झुरळे ,रेल्वे आणि अच्छे दिन

Submitted by Mandar Katre on 26 February, 2016 - 04:02

अच्छे दिन कधी येणार अश्या काड्या टाकणार्‍या माणसांना घडत असलेले बदल कधीच दिसत नाहित त्यांना फक्त शिव्या घालणे जमेल. भारतात सध्या काय क्रांतिकारी बदल घडत आहेत हे कधीच कळणार नाही म्हणुन लिहितो आहे.
हा माझ्या मित्राच्या बाबतीत आज (२५ फेब्रुवारी रोजी) घडलेला किस्सा आणि हा त्याने मला स्वतः सांगितलेला आहे (व्हॉट्सअ‍ॅपवर). मित्र तपोवन एक्स्प्रेस ने मुंबईला चालला होता. बोगी मध्ये मोठ्या प्रमाणावर झुरळे होती. दुसर्‍या मित्राने त्वरित रेल्वे हेल्प्लाइन वर तक्रार करायला सांगितली. याने पॉर्टल वर तक्रार केली. थोड्याच वेळात तक्रारीत लक्ष घालत आहोत म्हणुन संदेश आला, त्यानंतर थोड्याच वेळात फोन आला, त्यानंतर पुढच्या स्टेशनवर कर्मचारी येउन स्वच्छता करुन आणि हिट मारुन गेला.
मेसेज केला,पोर्टलवर तक्रार बुक केली - 14:31
Indian Railways-CD (संदेश): Thank you for sending your complaint/suggestion to Indian Railways. We will revert to you after due investigation. ! : 14:40
रेल्वे कडून कॉल आला होता,कोणी क्लिनिंग करणारी माणसे आलीत का ? अशी विचारणा केली गेली.कोणी आले नाही तर कॉल करा असे म्हणाले.: 14:53
रेल्वेचा माणूस आला: 14:57
थोडक्यात सांगायचे तर ३० मिनिटात तक्रारीचे निवारण झाले. हा बदल सुरेश प्रभु आल्यावर झाला आहे. म्हणजेच भाजपा आल्यावर झाला आहे. आधीची सरकारे असताना रेल्वे ढिम्म असायची. शष्प परिणाम व्हायचा नाही तक्रारींचा. हा बदल आहे. हे अच्छे दिन आहेत. पण ज्यांना करवादयचेच असेल ते अजुनही म्हणतील की "मुळात बोगी मध्ये झुरळे आलीच कशी? म्हणजे स्वच्छताच नव्हती. हेच का अच्छे दिन? हीच का प्रभुंची कार्यक्षमता? काय झाले मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचे जर रेल्वेत झुरळे फिरत असतील तर?". त्यातुन एकच स्पष्ट होइल की ज्याला फक्त बोंबाच मारायच्या आहेत तो फक्त बोंबाच मारेल. एकदा का पिवळे चष्मे घातले की लाल गुलाब सुद्धा केशरीच दिसेल wink emoticon
( © मिपा मित्रांच्या व्हाट्सअ‍ॅप पोस्ट वरुन साभार )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरील घटना घडत असताना मदनबाण (बाणराव) यांच्याशी व्हॉट्सप वरती गप्पा सुरू होत्या. त्याचा वृत्तांत.

***************

गेले कांही दिवस बाणरावांच्या दौर्‍याचे फोटो आणि अपडेट्स आम्हाला लाईव्ह मिळत होते. त्यावरून त्यांची खेचणेही सुरू होतेच.

अचानक बाणरावांनी बाँब टाकला

**दुपारी २ वाजून ३० मिनीटे**
"आत्ता तपोवन एक्प्रेसनी मुंबईला परत येतोय, गाडीत प्रचंड झुरळे आहेत, मी आत्तापर्यंत १० झुरळे मारली, बसणे कठीण आहे :("

यावर उत्तर म्हणून एक नतद्रष्ट "हिहिहिहि" असा हसला.

पण लगेचच सर्वजण सक्रिय झाले आणि सूचनांचा पाऊस पडला.

- रेल्वे मिनीस्टरला ट्वीट करा, लगेच हिट घेवून येतील.

- फोटो पण टाका

बाणरावांनी लगेच सांगीतले.

**दुपारी २ वाजून ३१ मिनीटे**
"मेसेज केला, पोर्टलवर तक्रार केली"

**दुपारी २ वाजून ३८ मिनीटे**
मी विचारले - रेल्वे हेल्पलाईनकडून कॉल आला का?

बाणराव
**दुपारी २ वाजून ४० मिनीटे**
"कॉल नाही, फक्त मेसेज आला, जाँच सुरू आहे म्हणे" आणि त्यांनी रेल्वेचा मेसेजही चिकटवला
Indian Railways-CD: Thank you for sending your complaint/suggestion to Indian Railways. We will revert to you after due investigation.

-"नीट कार्यवाही झाली तर मिपावर धागा टाकायला विसरू नका" असे सांगून मी एका धाग्याची सोय करून घेतली Lol

बाणराव - अर्थातच.. पण शक्यता कमी वाटते. असा सावध पवित्रा घेतला.

नंतर अवांतर चर्चा सुरू झाली.

थोड्याच वेळात बाणरावांचा अपडेट आला
**दुपारी २ वाजून ५३ मिनीटे**
"आत्ताच रेल्वे कडून कॉल आला होता,कोणी क्लिनिंग करणारी माणसे आलीत का ? अशी विचारणा केली गेली.कोणी आले नाही तर कॉल करा असे म्हणाले".

एवढ्यावरच कपिलमुनींनी टाळ्या पिटून जल्लोश सुरू केला.

मुनींच्या उत्साहावर बाणरावांनी "कोणी येऊन तर दे आधी" असे लिहून पाणी ओतले.

-आत्ता 100 झुरळे आहेत, हिट मारलं तर लपलेली 1000 बाहेर पडतील. असाही एक सल्ला आला.

**दुपारी २ वाजून ५७ मिनीटे**
"रेल्वेचा माणूस आला".

अशी घोषणा बाणरावांनी केली. आणि पुराव्यादाखल त्याचे सात आठ फोटो टाकले.

बाणरावांच्या समस्येचे इतक्या लगेच निराकरण झाले हे बघून सर्वांनाच आनंद झाला.

- नमो प्रभुजी

- माझा स्वतःच विश्वास बसत नाही. (हे खुद्द बाणराव)

- टाळ्या टाळ्या टाळ्या

- आयला भारी आहे खरच आपण भारतात राहतो ?

- नक्की Indian Railway??

- अच्छे दिन कुठेतरी येतायत रे

- जबरदस्त, याला म्हणतात अच्छे दिन

- बाणराव मान गएं..!

- It's impressive, Too Good

..आणि आम्ही सर्वांनी ही घटना आणि फोटो बाकीच्या ग्रूप्सवरती चिकटवायला सुरूवात केली.

माझ्या एका काकाने अरे ते डासांचे हिट आहे अशी शंका काढली, मी ती शंका पुन्हा मिपा ग्रूपवर विचारताच

Mosquito hit also works on cockroaches.It contains d allethrin.

असा खुद्द डॉक्टर खरेंचा रिप्लाय आला. ऑथॉरिटी कडून सर्टिफिकेट मिळाल्याने शंकानिरसन झाले.

एका उत्साही मिपाकराने लगेच खालचा मेसेज लिहून व्हायरल केला.

**********************

अच्छे दिन कधी येणार अश्या काड्या टाकणार्‍या माणसांना घडत असलेले बदल कधीच दिसत नाहित त्यांना फक्त शिव्या घालणे जमेल. भारतात सध्या काय क्रांतिकारी बदल घडत आहेत हे कधीच कळणार नाही म्हणुन लिहितो आहे.

हा माझ्या मित्राच्या बाबतीत आज (२५ फेब्रुवारी रोजी) घडलेला किस्सा आणि हा त्याने मला स्वतः सांगितलेला आहे (व्हॉट्सअ‍ॅपवर). मित्र तपोवन एक्स्प्रेस ने मुंबईला चालला होता. बोगी मध्ये मोठ्या प्रमाणावर झुरळे होती. दुसर्‍या मित्राने त्वरित रेल्वे हेल्प्लाइन वर तक्रार करायला सांगितली. याने पॉर्टल वर तक्रार केली. थोड्याच वेळात तक्रारीत लक्ष घालत आहोत म्हणुन संदेश आला, त्यानंतर थोड्याच वेळात फोन आला, त्यानंतर पुढच्या स्टेशनवर कर्मचारी येउन स्वच्छता करुन आणि हिट मारुन गेला.

मेसेज केला,पोर्टलवर तक्रार बुक केली - 14:31

Indian Railways-CD (संदेश): Thank you for sending your complaint/suggestion to Indian Railways. We will revert to you after due investigation. ! : 14:40

रेल्वे कडून कॉल आला होता,कोणी क्लिनिंग करणारी माणसे आलीत का ? अशी विचारणा केली गेली.कोणी आले नाही तर कॉल करा असे म्हणाले.: 14:53

रेल्वेचा माणूस आला: 14:57

थोडक्यात सांगायचे तर ३० मिनिटात तक्रारीचे निवारण झाले. हा बदल सुरेश प्रभु आल्यावर झाला आहे. म्हणजेच भाजपा आल्यावर झाला आहे. आधीची सरकारे असताना रेल्वे ढिम्म असायची. शष्प परिणाम व्हायचा नाही तक्रारींचा. हा बदल आहे. हे अच्छे दिन आहेत. पण ज्यांना करवादयचेच असेल ते अजुनही म्हणतील की "मुळात बोगी मध्ये झुरळे आलीच कशी? म्हणजे स्वच्छताच नव्हती. हेच का अच्छे दिन? हीच का प्रभुंची कार्यक्षमता? काय झाले मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचे जर रेल्वेत झुरळे फिरत असतील तर?". त्यातुन एकच स्पष्ट होइल की ज्याला फक्त बोंबाच मारायच्या आहेत तो फक्त बोंबाच मारेल. एकदा का पिवळे चष्मे घातले की लाल गुलाब सुद्धा केशरीच दिसेल Wink

**********************

धन्यवाद मनोज.
हा सर्व व्रुत्तांत नीट मांडणी, फोटोसहित व संबंधितांच्या नावासिहत द्यावा.
त्यामुळे पुढे फेबु व ट्विटरवर पसरवण्यास मदत होईल.
अशा चांगल्या बातम्या पसरवणे गरजेचे आहे.

हे खरे आहे का? असल्यास मोदी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन!

खरे असावे. मी गेल्या जुलै मध्ये जनशताब्दीने प्रवास केला तेव्हा अस्वच्छतेबद्दल कुठे तक्रार करावी आणि करुनही काही उत्तर न मिळाल्यास काय करावे याचे बोर्ड ट्रेनमद्ये जागोजागी लावलेले पाहिले. आमच्यावर तशी वेळ आली नाही कारण ट्रेन सुरू झाल्यानंतर ४ तासांनी एकजण येऊन पुर्ण डब्यात झाडु मारुन गेला आणि जाताना कच-याचा डब्बाही खाली करुन गेला. मागे एकदा प्रवास केलेला तेव्हा दुस-या दिवशी सकाळी कच-याचा डब्बा इतका भरलेला की खाली सगळीकडॅ कचराच कचरा झालेला. ट्रेन सुरू झाल्यापासुन कोणीही तो खाली केला नव्हता.

आता आपल्या त्या तिक्कडचि अकडम बकडम काहि जण येऊन म्हणतीलही की ते "बाणराव मोदिंचे पेड लेखक आहेत, कशावरुन असे काही घडले होते?"

सुरेश प्रभू यांच्याविषयी कोणीच वाईट बोलत नाही. कार्यक्षमतेच्या बाबतीत त्यांचा संपूर्ण मंत्रीमंडळात पहिला क्रमांक आहे हे सगळेच जाणतात. कोण कार्यक्षम आणि कोण अकार्यक्षम हे सगळ्यांना, अगदी काड्या टाकणार्‍यांनाही व्यवस्थित समजते आणि ते अशा विधायक कामांवर टीका कधीच करीत नाहीत.
किस्सा आधीच वायरल झालेला आहे. आणि अर्थात प्रसार होण्याजोगाच आहे, पण, खालील वाक्य लेखाच्या सुरुवातीला नसते, किंबहुना लेखामध्येच नसते तर तुमचा लेख सकारात्मक झाला असता. (रेल--मंत्रालयाचे मूळ कृत्य खूपच विधायक/सकारात्मक आहे.)
"अच्छे दिन कधी येणार अश्या काड्या टाकणार्‍या माणसांना घडत असलेले बदल कधीच दिसत नाहित त्यांना फक्त शिव्या घालणे जमेल. भारतात सध्या काय क्रांतिकारी बदल घडत आहेत हे कधीच कळणार नाही म्हणुन लिहितो आहे''
उगीचच? तुम्ही किंवा कोणीच हा किस्सा लिहिला नसता तर त्यांना बदल कळलेच नसते का?
तुमचा लेख हा रेल-मंत्रालयाच्या कौतुकापेक्षा 'घ्या, हा घ्या सज्जड पुरावा. आता तरी जिरली ना?' या धर्तीचा वाटला.

मनोज, मूळ लेख वाचला होताच. आणि तो अत्यंत सकारात्मक होता. माझा प्रतिसाद श्री. मंदार कात्रे यांच्या लेखाला होता. मूळ लेखाला उद्देशून काहीही मी लिहिले नव्हते.
माझ्या काहीही शंका नाहीत आणि माझ्या प्रतिसादातूनही माझ्या काही शंका असतील असे जाणवण्याजोगे नाही.
सुरेश प्रभूंबद्दल काहीही शंका नाहीत, आणि आधीपासूनच आदर आहे.
मोदींचे किंवा भाजपचे विरोधक हे त्यांच्या चांगल्या गोष्टींनाही विरोध करतील असे गृहीत का धरावे? हे तर सरसकटीकरण झाले.

>>>> मोदींचे किंवा भाजपचे विरोधक हे त्यांच्या चांगल्या गोष्टींनाही विरोधच करतील असे गृहीत का धरावे? हे तर सरसकटीकरण झाले. <<<<<
तुम्ही अड्डा किंवा तत्सम धाग्यांवर जात नाही का कधी?

>>>मोदींचे किंवा भाजपचे विरोधक हे त्यांच्या चांगल्या गोष्टींनाही विरोधच करतील असे गृहीत का धरावे? हे तर सरसकटीकरण झाले.<<< Rofl निरागसतेची परमावधी

>>>तुम्ही अड्डा किंवा तत्सम धाग्यांवर जात नाही का कधी?<<< Lol

मायबोलीचा अभ्यास वाढवणे आवश्यक आहे.

हीरा - मग माझा गैरसमज झाला असावा.

उगीचच? तुम्ही किंवा कोणीच हा किस्सा लिहिला नसता तर त्यांना बदल कळलेच नसते का?
तुमचा लेख हा रेल-मंत्रालयाच्या कौतुकापेक्षा 'घ्या, हा घ्या सज्जड पुरावा. आता तरी जिरली ना?' या धर्तीचा वाटला.

हे वाचून मला वाटले की तुमच्या मते हाच लेख हा मूळ लेख आहे आणि त्यामुळे वरील कमेंट दिलीत.

मूळ लेखामध्ये असे काही नसल्याने मी त्याची लिंक दिली इतकेच.

मोदींचे किंवा भाजपचे विरोधक हे त्यांच्या चांगल्या गोष्टींनाही विरोधच करतील असे गृहीत का धरावे? हे तर सरसकटीकरण झाले.

सरसकटीकरण असले तरी दुर्दैवाने सध्या तशीच परिस्थिती आहे. वारंवार परदेशी जाण्यावरून हिणवणे, जनधन योजना, स्वच्छ भारत, मेक इन इंडीया वर झालेली टिका किंवा अगदी काल रेल्वे बजेटवर झालेली टिका यांवरून असे मत तयार झाल्यास आश्चर्य नसावे.

मात्र तुमच्या प्रतिसादावरून एक सहज सुचले, गेल्या दीड/पाऊणेदोन वर्षांमध्ये मोदींच्या कोणत्या योजनेला काँग्रेसने पाठींबा दिला आहे याची माहिती मला कशी मिळेल?

मुळात ट्रेनच्या डब्यात झुरळे आलीच कशी? आणि इतकी व्कॉंटीटीत झुरळे डब्यात चढत असताना रेल्वे प्रशासन काय करत होते? Wink

आणि स्प्रे वापरुन झुरळांना जिवानीशी मारायचा अधिकार ह्या सहिष्णु आणि सेक्युलर देशात रेल्वेला दिला कोणी? आता या सामुहिक झुरळ हत्याकांडाबद्दल सरकार विरोधात आमचे आशास्थान राहुलजी गांधीजी, केजरीवाल वगैरे लोक उपोषणाला बसले तर विरोधकांना चालेल काय? की परत या उपोषणला ते नौटंकी म्हणुन त्याची वासलात लावतील? Proud

हा सर्व व्रुत्तांत नीट मांडणी, फोटोसहित व संबंधितांच्या नावासिहत द्यावा.
त्यामुळे पुढे फेबु व ट्विटरवर पसरवण्यास मदत होईल.
अशा चांगल्या बातम्या पसरवणे गरजेचे आहे.>>
+१

While the JNU fracas and fiasco is being played out in the media for almost two weeks, this is what also happened

a) India struck a unique oil deal with UAE, which will land it 4 Million barrels of oil almost free after 5 years.

b) Indian Railways auctioned scrap for almost Rs.3000 crores through an online auction that is transperant and therefore scam free.

c) The MakeinIndia event in Maharashtra saw commitments of Rs.15.2 lakh crores. Even if we assume a 10% conversion of those commitments, there are possible investments of Rs.1.52 lakh crores.

d) First batch of 800 cars have been shipped from Chennai port to Kandla. Seaway movement of cargo within the country was not permitted under law. The present government changed that law. This would result in transportation costs dropping to almost 1/3rd from Rs. 1.50 per kg per km to Rs.0.50 per kg per km.

Good work is happening in the country. The government may not be working at a pace you desire, but it is working - away from the noise and hubris of the news channels !

Four Important News that media should have been specially covered this week, but were not at all mentioned by Press, hand in hand with Congress, as they are busy in terrorising people with news of intolerance, creating situations of suicide and such silly childish gimmicks misusing student community.

The FOUR IMPORTANT DEVELOPMENTS ARE:

1. World Bank has appreciated our Prime Minister Narendra Modi's favourite Project 'CLEAN INDIA' and announced support of 1.5 Billion Dollars for the project.
http://www.worldbank.org/en/news/press-release/2015/12/15/world-bank-app...

2. The 'Nuclear Energy Agreement' between India & Japan has been applauded by 'IEA- Inventions for Energy Alternatives' supporting Solar Energy Exploration and announced that with this collaboration India will achieve a GREAT MILESTONE in the use of solar energy that will be exemplary to the whole world.
http://www.world-nuclear-news.org/NP-India-Japan-reach-agreement-on-nucl...
3. Within the next one year GOOGLE is going to provide Free Wifi Service in 100 Railway Stations and are going to train 20 Lakh Android Developers which means that 20 Lakh Youth will get the JOB OPPORTUNITY.
http://www.cnet.com/news/google-to-install-free-wi-fi-at-400-railway-sta...
4. Henceforth CBSC Books will be available online for FREE. Central Minister Smriti Irani has planned this special project.
http://indianexpress.com/article/india/education-news/cbse-books-to-be-m...

When media and News Papers have lost their CONSCIOUS FOR SOCIAL RESPONSIBILITY, Indian citizens have to take this responsibility to reach this message to maximum VOTERS REGARDING THE PROSPECTS NAMO GOVERNMENT IS BRINGING FOR THEM.

Definitely, you will also carry out this responsibility as I have done by sharing this message with you.

We have responsibility towards Future Of India.

व्हॉट्स अप वरुन साभार , ......

सुरेश प्रभू यांच्याविषयी कोणीच वाईट बोलत नाही. कार्यक्षमतेच्या बाबतीत त्यांचा संपूर्ण मंत्रीमंडळात पहिला क्रमांक आहे हे सगळेच जाणतात. कोण कार्यक्षम आणि कोण अकार्यक्षम हे सगळ्यांना, अगदी काड्या टाकणार्‍यांनाही व्यवस्थित समजते आणि ते अशा विधायक कामांवर टीका कधीच करीत नाहीत.>>
+१

सुरेशप्रभू स्वतः irctc.co.in वरुन सगल्य जनतेच्य डायरेक्ट संपर्कात असतात.
मला (म्हणजे सगळ्याच आय आर टी सी टी च्या सदस्यांना) नियमितपणे त्यांची इमेल्स येत असतात.
(हे मागेही रेल्वेच्या एका धाग्यावर लिहिलेले आहे.)

याअगोदर अड्ड्यावरच्या सदस्यांनी त्यांना मायबोलीकरांच्या रेल्वेबद्दलच्या काही मागण्या शब्दांकीत करून दिल्या होत्या आणि त्यांचीही सुरेश प्रभूंकडून योग्य दखल घेतली गेली आहे. हे ही मायबोलीवर डॉक्युमेंटेड आहे.

http://www.maayboli.com/node/51626?page=6

इथे पाहू शकता.

>>>याअगोदर अड्ड्यावरच्या सदस्यांनी त्यांना मायबोलीकरांच्या रेल्वेबद्दलच्या काही मागण्या शब्दांकीत करून दिल्या होत्या<<<

अड्ड्यावरचे सदस्यही मायबोलीकरच असतात ना?

<<

>>>याअगोदर अड्ड्यावरच्या सदस्यांनी त्यांना मायबोलीकरांच्या रेल्वेबद्दलच्या काही मागण्या शब्दांकीत करून दिल्या होत्या<<<

अड्ड्यावरचे सदस्यही मायबोलीकरच असतात ना?>>

----- धर्म: मराठी
जात: मायबोली
पोट-जातः अड्डा, कट्टा... अशा अजुन काही भिन्ती बान्धायचे काम सुरु आहे...

वा चांगली बातमी! पण मला हिटच्या वासवाल्या डब्यात बसवलं नसतं फार काळ.:डोमा:

साती तो आयडी( ऋग्वेद )अड्डेकर आहे का? ऑ?'ऋग्वेद' आणि अड्डेकर?
जोक्स अपार्ट, आता आयडीवर क्लिक केल्यास पान पहायची परवानगी नाही असं येतंय. आता ऋग्वेद कोणत्या आयडीने आहेत? त्यांचंही अभिनन्दन!

तुम्ही अड्डा किंवा तत्सम धाग्यांवर जात नाही का कधी?

>>
मी अड्ड्यावरच्या सदस्यांचा उल्लेख लिंबुटिंबु यांनी लिहीलेल्या या तिरकस वाक्याच्या संदर्भात केला आहे.
त्याच्यावर तुम्ही खिदळूनही घेतलेले आहे.
आता अचानक मग 'अड्ड्यावरचे सदस्यही मायबोलीकरच असतात ना?' अशी साळसूद प्रतिक्रीया का बरे?

स्वतःच विचित्र कॉमेंटस लिहून किंवा दुसर्‍यांनी लिहिलेल्या कमेंटला दात काढून मग कोलांट्या उड्या का बरे?

साती,
खास "आमच्या" अड्ड्यावरील व्यक्तीने असे केले असे सांगण्यामागील आपला विचार नक्की काय आहे?
आपण सगळे भारतीय / मराठी / माबोकर नाहीत का?

Pages