सैराट ही एक लव्हस्टोरी आहे. हे आतापर्यंत सर्वांनाच माहित झालं असेल. पिस्तुल्या, फॅंड्रीसारखे वेगळे विषय हाताळणार्या नागराजकडून जेव्हा “लव्हस्टोरी”सादर केली जाते तेव्हा ती केवळ गोडगोडुली प्रेमकथा नसते तर वास्तवाचा पक्का पाया घेऊन उभी राहणारी एक सशक्त पटकथा असते. मराठी चित्रपटांच्या इतिहासामध्ये सैराट हा एक मानाचे स्थान पटकावून बसणार आहे हे आता निश्चितच.
बर्लिन सारख्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये प्रीमीअर असो, वा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये रिंकू राजगुरुला मिळालेले “स्पेशल मेनशन एवॉर्ड” यामुळे सैराटबद्दल आधीच फार उत्सुकता होती. त्यातही झी मराठीने केलेल्या कल्पक मार्केटिंग आणि प्रसिद्धीमुळे सिनेमाबद्दल रीलीजच्या आधीच वलय तयार झालं होतं. अशा “हाईप” केलेल्या सिनेमांना अपेक्षाभंगाचा फार मॊठा धोका असतो, सुदैवाने सैराट सर्व अपेक्षांना पुरून उरतो आणि एक कंप्ल्लीट एंटरटेनमेंट पॅकेज बनतो.
आर्ची आणि परश्या, एका गावामधले अठराएकोणीस वयोगटामधले दोघं. ती मोठ्या पाटलाच्या घरची. तो गरीबाघरचा, खालच्या जातीमधला. त्याला ती आधीपासून आवडते, मग तिलाही तो आवडू लागतो. दोघं प्रेमात पडतात आणि मग हलकल्लोळ उठतो. मध्यंतरापर्यंत हा सिनेमा अक्षरश: भणभणत राहतो. फेअरीटेल रोमान्स भासावा अशी प्रेमकहाणी पडद्यावर दिसत राहते. या प्रेमकहाणीचा अंत पुढे काय होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही पण तरीही त्या अंतापर्यंत पोचेस्तोवर सैराट आर्ची-परश्याच्या नात्याचे अनेक पदर उलगडून दाखवत राहतो. सिनेमा जिथे संपायचा आहे तिथे संपतो, पण संपल्यानंतर खर्या अर्थाने “आर्ची-परश्याची” प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या मनामध्ये सुरू राहते.
सोशल नेटवर्कवर “जातीव्यवस्थेवर भीषण भाष्य करणारा सिनेमा” वगैरे बिरूदं याला प्राप्त झाली आहेत. मी त्याच्याशी फारशी सहमत नाही. हा सिनेमा जातीव्यवस्थेवर आधारित नाही, जातीव्यवस्थेच्या नादाला लागून समाजाला पोखरणार्या काही किड्यांबद्दलही हा सिनेमा बोलत नाही. हा सिनेमा बोलतो ते जातीच्या पायी कसला तरी वृथा अहंकार बाळगून गमावलेल्या काही आयुष्यांबद्दल. नागराज एकदाही- एकदाही या दोघांची “जात” सांगत नाही. त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीमधला फरक तो अतिशय हुशारीने दाखवत जातो. बाल्कनीमध्ये नाचणारी आर्ची आणि त्या गाण्याच्या ओळी केवळ तिच्याचसाठी आहेत अशा धुंदीत खाली जमीनीवर नाचणारा परश्या, झाडावर चढताना “अजून वर गेलो तर फांदी मोडेल” म्हणणारा परश्या, कॉलेजात “शब्दांच्या जाती” शिकवणारे प्रोफेसर, मगामधलं पाणी गटागट पिणारा परश्या पण तेच पानी एकही घोट न घेणारी आर्ची अशा अनेक रूपकांमधून मंजुळे कथा दाखवत राहतो. खरंतर हा सिनेमा “बघायची” गोष्ट आहे. सैराटमध्ये सर्वात जास्त सैराट काय चाललं असेल तर ते कॅमेरावर्क. करमाळ्यासारख्या एरवी रूक्ष वाटणार्या ठिकाणी काय अजबगजब शॉट्स घेतलेत!! मी आजवर इतके सिनेमा थेटरात पाहिले पण पक्ष्यांच्या उडत्या थव्या्सारख्या अशक्य सुंदर शॉटला मारलेल्या उत्स्फ़ुर्त टाळ्या-शिट्या पहिल्यांदाच पा्हिल्यात.
कॅमेरावर्कखालोखाल कौतुक आहे ते रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या दोन नवकलाकारांचं. दोघंही इतके नवखे असूनही अप्रतिम अभिनय करतात, किंबहुना ते अभिनय करतात असं वाटतच नाही इतके सच्चे वाटतात. रिंकूच्या वाटयाला आलेली भूमिका ही जास्त जटिल आहे, लाडावलेली मुलगी ते एक जबाबदार व्यक्ती हा भलामोठा पल्ला तिच्या भूमिकेमध्ये ती फारच सशक्त रीत्या दाखवते. तिच्या कॉस्च्युममधला सूक्ष्म पण जाणवणारा बदल पाहता तिच्या भूमिकेसाठी एकंदरीत टीमनेच किती मेहनत घेतली आहे ते समजतं. आकाश ठोसरने खूप समजूतदारपणे काम केलेलं आहे, रिंकूसमोर तो जरा फिका पडला तरी त्याचे काही खास प्रसंग आहेत ज्यात तो खूप उठून दिसतो. खासकरून ती निघून गेल्यावर गळ्याभोवती फास घेऊन रडतानाचा प्रसंग. हो! हा एक स्टीरीओटाईप मंजुळेंनी मोडला आहे, हीरो रडतो चांगला हुंदके देऊन देऊन रडतो. शिवाय, हीरो मार खाताना हीरॉइन येऊन त्याला वाचवते.
सिनेमाचा अजून एक प्लस पॉइण्ट म्हणजे त्याचे संवाद. पूर्ण मराठवाडी शैलीमध्ये असणारे संवाद कुठूनही कृत्रिम वाटत नाहीत. उलट, ल्येका, यती, करती सारखे अस्सल शब्दप्रयोग योग्य ठिकाणी वापरून मजा येत राहते. सल्याच्या घरच्यांशी बोलतानाचा मराठी-हिंदी ठेका तर महान जमलाय. आर्चीच्या वडलांची स्टेजवरून भाषण करायची पद्धत आणि घरी आलेल्या प्राचार्याशी बोलायची पद्धत यातून सिनेमाबद्दल बरंच काही समजत राहतं. छोट्यातली छॊटीपात्रंदेखील आपला पूर्ण ठसा उमटवून जातात.
अजय अतुलच्या संगीताबद्दल बरंच बोलून झालंय, म्हणून आता इतकंच म्हणेन की सिनेमामध्ये असलेली चारही गाणी अतिशय चपखल आहेत आणि कूठेही खटकत नाहीत. याड लागलंचं पिक्चरायझेशन गाण्याइतकंच अप्रतिम आहे.
या सिनेमाचा टेम्प्लेट थोडासा तमिळ सिनेमांसारखा आहे, बहुतेक तमिळ लव्हस्टोरी अशाच असतात. सिनेमाच्या पहिल्या भागावर तर मणीरत्नमची छाप जाणवत राहते. नदीमधली दृश्यं, ऊसाच्या शेतामधले काही शॉट्स, मित्राच्या प्रेमकहाणीसाठी मार खाणारे दोस्तलोक्स, गाण्यांमधून पुढे जाणारी लव्ह्स्टोरी. गावाच्या राजकीय उतरंडीचे दर्शन घडवणारी दृश्यं असोत वा खेड्यांचं अस्सल आधुनिक वर्णन करणारे प्रसंग असोत दाक्षिणात्य सिनेमा अधूनमधून झळकत राहतात. तरीही मंजुळेंची प्रेमकथा मराठी मातीशी शंभर टक्के इमान राखून आहे. फेसबूकवर शोधाशोध करणारे टीनेजर हीरो आणि कॉलेजात शेतात फिरायला ट्रॅक्टर आणि बुलेट चालवणारी नायिका असो, ही प्रेमकथा फार गोजिरी वाटत राहते. अर्थात सर्व काही आलबेल नसतंच. प्रेमकहाणीमध्ये यायचे ते खलनायक एम्ट्री करतातच आणि करायचा तो राडा करतातच. यादरम्यान, घरातून पळून जाणारे नायक-नायिका पाहताना खरोखर ताण येऊ लागतो. आता या प्रेमकथेचा दुर्दैवी अंत होणार, आता.. आता की आता… असं म्हणत म्हणत मध्यंतर येतो आणि प्रेक्षक म्हणून मी सुटकेचा श्वास टाकला. सिनेमाच्या दुसर्या भागात ही प्रेमकहाणी गावामधून बाहेर येते, एका अनोळखी शहरामध्ये हे दोन प्रेमी जीव “आशियाना” बनवतात आणि सुखानं संसार करू लागतात… पण सर्व काही आलबेल होतच नाही आणि सिनेमा संपता संपता मीच सुन्न होऊन जाते.
फॅंड्रीमध्ये जब्यानं कॅमेराला भिरकावलेला दगड हा त्या सिनेमाचा हायपॉइंट होता, सैराटचा शेवटचा शॉटही तसाच हायपॉइंट आहे, त्याबद्दल मला बरंच काही लिहायचं आहे, पण सध्या सिनेमा थेटरामध्ये असेपर्यंत मी त्यावर लिहिणार नाही. केवळ इतक्ंच सांगेन, की इतर सिनेमा जेव्हा संपतात तेव्हा त्यांची कहाणी संपते, पण सैराटची कहाणी मात्र प्रेक्षकांच्या डोक्यामध्ये भिरभिरतच राहते. जब्याचा तो दगड तेव्हाही सरळ येऊन घप्पकन बसला होता, याहीवेळी तसाच बसतो.
करमाळ्यात कोळीण मासे विकतेय
करमाळ्यात कोळीण मासे विकतेय पाहून जरा कमाल वाटली....
मला वाटते, त्या बाजूला मासे कमीच/ नाहीच खात. आता बदलेलं असेल तर माहीत नाही.
सिनेमाचा दुसरा हाफ
सिनेमाचा दुसरा हाफ हैद्राबादमध्ये आहे ना? तिथे विकतात कोळणी मासे
मला वाटलेले की सुरुवातीचा
मला वाटलेले की सुरुवातीचा प्रेम जुळल्याचा भाग करमाळ्यातच आहे. आणि म्हणून वाटाले की.
मंगळवेढा असते तर पटले असते की चला मासे मिळतात.
असो.
सुंदर रिव्यू नंदिनी! ट्रेलर
सुंदर रिव्यू नंदिनी! ट्रेलर पाहिल्यापासून प्रचंड कुतूहल आहे या चित्रपटाबद्दल. त्या फॅण्ड्री चा दिग्दर्शक म्हणून अजूनही. मला फॅण्ड्री आठवतो त्यावरून त्यातील नाट्य दाखवताना पार्श्वभूमी मुद्दाम सुंदर दाखवणे हा उद्देश वाटला नव्हता. इथे तो अनेक फ्रेम्स अतिशय सुंदर आहेत.
छान परीक्षण .. चित्रपट
छान परीक्षण .. चित्रपट बघावासाच वाटावे लावणारे .. हा चित्रपट बघता नाही आला काही कारणांनी तर वाईट वाटत राहणार .. फँड्री बघायला जमला होता थिएटरात.. पण तितकाही आवडला नव्हता.. हा आवडेल असे वाटतेय..
.
हा चित्रपट पाहून टीन एजर मुलांवर भलताच परिणाम होईल अशी आवई उठवणार्या काही महाभागांनी >>
>>>>>>>
अश्या मेसेजचा फायदाच होतो .. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालायला
मला तर एकदम इषकझादे मराठीत आला काय असं वाटलं क्षणभर >>>
>>>
सेम पिंच! मलाही अगदी तसेच वाटलेले प्रोमो बघून.. पण क्षणभरच, हा चित्रपट नक्कीच तसा नसणार याची खात्री होती.. आहे..
तरूणपण हा आयुष्यातील अतिशय
तरूणपण हा आयुष्यातील अतिशय सुंदर काळ असतो. प्रेमात पडायचा, सुंदर स्वप्ने पाहायचा आणि ती स्वप्ने परिपूर्ण करायचा. तारूण्यसुलभ भावनेने प्रेमात पडणं थांबणार नाही आणि थांबायलाही नको. या प्रेमात पडणार्या तरुणाना फटकरुन ना देता, आपुलकीने सामावून घेतले तर ते आयुष्यभर खूप काही करतील.
ही काही समाजात शैक्षणीक प्रवाहात असणा-या कोवळ्या वयातील मुलांमध्ये बालवयातील प्रेमप्रकरणांची विकृती नाही. सामाजिक प्रबोधन घडायचे असेल तर वैदिक हिंदू संस्कृती ग्रूप मधील सदस्यांचे व्हायला हवे. प्रेमीजनाना आपुलेसे करा, प्रेम केले म्हणजे शिक्षण थांबले असे नाही.
आत्ता सर्व साधारण २५-४० वय असलेल्याना विचारा - त्यानी प्रेम केले, जात पात झुगारून प्रेम केले, त्यातील काही जणांची सफल लग्न पण झाली, काहींना घरच्याच्या दबावाखाली परिस्थिती ला सामोरे जाउन प्रेमाला विसरावे लागले. ह्यानी प्रेम केलें , अश्लिल हावभाव केले, खुणवाखुणवी केली, खूप शिक्षण घेतले, चांगली नोकरी मिळवली, पैसे कमावले. आपल्या पसंतीच्या जोडीदाराच्या साथीने खूप सुखी जीवन साध्य केले.
उडन खटोला - अल्पवयीन मुलगी लफड्यात? (प्रेमात) पडते तेंव्हा तिला सांगा की प्रेम कर पण आधी चांगले शिक्षण घे, आपल्या पायावर उभी हो, आयुष्या सुंदर कर, उंच स्वप्ने बघ आणि तुझया प्रेमाला पण ती स्वप्ने दाखव. दोघे मिळून ती पूर्णा करा. त्यांच्या प्रेमाला विरोध न करता, त्याना सामावून घ्या आणि भरारी मारायला शिकवा.
मी अजुन चित्रपट पहिला नाही, येथे मराठी मंडळाने आणला तर आवर्जून बघेन.
नंदिनी ताई तुम्ही चेन्नईला
नंदिनी ताई तुम्ही चेन्नईला राहता ना तिथे हा चित्रपट Relese झाला ?
(No subject)
(No subject)
नंदिनी ताई तुम्ही चेन्नईला
नंदिनी ताई तुम्ही चेन्नईला राहता ना तिथे हा चित्रपट Relese झाला ?>> सुट्टीसाठी महाराष्ट्रात आलेली आहे. अर्थात मागे चेन्नईमध्ये फँड्रीचे खास शोज केले होते तसेच सैराटचे केल्यास आश्चर्य वाटणार नाही.
टण्या आणि केदार भाषेबद्दल दिलगिरी. ती सोलापुरीच बोली आहे. नंतर लेख एडिट करताना बदल करते.
टण्या. पिक्चर् नीट पाहिलास तर फ्लेक्सची गंमत तुला दिसेलच.
गावचं वातावरण एकदम भारी घेतलंय.
माझ्या मते, पहिला हाफ फार ताणला आहे आणि तो ताण असह्य होइपर्यंत (चांगल्या आर्थाने) खेचला जातो. सेकंड हाफमध्ये अख्खा पिक्चर गीअर बदलतो. सेकंड हाफबद्दल सविस्तर थोडं नंतर लिहेन.
अगो, मी फारशी कथा सांगितली नाहीये, जितकं सूचित करणारी वाक्यं आहेत त्याहून अधिक काय आहे ते पिक्चर पाहशील तेव्हा तुला जाणवेल.
इशकजादे तद्दन फिल्मी मसाला होता. सैराट त्यामानानं बराच गंभीर सिनेमा आहे.
चित्रपटाची लांबी जास्त आहे अशा तक्रारी येत आहेत, म्हणून निर्मात्यांनी लांबी कमी काअयचा निर्णय घेतल्याचे वाचले आहे. लांबी जरी जास्त असली तरीही सिनेमा कुठेही रेंगाळत नाही अथ्वा कंटाळा आणत नाही. अर्थात दहा मिनिटे अजून कमी केली तरी चालू शकेल.
परिक्षण छान आहे.
परिक्षण छान आहे.
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय. हा चित्रपट
मस्त लिहिलंय. हा चित्रपट नक्कीच पाहणार.
गंमत म्हणजे हे जे काही
गंमत म्हणजे हे जे काही सोशलमिडीयांच्या गृप पेजेस मधून सैराट विषयी लिहून पसरवले जात आहे तशाच पेज वरुन "इशकजादे" या चित्रपटाला पाठिंबा देणारे मेसेज फिरत होते का तर हिरो हिंदू आणि हिरोईन मुस्लिम दाखवली होती.
बघा धर्म वेगवेगळा इतरांचा असेल तर यांची मानसिकता बदलते आणि स्वतःच्या धर्माच्या जातीचा वर असेल तर मानसिकता वेगळी होते.
अश्या दलालांपासून लांब रहावे हेच समजूतीचे लक्षण
नन्दिनी- छान परिक्षण, आता
नन्दिनी- छान परिक्षण, आता चित्रपट बघावा लागणार.
मस्त लिहिलंय. हा चित्रपट
मस्त लिहिलंय. हा चित्रपट नक्कीच पाहणार.>>>> +१०००
This movie is released in
This movie is released in Gurgaon in PVR Cinema. After KKG, Natsamrat this one is released in NCR. Good for people like us
कालच रात्री पाहिला. आवडला
कालच रात्री पाहिला. आवडला चित्रपट. तुझं परीक्षणही मस्तच! सगळं काही आलबेल सुरु असताना असा अंगावर येणारा शेवट पाहून फार सुन्न व्हायला झालं. फॅंड्री आणि आता सैराट…. दोन्हीच्या शेवटानी मनात कोणत्यातरी खळबळीची सुरुवात केली.
स्वच्छ नजरेच्या रिव्ह्यूची
स्वच्छ नजरेच्या रिव्ह्यूची वाट बघत होते, तो तुझ्याकडून मिळाला ते बरं झालं. बघायचा तर आहेच.
गणेश मतकरींचाही रिव्ह्यू चांगला आहे.
सगळीकडे जी काही धुळवड चाललीये, ती चालू दे. एखाद्या मराठी चित्रपटासाठी अशी धूळवड लक्षवेधी आहे. ग्लॅड!
चित्रपटाची कथा पुरेशा
चित्रपटाची कथा पुरेशा विस्तारानं आणि चित्रपटाचा शेवट कसा आहे, हे सांगितल्याबद्दल धन्यवाद.
ह्या लेखात जरी कथा विस्तारुन
ह्या लेखात जरी कथा विस्तारुन सांगितली आहे तरी शेवटाची कल्पना आली नव्हती. निदान मला तरी.
पण शेवट कळायला रसपच्या लेखाची मदत झालीच.
"सैराट" चा अर्थ काय??
"सैराट" चा अर्थ काय??
रानटी , हिंस्त्र
रानटी , हिंस्त्र
ओहो. धन्यवाद.
ओहो. धन्यवाद.
"सैराट" चा अर्थ काय??>>>>>>>
"सैराट" चा अर्थ काय??>>>>>>> सैराट म्हणजे दुनियेला फाट्यावर मारुन मनाला येईल असे वागणारा असा अर्थ आहे,,हा खास पश्चिम महाराश्ट्रातला ग्रामिण शब्द आहे.
रानटी , हिंस्त्र>> नाही
रानटी , हिंस्त्र>> नाही नाही...
सैराट म्हणजे मुक्त , स्वच्छंद , बेभान , सुसाट , वेगवान इ.
ref: Nagraj Manjule TV9 interview 13th min
link: https://www.youtube.com/watch?v=UPDqBmqTx10
गुड्डु +१
गुड्डु +१
मस्त लिहिलंयस नंदिनी.
मस्त लिहिलंयस नंदिनी.
सैराटचा मलाही लागलेला अर्थ
सैराटचा मलाही लागलेला अर्थ सुसाट
झिंगाट म्हणजे नेमके काय समजले नाही.
झिंगाट म्हणजे नेमके काय समजले
झिंगाट म्हणजे नेमके काय समजले नाही. >> ह्या शब्दाचा अर्थावर एक बाफ निघू शकेल की ! काढा. मग त्यानंतर पोलचा बाफही काढता येईल.
Pages