झुरळे ,रेल्वे आणि अच्छे दिन

Submitted by Mandar Katre on 26 February, 2016 - 04:02

अच्छे दिन कधी येणार अश्या काड्या टाकणार्‍या माणसांना घडत असलेले बदल कधीच दिसत नाहित त्यांना फक्त शिव्या घालणे जमेल. भारतात सध्या काय क्रांतिकारी बदल घडत आहेत हे कधीच कळणार नाही म्हणुन लिहितो आहे.
हा माझ्या मित्राच्या बाबतीत आज (२५ फेब्रुवारी रोजी) घडलेला किस्सा आणि हा त्याने मला स्वतः सांगितलेला आहे (व्हॉट्सअ‍ॅपवर). मित्र तपोवन एक्स्प्रेस ने मुंबईला चालला होता. बोगी मध्ये मोठ्या प्रमाणावर झुरळे होती. दुसर्‍या मित्राने त्वरित रेल्वे हेल्प्लाइन वर तक्रार करायला सांगितली. याने पॉर्टल वर तक्रार केली. थोड्याच वेळात तक्रारीत लक्ष घालत आहोत म्हणुन संदेश आला, त्यानंतर थोड्याच वेळात फोन आला, त्यानंतर पुढच्या स्टेशनवर कर्मचारी येउन स्वच्छता करुन आणि हिट मारुन गेला.
मेसेज केला,पोर्टलवर तक्रार बुक केली - 14:31
Indian Railways-CD (संदेश): Thank you for sending your complaint/suggestion to Indian Railways. We will revert to you after due investigation. ! : 14:40
रेल्वे कडून कॉल आला होता,कोणी क्लिनिंग करणारी माणसे आलीत का ? अशी विचारणा केली गेली.कोणी आले नाही तर कॉल करा असे म्हणाले.: 14:53
रेल्वेचा माणूस आला: 14:57
थोडक्यात सांगायचे तर ३० मिनिटात तक्रारीचे निवारण झाले. हा बदल सुरेश प्रभु आल्यावर झाला आहे. म्हणजेच भाजपा आल्यावर झाला आहे. आधीची सरकारे असताना रेल्वे ढिम्म असायची. शष्प परिणाम व्हायचा नाही तक्रारींचा. हा बदल आहे. हे अच्छे दिन आहेत. पण ज्यांना करवादयचेच असेल ते अजुनही म्हणतील की "मुळात बोगी मध्ये झुरळे आलीच कशी? म्हणजे स्वच्छताच नव्हती. हेच का अच्छे दिन? हीच का प्रभुंची कार्यक्षमता? काय झाले मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचे जर रेल्वेत झुरळे फिरत असतील तर?". त्यातुन एकच स्पष्ट होइल की ज्याला फक्त बोंबाच मारायच्या आहेत तो फक्त बोंबाच मारेल. एकदा का पिवळे चष्मे घातले की लाल गुलाब सुद्धा केशरीच दिसेल wink emoticon
( © मिपा मित्रांच्या व्हाट्सअ‍ॅप पोस्ट वरुन साभार )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Yes sir surely you won't think that indian express is publishing fake news! >> ह्म्म्म्म. indian express ने छापलेले रोहितचे भाषण एका भक्ताला पाठवले तर तो म्हणाला "हॅ, ते तर prestitute आहे.' Wink

सनव वरच्या भुक्कड फॉरवर्ड मध्ये पण न्यूज़ पेपर च्याच liनक्शा होत्या, त्यामुळे ndtv किंवा इंडियन एक्सप्रेस ची लिंक खरी असा प्रश्न नाही आहे. बऱ्याचदा आलेले प्रेस रिलीज तसेच छापले जाते. वर रेल्वेच्या न्यूज़ बाबत 3-4 पेपर्स मध्ये सारखाच कन्टेन्ट आहे.
वर त्या न्यूज़ मध्ये " पहिल्यांदा केले" वगैरे क्लेम नाहीत. ती लिंक जेव्हा whats अप मेसेज बनून येते तेव्हा ही भक्तीची झूल चढ़ते.
हे तुमच्या लिंक बद्दल बोलत नाहीये, ते काम निःसंशय चांगलेच आहे

भरत तुम्ही तुमचा वेळ का वाया घालवत आहात ?
हे एक फॉरवर्ड खोटे आहे असे सिद्ध केल्याने लोकं पुढचे फॉरवर्ड आपले आपण तपासून पहातील अशी वेडी आशा वाटते का तुम्हाला ?
कुठेतरी एक पेड़ कन्टेन्ट रायटर 20%fact आणी उरलेला मसाला घालून पोस्ट बनवणार् , एक भक्त ती फॉरवर्ड करणार आणी आपण वेळ घालवून त्याचे काउंटर शोधायाचे आणी वर भक्तांना पटवायचे .
मग इट्स जस्ट अ फॉरवर्ड म्हणून भक्त पळ काढणार, 2 दिवसांनी हाच खेल नव्याने.

आधी वेगवेगळ्या ग्रुप वर येणारे forwards ना मी सुध्दा उत्तरे देत असे
पण लवकरच माझी गणना वेडसर आहे जरासा या सदरात होऊ लागल्याने मी वेळ घालवणे थांबवले आहे

सिम्बा,
Indian citizens have to take this responsibility to reach this message to maximum VOTERS REGARDING THE PROSPECTS NAMO GOVERNMENT IS BRINGING FOR THEM.

Definitely, you will also carry out this responsibility as I have done by sharing this message with you

मी भारताचा जबाबदार नागरिक आहे हो. राष्ट्रवादी आहे की नाही माहीत नाही.

ग्रुप्सवर मोदीभक्तच बोलके असतात. पण तिथे अनेक जण ६८% तलेही असतात. त्यांना नीरक्षीरविवेक करता यावा म्हणून लिहायचं. यासाठी मलाही काही लेबल्स लागलीत. सध्या देशद्रोहाचं लागलं असेल.

IBTL: NATION SHAMED! Fixing by Cong+Left in Rajya Sabha caught on cam

https://www.youtube.com/watch?v=BACBFg_L7kA&feature=share

मयेकर आणि समुह,
हा व्हीडीओ कसा बनावट आहे किंवा जे आरोप त्याच्या शिर्षकात केले गेले अहेत ते खोटॅ आहेत,
याच कृपया पुरावे द्यावे.

मागे एकदा कधीतरी मोदींवरुन तेल आणि तेलावरुन विजेवरच्या कार्स असा विषय भरकटत गेला तेव्हा एका मा. अड्डाजी साहेबांचे एक मा. मेंबरजी साहेब असे म्हणाले होते की एवड्या महाग टेस्ला कार्स, केव्ढ्या त्या किमती कोण घेईल का / घेत असेल का, काही उपयोगाच्या नाहीत, तेलावरच्याच गाड्या ब-या ई.

तर त्यांच्यासाठी: Electric Cars Could Wreak Havoc on Oil Markets Within a Decade
https://www.youtube.com/watch?v=jwHN6QQWv2g

IBTL ही भाजीपाला वाहेलेली टुक्कार संघटना आहे. त्यांच्या वेबसाईट नजरेखालून घातल्यास मानसिकता कळून येते असे लोक काहीही बघितल्यावर बिनडोक अर्थ काढण्यात पटाईट असतात.

सिंबा, मयेकर व समुह,
बघांह...... कोणत्याही मुद्दावर किंवा पुराव्यावर न बोलता बातम्या देणा-य संस्थेवर व्यक्तिगत हल्ल करणॅ चालु झालेले आहे.
हेच होते का तुमचे नीरक्षीरविवेक?

तुम्ही वेबसाईट बघितली का? त्यावरचे कंटेन्ट् वाचले का? नसल्यास आधी जाऊन वाचा मग बोला.
राहिले तो व्हिडीओ यावर मटामधे बातमी आली होती. वेळ पुर्ण होत आहे. इ. स्वरुपाचा इशारा असु शकेल वगैरे शक्यता वर्तमानपत्रात वर्तवली गेली.

बाकी नॅशनल शेम म्हणून या टुक्कार पक्षाला वाहिलेल्या भेकड संघटनेने स्तोम माजवणे म्हणजे स्वतःच्या अकलेचे जाहीर वाभाडे काढून घेणे झाले.

मोदीसरकारचे गुणगान करणार्‍या फॉर्वर्डसमधला फोलपणा दाखवून दिला की त्याबद्दल काहीही न बोलता दुसराच कोणतातरी विषय काढायचा या हातखंड्याशी अनेक व्हॉट्सॅप ग्रुप्स आणि मायबोलीमुळे चांगलाच परिचय आहे.

यांनी सतत काही ना काही फेकत राहायचे आणि ते चूक की बरोबर आहे हे आम्ही सिद्ध करायचे. मग हे पुढचं काहीतरी फेकायला तयार. बस्सीसाहेब म्हणतात तसं 'त्या विद्यार्थ्यांनी त्यांचं निरपराधित्व सिद्ध करायचं. " म्हणजे ते अपराधी आहेत हे सिद्ध करायची पोलिसांची जबाबदारी नाही, असंच ना?

राज्यसभेत जे घडलं ते चूक असेल तर एन्डीएचे खासदार मुकाटपणे सहन करतील असं वाटतं का?
दुसरीकडे लोकसभेच्या सभापतीबाईंनी कामकाजातले कोणते शब्द वगळले आणि कोणते कायम ठेवले याबद्दलची एक इंटरेस्टिंग बातमी वाचनात आली.

प्रतिसाद वाचत असता एक आश्चर्यकारक प्रतिसाद वाचण्यात आला. त्यात एकने विचारले की हे खरे आहे का. आता एक विचार करा श्री कात्रे याना खोटे सान्गायाची कायह्गरज आहे. म्हणजे आपल्यात प्रत्येकाविषयी अविश्वास भरला आहे की एका साध्या गोश्तिवर आपण सकारात्मक नजरेने बघूच शकत नाहि. धन्य आहात आपण.

दिगोची, कारण अशा मेसेजेसचा मारा सतत होत असतो. अगदीच खोटे नाहीत, पण ज्यातलं खरं शोधावं लागतं असे मेसेजेस. तुम्ही सगळे प्रतिसाद वाचले तर मासले मिळतीलच.

भाजप कायम इलेक्शन मोडमध्येच/प्रचारकाच्या भूमिकेत राहणार. आत्ताच २०१९ च्या निवडणुकांचे वेध लागलेत अनेकांना. म्हणूनच सुरेश प्रभूंचं विशेष कौतुक वाटतं. ते करूनसवरून नामानिराळे राहतात.

ईराणीबै फेस्बुकावरच्या पोष्टी वाचुन दाखवतात तसं आता व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वाचुन अच्छे दिन आल्याचे समाधान मानुन घ्यायचे तर Lol

दीगोची, डोळ्याने बघितलेले वीडियो 2 दिवसांनी खोटे असल्याचे कळते, अशा परिस्थितीत छापील शब्दावर अविश्वास दाखवला कोणी तर इतके वाईट वाटून घेऊ नये

हितेश ते मिलिंद जाधव या id बद्दल बोलत आहेत ज्यानी सम्बन्ध नसलेले whts app फॉरवर्ड टाकून चर्चेचा रोख बदलला

एक चांगला अनुभव म्हणुन या प्रसंगाचे खचितच वर्णन करता येईल. पण त्यावरुन 'अच्छे दिन' वगैरे आल्याचे जाहीर करणे हे भाबडेपणाचे वाटते.

चांगला अनुभव आहे.
पहिल्या पानावरच्या काही सोडल्या तर नंतरच्या पानांवरच्या विषयापासुन भरकटत चाललेल्या प्रतिक्रीया बघुन लिहीणार नव्हते पण रेल्वेचा खरोखरच चांगला अनुभव गेल्या काही महिन्यात आला आहे त्यामुळे लिहायचे ठरवले. काही वेळा कोकण भाग, नागपुर आणि सोलापुर इथे जाऊन आलेय गेल्या काही महिन्यात.

-डब्यात ( २ आणि ३ टियर एसी ) क्लिनिंग बद्दल बोर्ड सर्वत्र लावलेले आहेत.
-एकदा डब्यात पाणी सांडून चिखल झाला तर सुपरवायझर येऊन सफाई करणार्याला रागावला आणि ते स्वतः थांबुन नीट साफ करुन घेतलं.
-ऑनलाईन तिकीट काढलं असेल तर प्रत्येकवेळी प्रवास झाल्यावर एक एस एम एस येतो त्यात गाडीतली स्वच्छता कशी होती, चादरी , उशा वगैरे मिळाल्या का हे विचारले जाते. त्या सम्स ला रिप्लाय करते मी.
- गाडीतले टॉयलेट्स खरोखरच स्वच्छ असतात.
-काही रुट वर मुख्यतः को. रे च्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधे बायो टॉयलेट्स आहेत.
- सोलापुर स्टेशन चक्क बर्यापैकी स्वच्छ दिसलं. ( आधीचे पाहीले असेल त्याला मी काय म्हणते हे कळेल)
- अलिकडेच ऑनलाईन फुड ऑर्डर करता येते असेही ऐकले ( पण हे पाहिले नाहीये)

रेल्वे गाडितल्या चादरी वापरताना सावधान. तुम्ही आजार ओढावुन घेउ शकता.चादरी दोन महिन्यातुन एकदा धुतल्या जातात.आजच ABPLive वर दाखवत होते.

न धुतलेल्या चादरी कधी पाहिल्या नाहीत.
ब्लॅंकेट्स प्रत्येक वेळी धुतल्या जात नाहीत, हे माहिती आहे, आणि ते दिसतेपण.

मी लहानपणापासुन रेल्वेने प्रवास करते , चादरी नेहेमी लाँड्रीतुन आलेल्याच दिसल्या आहेत.
मी लहान असताना, आणि आता माझी मुलगी , भाचा, इतर लहान मुले सगळे या चादरी प्रवासात वापरतो. अजुनतरी आजारी पडलो नाहीये.
ब्लँकेट डायरेक्ट वापरु नये. त्याला आतुन चादर लावावी किंवा त्यावर चादर अंथरुन मग झोपावे

Pages