सैराट ही एक लव्हस्टोरी आहे. हे आतापर्यंत सर्वांनाच माहित झालं असेल. पिस्तुल्या, फॅंड्रीसारखे वेगळे विषय हाताळणार्या नागराजकडून जेव्हा “लव्हस्टोरी”सादर केली जाते तेव्हा ती केवळ गोडगोडुली प्रेमकथा नसते तर वास्तवाचा पक्का पाया घेऊन उभी राहणारी एक सशक्त पटकथा असते. मराठी चित्रपटांच्या इतिहासामध्ये सैराट हा एक मानाचे स्थान पटकावून बसणार आहे हे आता निश्चितच.
बर्लिन सारख्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये प्रीमीअर असो, वा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये रिंकू राजगुरुला मिळालेले “स्पेशल मेनशन एवॉर्ड” यामुळे सैराटबद्दल आधीच फार उत्सुकता होती. त्यातही झी मराठीने केलेल्या कल्पक मार्केटिंग आणि प्रसिद्धीमुळे सिनेमाबद्दल रीलीजच्या आधीच वलय तयार झालं होतं. अशा “हाईप” केलेल्या सिनेमांना अपेक्षाभंगाचा फार मॊठा धोका असतो, सुदैवाने सैराट सर्व अपेक्षांना पुरून उरतो आणि एक कंप्ल्लीट एंटरटेनमेंट पॅकेज बनतो.
आर्ची आणि परश्या, एका गावामधले अठराएकोणीस वयोगटामधले दोघं. ती मोठ्या पाटलाच्या घरची. तो गरीबाघरचा, खालच्या जातीमधला. त्याला ती आधीपासून आवडते, मग तिलाही तो आवडू लागतो. दोघं प्रेमात पडतात आणि मग हलकल्लोळ उठतो. मध्यंतरापर्यंत हा सिनेमा अक्षरश: भणभणत राहतो. फेअरीटेल रोमान्स भासावा अशी प्रेमकहाणी पडद्यावर दिसत राहते. या प्रेमकहाणीचा अंत पुढे काय होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही पण तरीही त्या अंतापर्यंत पोचेस्तोवर सैराट आर्ची-परश्याच्या नात्याचे अनेक पदर उलगडून दाखवत राहतो. सिनेमा जिथे संपायचा आहे तिथे संपतो, पण संपल्यानंतर खर्या अर्थाने “आर्ची-परश्याची” प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या मनामध्ये सुरू राहते.
सोशल नेटवर्कवर “जातीव्यवस्थेवर भीषण भाष्य करणारा सिनेमा” वगैरे बिरूदं याला प्राप्त झाली आहेत. मी त्याच्याशी फारशी सहमत नाही. हा सिनेमा जातीव्यवस्थेवर आधारित नाही, जातीव्यवस्थेच्या नादाला लागून समाजाला पोखरणार्या काही किड्यांबद्दलही हा सिनेमा बोलत नाही. हा सिनेमा बोलतो ते जातीच्या पायी कसला तरी वृथा अहंकार बाळगून गमावलेल्या काही आयुष्यांबद्दल. नागराज एकदाही- एकदाही या दोघांची “जात” सांगत नाही. त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीमधला फरक तो अतिशय हुशारीने दाखवत जातो. बाल्कनीमध्ये नाचणारी आर्ची आणि त्या गाण्याच्या ओळी केवळ तिच्याचसाठी आहेत अशा धुंदीत खाली जमीनीवर नाचणारा परश्या, झाडावर चढताना “अजून वर गेलो तर फांदी मोडेल” म्हणणारा परश्या, कॉलेजात “शब्दांच्या जाती” शिकवणारे प्रोफेसर, मगामधलं पाणी गटागट पिणारा परश्या पण तेच पानी एकही घोट न घेणारी आर्ची अशा अनेक रूपकांमधून मंजुळे कथा दाखवत राहतो. खरंतर हा सिनेमा “बघायची” गोष्ट आहे. सैराटमध्ये सर्वात जास्त सैराट काय चाललं असेल तर ते कॅमेरावर्क. करमाळ्यासारख्या एरवी रूक्ष वाटणार्या ठिकाणी काय अजबगजब शॉट्स घेतलेत!! मी आजवर इतके सिनेमा थेटरात पाहिले पण पक्ष्यांच्या उडत्या थव्या्सारख्या अशक्य सुंदर शॉटला मारलेल्या उत्स्फ़ुर्त टाळ्या-शिट्या पहिल्यांदाच पा्हिल्यात.
कॅमेरावर्कखालोखाल कौतुक आहे ते रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या दोन नवकलाकारांचं. दोघंही इतके नवखे असूनही अप्रतिम अभिनय करतात, किंबहुना ते अभिनय करतात असं वाटतच नाही इतके सच्चे वाटतात. रिंकूच्या वाटयाला आलेली भूमिका ही जास्त जटिल आहे, लाडावलेली मुलगी ते एक जबाबदार व्यक्ती हा भलामोठा पल्ला तिच्या भूमिकेमध्ये ती फारच सशक्त रीत्या दाखवते. तिच्या कॉस्च्युममधला सूक्ष्म पण जाणवणारा बदल पाहता तिच्या भूमिकेसाठी एकंदरीत टीमनेच किती मेहनत घेतली आहे ते समजतं. आकाश ठोसरने खूप समजूतदारपणे काम केलेलं आहे, रिंकूसमोर तो जरा फिका पडला तरी त्याचे काही खास प्रसंग आहेत ज्यात तो खूप उठून दिसतो. खासकरून ती निघून गेल्यावर गळ्याभोवती फास घेऊन रडतानाचा प्रसंग. हो! हा एक स्टीरीओटाईप मंजुळेंनी मोडला आहे, हीरो रडतो चांगला हुंदके देऊन देऊन रडतो. शिवाय, हीरो मार खाताना हीरॉइन येऊन त्याला वाचवते.
सिनेमाचा अजून एक प्लस पॉइण्ट म्हणजे त्याचे संवाद. पूर्ण मराठवाडी शैलीमध्ये असणारे संवाद कुठूनही कृत्रिम वाटत नाहीत. उलट, ल्येका, यती, करती सारखे अस्सल शब्दप्रयोग योग्य ठिकाणी वापरून मजा येत राहते. सल्याच्या घरच्यांशी बोलतानाचा मराठी-हिंदी ठेका तर महान जमलाय. आर्चीच्या वडलांची स्टेजवरून भाषण करायची पद्धत आणि घरी आलेल्या प्राचार्याशी बोलायची पद्धत यातून सिनेमाबद्दल बरंच काही समजत राहतं. छोट्यातली छॊटीपात्रंदेखील आपला पूर्ण ठसा उमटवून जातात.
अजय अतुलच्या संगीताबद्दल बरंच बोलून झालंय, म्हणून आता इतकंच म्हणेन की सिनेमामध्ये असलेली चारही गाणी अतिशय चपखल आहेत आणि कूठेही खटकत नाहीत. याड लागलंचं पिक्चरायझेशन गाण्याइतकंच अप्रतिम आहे.
या सिनेमाचा टेम्प्लेट थोडासा तमिळ सिनेमांसारखा आहे, बहुतेक तमिळ लव्हस्टोरी अशाच असतात. सिनेमाच्या पहिल्या भागावर तर मणीरत्नमची छाप जाणवत राहते. नदीमधली दृश्यं, ऊसाच्या शेतामधले काही शॉट्स, मित्राच्या प्रेमकहाणीसाठी मार खाणारे दोस्तलोक्स, गाण्यांमधून पुढे जाणारी लव्ह्स्टोरी. गावाच्या राजकीय उतरंडीचे दर्शन घडवणारी दृश्यं असोत वा खेड्यांचं अस्सल आधुनिक वर्णन करणारे प्रसंग असोत दाक्षिणात्य सिनेमा अधूनमधून झळकत राहतात. तरीही मंजुळेंची प्रेमकथा मराठी मातीशी शंभर टक्के इमान राखून आहे. फेसबूकवर शोधाशोध करणारे टीनेजर हीरो आणि कॉलेजात शेतात फिरायला ट्रॅक्टर आणि बुलेट चालवणारी नायिका असो, ही प्रेमकथा फार गोजिरी वाटत राहते. अर्थात सर्व काही आलबेल नसतंच. प्रेमकहाणीमध्ये यायचे ते खलनायक एम्ट्री करतातच आणि करायचा तो राडा करतातच. यादरम्यान, घरातून पळून जाणारे नायक-नायिका पाहताना खरोखर ताण येऊ लागतो. आता या प्रेमकथेचा दुर्दैवी अंत होणार, आता.. आता की आता… असं म्हणत म्हणत मध्यंतर येतो आणि प्रेक्षक म्हणून मी सुटकेचा श्वास टाकला. सिनेमाच्या दुसर्या भागात ही प्रेमकहाणी गावामधून बाहेर येते, एका अनोळखी शहरामध्ये हे दोन प्रेमी जीव “आशियाना” बनवतात आणि सुखानं संसार करू लागतात… पण सर्व काही आलबेल होतच नाही आणि सिनेमा संपता संपता मीच सुन्न होऊन जाते.
फॅंड्रीमध्ये जब्यानं कॅमेराला भिरकावलेला दगड हा त्या सिनेमाचा हायपॉइंट होता, सैराटचा शेवटचा शॉटही तसाच हायपॉइंट आहे, त्याबद्दल मला बरंच काही लिहायचं आहे, पण सध्या सिनेमा थेटरामध्ये असेपर्यंत मी त्यावर लिहिणार नाही. केवळ इतक्ंच सांगेन, की इतर सिनेमा जेव्हा संपतात तेव्हा त्यांची कहाणी संपते, पण सैराटची कहाणी मात्र प्रेक्षकांच्या डोक्यामध्ये भिरभिरतच राहते. जब्याचा तो दगड तेव्हाही सरळ येऊन घप्पकन बसला होता, याहीवेळी तसाच बसतो.
बाकी गाण्यांपैकी मला एकही
बाकी गाण्यांपैकी मला एकही अपिल झालं नाही हा कदाचित माबुदो असावा.>> Yes I agree. There is nothing new in Ajay-Atul. They are spent force.
महेशने पिंजरा बघीतला होता का?
महेशने पिंजरा बघीतला होता का? असेल तर वयाच्या कुठल्या वर्षी. महेशराव एकंदरीत तुम्ही सध्या गंडलेले आहात व विरोधासाठी विरोध करत आहात. कृपया आत्मपरीक्षण करा.
महेश, चित्रपट पाहिला आहे का?
महेश, चित्रपट पाहिला आहे का? चित्रपट पाहिल्याशिवाय चित्रपटाबद्दल मत मांडणे याला काहीच अर्थ नाही.
महेश, चित्रपट पाहिला आहे का?
महेश, चित्रपट पाहिला आहे का? चित्रपट पाहिल्याशिवाय चित्रपटाबद्दल मत मांडणे याला काहीच अर्थ नाही.
निव्वळ एक चांगली कथा म्हणून
निव्वळ एक चांगली कथा म्हणून सैराट पाहावा म्हटला, तरी मनात नकळत कोठे न कोठे तुलना होतेच. साधारण अशाच प्रत्यक्षात पाहिलेली व ऐकलेली लफडी आठवतात, प्रत्येकाचा चांगला वाईट शेवट आठवतो, अन मग नकळत तोच चष्मा डोळ्यांवर आपसूक येतो. प्रत्येकाच्या मनाला भिडेल असे सादरीकरण , ही मंजुळेंची जादूच म्हणायला हवी.
बाकी इतर असे कितीतरी रद्दड, टिपिकल बॉलीवूडी सिनेमे आहेत, जे पाहायला चष्मा सोडा, डोळे सुद्धा लागणार नाहीत.
नंदिनी आता वाचला प्रतिसाद.
नंदिनी
आता वाचला प्रतिसाद. सिनेमा पाहील्यानंतर बोलू. खरंय हे. अपेक्षा वाढल्याने निराशा होऊ नये अशी इच्छा आहे.
मास्तर बिघडतील म्हणुन
मास्तर बिघडतील म्हणुन "पिंजरा"ला विरोध का केला नाही........>>>
धाग्याची मनोरंजन वॅल्यु भारी आहे.
मी कधीची आठवतेय की आम्ही म्हणजे मी आणि माझ्या नवर्याने कोणता बरे पिच्चर पाहिला होता तेव्हा?
सैराट् वर प्रतीसाद बुंगाट आले
सैराट् वर प्रतीसाद बुंगाट आले आणी वाद झिंगाट झाले.
रश्मी काल फेसबुक वर मी एक
रश्मी
काल फेसबुक वर मी एक पोस्ट वाचली. झी ने स्वतःच काही लोकांना हाताशी धरून वाद उकरून काढला आणि स्वतःची प्रसिद्धी करून घेतली. अंतस्थ हेतू बहुतेक हाच असावा. खखोझीजा.
संतुलितपणाचा बुरखा टरकवला
संतुलितपणाचा बुरखा टरकवला गेला महेश्रावांचा.
सनव, प्रामाणिकपणाबद्दल १०गुण तुम्हाला
ती बालिकावधू नामक मध्ययुगीन
ती बालिकावधू नामक मध्ययुगीन मानसिकतेची मालिका दाखवत टीव्ही वर तेव्हा नाही तो कुणी इथे, आणखी कुठे प्रतिवाद केला ते.... तेव्हा नाही वाटलं की इतक्या गुंगून जाऊन पहाणारे प्रेक्षक हे समाजासाठी धोकादायक आहे म्हणून.. आणि आता फक्त सैराट ने नीतीमूल्य वगैरे धोक्यात येणारेत का काय? +१११११
आणि सिनेमे पाहून लोक बदलतात हा तर मोठा विनोदच आहे
'प्रकाश बाबा आमटे ' सिनेमा पाहून किती जण समाजसेवक झाले ?+११११११११११११११११११११११११११११११११११
चित्रपटाची कथा, लहान वयातलं प्रेमप्रकरण, उच्चनीचता आणि गाणी यापेक्षाही मंजुळे आणि फक्त मंजुळेंच्या दिग्दर्शनासाठी पुन्हापुन्हा पहावा असा सिनेमा आहे.+१११११११
नंदिनी छान लिहिले आहेस,
नंदिनी छान लिहिले आहेस, सिनेमा बघायचा आहे म्हणून लेख पुर्ण वाचला नाही.
इकडे तावातावाने मते मांडणार्या किती पालकांनी आपल्या मुलांना ' श्याम ची आई' दाखवला हे अगोदर सांगा.
मी बहुधा सगळी चर्चा मिस्स
मी बहुधा सगळी चर्चा मिस्स करेन.
सगळ्यांनी चित्रपट पाहिला असता तर मला पण आज पोस्टी टाकता आल्या असत्या.एकच सांगते,, फर्स्ट हाफ प्रचंड हसवणारा,एंटरटेंनिंग्,आनि सेंकड तेवढाच गंभीर्,विचार करायला लावणारा आहे.शेवट आठवला तरी अंगावर काटा येतोय्,,सैराट ची झिंग अजुन उतरली नाहीये.
आशुचॅम्प,वरदा,घारुअण्णा,विलभ पोस्टी आवडल्या
सैराट बघायला मिळायला अजून १०
सैराट बघायला मिळायला अजून १० दिवस आहेत. पण सैराटचं संगीत ऑलरेडी रीपिट मोडवर सतत चालू आहे. एस्पेशियली "सैराट झालं जी"!!! भव्य ऑर्केस्ट्रा आणि त्यातून वाट काढून मनाला भिडणारे सुंदर आवाज!
मी येथे प्रतिसाद लिहिणार नाही
मी येथे प्रतिसाद लिहिणार नाही हे सांगून देखील माझ्या नावाने अनेक प्रतिसाद येत आहेत. म्हणुन उत्तरादाखल लिहित आहे.
>>महेशने पिंजरा बघीतला होता का? असेल तर वयाच्या कुठल्या वर्षी.
माध्यमिक शाळेत असताना पाहिला होता, तेव्हाही तो आवडला नव्हता. एखादा तत्वाने चालणारा माणूस एवढा वेड्यासारखा वाया जाऊ नये हे माझे प्रामाणिक मत. अशी माणसे त्यापेक्षा मरण पत्करू शकतात.
>>महेशराव एकंदरीत तुम्ही सध्या गंडलेले आहात व विरोधासाठी विरोध करत आहात.
निषेध. हा वैयक्तिक हल्ला आहे. मी हे अशा प्रकारचे कोणाबद्दल लिहित नाही (अपवाद अगदीच वैयक्तिक हल्ले चालू असतील तर). हे विधान मागे घेण्यात यावे ही विनंती.
>>कृपया आत्मपरीक्षण करा.
हे ठीक आहे. आणि तसेही या सल्ल्याची गरज सर्वांनाच आहे.
@ नंदिनी : रिपोर्ट्सवरून अंदाज येतोच, पण अॅग्री. म्हणूनच मी प्रतिसाद लिहिणे बंद केले होते.
सर्वांना विनंती आहे की कृपया कोणीही कोणावरही वैयक्तिक हल्ले करू नये. मते पटत नसली तरी भाषा संयमित ठेवून चर्चा करता येऊ शकते.
well said nandinee.... सैराट
well said nandinee....
सैराट पाहिला........
शेवट फ़ार फ़ार अस्वस्थ करुन गेला...
पुर्वार्ध उत्तम क्यामेरा वर्क साठी भावला..गती सन्थ वाट्ते...गाणी ओ.के... रिन्कु आणि आकाश चा अभिनय आश्वासक आहे...रिन्कुच .बेअरीन्ग पाहुन मलयालम 'परिणयम' मधली मोहिनि आठवली....
पण शेवट मात्र काळजात एक आर्त वेदना ठेऊन गेला...
आपण जो चित्रपट पाहिला, तो काही लोक जगले आहेत...वेदना सोबत घेऊन किवा वेदना मागे ठेऊन....
वाईट वाट्ले.....शेवट फ़ार फ़ार अस्वस्थ करुन गेला...!!
सैरा॑टची मुळ प्रिंट लिक झाली
सैरा॑टची मुळ प्रिंट लिक झाली आहे
इथे सगळ्यांच्या मोबल्यामध्ये आहे सैराट :रागः
पहिल्याच आठवड्यात पिक्चर व्हायरल झाला त्यामुळे खुप वाईट वाटतयं नागराजसाठी. खुप आर्थिक नुकसान सोसावे लागेल.
हो सैराट लीक झालाय. ऑफिसमधली
हो सैराट लीक झालाय.
ऑफिसमधली एक मैत्रीण म्हणाली की हवाय का सैराट.
मी म्हणालो नको येत्या चार दिवसांत थिएटरला बघेन.
आणि मग दमही दिला की कोणाला देऊ नकोस.
चार लोकांना पटवलेही वर्षातून मोजके दोनचार चित्रपट थिएटरात जाऊन बघण्यासारखे येतात, त्यातही हा मराठी, तर चुकवू नका. थिएटरला लोकं खुर्च्यांवर उभे राहून नाचतात वगैरेच्या गप्पाही सुरू केल्या. खरे चित्रपटप्रेमी थिएटरातच बघतील असे वाटते..
सैरा॑टची मुळ प्रिंट लिक झाली
सैरा॑टची मुळ प्रिंट लिक झाली आहे --- अर्रर्र हे वाईट झालं की..
पण मराठी पिक्चरची पण प्रिंट हिंदी सारखी लिक झाली म्हणुन हायसं वाटूच घ्यायचं की.. एका चांगल्या मराठी पिक्चरचा इनकम बुडणार म्हणून दु:ख करायचं हे कळत नाहीये अजून...
सैरा॑टची मुळ प्रिंट लिक झाली
सैरा॑टची मुळ प्रिंट लिक झाली आहे -->>>>> याची जबाबदारी निर्मात्याची असते ना? माहीत नाही म्हणून विचारलेय. सुभाष याबाबत खूप दक्ष असतात असे वाचलेय.
ऋण्मेष, सत्यवचन . इतका चांगला
ऋण्मेष, सत्यवचन . इतका चांगला चित्रपट सर्वांसोबत बघातानाचा अनुभव एकट्याने मोबाईलवर पाहून मुळीच यायचा नाही. ठराविक दृष्यांपाठोपाट सगळ्या थिएटेरमध्ये जी भावनांची लाट येते, ती एकट्याने पाहून कधीच येत नाही.
दुनियादारी एकट्याने पाहताना काहीच वाटलं नाही, पण मित्रांबरोबर पहिला आणि डोळे नकळत ओले झाले .
अशा लीकमुळे सैराटची लोकप्रियता कदाचित वाढेलच, अन ज्यांना सैराटस्पर्श झालेला नाही, तेसुद्धा चित्रपट पाहण्यास येतील.
http://www.loksatta.com/manor
http://www.loksatta.com/manoranjan-news/bollywood-version-of-zingat-song... हे भारीये!
तसे असेल तर खरच वाईट झालय. बर्याच दिवसानी एक उत्तम सिनेमा आलाय, तर लोकाना ते पण रुचत नाही. स्वत मेहेनत करायची नाही, फुकटात हवे.:राग:
अशा लीकमुळे सैराटची
अशा लीकमुळे सैराटची लोकप्रियता कदाचित वाढेलच, अन ज्यांना सैराटस्पर्श झालेला नाही, तेसुद्धा चित्रपट पाहण्यास येतील. >> आमिन.___/\___ असे झाले तर सोन्याहुनही पिवळं पण माझ्या माहितीतले दोघेतिघे आहेत जे येत्या रविवारी सैराट बघायला जाणार होते ते आता मोबाईलमध्ये असल्यामुळे थेटरला नाही जाणार.

आताच एका मैत्रिणीला समजावले असता तिने चित्रपट फोरवर्ड न घेता सिनेमागृहात जाऊन पाहण्याचा निर्णय घेतला आहे.
मी आज संध्याकाळच्या शोला
मी आज संध्याकाळच्या शोला जाणार आहे. आम्हाला कशीबशी तिकिटं मिळाली तीपण पुढची रो आहे. त्यामुळे या पायरसीचा परिणाम अजूनतरी झालेला नाहीये. सगळीकडे आजही जवळपास हाऊसफुल आहे.
जाऊ दे आता पुढची रो तर पुढची रो..बघून टाकणार.
अरेरे , केवळ काही फुकट्या
अरेरे , केवळ काही फुकट्या लोकांमुळे एका चांगल्या चित्रपटाच्या उत्पन्नास गालबोट लागेल. आपणच असे करायचे आणि वर मराठी चित्रपटसृष्टी बुडते अशा बोंबा मारायच्या
>>महेशने पिंजरा बघीतला होता
>>महेशने पिंजरा बघीतला होता का? असेल तर वयाच्या कुठल्या वर्षी.
माध्यमिक शाळेत असताना पाहिला होता, >> कसा काय? तुझ्या बालमनावर भलतेच संस्कार झाले की मग नको त्या वयात.
>>महेशराव एकंदरीत तुम्ही सध्या गंडलेले आहात व विरोधासाठी विरोध करत आहात.
निषेध. हा वैयक्तिक हल्ला आहे. हे विधान मागे घेण्यात यावे ही विनंती.>> माफ कर. वैयक्तिक काही नाही पण सिनेमा न बघताही उगाच त्यावर ताशेरे मारत आहेस. मुद्दा नीट समजुन घे. कॉलेजवयीन प्रेमप्रकरणे दाखवल्यामुळे संस्कृती बुडाली असे तुला वाटते काय? तसे तुझ्या या आधीच्या सर्व पोस्टवरुन दिसत आहे. तसे वाटत असेल तर मला वाटते खरच नीट विचार करुन आपण जो विरोध करतोय त्याला काही अर्थ आहे का? त्या करताच ते वरचे वाक्य आहे. तुला खरच हा वैयक्तिक हल्ला वगैरे वाटत असेल तर मला माफच कर. बाकी फोनवर बोलुच. त्यातुनही तुला पटले नाहीच तर सोडुन देईन मी हा विषय.
This is ultimate joke on
This is ultimate joke on whatsapp (#सैराट )
डाॅक्टर मुलीला ः प्रेग्नंट कशी झालीस ?
मुलगी : आईवडिल पिक्चर पाहायला गेले आणि bf घरी आला
डाॅक्टर : तुला एकटीला ठेऊन कसे गेले ?
मुलगी : सैराट पाहायला गेले होते , माझ्यावर वाईट संस्कार होतील म्हणून घरीच ठेवलं
कृपया इथे चित्रपटाबद्दलच
कृपया इथे चित्रपटाबद्दलच बोला. अवांतर गप्पा नकोत.
हो सैराटची प्रिंट लिक झाली
हो सैराटची प्रिंट लिक झाली आहे. आत्ताच ऑफिसमधल्या एका कलीगच्या मोबाईल मध्ये सैराट मुव्ही आहे असं कळल.
http://www.loksatta.com/manor
http://www.loksatta.com/manoranjan-news/bollywood-version-of-zingat-song... हे भारीये! <<<<
हो रश्मी ताई सकाळीच पहिला हा व्हिडीओ……. धम्माल आहे. मानल पाहिजे त्या व्हिडीओच्या एडिटरला. कसला क्लास व्हिडीओ बनवलाय.
Pages