तुम्ही न पाहिलेल्या माबोकरांच्या व्यक्तीमत्वाची तुमच्या मनातील प्रतिमा

Submitted by अभि_नव on 17 February, 2016 - 03:32

ज्या माबोकरांना तुम्ही प्रत्यक्ष भेटलेले नाहीत किंवा छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्या सदस्यांच्या माबोवावरातुन तुमच्या मनात त्यांच्या व्यक्तीमत्वाची तयार झालेली प्रतिमा साकारायची आहे.

कोणाचाही अपमान करु नका आणि आपल्याबद्दल (सामाजीक संकेत पाळुन) लिहिले असेल तर अपमान वाटून घेऊ नका!

सभ्य शब्दांची मर्यादा पाळा आणि उगाच कोणत्याही उल्लेखामुळे जाती, धर्माची भावना दुखावुन घेऊ नका.

प्रेरणा - लिंक पहिल्या प्रतिसादात दिली आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, भावना पोचल्या पण "साधे" ह्या शब्दाच्या वापरावरून गम्मत करत होते .. Happy

परत एकदा "एक्स मिल्ट्रीमन" ही साधे असू शकतात .. आणि सिव्हिलियन (एक्स्/करन्ट) अजिबात साधे नसणारे .. Wink Happy

तगडी तब्ब्येत, पिळदार मिशा, करारी आणि भेदक नजर, इ. इ. वाटत होते. >>>> ह्यातले एकही वर्णन अशोक पाटील यांना लागू पडत नाही Happy

हर्पेन : या आयडीवरून एकतर ही गृहिणी असावी आणि दुपारच्या वेळी घरातले सगळे काम उरकल्यावर आवडीचे गाणे ऐकता ऐकता हरवून गेली असावी असे वाटते. हरवेन मी, हरपेन मी सारखे. Wink
हर्पेन, माफ कर रे Happy

बहुतेक अ‍ॅक्टिव्ह आय डीं ना मी भेटलेलो असल्यामुळे किंवा छायाचित्रे पाहिलेली असल्यामुळे वेगळ्या प्रतिमा मनात नाहीत. असंबांना भेटलेलो नाही, एक्सेप्ट एक! ती लहानपणी कशी दिसायची ह्यावरून आत्ता कशी दिसते हे सांगता येणार नाही.

माझ्या लिस्टीत
अशोकमामा - गिरीश कर्नाड
गिरीश कर्नाड यांच्याकडे बघूनच काहीतरी अभ्यासू व्यक्तीमत्व बघितल्याचा फील येतो. तसाच फील अशोकमामांची पोस्ट वाचायला सुरुवात करायच्या आधी येतो.

>>>गिरीश कर्नाड यांच्याकडे बघूनच काहीतरी अभ्यासू व्यक्तीमत्व बघितल्याचा फील येतो<<<

हाच तर त्यांचा अभिनय आहे. अमोल पालेकरही त्यातलेच.

या खुसखुशीत आणि अगदी कौटुंबिक पातळीवर चाललेल्या चर्चेचा आनंद बहुतांशी सदस्य घेत असल्याचे मी अगदी पहिल्या पानापासून वाचत आलो आहे. आज इथे माझ्याबद्दलही चर्चा काही सन्माननीय सदस्यांनी केल्याचे वाचले आणि आनंद झाला मला.

जाई ही माझी भाचीच असल्याने तिला मी भेटलो असणे साहजिकच आहे. तर तिने मी कसा नाही हे तर वर सांगितले आहेच. पुढे ऋन्मेष यानी गिरीश कर्नाडसमवेत मला बाकावर जागा दिल्याचे वाचून बरे वाटले. मी साठी ओलांडली आहे आणि शासकीय सेवेतून निवृत्त झालो असल्याने आता नोकरीची कोणती जबाबदारी नाही. मिळत असलेली पेन्शन समाधानकारक असल्याने तिकडूनही कसली तक्रार नाही. घरीही अन्य सर्वसामान्य कुटुंबात असते तसेच समाधानी वातावरण आहे आणि मी मायबोलीवरील विविध चर्चांचा अगदी मनापासून आनंद घेत आलो आहे...घेत आहे.....पुणे, कोल्हापूर आदी ठिकाणी अनेक मायबोली सदस्यांसमवेत झालेल्या गटगमध्ये मी असल्याने बर्‍याच भाचेभाच्यांना भेटत असतो. थोडक्यात एका आनंदी आणि ज्येष्ठ व्यक्तीची प्रतिमा कशी असू शकेल तसा मी आहे.

जाई, बघ ना. आता बोबडं बोलायची प्रॅक्टिसपण करून घेते.

मायबोलीवर गेल्या काही वर्षांत माझी इमेज एकदमच बदलली गेली असं ध्यानांत आलंय.

>>>>> आपण भेटलोय कर्जत वविला. <<<<<
अरे हो की मंजुडी...... आठवलं.... मी असा खाली उभा होतो शेडच्या बाहेर पोर्चमधे, तुम्ही अशा एक पायरी वर उभ्या होता शेडच्या आत... तुम्ही म्हणालात की मी अमुक तमुक... मग मी आ वासुन मान वर करुन तुमच्याकडे पाहुन घेतले... अन तरीही तिथे तुमच्या 'अमुकतमुक' नावाची सांगड तुमच्या आयडीशी घालता येईना म्हणुन नाद सोडून दिला..... छानसे नमस्कार चमत्कार केले, अन मी तिथुन बाजुला जाउन विचारात पडलो. की या बाई "मायबोलीवर नेमक्या कोण?"
तो कोणत्या सिनेमामधे अनुपम खेर नै का बस मधल्या लोकांना क्या कैसे हो, बीबि बच्चे कैसे है विचारायचा अन पुढे आख्खा प्रवासभर तो माणुस, "हा अनुपम खेर नेमका कोण, याला कुठे पाहिलाय, काय संबंध" याचा विचार करुन हैराण व्हायचा, अगदी त्या माणसासारखेच झाले माझे...... खरे नाव अन आयडी यांची सांगडच लागेना.....

बाकी प्रत्यक्ष भेटीत मात्र तुम्ही "खडूस" वगैरे वाटला नाहीत हां...... फक्त तेव्हाच तुमची आयडी आठवली अस्ती तर मात्र नक्कीच "टेस्ट" केली असती खडूस आयडीवर... Proud

लिंबूटिंबू काकांना मी भेटले नाहीये फोटो पाहिलेत त्यावरून ते एक मध्यमवर्गीय व्यक्तिमत्व वाटतात . चाळीशीच्या पुढचे साधारणतः , प्रांपचिक जबाबदारी असलेले ,कठीण प्रसंगातून गेल्याच्या खुणा व्यक्तित्वावर असलेले . सिनेमाच्या भाषेत बोलायचं झाल्यास एक चरित्र व्यक्तिमत्व . त्यांची सर्वच मत पटतं नाही . विशेषतः ब्रिगेडी नक्षली वाक्य सुरु झालं की हसायलाच येत . थोडक्यात मध्यमवयीन संसारी प्रेमळ व्यक्तिमत्व असावेत .

जाई, तू फेसबुकवर बघितले असशील की फोटो माझे.... खूप फोटो आहेत तिथे माझे. बाकी तू केलेले वर्णन बरोबर आहे. "कनिष्ठ मध्यंमबर्गीय पांढरपेशा"....

दिनेशभौ, फोटो मस्त आहे.... खूप पूर्वी आपण भेटालो होतो घोले रोडच्या टोकाच्या ज्ञानेश्वर पादुका चौकात, त्यावेळेपेक्षा या फोटोत जास्त चांगले दिसता आहात. Happy

Happy

Pages