२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊ Lol

ऋन्मेष , तुम्ही साधारणपणे काहीही लिहिता हे माहिती आहे. पण अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा उल्लेख 'तालिबान' असा करणं ही अफगाण लोकांची क्रूर थट्टा आहे.
तुम्ही यावरही युक्तिवाद कराल याची खात्री आहेच. असो.

>>>>>>>>>>

मी ते थट्टेनेच लिहिले होते. ती क्रूर होऊन जर कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी स्वतंत्र धागा काढून जाहीर माफी मागायला तयार आहे. कोणाच्या भावना दुखावून मला युक्तीवाद करायला आवडत नाहीत.

एक सहज सांगतो. काही जण सरसकट सर्वच पाकिस्तान्यांचा उल्लेख दहशतवादी असे करतात. तसेच सरसकट सर्वच भारतीय मुसलमानांना देशद्रोही संबोधतात. ते देखील थट्टेत नाही तर सिरीअसली. अश्या विचारांविरुद्ध लढा द्यायचे काम मी सोशल साईटवर करतो. त्यामुळे जाणुनबुझून मी कोणाला असे दुखावणार नाही याची खात्री बाळगा.

वरचा उल्लेख मी क्रिकेटच्या अनुषंगानेच केला होता. जशी आफ्रिकन गोलंदाजीची अमानुष कत्तल होत होती, अफगाणी फलंदाजांनी जसा आतंक माजवला होता त्या अनुषंगाने म्हटले होते. तरी मला त्याचा ईतर काही अर्थ निघणार नाही ना किंवा आपली उपमा चुकत तर नाही ना याची काळजी घ्यायला हवी होती. पुढच्या वेळी घेईन.

अवांतर - मी जोशमध्ये येत बरेचदा काहीही लिहितो याची कल्पना आहे मला. तो आरोप कुठल्याही युक्तीवादाशिवाय मान्य आहे. तरी सुधारायचे प्रयत्न चालू आहेत. आपल्यासारख्यांची मदत अपेक्षित आहे. असे काहीही लिहिलेले तिथल्यातिथे दाखवल्यास फायदा होईल.

असो,
इथून पुढे क्रिकेटवर.

वेस्ट ईंडिजचा संघ श्रीलंकेच्या तब्बल अडीज ते साडेतीन पट चांगला असल्याने सामना अपेक्षेप्रमाणे सरधोपट सरगम झाला. गेलचे मागे असणे विंडीजच्या पथ्यावर पडले. पुढे येऊन बाद झाला असता तर त्याचे एक प्रेशर आले असते. कदाचित. बाकी फ्लेचर जरा जास्तच भारी खेळला. जरा थबकला असता आणि लंकेने संधी साधल्या असत्या तर काही रोचक घडू शकले असते.
मॅथ्यूजला आयपीएलमध्ये धोनीच्या संघात खेळायची गरज आहे. कॅप्टन्सीमधले बरेच काही शिकायची गरज आहे त्याला.

आत्ता श्रीलंका वर्सेस वेस्ट इंडिज आणि अफघाणिस्तान वर्सेस साऊथ आफ्रिका हायलाईट्स बघत होतो. I think I just figured out what I was not able to articulate in my previous post about Root, Amla and Kohli's game.
I was watching these guys like de cock, du plesis, duminy, Gale, De Villiers (even Yuvraj). Huge huge strikers of the ball, these guys. Their ability to hit the ball hard, cut it with hardly any room and still make it to the boundary is just incredible! But the point still remains is that, these shots still are dangerous.
If the bowlers keep their heads and continue to follow these batsmen bowl balls close to them giving them hardly any room, they will break!
Now on the other hand, these players like Amla, Root, Rohit Sharma, Kohli (a little bit) have brilliant technique and can hit balls bowled straight on to them as they possess the technique to drive the ball with a straight bat. That's why they could prove to be very useful on strong bowling pitches or in matches where bowlers are bowling rather straight. Their technique is more valuable in my view and that's what sets them apart.

वैद्यबुवाजी, टी-२० पुरतंच बोलायचं झालं, तर मला असंही वाटतं जे फलंदाज 'अनऑर्थोडॉक्स' फटके मारूं शकतात, तेही भेदक गोलंदाजांवरही खरं दडपण आणूं शकतात. असे फटके मारायचंही एक विशिष्ठ 'टेक्निक' असतंच, तें घोटूनच आत्मसात करावं लागतं व त्यांत चेंडूचं नेमकं 'अँटीसिपेशन' करायचं कसबही लागतं. डी व्हीलीयर्स हा या पंथातला दादाच म्हणावा लागेल !!

स्पर्धेतील सर्वात खराब गोलंदाजी आतापर्यंत साऊथ आफ्रिकेची झाली आहे. हे कालच्या मॅच वरून स्पष्ट झाले. इंग्लंड विरुध्द मार खाल्ला ठिक आहे. पण अफगाणिस्तान सारखी नवखी टीमचे सदस्य सुध्दा १६ चेंडूत ४५ धावा मारतात आणि १७२ टोटल गाठतात हे आश्चर्यचकित करणारे आहे. भले खेळपट्टी फलंदाजीस पोषक का असेना. पण एकिकडे सतत खेळणारे प्रचंड अनुभवी गोलंदाज आणि दुसरी कडे क्वचित खेळण्याची/सरावाची संधी मिळणारे अननुभवी फलंदाज यांच्यात फरक तर आहे.

२१० गाठून सुध्दा अवघ्या ३०-३५ रन्स ने सामना दुबळ्यासंघाविरुध्द जिंकणे निश्चित आफ्रिकेसाठी धोक्याची घंटी आहे.

यापुढे मात्र अर्जुनाने द्रौपदी जिंकायची आणि इतरांनी ती वाटून घ्यायची हा व्यवहार बंद व्हावा. संघातले नकुल-सहदेव कधी खेळणार? युवराजने या अर्जुनाचं सारथ्य केलं, पण तरीही युवराज आश्वासक वाटला नाही, पण साथ मोलाची होती. पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांनी मंद खेळपट्टीवर आखूड टप्प्याची गोलंदाजी टाकून आपल्या वाटेतले काटे कमी केले.

अर्धशतकानंतर सचिनला अभिवादन करून विराटने बहुधा सांगितले, ‘‘तुझाच वारसा पुढे चालवतोय. आशीर्वाद दे’’
सचिन ‘तथास्तु’ म्हणाला असावा!

द्वारकानाथ संझगिरी

---

अतिशय अचूक निरिक्षण. सचिन होता तेव्हा ही हीच स्थिती भारतीय संघात होती. आता ही आहे.

<<... सचिन होता तेव्हा ही हीच स्थिती भारतीय संघात होती. आता ही आहे.>> मला वाटतं, सचिन होता त्यापेक्षां आतां स्थिती खूपच चांगली आहे; गोलंदाजीला धार चढलीय, क्षेत्ररक्षण वाखाणण्यासारखं सुधारलंय व फलंदाजी अगदींच एकखांबी आहे असंही नाहीं म्हणता येणार !
And , almost every team in this tournament is blessed with at least one outstanding batsman in form on whom the team depends heavily ; India has, perhaps, only the best among them !!

कालच्या मॅच मध्ये अफगाणिस्थान नी सा. आफ्रिकेच्या तोंडचं पाणी पळवलंच होतं.. थोडा अनुभव कमी पडला.. अन्यथा मॅच गेल्यातच जमा होती... अहमद शहजादनी तर तुडवलाच पहिल्या तेन ओव्हर्स मध्ये.. ख्रिस मॉरीसनी अनुभवाचा उत्तम उपयोग करुन योग्य वेळी बॉलिंग थोडीशी शॉर्ट करुन अफ्रिकेला मॅच जिंकण्यासाठी संधी उपलब्ध करुन दिली आणि ते जिंकले. जर पहिल्या दोन बॉलर्स सारखीच बॉलिंग मॉरिसने केली असती तर अफगाणिस्थाननी नक्कीच अपसेट दिला असता...

कदाचित ते एखादी मॅच जिंकू शकतात.. त्यांचे बॉलर्स पण चांगले आहेत.. ती डिव्हीलियर्स नी एक ओव्हर तोडली म्हणून नाहीतर चित्र वेगळे दिसू शकले असते.. अर्थात आत्यबाईला मिशा सगळं..

पण एकूणात अफगाणिस्थान एक चांगली टीम आहे हे नक्की.. असोसिएट्स चांगले खेळायला लागलेत आता..

<< पण एकूणात अफगाणिस्थान एक चांगली टीम आहे हे नक्की>> १०० % सहमत. मुख्य म्हणजे कोणताही न्यूनगंड न बाळगतां ते आत्मविश्वासाने प्रत्येक सामना खेळतात व सर्वस्व पणाला लावून झुंझतात ! ग्रेट क्वालिटी !!

काल गेल नव्हता तरी वेस्ट इंडीज जिंकली.
आपण कोहली खेळला नाही तर न्युझिलंड विरुध्दची मॅच हारलो.

<< आपण कोहली खेळला नाही तर न्युझिलंड विरुध्दची मॅच हारलो.>> मला वाटतं इतकं गणिती समीकरण नाही हें. कोहलीइतके नसले तरीही जागतिक दर्जाचे टी-२० खेळाडूही आहेत आपल्याकडे !

भाऊ. असने वेगळे आणि ऐनवेळेस खेळणे वेगळे. रैना, धवन, रोहित थोडाफार युवराज, जाडेजा, ही मंडळी शेवटची मॅच कधी व्यवस्थित खेळली? हा प्रश्न विचारल्यावर काहीच आठवत नाही. तरी बर आपण भारतीय खेळपट्टीवर खेळतोय तरी आपली सलामी जोडी साधे ३० धावांची भागीदारी करू शकत नाही? हे लाजिरवाने नाही का? धवन १ मॅच मधे खेळला की १० मॅच मधे १० धावांच्या वर जात नाही. रैना इतक्या दिवसांमधून फक्त ऑस्ट्रेलियाविरुध्द २००चे टारगेट चेस करताना खेळला त्या आधी आणि त्यानंतर कुठल्या मॅच मधे खेळला? हे कुणाला आठवत ही नसेल. तसेच जाडेजाचे आहे. याची बॅटींग फार मुश्किलने येते आणि आली तरी हाही खेळत नाही. जाडेजा बँटींगला आल्यावर शेवट पर्यंत नाबाद राहिला अशी १०० पैकी १-२ मॅच असेल जास्तितजास्त. मग काय करायचे
दरवेळेस एक बाजू विराट लावून धरतोय. हेच चित्र आतापर्यंत दिसत आहे. बाकीचे संघाचे व्यवस्थापक या गोष्टींचा फायदा कधीना क्धी उठवणार. तेव्हा काय?
खरतर धोनीला आता विराटनंतरच बँटींगला यायला पाहिजे. रैना, युवराज नंतर जो पर्यंत धोनी जास्तीतजास्त षटक खेळेल आपला धावफलक जोमाने वाढेल.

रैना, जडेजा अन धवन, असून अडगळ नसून खोळंबा.

धवन तर हकलायची वेळ आली की एखादी मॅच खेळून घेतो, मग परत पाट्या टाकायला मोकळा.

जडेजाची फील्डिंग सोडली तर बोलिंग अन बॅटिंग टोटल बेभरवशी. बॅटिंगमध्ये कन्सिस्टंसी अख्या करिअरमधे कधीही दिसली नाही याच्या. टोटल मटका, जो फार क्वचित लागतो. बोलिंग काही वेळा प्रॉपर स्पिनरच्या जवळ जाणारी तर कधी केवळ चेंडू टाकणे या लेव्हलची.

रैनाचे बॅडपॅच त्याच्या फॉर्मपेक्षाही लांब असतात.

पण जोवरी डोक्यावर धोनीछत्र आहे तोवरी हे गोचीड असेच चिकटून बसणार.

बरोबर आहे भाऊ. ते तर आहेच. म्हणूनच मी त्यांच्या हातोटीला इन्क्रेडिबल म्हणालो आहेच. कधी कधी ते बॅट्समन त्यांच्या ख्यातीनुसार खुप वेगात अ‍ॅडजस्टमेंट करुन (बॉल अँटिसिपेट करुन) चांगला बॉल भिरकावतातच. ती लोकं त्यात मास्टर झालीयेत आता पण तुम्ही सगळे शॉट जर बघितले तर बर्‍याच वेळा विड्थ दिली जाते बॉलर लोकांकडून. समजा एखाद्या चांगल्या बॉलला चांगला शॉट मारला तर डगमगून न जाता त्यांना सतत चेज केले पाहिजे क्लोज टु देअर बॉडीज. हा पैत्रा ह्या स्ट्रेट बॅट वाल्यांना लागू पडत नाही. Happy

कोहलीइतके नसले तरीही जागतिक दर्जाचे टी-२० खेळाडूही आहेत आपल्याकडे !>>>

भाऊ, कोहली, धोनी व्यतिरिक्त बरेचसे IPL दर्जाचे आहेत!

उदा. जडेजा, रैना- आयपीएल च्या २५% देखिल नियमितता दाखवत नाही आंतरराष्ट्रिय सामन्यात!

पाहा हा मॅसेज

धोनी opened group

Doni added raina

रैना: Hi

Dhoni added jadeja

Dhoni added rahane

Dhoni added yuvi

धोनी: ऐका रे

रैना: काय झाल दादा

रहाने: ????

धोनी: आज जिंकायच असेल तर विराट ला भडकावा

जडेजा: done भाऊ

Dhoni added virat

विराट : hi guys

Dhavan: हा बघा आला इंग्रज

विराट : गप रे माकड़ा

जडेजा: विराट कसा आहेस रे वहिनी सोडून गेल्या ना

विराट: ग्रुप वर नको रे हा विषय

अश्विन: अरे याला फसवलं रे

विराट: गप रे धोनीच्या चमच्या

शर्मा: भावा तुझी पॉवर दाखवून दे संध्याकाळी वहिनीना एकदम जळवून टाक..

विराट: :<(:<(:<(:<(:<(:<(

शर्मा : असाच राग हवा भावा

विराट: चला येतो

धोनी : कुठे निघालास ?

विराट : सराव करायला

धोनी: एवढया उन्हात ?

विराट: बघाच आज कशी तिला जळवतो

धोनी: काळजी घे भावा

Dhoni removed virat

धोनी : जिंकलो रे आपण

रैना: आता काय सोडत नाही Pakistan ला

धवन: धडामधूम

धोनी : चला रे झोपू आता
संध्याकाळी मस्त उठू
आपल्याला सराव करायची गरज नाही आता

हाहाहाहाहाहाहाहा

--------

महाराष्ट्र टाईम्स

<< भाऊ, कोहली, धोनी व्यतिरिक्त बरेचसे IPL दर्जाचे आहेत! >> टी-२० च्याच संदर्भात, रोहित, धवन व, फॉर्ममधे आल्यास, रैना व युवराज हे देखील एकहाती सामना जिंकून देण्याच्या कुवतीचे आहेत असं मला वाटतं. केवळ एका कोहलीच्या जोरावर कुणीही आपल्याला ह्या विश्वचषकाचे मुख्य दावेदार मानणार नाहीं; व तसं असेलच, तर आपणही हरल्यास छाती पिटण्याची गरज नसावी !

कोहली जबरदस्त! १९९० च्या दशकातला सचिन चा काळ आठवतो, जेव्हा तो एकटाच खेळायचा आणी बाकीचे आजुबाजूला केवळ ११ चा संघ असण्याचा नियम असल्यामुळे हजेरी लावून जायचे. १९९९-२००० पासून चित्र बदलायला लागलं (द्रविड, गांगुली, सेहवाग वगैरेंचा जम बसल्यावर). तसं बॉलिंग मधे सगळ्या आशा-अपेक्षा कुंबळेवर असायच्या.

टी-२० च्याच संदर्भात, रोहित, धवन व, फॉर्ममधे आल्यास, रैना व युवराज हे देखील एकहाती सामना जिंकून देण्याच्या कुवतीचे आहेत असं मला वाटतं. >> भाऊंना अनुमोदन (धवन वगळता). अर्थात धवन बद्दल तो अतिशय मह्त्वाच्या सामन्यात खेळतोच खेळतो असे जाणवते. रोहोत चा टी-२० खेळ फारसा जबरदस्त नाहि आहे. एक दिवसीय सामन्याप्रमाणे इथे त्याला त्याचा पेस अ‍ॅडजस्ट करायला अजून जमलेले नाही. पण एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता त्याच्यात नक्कीच जाणवते.

बुवांच्या वरच्या पोस्ट्मधे स्ट्रेट बॅट ने खेळण्याबद्दल जे म्हटलय ते बदलून मी असे म्हणेन कि हे लोक proper cricketing shots खेळतात आणी सॉफ्ट हँड ने खेळून धावफलक सतत हलता ठेवतात हा मुख्य फरक आहे (ह्याला रोहीत सणसणीट अपवाद आहे) ह्याउलट गेल , मिलर, मॅक्स्वेल स्लॉग मोडमधे अधिक खेळतात. अ‍ॅबे कसा खेळतो हे फक्त त्यालाच माहित आहे पण त्याच्या टॅलेंटला तो कधीच न्याय देऊ शकणार नाही असे मला राहून राहून वाटते.

माझं ऑस्ट्रेलियाविषयी एक निरीक्षण आहे. त्यांना सहसा दबावाखाली हरवता येत नाही. त्यांना त्यांच्यापेक्षा सातत्यानं चांगलं खेळूनच हरवावं लागतं. संपूर्ण मॅच त्यांच्यापेक्षा चांगलं खेळूनच त्यांना हरवता येतं. क्वचित ते दबावाखाली येऊन बॅटींग कोलॅप्स किंवा बॉलिंग भरकटून वगैरे हारतात (तो मक्ता द. अफ्रिकेकडे आहे)

बांग्लादेशने निराश केले ..

आता ऑस्ट्रेलिया-ईंडिया नॉकआउट होण्याची शक्यता निर्माण झालीय ... भले आपणच सरस असलो तरी ऑस्ट्रेलियाला हलके लेखू शकत नाही. आयपीएलचा अनुभव गाठीशी आहे त्यांच्या .. रोहीत शर्मा की प्लेअर राहील त्या सामन्यात आणि चमकदार कामगिरी करेल हा एक अंदाज

भले आपणच सरस असलो तरी ऑस्ट्रेलियाला हलके लेखू शकत नाही>>>>>>>> ऑंय? अरे हे वाक्य (अल्टीपल्टी करुन) ऑस्ट्रेलियामधला ऋन्मेष म्हंटला तर ठीक आहे मैट! Lol

केप्या पॉईंट्स तेव्हढेच आहेत.. नेट रन रेट जास्त आहे फक्त..

भारतीय लेडिज बायका सेमी फायनलच्या शर्यतीतून बाहेर.. अगदीच जर तरचा प्रश्न आला तर पुढे जातील अन्यथा पुढची मॅच शेवटची.. किती वाईट बॅटींग केली गेल्या दोन मॅचेस मध्ये...

Pages