'फॅण्ड्री' च्या शेवटी जब्या आणि त्याचं पूर्ण कुटुंब डुक्कराच्या मागे लागलेले दाखवले आहेत. त्यांची आणि डुक्कराची ती धडपड, पळापळ बराच वेळ चालते. पळून पळून जब्याचा बाप इतका दमतो की त्याच्या अक्षरश: छातीचा भाता होतो. ही सगळी पळापळ हळूहळू करत जब्याच्या शाळेभोवतीच्या परिसरात येते. मग जब्या त्याचे सवंगडी आणि 'ती'च्यापासून स्वत:चं तोंड लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहतो. त्या प्रयत्नात १-२ वेळा पकडता येऊ शकणारं डुक्कर निसटतं. बाप खूप शिव्या घालतो. अखेरीस जब्या परिस्थितीला शरण जातो आणि आपलं हे अस्तित्व स्वीकारतो. त्याची लव्ह स्टोरी त्याच्या कधीही न वाचल्या जाऊ शकणाऱ्या एका कागदोपत्री फुटकळ इतिहासात जमा होते आणि त्या लव्ह स्टोरीचा पूर्णविराम म्हणून तो एक दगड थेट आपल्याकडे - कॅमेऱ्याच्या दिशेने - फेकतो. कहाणी संपते. बराच वेळ चाललेला डुक्कर पकडण्याचा प्रसंग ठळकपणे लक्षात राहतो. लक्षात राहते जब्याची केविलवाणी धडपड आणि त्याच्याहीपेक्षा केविलवाणा त्याचा बाप. 'फॅण्ड्री' मधला हा शेवटचा प्रसंग चालतो बराच वेळ, पण तरी तो लांबलेला वाटत नाही. किंबहुना 'फॅण्ड्री' एकूणच ची लांबी हे त्याचं एक बलस्थानच होतं. जेमतेम शंभर मिनिटं - साधारण पावणे दोन तास फक्त - चालते ती कहाणी.
'फॅण्ड्री' चं अजून एक बलस्थान होतं 'नाविन्य'. ती एक अशी कहाणी होती, जी कुणी कधी ह्यापूर्वी सांगितली नव्हती. कुणाला ते कदाचित पेलणारंच नव्हतं. 'हे दाखवून काय मिळणार आहे', असाच विचार त्यामागे असावा, कारण ती कहाणी कुणाला माहित नव्हती किंवा कुणी पाहिलेली नव्हती, असं तर नक्कीच नव्हतं. नागराज मंजुळेंनी ते आव्हान पेललं. मी असं म्हणणार नाही की, 'त्यांनी तो धोका पत्करला.' त्यांना त्यात धोका वगैरे वाटायचा प्रश्नच नव्हता. कारण काही कमवण्यासाठी ती कलाकृती नव्हतीच, त्यामुळे काही गमवण्याचा किंवा न कमवण्याचा धोकाच उद्भवत नाही.
'फॅण्ड्री'मध्ये मला काय आवडलं असं मला कुणी विचारलं, तर उत्तर सोपं आहे. 'उत्कटता.' आणि ही जी उत्कटता 'फॅण्ड्री'त आहे, ती माझ्या मते तरी वरील दोन कारणांमुळे आहे.
'सैराट' ह्याच दोन बाबतींत 'फॅण्ड्री'समोर खूपच कमी पडतो.
तब्बल तीन तासांची लांबी, 'सैराट'ला खऱ्या अर्थाने पसरट करते. सुरुवातीच्या कमीत कमी एक तासाच्या चित्रपटाला जर पूर्णपणे कापून टाकलं असतं, तर काय झालं असतं, असा एक विचार मनात येतो. हा एक तास - सव्वा तासाचा सिनेमा चक्क रवी जाधवांनी केलेला वाटतो. ह्या तास - सव्वा तासात मिसरूड फुटलेली पोरं टवाळक्या करतात. समवयस्क मुलींवर लाईन मारतात. ह्या तास - सव्वा तासात किती तरी वेळा नायक-नायिका एकमेकांशी फुल्ल फिल्मी नजरानजर करतात. म्हणजे बाजूनी जाता जाता नजरा भिडवणे वगैरे..! लव्ह लेटर्स दिली जातात आणि टाका भिडतो.
मग अजय-अतुलच्या ट्रेडमार्क स्टाईलच्या बुंगाट गाण्यावर पब्लिक झिंगाट नाचतं आणि त्यानंतर खरा सिनेमा सुरु होतो.
इथून पुढचा सिनेमा क़यामत से क़यामत तक़, इशक़जादे, साथिया अश्या काही सिनेमांचं 'सुधारित मिश्रण' आहे. QSQT मध्ये खानदानी दुष्मनी असते, इथे जातीय भेद. QSQT मध्ये नायिकेकडच्या एका कौटुंबिक सोहळ्याच्या वेळी प्रेम प्रकरण उघडकीला येतं, इथेही तसंच. QSQT मध्ये दोघे जण पळून जातात आणि एका तात्पुरत्या घरात आश्रय घेतात, तेव्हा समजतं, नायिकेला तर चहासुद्धा करता येत नाही, इथेही तसंच. मग जसं 'साथिया'मध्ये नायक-नायिकेत अहंकार आड येऊन दुरावा निर्माण होतो, तसा इथेही काही मिनिटांसाठी होतं. कहाणी अपेक्षित वळणांनी अपेक्षित शेवटापर्यंत जाते. ह्या सगळ्या प्रवासात छोटे-छोटे फिल्मी योगायोगही बरेच जुळून आलेले आहेत. पळून जाण्यासाठी किनाऱ्यावर एक unattended मोटारबोट तयारच असणं, (पहिल्या वेळेस) भरपूर चोप मिळालेला असतानाही कुठे जखमा नसणं, (दुसऱ्या वेळेस) गुरासारखा मार खाऊनही किरकोळ जखमांसह पळ काढू शकणं, ज्या रस्त्याने गाडी जाणार आहे, त्याच्या बाजूलाच पोरांना बदडणं की अगदी लगेच दिसून यावं, वगैरे.
'सैराट'च्या संगीताचीही एक हवा आहे. 'अजय-अतुल' ने धूम मचवली असली, तरी सगळ्याच गाण्यांवर त्यांच्याच कुठल्या न कुठल्या गाण्याची (नेहमीप्रमाणे) छाप दिसतेच. 'झिंगाट' गाण्यावर बेभान होऊन नाचणारं अख्खं सिनेमागृह मी पाहून आलो आहे. अनेक दिवसांनंतर अशी जादू कुणी केली आहे. ह्या 'X-factor' बद्दल तर वादच नाही. गाण्यांचं संयोजनही केवळ अफलातून झालं आहे. 'हॉलीवूड'मध्ये संगीत संयोजन केलं गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. भरमसाट वाद्यांचा मेळ कसा असतो, हे समजून घेण्यासाठी भन्साळीने इकडे शिकवणी लावावी म्हणतो ! कुठेही कर्णकर्कश्य न होताही सांगीतिक भव्यता कशी असते, हे 'सैराट'ची गाणी दाखवतात. खास करून 'सैराट झालं' आणि 'याड लागलं' मधला वाद्यमेळ तर ऐकावाच.
'ऑनर किलिंग' ही उत्तर भारताच्या बऱ्याच भागांतली एक भीषण समस्या आहे. गुन्हेगारी जगतातल्या सत्यघटनांवर आधारित एका कार्यक्रमात अशीच एक कहाणी मागे पाहिली होती. 'सैराट'चं कथानक त्या सत्यघटनेवर बेतलेलं आहे. कहाणीतली सगळी वळणं आधीच कळून येतात. शेवटही माहितच असतो, पण अचूक नेम साधून शेवटाचा दगड थेट भिरकावण्याचं नागराज मंजुळेंचं कौशल्य व्यावसायिकतेचा कीडा चावल्यावरही अबाधित आहे. हा शेवट पायाखालची जमीन, डोक्यावरचं छप्पर, बुडाखालची खुर्ची सगळं बाजूला करतो. पोटातली आतडी पिळवटतो आणि डोक्यातला मेंदू बधीर करतो. डोळे थिजतात, हात-पाय गारठतात आणि ओठांना कंप सुटतो. केवळ ह्या शेवटासाठी दिग्दर्शक मंजुळे हवे होते, बाकीच्या पसाऱ्यासाठी कुणीही, अगदी कुणीही चाललं असतं.
समजा, हा चित्रपट 'फॅण्ड्री' वाल्याचा नसता, दुसऱ्या कुणाचा असता तर ?
तर हा एक महान चित्रपट असता. कितीही काहीही म्हणा, कुणी केलंय ह्यावर त्याचं मूल्यमापन ठरतंच ठरतं. जो मुलगा अभ्यासूच आहे, तो जर पहिल्या ऐवजी दुसऱ्या क्रमांकावर आला तर ते जास्त धक्कादायक असतं आणि काठावर पास होणारं एखादं दिवटं टपकलं, तरी विशेष काही घडलेलं नसतंच ! मंजुळेंचा दुसरा क्रमांक आला आहे, हे धक्कादायक आहे.
तीन तासांपैकी फक्त पाच मिनिटं मंजुळे दिसतात, एरव्ही दिसत नाहीत ही चित्रपटाची दुसरी शोकांतिका आहे. 'नागराज कमर्शियल मंजुळे' मला तरी पाहायचा नव्हता, इथून पुढेही पाहायचा नाहीय. त्यासाठी त्यांना किशोरवयीन प्रेम ह्या आजच्या मराठी चित्रपटाच्या जिव्हाळ्याच्या विषयापासून जरा वेगळं व्हावं लागेल. कारण आत्तापर्यंतच्या त्यांच्या दोन्ही चित्रपटांत हा समान धागा आहे.
नवीन चेहरे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू आश्वासक आहेत. नायिकेच्या भूमिकेसाठी एखादा चिकना चेहरा न निवडता रफ अॅण्ड टफ रिंकू निवडणं हा मास्टरस्ट्रोक होता. आकाश ठोसरसुद्धा एकदम मातीतला वाटतो. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची निरागसता आहे. दोघेही फ्रेश असल्यामुळे कुठेही ते व्यक्तिरेखेच्या पुढ्यात येत नाहीत. नायकाच्या मित्रांच्या भूमिकेतल्या दोघांची नावं नीट कळू शकली नाहीत. (क्षमस्व) सुरेश विश्वकर्मा, सुरज पवार आणि तानाजी गालगुंडे ह्यांपैकी दोघे असावेत आणि उरलेला नायिकेचा भाऊ ! दोघा मित्रांची कामंही जबरदस्त झाली आहेत. खासकरून लंगड्या प्रदीपचं काम खूपच मस्त !
'सैराट' एकदा पाहण्यासारखा आहे. पण नागराज मंजुळेंचा चित्रपट म्हणून पाहिल्यास अपेक्षाभंग हमखास आहे. काही वेळेस संवेदनशील मनाला व्यावसायिकतेचीही एक दुसरी बाजू असते, हे एक नव्याने शिकता येऊ शकेल.
रेटिंग - * * १/२
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/04/movie-review-sairat.html
'सैराट झालं जी...' गाण्याच्या
'सैराट झालं जी...' गाण्याच्या सुरूवातीला कमानीकमानींमधला एक शॉट आहे. परश्या पुढे चालत असतो, मागे थोड्या अंतरावर आर्ची, तो अर्धवट मागे बघत ती कुठे आहे याचा अंदाज घेतो, ती त्याला एका खांबाजवळ गाठून poke करते... किंवा नंतर शेतात त्याच्या अंगावर सुकं गवत टाकते, तो ते डॉज करण्याचा प्रयत्न करतो..
नॉर्मली, अश्या ड्युएट गाण्यांमधे हिरो या प्रकारच्या गोष्टी करताना दाखवला जातो, इथे हिरॉईनला करताना दाखवलंय त्यानेही तिचं व्यक्तिमत्व दिसून येतं.
ती आर्ची क्लासमधे येते आणि
ती आर्ची क्लासमधे येते आणि एकटक त्या परश्याकडे बघत बसते तेंव्हाचे त्याचे आधी खूष झाल्याचे मग ओशाळल्याचे आणि शेवटी विनवणी केल्याचे भाव अगदी भन्नाट आहेत. तेंव्हाच त्या मित्राच त्याला सारखं ढोसत राहणं, तुझ्याकडच बघतिय लगा. \
मग परश्या आणि त्याच्या मित्रांनी घरी जाऊन केलेलं विश्लेषण सगळच भन्नाट जमलय. कुठेही व्हल्गर वाटत नाही.
फारएण्ड, फेरारीचा झेंडा ...
फारएण्ड, फेरारीचा झेंडा ...
एक नंबर निरिक्षण !!
मला ती याडं लागलय ची सुरवात
मला ती याडं लागलय ची सुरवात पण फार आवडते. परश्या ज्या अधिरतेने उडी मारतो नावेतुन आणि पुढे विहिरीत उडी मारुन 'सॉरी सॉरी मी बघितलच नाही', त्यावर ती आर्ची 'चल निघ भायेर'
पुढे मित्र विचारतात,काय म्हणली रं ती'
तर हा' निघ भायेर' म्हनली.
मस्त घेतलय अगदी छोट्या छोट्या गोष्टीतुन पुढे सरकत जाते ती प्रेमकथा.
सगळ्यांनी मिळून स्क्रीन प्ले
सगळ्यांनी मिळून स्क्रीन प्ले लिहा बर आता इथे.. .सुरुवाती पासून शेवट पर्यंत कुठेही इकडे तिकडे न करता..
>>>मला ती याडं लागलय ची
>>>मला ती याडं लागलय ची सुरवात पण फार आवडते. परश्या ज्या अधिरतेने उडी मारतो नावेतुन आणि पुढे विहिरीत उडी मारुन 'सॉरी सॉरी मी बघितलच नाही', त्यावर ती आर्ची 'चल निघ भायेर'
पुढे मित्र विचारतात,काय म्हणली रं ती'
तर हा' निघ भायेर' म्हनली.<<<
हा तर मला खूपच आवडलेला. परश्याला आर्ची त्याच्याशी काहीतरी बोलल्ली हेच महत्वाचे.
शुभांगी तु लिहलेल्या सीन
शुभांगी तु लिहलेल्या सीन नंतरचा सीन.. तो पारर्या चढुन वर जात असताना सगळेजण आर्ची त्याच्याकडे पाहते ते पाहतात ,,आनि मी तो किती क्युट,मिश्कील हसतो हेच पाहते.त्यावेळच म्युझिक ही भारी.
लंगड्याची विहरीतली पहिली उलटी उडी ही भारी.
तो हसरा आहे. पहिल्या हाफ मधे
तो हसरा आहे. पहिल्या हाफ मधे तोच जास्त आवडला. टिपिकल चॉकलेट हिरो
मला ती याडं लागलय ची सुरवात
मला ती याडं लागलय ची सुरवात पण फार आवडते > मला ही.....पुर्ण गाणंच मस्त झालय.....परश्या पाण्यात उडी मारतो मग घरी जावून आंघोळ करून, मस्त तयार होवुन निघतो...हातात घड्याळ वैगरे असते तेव्हा च मनात आले अरे हा तर विहिरीत उडी मारणार आहे पण तसही सिनेमा त हे सगळे चालतच.....पण इथे तो विहिरीत उडी मारायच्या आधी वॉलेट(?) आणि घड्याळ मित्रा कडे भिरकावतो...आणि मगच पाण्यात उडी मारतो......प्रेमात पडल्यावर ही तेवढे भान रहातेच . मी असते तरी आधी घड्याळच सांभाळले असते
डिटेलिंग आवडलेच...
आताच बया गाण्यात आर्ची
आताच बया गाण्यात आर्ची त्याच्याकडे एकटक बघत असते . सर तिच्याकडे बघतात त्यावर ती डोळ्यानेच सांगते की तुमच तुम्ही शिकवा आणि परत परश्या कडे बघायला लागते
मस्त बोलते ती डोळ्यांनी
ती म्हणते सॉरी सॉरी च्या
ती म्हणते सॉरी सॉरी च्या लाडक्या. !!!
तो फिशिंग करून आलेला असतो मग अंगाला वास येत असेल म्हणून घरी जाऊन स्वच्छ अं घोळ करून
मग जाउन पाण्यात पडतो. हुषार ग बै पोर. माझी याड लागलं वरची पोस्ट शोधून इथे आणते.
अन्यथा फार काहि 'भारी' मिस करतोय असे एकंदरीत (सर्वत्र वाचून) वाटत नाहीये... >> संगीत नक्कीच मिस करत आहात. सावन किंवा तत्सम अॅप्स वर संगीत डाउन लोड ला उपलब्ध आहे. डाउन लोड करताना अॅपची फी भरावी लागते मात्र.
मी सुट्टीत परदेशात भटकताना हीच गाणी रिपीट वर ऐकत होते. सिंफनी तर ऑस्सम आहे. व झिंगाट पण मस्त. बाकी दोन गाण्यंपरेंत पोहोचलेच नाही अजून. एक मुलीचे गाणे जरा जरा तेलुगु सिनेमातील छापाचे आहे पण गोड आहे. शिरशिरी उमटवणारे. सिंफनीचे रसग्रहण लिहायचेच आहे पण इतक्या लोकांनी सैराट वर लिहीले आहे त्यात भर नको म्हणून चूप आहे. सिंफनीतच सिनेमाचा शेवट व्यक्त केला आहे.
२/३ सिंफनी झाल्यावर स्त्रीच्या आवाजातले आरारुरार्रीरू असे शब्द आहेत. व सुरावट. ही आंध्रा साइडला
लहान मुलांना लोरी म्हणून गाताना म्हणतात. ते सही पकडले आहे. आर्चीच्या मनात माहेरचा आहेर पाहून निर्माण झालेल्या कोवळ्या लहरी. मग एक जबरदस्त पण छोटीच काली आंधी व अॅब्रप्ट शेवट. सो ट्रॅजिक. सो क्लासिक. चार सहनर्तक व नर्तकी, एक हिरो व एक हिरॉइन असा सेट घेउन पूर्ण सिनेमाची कथा बॅले द्वारे ऑपेरा किंवा मॉडर्न डान्स द्वारे पण प्रेझेंट करता येइल असे व्हिज्युअलाइज करता येते सिंफनी बद्दल.
मजेची गोष्ट म्हणजे हाउस ऑफ दियॉर ने मागील आठवड्यात कान चित्रपट उत्सव सुरू होण्याच्या मुहुर्तावर
आर्ची ज्वेलरी लाइन बाजारात आणली आहे. पिंक व्हाइट हिरे व सोने ह्याची ज्वेलरी आहे. ते वाचून फार मजा वाटली.
हा फो टो त्या कलेक्षनचा.
http://www.dior.com/couture/en_us/jewellery/jewellery-collections/archi-...
याडं लागलं गं याडं लागलं
याडं लागलं गं याडं लागलं गं
रंगलो तुझ्यातं याडं लागलं गं
वास ह्यो ऊसातं येई कस्तुरीचा
चाखलया वारं ग्वाड लागलं गं…
हे कडव गाण्यात 3 वेळा आहे. तिन्ही वेळेस त्याचे background music वेगवेगळे आहे. पहिल्या वेळेस background मधे Cello वाद्याचा वापर केला आहे त्याचे music वेगळे आहे.
नंतर लगेच परत दुसर्या वेळेस ते कडव आल्यावर background वाद्य bagpipers, flute मधे बदलते आणि music पुन्हा बदलण्यात येते. शेवटी तिसर्या वेळेस हे कडव आल्यावर आधीचा ठेका बदलून ढोल झांजाचा वापर केला गेला.
एकाच कडव्याला वेगवेगळे background music दिलेले पहील्यांदाच पाहीले.
हिंदीमधे असा प्रयोग राजेश रोशन हे करतात.
फ्युजन म्युझिकचा सुरेख
फ्युजन म्युझिकचा सुरेख प्रयोग आहे हे गाणे. आधी सिंफनी मग तो भारतीय ताल वाद्याचा ठेका व मग स्त्रीचा आवाज. त्यात अॅक्चुअल पुरुष पात्र लाइट वार्यासारखे आहे पण गाण्यात तो पुढे येतो व स्त्री पात्र जे अॅक्चुअली अग्नि सारखे आहे ते गाण्यात पार्श्वभूमीला आहेआहेत. ण दोघे एकमेकात पार विरघळून गेले आहेत. मग ते लहान बाळा ला मांडीवर ठेवून जोजविल्या सरखे आरा र्रि रा रि रा रा. एक लहर वात्सल्याची.
मग प्रिन्स भाउंची तलवार सपासप फिरते. व काळा अंधार. दर वेळी ऐकताना शेवट येउ नये असे होते.
हाच अनुभव मला मेरे ढोलना मध्ये पण येतो. स्त्री व पुरुष एकमेकांच्या प्रेमात आहेत व अगदी तिचे नाचणे व त्याचे सूर एकमेकांसाठी आहेत. ताल व सूर मिसळून गेले आहेत. मग मध्येच राजाची तलवार तळपते व स्तंभित झालेली प्रेयसी. तिचा मूक आक्रोश. हर हर. ये जालिम समाज ऐसा क्यूं है.
सर तिच्याकडे बघतात त्यावर ती
सर तिच्याकडे बघतात त्यावर ती डोळ्यानेच सांगते की तुमच तुम्ही शिकवा आणि परत परश्या कडे बघायला लागते >>> हो ती एक्स्प्रेशन्स जबरी आहेत.
मला तिची एण्ट्री पण जबरी आवडली. उगाच ड्रामेबाजी नाही. विहीरीकडे चालत येताना बॉडी लॅन्ग्वेज सॉलिड आहे. कूल कमाण्ड
अमा - मला बॅले/ऑपेरा ची लॅन्ग्वेज कळत नाही, त्यामुळे फारसे रिलेट करू शकलो नाही पण साधारण कल्पना आली.
याड लागलं हे नक्कीच झिंगाट पेक्षा जास्त चांगले आहे. पण grows up on you म्हणतात तसे आहे. पहिल्यांदा एक दोनदा ऐकले तेव्हा काही भारी वाटले नाही. थिएटर मधे सगळ्या इफेक्टसकट जबरी वाट्ले. आता आवडते. ते परश्याला तिच्या आतेभावापासून वाचवल्यावर सुरू होते ते तेलुगु/तमिळ टाईप गाणेही छान आहे. त्याच्या सुरूवातीला ती मान एकदम वळवून तेथून निघते तो शॉट मस्त आहे.
आता डीवीडीवरही पहिला भाग पाहिला परत. एक दोन सीन्स थिएटर मधे पाहिल्याचे आठवत नाही. तसेच ते झिंगाट गाणेही डीवीडी व्हर्जन वेगळीच आहे. संगीतही वेगळे आहेच पण 'बांधावरून कल्टी' च्या जागी वेगळ्याच ओळी आहेत - काहीतरे 'हायपिच गाणे' वगैरे.
याड लागलं (इतक्या वेळा ऐकून
याड लागलं (इतक्या वेळा ऐकून ऐकून की काय !) मला आता ओके वाटायला लागलेय. 'सैराट झालं जी' अजूनही ऐकावेसेच वाटते.
मास्टरपीस तयार होतो तेव्हा
मास्टरपीस तयार होतो तेव्हा कथानक आणि गाणी एकमेकांत बेमालूम मिसळून जातात.
'सैराट'ची गाणी कलाकृती म्हणून अप्रतिम बनली आहेत आणि त्या गाण्यांमुळे चित्रपट एका वेगळ्या उंचीवर पोचला आहेच पण त्या कथानकाचा, शोकांतिकेचा आत्मा प्रत्येक गाण्यात उतरलेला आहे. विशेष करुन याड लागलं, आता गं बया आणि सैराट झालं जी मध्ये ! उदा. मन झालं हे बाजिंदं पासून लागलं सजनीला सजनाचं याड पर्यंतच्या ओळी आणि एकंदरच चालीत पुढच्या घटनांची चाहूल आहे किंवा याड लागलं मध्ये तो विहिरीत उडी मारुन बाहेर येईपर्यंतचे म्युझिक आणि हमिंग आणि रारीरारा किंवा 'दुखनं हे देखनं गं एकलंच हाय साथीला' ह्यासारख्या ओळी ऐकताना जितकं शांत वाटतं तितकंच कारुण्यही जाणवतं.
'याड लागलं'ने याड लावायला जरा वेळ घेतला पण आता तिन्ही गाणी सारखीच चढली आहेत मनावर. याड लागलीची सिम्फनी किती प्रवाही झाली आहे आणि त्या ग्रामीण शब्दांना ती जराही ओढूनताणून वापरल्यासारखी वाटत नाही. प्रत्येक गाण्याचे चित्रिकरण खास आहे. एकनएक फ्रेम लक्षात राहील असे ! सैराट झालं जी मध्ये कवायतीच्या शॉटनंतर येणारे म्युझिक आणि त्याबरोबर सूर्यास्ताच्या वेळेस त्या दोघांचा घेतलेला एरियल शॉट त्या गाण्याचा हायपॉईंट आहे एकदम !
सध्या ही गाणी परत परत ऐकायला आवडत आहेत, काही काळानंतर ती ऐकणे कमी होईल, मग पूर्ण बंद होईल. पण अनेक वर्षांनंतरही जेव्हा ही गाणी अधूनमधून परत ऐकली जातील तेव्हा ही गाणी एकाच वेळी वेदनेची तार हलकेच छेडतील आणि मनावर फुंकरही घालतील हे निश्चित. इतर अनेक अविस्मरणीय, क्लासिक गाण्यांप्रमाणेच !
फा, ते गाणं आताच बया का
फा, ते गाणं आताच बया का बावरलं
जे सध्या माझ्या आयपॉडवर वाजतंय! श्रेया अफलातून गायली आहे सर्व उच्चार अचूक!
परश्याच्या स्वप्नात आर्ची जो ड्रेस घालून येते तो परश्या झोपतो त्या जवळच्या भिंतीवर लावलेल्या पोस्टरमध्ये आलिया ने घातलेला आहे!
प्रकाटआ
प्रकाटआ
किती मस्त लिहिलंय
किती मस्त लिहिलंय सगळ्यांनी.
मला आवडलेले डायलॉग्स/शॉट्स/सीन्सः
१. लंगड्या ओरडून सांगत असतो पर्शाला त्यातले फक्त आर्ची आली विहिरीवर एवढे ऐकू येते
आणि तो पाण्यात सूर मारताना जे काही म्युजिक वाजतेय मागे अहाहा जीव होऊन गेला.
२. बास कर की लेका मान मोडेल.
३: मी कुठं म्हटलं मला आवडत नाही . (एकदम ट्वीस्ट्च)
४. सारखं ज्येवला का? ज्येवला का?
५. सल्याचे नातेवाईक समजावतात त्यानंतर आर्ची परशा बाहेर पडतात मग एकेक करत परत सगळे एकत्र येतात.
६. आर्चीची हळवी बाजूपण आवडली. नानाला हात बराय का विचारणं, आईला तात्या बोलतील का माझ्याशी विचारणं इ.
दुखनं हे देखनं गं एकलंच हाय साथीला' ह्यासारख्या ओळी ऐकताना जितकं शांत वाटतं तितकंच कारुण्यही जाणवतं.>>>>>>> दिलकी बात!!!!!!!
सध्या फोनवरून एवढेच टाईपते. बाकीचे नंतर
https://m.youtube.com/watch?v
https://m.youtube.com/watch?v=elGrGhGa-kY
डिटेलिंग बद्दल म्हणाल तर खरेच
डिटेलिंग बद्दल म्हणाल तर खरेच फार छोट्या छोट्या गोष्टींवर मेहनत घेतली आहे.
ती चेन्नई एक्सप्रेस म्हणते त्याआधी लंगड्या साबण लावत असतो तेव्हा शेजारी वाहते पाणी दाखवलेय, मेबी पंप असावा. नायतर एवढा फेस कसा होईल साबणाचा असे उगाच वाटत राहते. पण दुसर्यांदा पाहीला मुव्ही तेव्हा जाणवले.
आज तिसर्यांदा पाहून झाला. आता परत नाही बघणे होणार कदाचीत पण गाणी बघितली जातील.
अजुन एक असे होतेय कि झिंगाटची नशा उतरत गेलीये पण बाकी गाणी जास्तच आवडू लागलीत आणी तिही नुसती ऐकण्यापेक्षा बघायला भारी वाटतात.
चारही गाणी मस्त क्रमाने कथानक फुलवत जातात. एक त्याचे, एक तिचे, एक दोघांचे, आणी एक तर सगळ्यांचे... अगदी पब्लीकचेही.
सदर लेखकाची पार्श्वभुमी
सदर लेखकाची पार्श्वभुमी ग्रामीण जगण्याच्या किती जवळ आहे माहित नाही. पण आमच्यासारख्या गावठी लोकांना पुर्वार्धातील प्रसंगही वास्तव आणि बारकाव्यासहीत टीपल्याचे वाटले. बॉडीत मुंग्या येतील अशी सॉन्ग आहेत. मुलामा नसलेला आणि समाजात अपवाद म्हणून घडणारा शेवट आहे.
हसवतो. नाचवतो. विचारही करायला लावतो.
देवारक्ताशप्पत सांगतो.... पिक्चर काळ्या चिमणीची राक टाकल्यागत बगतय माणूस....
लोकहो तुम्हाला आवडलेल्या
लोकहो तुम्हाला आवडलेल्या प्रसंगाची नवीन धागा काढुन चर्चा तिथे चर्चा करा . ' सैराट' मला आवडलेले प्रसंग' , बरेचशे बारकावे , जसं की फा म्हणाला ' फेरारीचा झेंडा' , उदय८२ ने सांगितलेलं याड लागलं गाण्याचे वेगवेगळं म्युझिक असे खुप सारे बारकावे आहेत.
मस्त , बारीक सारीक डिटेल्स
मस्त , बारीक सारीक डिटेल्स बद्दल प्रतिसाद वाचायलाही मजा येतेय !
तो फिशिंग करून आलेला असतो मग
तो फिशिंग करून आलेला असतो मग अंगाला वास येत असेल म्हणून घरी जाऊन स्वच्छ अं घोळ करून
मग जाउन पाण्यात पडतो. हुषार ग बै पोर.
<<
अमा,
दॅट्स इंटरेस्टींग !
मी विचार करत होते हा तडक विहिरीत न जाता घरी आंघोळीला का गेला :).
बाळ्या जेव्हा अरबाजच्या
बाळ्या जेव्हा अरबाजच्या दुकानावर बसलेला असतो.मागे रेडिओवर मोदिंजींच मन की बात चाललेल असत.भारी सीन आहे तो
फोटोग्राफीतलं फारसं कळत नाही
फोटोग्राफीतलं फारसं कळत नाही पण नेत्रसुखद वाटते. मध्यंतरानंतर पहिल्या हाफमधला हिरवा रंग गायबच होतो. याला छायालेखन म्हणत असावेत असा अंदाज केला. ठरवून करत असतील का ?
कुणी जाणकाराने कॅमेरामन सुधाकर रेड्डी यांच्याबद्दल आणि त्यांच्या कॅमे-याबद्दल लिहावं अशी फारा दिवसांची चार आठवड्यापासूनची इच्छा आहे. रवीशकुमार ने लिहीलंय, पण त्याने मन भरलं नाही.
दुबार पोस्ट.
दुबार पोस्ट.
चित्रपट थिएटर ला बघता येणार
चित्रपट थिएटर ला बघता येणार नाही.(सध्या फक्त विनोदी आणि लहान मूल फ्रेंडली चित्रपटच थेटर ला बघतो.)
पण युट्यूब वर काही सीन काटलेले असा पाहिला.गाणी तर सुंदरच आहेत.
वेडं(सर्व स्पेक्स मध्ये बसून लग्नात कन्व्हर्ट होऊ शकायला अडचणी येतील असं) प्रेम करुन ते हिंमतीने निभावणारे नायक नायिका आहेत.आणि आर्ची चं पात्र तर खूप सुंदर रंगवलंय.मुली बरेचदा खूप माईंड गेम्स खेळतात.मुलगा आवडला हे मुलाला बर्यापैकी जेरीस आणल्याशिवाय कबूल करत नाहीत.बरेचदा नॉन कमिटल ('तू तसा मला फ्रेंड म्हणून आवडतोस') नातं ठेवण्यात सुरक्षितता मानतात.पण आर्ची ला आपल्या आवडीवर प्रचंड कॉन्फिडन्स आहे.
नायक नायिका दोघं छान फ्रेश वाटतात.गाणी सुंदरच.सैराट हे जीव रंगला दंगला नेक्स्ट व्हर्जन वाटतं.शेवट आधी पाहिला.शेवट ज्याला माहित असेल त्याला आधीची गाणी, रोमान्स, ताजं ताजं लाजरं प्रेम बघून गळ्याशी खूप दाटल्यासारखं होतं.असं वेडं प्रेम दोघांनी करु नये असं शेवट पर्यंत वाटत राहतं.मीच त्यांना मनात 'अजून वेळ आहे, बॅक ऑफ,परत फिरा' वाले सल्ले सारखे देत बसले होते.
सुंदर चित्रपट आहे.हा बर्लिनेल मध्ये दाखवला तिथे परदेशी लोकांच्या काही प्रतीक्रिया असतील तर वाचायला आवडतील.
रवीशकुमार ने लिहीलंय>>>
रवीशकुमार ने लिहीलंय>>> कुट्टं? लिंक द्या.
Pages