झुरळे ,रेल्वे आणि अच्छे दिन

Submitted by Mandar Katre on 26 February, 2016 - 04:02

अच्छे दिन कधी येणार अश्या काड्या टाकणार्‍या माणसांना घडत असलेले बदल कधीच दिसत नाहित त्यांना फक्त शिव्या घालणे जमेल. भारतात सध्या काय क्रांतिकारी बदल घडत आहेत हे कधीच कळणार नाही म्हणुन लिहितो आहे.
हा माझ्या मित्राच्या बाबतीत आज (२५ फेब्रुवारी रोजी) घडलेला किस्सा आणि हा त्याने मला स्वतः सांगितलेला आहे (व्हॉट्सअ‍ॅपवर). मित्र तपोवन एक्स्प्रेस ने मुंबईला चालला होता. बोगी मध्ये मोठ्या प्रमाणावर झुरळे होती. दुसर्‍या मित्राने त्वरित रेल्वे हेल्प्लाइन वर तक्रार करायला सांगितली. याने पॉर्टल वर तक्रार केली. थोड्याच वेळात तक्रारीत लक्ष घालत आहोत म्हणुन संदेश आला, त्यानंतर थोड्याच वेळात फोन आला, त्यानंतर पुढच्या स्टेशनवर कर्मचारी येउन स्वच्छता करुन आणि हिट मारुन गेला.
मेसेज केला,पोर्टलवर तक्रार बुक केली - 14:31
Indian Railways-CD (संदेश): Thank you for sending your complaint/suggestion to Indian Railways. We will revert to you after due investigation. ! : 14:40
रेल्वे कडून कॉल आला होता,कोणी क्लिनिंग करणारी माणसे आलीत का ? अशी विचारणा केली गेली.कोणी आले नाही तर कॉल करा असे म्हणाले.: 14:53
रेल्वेचा माणूस आला: 14:57
थोडक्यात सांगायचे तर ३० मिनिटात तक्रारीचे निवारण झाले. हा बदल सुरेश प्रभु आल्यावर झाला आहे. म्हणजेच भाजपा आल्यावर झाला आहे. आधीची सरकारे असताना रेल्वे ढिम्म असायची. शष्प परिणाम व्हायचा नाही तक्रारींचा. हा बदल आहे. हे अच्छे दिन आहेत. पण ज्यांना करवादयचेच असेल ते अजुनही म्हणतील की "मुळात बोगी मध्ये झुरळे आलीच कशी? म्हणजे स्वच्छताच नव्हती. हेच का अच्छे दिन? हीच का प्रभुंची कार्यक्षमता? काय झाले मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचे जर रेल्वेत झुरळे फिरत असतील तर?". त्यातुन एकच स्पष्ट होइल की ज्याला फक्त बोंबाच मारायच्या आहेत तो फक्त बोंबाच मारेल. एकदा का पिवळे चष्मे घातले की लाल गुलाब सुद्धा केशरीच दिसेल wink emoticon
( © मिपा मित्रांच्या व्हाट्सअ‍ॅप पोस्ट वरुन साभार )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिलिंद तेव्हा देश गरिब होता.अनेक अडचणी होत्या. निवडणुकित १०००० कोटी खर्चले जात नव्हते.देशाला युध्दही करावे लागले होते. आठ लाखाचे सुट घातले जात नव्हते. आता तशी परिस्थिती आहे का?

आता तशी परिस्थिती आहे का?

आता तुमचे युवराज जे एन यु मध्ये जाऊन देशविरोधी कंटकाना समर्थन देत असतात !!

वाह्ह.. वाचनीय प्रतिसाद.

कार्यक्षम अ‍ॅडमीनचे विशेष अभिनंदन.

आंतरराष्ट्रीय नेता (स्टेट्समन) म्हणून अमेरिकेत मोदींचा डंका असा वाजतोय यात काही चुकीचे आहे का ?

हे पण खरे आहे का ?

तीव्र निषेध या प्रकारांचा

मेंदू नामक अवयवाचा उपयोग करणे त्यांच्याकडून अपेक्षित नाहीच.>>
काय मयेकर्स!! जेंव्हा काँगीज भ्रष्टाचारात कोटीच्या कोटी उड्डाने घेत होती तेंव्हा काँगी भक्तांनी त्यांच्या मेंदुचा केलेला उपयोग पाहायला आवडेल
....पुढच्या वेळी कोणीही येवो पण काँगीजला धडा मिळेल असं वाटलं होतं पण छे!!

Pages