच लागतील म्हाणून पठ्ठीने पैसे भरले.
माझ्या दिराने सोकॉल्ड खालच्या जातीच्या मुलीशी लग्न केले.४ दिवस सासू,नणंदा नाराज होत्या तितकेच.बाकी इतरांकडून (त्यात आम्हीही आलोच.) विरोधाचा प्रश्न नव्हताच.
देवकी घाटावर आणि उर्वरीत
देवकी
घाटावर आणि उर्वरीत महाराष्ट्रामधे बौद्ध समाजात जातपंचायत नाही. जातपंचायतीने दंड ठोठावणे ही कल्पना अस्तित्वात नाही. प्रत्येक जातीमधे जातपंचायत असते असं काही नाही. पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजात देखील जातपंचायत नाही. माळी समाजात पण बहुतेक नाही. ब्राह्मण समाजात पण माझ्या पाहण्यात नाही. सीकेपी समाजात देखील नाही. ज्या समाजात असुरक्षित राहणीमान आहे त्यांच्यामधे जातपंचायत आहे. भटके जीवन, विखुरलेला समाज, अल्पसंख्य असणे इत्यादी कारणांने असुरक्षितता येते.
कोकणात अशी बौद्ध समाजाची जातपंचायत असते का याबद्दल मला खात्री नाही. तुम्हाला याबाबतीत नक्की माहिती आहे का ?
देवकी घाटावर बौद्ध समाजात जात
देवकी
घाटावर बौद्ध समाजात जात पंचायत नाही. नागपूरला पण नाही.
खानदेश आणि कोकण याबाबतीत कल्पना नाही.
कोकणात बहुधा गावकी असावी असे वाटते. ( गावकी आणि जातपंचायत यात फरक असतो. नेमणूक झालेले पंच आणि आयत्या वेळी वडीलधा-या माणसांच्या सल्ल्याने गावाने (समाजाने ) केलेला निर्णय यात फरक आहे.)
ब्राह्मण समाजात जातपंचायत..
ब्राह्मण समाजात जातपंचायत.. हा हा!
भले बसवली जातपंचायत. इथे सख्ख्या भावंडांनाही एकमेकांच्या आयुष्यात एका लिमिटपलिकडे नाक खुपसू देत नाहीत. जातपंचायत वगैरेचे कोण ऐकणारे?
कोकणात गावकी असते हे करेक्ट.
कोकणात गावकी असते हे करेक्ट. पण माझ्या पाहण्यात जे आहे त्यात घरातले खाजगी निर्णय(मुलांची शिक्षणे, लग्ने, नोकरी-व्यवसाय वगैरे) त्यात येत नाहीत. निदान माझ्या सासरच्या गावी तरी नाही.
गावासाठीचे, वाडीसाठीचे किंवा तत्सम निर्णय असतात त्यात. मग मुख्य देवळापासून अमुक एक त्रिज्येपर्यंतचा गावातला परिसर हा दारू मुक्त असलाच पाहिजे, गावातली जमिन गावाबाहेरच्याला विकायची नाही वगैरे एकमताने घेतलेले निर्णय असतात.
ब्राह्मण प्रगत समाज आहे ,ते
ब्राह्मण प्रगत समाज आहे ,ते जात पंचायत वगैरे फंदात कधीच पडणार नाहीत.
सैराट पाहिला, आवडला.
सैराट पाहिला, आवडला. पहिल्या भागातली काही दृश्ये अतिशय सुरेख घेतलेली आहेत, मराठी चित्रपटात सहसा अशी दृश्ये पाहिलेली नव्हती. वाद्यमेळ श्रवणीय आहे. पण गाणी केवळ सतत कानावर आदळवल्याने लक्षात राहिली, श्रेया घोषालच्या गाण्याचे सुरवातीचे शब्दही आता आठवत नाहीयेत. अजय गोगावलेने गाऊ नये असे खूप ठिकाणी वाचले पण त्याचा आवाज तिथल्याच मातीतला वाटला. शहरी चित्रपट असेल तर कदाचित आवाज विसंगत वाटेल.
चित्रपटाचा शेवट आधीच माहीत होता तरीही त्याने निशब्द केले.
या निमित्ताने आपल्या समाजात लग्नासंबंधी विचारांचा लंबक दोन्ही बाजूंनी किती ताणलेला आहे हे लक्षात आले. एका बाजूला लग्न ही खूप खाजगी गोष्ट आहे, एकमेकांशी बांधिलकी असलेली पुरे, त्याच्यावर लग्न नावाचा सामाजिक स्टॅम्प आम्हाला नको म्हणणारे अल्पसंख्य आहेत. त्याचवेळी बहुसंख्य लोकात लग्न हा एक सामाजिक व्यवहार आहे. त्या व्यवहाराचे नियम पाळले नाहीत तर माफी नाही. चित्रपटात मुलाच्या घरच्यांना गाव सोडावे लागते, जातीबहिष्काराला सामोरे जावे लागते, त्यांच्याशी इतर जातिबंधवांचा रोटीबेटी व्यवहार बंद होतो. मुलीच्या घरच्यांची सत्ता जाते. जिथे ते नेते म्हणून सत्तेच्या गुर्मीत वावरले तिथे ती सगळी गुर्मी लोप पावते, ते नेतेपद दुसर्याच्या गळ्यात पडताना पाहावे लागते. हे सगळे का? तर लग्न हा महत्वाचा सामाजिक व्यवहार समाजाचे नियम न पाळता केला गेला. ज्या समाजाची बुद्धी आजही यातच अडकली आहे त्या समाजात हे नियम मोडून संबंधितांचे कायमचे नुकसान करणाऱ्यांना कडक शिक्षा दिली जाणारच. हि शिक्षा करायची संधी चित्रपटात मुलीच्या घरच्यांना मिळते, मुलाच्या घरच्यांना मिळत नाही इतकेच. मिळाली असती तर त्यांनीही तेच केले असते. मंजुळेने ऑनर किलिंग केले जाते हे दाखवलेले नाही तर ते का केले जाते हे दाखवलंय असे मला वाटले.
चित्रपटात कुठेही जातीचा उल्लेख नाही तरीही त्यात जात घुसडून आणि दिग्दर्शकाचीही जात काढून एकमेकांवर चिखलफेक करणाऱ्या दोन्ही बाजूंच्या लोकांबद्दल काय बोलावे? तेही त्याच समाजाचा भाग आहेत ज्याच्या बुद्धीची झेप कुठपर्यंत आहे हे चित्रपटात आलेय.
हा शो आमच्या इथे हाऊसफुल होता, आजचे सगळेच शो हाऊसफुल।होते. पण आलेल्या लोकांपैकी कितीजणांना चित्रपट पाहतानाचे डूज आणि डोंट्स माहीत होते? कमीतकमी 2 अतीलहान मुले होती जी मोठ्याने गळा काढून रडत होती. पडद्याकडे पाठ फिरवून चिवचिवाट करणारीहि काही मुले होती. सुरवातीला घाणेरडी बडबड करणारी मंडळी नंतर थंड झाली ते एक नशीब. दुसर्या भागात एक गंभीर दृश्य सुरु असताना चिवचिवाटवाल्या मंडळींपैकी एकाच्या मोबाईलवर 'याड लागलंय' जोरात सुरु झाले तेव्हा न राहवून एकजण जोरात 'देखना नही तो बाहेर जाव' म्हणून ओरडला. कदाचित मराठी नसावा. चित्रपटाला इंग्रजी सबटायटल्स होते.
शेवटचे दृश्य निशब्द घेतले गेले हे कित्येकांना समजले नाही. काहीजण आवाज आवाज म्हणून ओरडत होते.
बर्याच समाजा मधे आते भावा
बर्याच समाजा मधे आते भावा बरोबर व मामा बरोबर लग्न होतात तो गुन्हा कसा झाला/होतो? कदाचित प्रेम विवाह केला हा गुन्हा असावा...काही पण फेकतात लोकं
हैद्राबाद ला माझी एक राव अड्नावाची ब्राम्हण शेजारी होती जिचे लग्न मामा बरोबर झाले होते तिने सांगितले होते की त्यांच्या कडे अशी लग्न होतात पण महाराष्ट्रात मी अशी लग्न पाहिली नाहित.
काही जातीत माझ्या पाहण्यात
काही जातीत माझ्या पाहण्यात नाही असे म्हटलेय मी. देवकी यांचा असा समज असावा कि प्रत्येक जातीची जातपंचायत असते. तरी पण कोकणातले माहीत नसल्याने विचारलेय. हसण्यासारखे काय आहे त्यात हे नाही कळाले . खरे तर आधीची पोस्ट संपादीत करताना एरर आल्याने तशीच राहिली आहे.
काही काही आयडी धागा
काही काही आयडी धागा भरकटवायलाच बसलेले असतात!
चित्रपटाबद्दल बोला हव तेव्हढ... नसते विषय कशाला उगाळत बसता
खरेच त्या विषयांवर गंभीर चर्चा करायची असेल तर वेगळा धागा काढून हवा तो गोंधळ घाला
वाचायला यावे एक आणि वाचायला मिळावे वेगळेच... असे चाललय बऱ्याचश्या धाग्यांवर आजकाल!
व्हॉट्सअॅप साभारः कृपामयी
व्हॉट्सअॅप साभारः
कृपामयी मेंटल हॉस्पिटल, मिरज येथे "सैराट" ने वेडे झालेल्या लोकांसाठी वेगळा वॉर्ड सुरु. खालील पैकी कोणतीही लक्षणे तुमच्यात किंवा तुमच्या आसपास च्या लोकांमध्ये असल्यास स्पेशल वार्ड चा लाभ घ्या.
लक्षणे :
१. सतत सैराट बद्दल पोस्ट्स करणे.
२. Director किती महान आहे हे गावाला सांगत सुटणे.
३. प्रत्येक गाण्याचे लिरिक्स पाठ असल्याचे म्हणून दाखवणे.
४. अकलूज गावामध्ये आपले पाहुणे राहतात हे दुसर्यांना सांगणे.
५. सैराट ची गाणी मोठ्याने मोबाईल वर लावणे.
६. आरची वर गरजेपेक्षा जास्त लाईन मारणे आणि आपण तिच्यासाठी किती लायक उमेदवार आहोत याचा एकांतात विचार करणे.
७. करमाळा गावातील विहीर बघायला जाऊया म्हणून ट्रिप काढायचा विचार करणे.
८. नागनाथ मंजुळे आणि स्टिव्हन स्पीलबर्ग यांची तुलना करणे.
९. सैराट ची रोजची कमाई किती यांचा हिशेब वहीत लिहून ठेवणे.
हलके घ्या
साधना, तुम्ही लिहिलेलं आवडलं.
साधना, तुम्ही लिहिलेलं आवडलं.
अवांतरः लग्न एक खाजगी व्यवहार की सामाजिक! आणि आपल्याकडे म्हणतातच की लग्न दोन जीवांच होत नाही तर दोन घरांच होतं (सामाजिक बंध).
अंजली १२ सचिनभक्तांसाठी असा
अंजली १२
सचिनभक्तांसाठी असा एखादा वॉर्ड आहे का ?
कापोचे कोकणात जातपंचायत नाही
कापोचे
कोकणात जातपंचायत नाही पाहिली कधी. पण भावकी/गावकी मात्र पाहिली आहे. रायगड रत्नागिरी मधल्या काही जातींमध्ये हे प्रकार चालतात. रायगड मधल्या बहिष्काराच्या बातम्या तर सतत येत असतात. पण बहिष्काराच कारण फक्त लग्न एवढच मर्यादित नाही. आगदी निवडणूकीत विरोधी काम केल्याने सुद्धा बहिष्कार घातला गेला आहे.
रत्नागिरी मध्ये एका समाजात गावातील काही लोकांना गावकार मूहणून संबोधल जात. हे गावकार त्याच जातीतले असतात, पण हि गावकार मंडळी जातीतलीच उच्च जात म्णून वावरु लागली आहेत.हि गावकार मंडळीच पंचांसारख निवाड्याच काम करतात.
सिंधीदूर्गात गावकार हा शब्द वेगळ्या रुपाने येतो. पुर्वाश्रमीच्या बलू
तेदाराना गावकार म्हणतात.
सूनटून्या. रत्नागिरीत गावकार
सूनटून्या.
रत्नागिरीत गावकार शक्यतो कुणबी समाजाचे असतात असे पाहिले आहे.
(पण गावकीचे काम करणारे खरे तर कुणीही गावकार पदवीस प्राप्त आहेत.)
त्यांना त्या समाजात मान असतोच पण इतर गावकीच्या कामातही असतो.
उदा. होळी, गार्हाण घालणे, ग्रामदेवतेची पूजा, पूजेत कापलेली कोंबडी घेणे.
सुनटुन्या धन्यवाद. मला आताच
सुनटुन्या धन्यवाद.
मला आताच माहिती मिळाली एका स्थानिकाकडून.
जातपंचायत या अर्थाने नाही, पणकोकणात भावकी असते. भावकीला घाबरतात. हे जवळपास सगळ्याच समाजात असते. समाजमंदीर असते. त्यांच्या बैठका होतात. उत्सव होतात. वर्गणी असते. तहहयात पंच नसतात एव्हढाच काय तो फरक. एकंदर कोकणात घाटापेक्षा मागास सामाजिक वातावरण आहे.
एकंदर कोकणात घाटापेक्षा मागास
एकंदर कोकणात घाटापेक्षा मागास सामाजिक वातावरण आहे.>>> ऑ? हे कसं काय? भावकी आहे म्हणुन?
नागनाथ मंजुळेला पुढचा सिनेमा
नागनाथ मंजुळेला पुढचा सिनेमा कोंकणातल्या 'घाटापेक्षा मागास सामाजिक वातावरण' या विषयावर काढायला सजेस्ट करुया काय?

एकंदर कोकणात घाटापेक्षा मागास
एकंदर कोकणात घाटापेक्षा मागास सामाजिक वातावरण आहे.> असह्मत
साति. येस्स
साति. येस्स
एकंदर कोकणात घाटापेक्षा मागास
एकंदर कोकणात घाटापेक्षा मागास सामाजिक वातावरण आहे.<<
उलट आहे.
सुन्टुन्या अंनिसकडे
सुन्टुन्या
अंनिसकडे जातपंचायतीविरोधात आलेल्या दाव्यांवरून त्याने हे म्हटलंय. गुगळून पाहीलं. अशाच बातम्या दिसतात.
साती
नागनाथ मंजुळेला पुढचा सिनेमा कोंकणातल्या 'घाटापेक्षा मागास सामाजिक वातावरण' या विषयावर काढायला सजेस्ट करुया काय? >>> उपहास कि श्लेष ? नक्की करा एकदा. पालथा घडा म्हणून शिक्का बसूद्या मग फार प्रभावी होईल बरं का पोस्ट.
माहिती विचारल्याने पाघ होत असेल तर मग तुम्हाला शंभर गुण !!
( हा उपहास नाही, कौतुक कौतुक)
(एक रूपवान आयडी आहे ज्याने इतका वेळ काहीही तक्रार केलेली नाही. विशिष्ट आयडीच्या पोस्ट्स आल्या की त्याला साक्षात्कार झालेला आहे. आयपीएल विरुद्धच्या धाग्यावरचा राग किती काळ धुमसणार कुणास ठाऊक...
)
श्लेष म्हणजे काय असं तुमचं मत
श्लेष म्हणजे काय असं तुमचं मत आहे?
छे बुवा,मी नवीन आहे
छे बुवा,मी नवीन आहे मायबोलीवर. आपणच सांगावे.
एकंदर कोकणात घाटापेक्षा मागास
एकंदर कोकणात घाटापेक्षा मागास सामाजिक वातावरण आहे.>१००% असहमत!
अंनिसच म्हणाल तर दाभोळकरांनी 'बैठक' बाबत लिहिलं आहे ज्याचं प्राबल्य उरण्/अलिबाग या भागात दिसतं (बहुधा)
कापोचे़ Kahi mojakya jatitil
कापोचे़
Kahi mojakya jatitil mandali tehi mojakech ase vagtat.
TalKoknaat savarn jatinmadhye koni konabarobar lagn kel yakade dhunkun suddha paahat naahit. Gharatil mandali thodi dhusfus kartat, pan nantar hotat changli.
Aamchyach gharaat tinhi bhavandanchi aantar jatiy lagna jhali aahet. Savarn to Savarn aani Savarn to Dalit.
Kakane thodafar abola dharlela pan tyachyach donhi mulani tyalaa dhada shikvala.
Gavaat tar konalahi kadichahi farak padlaa nahi. Gav vale / bhavaki saglya goshtinmadhye saamil karun ghetat. Konihi kadhihi virodh kelela naahi.
वर साधना यांनी सांगितलेली
वर साधना यांनी सांगितलेली घटना तळकोकणातलीच आहे. सावंतवाडी भागातली.
सांगायचा मुद्दा हाच की कोकणात सगळीकडेच सगळं आलबेल आहे असे मुळीच नाही. वाळीत टाकणे, आंतरजातीय लग्नांना विरोध या गोष्टी आहेतच.
प्रत्येक ठिकाणचा अनुभव वेगळा
प्रत्येक ठिकाणचा अनुभव वेगळा असू शकतो. तसेच स्थितीनुसारही अनुभवात फरक पडू शकतो. मी लिहिलेल्या घटनेत लग्नानंतर 8 दिवस सगळे व्यवस्थित होते. पण गावातल्या गावात आंतरजातीय लग्न अगदी नेहमीसारखे करणे काही जणांना खटकत होते, त्यांनी वातावरण तापवले. चोरासारखे गुपचूप उरकले असते तर उघड बहिष्कार झाला नसता. प्रश्न हा आहे कि जर दोन्ही घराची मान्यता आहे तर का करावे सगळे गुपचूप? लग्न नेहमीसारखे करण्यात कोणालाही खिजवण्याचा हेतू नव्हता, सुचवल्याप्रमाणे वाडीत हॉल घेऊन लग्न केले गेले, पूजा तर हॉलवर घालणे शक्य नव्हते. आमंत्रणे दिलेले सगळे लोक आले, आलेल्यांना जेवायला घालायची प्रथा आहे, तसे जेवण दिले. पण साध्या गोष्टीही लोकांना खटकतात आणि पराचा कावळा केला जातो.
सोकॉल्ड सामाजिक दरी आणि
सोकॉल्ड सामाजिक दरी आणि त्याचे दुष्परीणाम हा नागराजच्या सिनेमांचा गाभा असतो. वर म्हटल्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला जे काही वाईट घडतेय त्याकडे डोळे मिटून असं काही घडतंच नाही असं म्हणणं सोप्पं असतं.
मुळात ऑनर किलींग विषयावर बक्कळ सिनेमे येऊनही याच चित्रपटाला इतके हायलाईट का केले गेले असावे यावर राहून राहून आश्चर्य वाटते.
सिनेमॅटोग्राफी हे या चित्रपटाचे बलस्थान असल्याचे वाचले एका ठिकाणी त्यामुळे, दिग्दर्शनातील काही चांगल्या बाजूंसाठी नक्कीच हा चित्रपट पाहणार.
फेसबूकवरील व मायबोलीवरील इतर सैराट धाग्यांवरील समाज प्रबोधन, मुले बिघडणे, बाल वयातील प्रेम प्रकरणाला हवा देणे, शिवाजी महाराजांचा फोटो असलेल्या घरातील लोक इतके वाईट वागूच शकत नाहीत ते मुद्दाम हेतूपुरस्सर बदनामीकारक दाखवले आहे वगैरे वगैरे वाचून गंमत वाटली.
अवांतर : शिवाजी महाराजांचा फोटो किंवा पुतळा ... यावर विशिष्ट वर्गाची किंवा जातीची मक्तेदारी नाही. माझ्या माहेरची जात मराठा नसूनही माझे अनेक भाऊ कट्टर शिवभक्त (शिवाजी महाराज भक्त) आहेत. तसंच पाटील हे आडनावही जातीदर्शक नाही. अनेक जातींमध्ये पाटील आडनांव असल्याचे पाहीले आहे.
कोकणात विशेषतः रायगड जिल्ह्यात काही भागांमध्ये आडगावांत "वाळीत टाकणे" हा प्रकार सर्रास घडतो. कारण कुठलेही पुरते, आपली टिमकी गाजवणे, सत्ता गाजवणे हा हेतू जास्त असतो. मागे वाचलेल्या एका बातमीमध्ये ट्रेकींगची आवड असलेल्या जोडप्यापैकी तरूणी जीन्स घालते या कारणास्तव त्यांचे कुटुंब वाळीत टाकले होते. अडवणूक करणे हा मेन मोटीव.
कोकणात (मुंबई व रायगड) व तळकोकणात(सिंधुदुर्ग जिल्हा) (आडगावे वगळता) आंतरजातीय विवाहांना सध्या हळूहळू स्वीकारले जात असले तरीही वर कोणीतरी लिहील्याप्रमाणे टोचून अर्धमेले करणे तितकेसे सुधारले नाही. (रीतसर वैदिक लग्न लागले तरीही शेण खाल्ले, पळून गेले, नाक कापले वै. विशेषणांनी लग्नाला कितीही वर्षे झाली असली तरी नातेवाईकांच्यात उद्धार होतोच, सौम्य प्रकार - "आपल्यातले नाहीत" असं म्हणून कायम परकेपणाचा नाकारल्याचा शिक्का बसतो.
एकंदर कोकणात घाटापेक्षा मागास सामाजिक वातावरण आहे. >> जातपंचायती / गावकी / भावकी असणे किंवा नसणे केवळ यावरून एखाद्या ठिकाणचे सामाजिक वातावरण मागास ठरत नाही, इतर अनेक मुद्दे असतात. भावकी हा प्रकार घाटावरही विशेष करून असतोच.
विवाह ही बाब खाजगी की सामाजिक या मुद्द्याबद्दल : एरवी दोन कुटुंबांना जोडणारे वै. उदात्त विशेषणं लावले गेलेले लग्न मानपान, देणंघेणं, त्यावरून गदारोळ, लग्नानंतरचा छळ या बाबी मात्र अचानक खाजगी होऊन जातात.
Pages