२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यन्झी वाले ट्रॅक वर आहेत. ७९/२. टिकले तर २०० ही हाणतील, मग अवघड आहे पाक ला.

बाकी काल ऑस्ट्रेलिया वर्सेस बांग्लाचे हायलाईट्स बघितले. उस्मान ख्वाजा!!!! अरं काय खेळतय पोरगं? काय बॅलन्स आहे भौ चा? जागेवर! जागेवर राहून बॉलरच्या डोक्यावरुन ९० मिटरची सिक्स मारली त्यानी काल. अबाबाबाबा! आणि ताकद पण नाही लावली जास्त. प्युअर टायमिंग! रुट बरोबर आता ह्याला ही वॉच करावा लागले. काय टॅलेंट!

पाकिस्तान खतरे मे ..
तरी आज ते जिगर दाखवतील असे वाटतेय ..
आफ्रिदी आणि जावई बापू खेळतील असा अंदाज ..

ऑंय? अरे हे वाक्य (अल्टीपल्टी करुन) ऑस्ट्रेलियामधला ऋन्मेष म्हंटला तर ठीक आहे मैट! हाहा
>>>>>
बस्स काय बुवा, २०-२० मध्ये ऑस्ट्रेलियाला आपण भारी पडतो., नुकतेच त्यांच्या देशात ३-० मारून आल्यावर तर त्यांना भारताला कसे हरवायचे हे शोधायचे आहे. आपल्याला बस एंजॉय करायचे आहे. तरी जडेजाला बसवा आणि भजनला घ्यायला हवे त्या मॅचला ..

मस्त सुरुवात पाकची..
पाकिस्तान जिंकली तरच मजा आहे..
ग्रूप ओपन झाला पाहिजे.. शेवटच्या सामन्यापर्यंत कोण येतेय कोण जातेय ठरायला नको ..

आउट!

त्याचीच आठवण काढत होते. त्यांनी चुका केल्या की शोएब मस्त बडबड करतो. मी फॅन आहे त्याच्या कमेन्टरीची Happy

विकेट्स नी फरक पडतो. ६१/० होते ५ ओवर्स मधे. १० ओवर्स मधे १०० सहज होतील असं वाटलं होतं. पण आता १२ ओवर्स मधे पण नाही झालेत.

शोएब बराच देशाभिमानी आहे. अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंना फिक्सिंगची कीड लागली असली, तरी शोएबने त्याची आर्थिक पार्श्वभूमी खराब असूनसुद्धा असे काही केलेले नाही.

इतकी अफलातून सुरवात होवूनही पाकच्या मधल्या फळीने नांगी टाकली !
कां कुणास टावूक , पण सुरवातीलाच किवीजनी एखादी ओव्हर तरी सोधुला देवून पहायला हवी होती, असं तीव्रतेने वाटत होतं.

अरे त्या झंपाची बोलिंग स्टाईल शेन वॉर्न सारखी नाही का वाटत? एकदम तसच आधी २-३ पावलं चालत यायचं आणि नंतर जर्क अ‍ॅक्शन मध्ये लेग स्पिन करायचं.

तसं न होवो, पण भारताच्या ग्रुपमधे 'रन-रेट'च निर्णायक ठरणार असं वाटतंय, निदान ती शक्यता तरी आहेच. जिंकण व रन-रेट वाढवणं ह्या दोन्ही गोष्टी अपरिहार्य आतां आपल्यासाठी. तो पंड्या एक छुपा रुस्तुम वाटतो याकरतां !! विराट आहेच; शिवाय,कठीण समय येतां कोण कामास येतो, तें कळेलच म्हणा आतां !! शुभेच्छा.

भाऊ काल पासुन तेच तर म्हणतोय. Happy

रमीज राजा खुर्चीवर उड्या मारत कॉमेंट्री करू लागलाय>> तेच भोवले पाकला. नेहेमीप्रमाणे. Proud
आज मांजराला लांब ठेवा.

भारताच्या ग्रुपमधे 'रन-रेट'च निर्णायक ठरणार असं वाटतंय, >> बांग्ला विरुद्ध ५०-६०च्या मार्जिनने जिंकले तर पुढल्या ऑसीज सोबतची मॅच ट्रेन्शन फ्री खेळता येईल. नाहि तर कठिण होऊन बसेल.

तो पंड्या एक छुपा रुस्तुम वाटतो याकरतां !! >>> मला तर तो वाईडची खैरात करणारा टेनिस प्लेअर वाटतो. तस असलं तरी क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीत त्याची बॉडीलॅन्गेंज पॉसिटिव असते.

पंड्याला एकच ओव्हर द्यावी त्यात तो चमत्कार करतो. आणि दुसरी ओवर दिल्यावर आपल्याला त्याला कोपरा पासुन नमस्कार करावा लागतो Wink

<< टी-२० च्याच संदर्भात, रोहित, धवन व, फॉर्ममधे आल्यास, रैना व युवराज हे देखील एकहाती सामना जिंकून देण्याच्या कुवतीचे आहेत असं मला वाटतं >> आजच्या मुलाखतीत बंगलादेशच्या शकीब अल हसनने नेमकं हेंच म्हटलंय !
<< मला तर तो वाईडची खैरात करणारा टेनिस प्लेअर वाटतो. >> मीं पंड्याच्या फलंदाजीबद्दलच म्हणत होतो .

< टी-२० च्याच संदर्भात, रोहित, धवन व, फॉर्ममधे आल्यास, रैना व युवराज हे देखील एकहाती सामना जिंकून देण्याच्या कुवतीचे आहेत असं मला वाटतं >> आजच्या मुलाखतीत बंगलादेशच्या शकीब अल हसनने नेमकं हेंच म्हटलंय !>>>

आमचा प्रोब्लेम एकच आहे की कोहली सारखी नियमितत नाही! त्यामुळे सामना पहाणार्‍या भारतीयांच्या मनात ह्यांच्या विषयी नेहमीच साशंकता!

आज शिमग्याच्या दिवशी दिवाळी साजरी करायची सांधी क्रिकेट प्रेमींना द्यावी ह्या सर्वांनी मिळून हीच मनापासून इच्छा!! Happy

इंग्लंड लईच येड्यासारखे खेळून राहिले ना भाउ... एकाच ओव्हर मध्ये ३ विकेट्स... मॉर्गन पहिल्या बॉलवर क्लिन बोल्ड...

असेच खेळले तर हारणार नक्की... अफगाणिस्थानी फक्त शांत डोक्यानी खेळायला पाहिजे..

Pages