तुम्ही न पाहिलेल्या माबोकरांच्या व्यक्तीमत्वाची तुमच्या मनातील प्रतिमा

Submitted by अभि_नव on 17 February, 2016 - 03:32

ज्या माबोकरांना तुम्ही प्रत्यक्ष भेटलेले नाहीत किंवा छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्या सदस्यांच्या माबोवावरातुन तुमच्या मनात त्यांच्या व्यक्तीमत्वाची तयार झालेली प्रतिमा साकारायची आहे.

कोणाचाही अपमान करु नका आणि आपल्याबद्दल (सामाजीक संकेत पाळुन) लिहिले असेल तर अपमान वाटून घेऊ नका!

सभ्य शब्दांची मर्यादा पाळा आणि उगाच कोणत्याही उल्लेखामुळे जाती, धर्माची भावना दुखावुन घेऊ नका.

प्रेरणा - लिंक पहिल्या प्रतिसादात दिली आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पादुकानन्द ,
तुमच्या डोक्यात कोण आहे ते तुम्हालाच ठाऊक..
पण बोलताना जरा भान ठेवा प्रतिसादात.. वाचायला सुद्धा घाण वाटतं..

by sanshodhak लिंबूटिंबू- नावाप्रमाणेच खोडकर खट्याळ निरागस वाटणारे पण बेरकी व्यक्तिमत्व. एखादा आयडी लहान समजून अंगावर आला तर शिंगावर घेणारे दोस्तोंका दोस्त दुश्मनोंका दुश्मन असणारे. हलकेच घ्या!
बरोबर ओळखलेत Happy मिथुन रास मिथुन लग्न, सबब मनाने चिरतरुण.... योग्य त्या दुसर्यास श्रेष्ठत्व देऊन, पुढारीपण देऊन स्वतःकडे "लहानपण" अनुयायीपणा स्विकारणारे मन, पण वेळेस अति होतय असे दिसल्यास वीजेच्या वेगाने सर्व सूत्रे स्वतःच्या हातात घेण्याची राखीव क्षमता.

by kaapoche ४. लिंबुटिंबू आवडता आयडी आहे. त्यांच्या पोस्टी वाचण्याचा प्रसंग येत नाही पण जेव्हढं काही वाचतो त्यावरून राम लखन मधले माधुरीचे पप्पा आठवतात.
इथे पण कोड्यात बोलतो, मला रामलखन आठवत नाही, त्यातलि माधुरि नाही की नाही तिचे पप्पा आठवत. Sad
अन माझे लिखाण वाचित नाई तुम्ही हे काय बरे नाही हो..... किती मधुररसाला मुकताय तुम्ही... Proud
अन तुमचा फोटो कधी कुठे बघितला हो?

by ashvinI लिंबुटिंबू : रोक ठोक व्यक्तिमव्त, 'नाठाळ्याच्या माथी हाणु काठी' टाइप, याच्या विचारन्चि बैठ्क पक्की आहे. स्वतःचे मत न बदलणारे , चतुर, धार्मिक आसावे. हे आणि दिनेशदा एकाच वयाचे असावेत.
अगदी बरोब्बर, फक्त दिनेशदा वयाने थोडे लहानच असावेत माझ्यापेक्षा. मात्र त्यांच्या देशविदेशातील वास्तव्याचा, कामाचा अनुभव दांडगा, म्हणूनच मायबोलीव्र माझ्यापेक्षा वयाने लहान असणार्‍यांनाही त्यांच्या कर्तुत्वामुळे मी माझ्यापेक्षा मोठेच मानतो त्यातिलच हे एक व्यक्तिमत्व.

by praku लीम्बुजी - बारीक अंगकाठी असलेले धोतर नेसणारे. पूजा सांगायला येणाऱ्या गुरुजींसारखी प्रतिमा. यांचे आडनाव जोशी असेल असे मला नेहमी वाटते. टिपिकल 'जोशी टाईप' आहेत हे.
होय हो, निवडक दिवशी माझा असाच वेश असतो. बारीकच आहे मी अजुन तरी. मात्र आडानाव "एकारान्त / त्यातुन रेकारान्त" कोब्राचे आहे. जोशी नाही.

by prakash ghatpande लिंबूटिंबू- शरद पोंक्षे टाईप
प्रकाशराव, हा मी माझा बहुमान समजतो. पण मी दिसायला तसा नाही. शरद पोंक्षे करारी/रुबाबदार व्यक्तिमत्वाचे आहेत. माझ्यात त्यातिल एकही लक्षण नाही, ते हजारालाखतही उठुन वेगळे दिसतील, मी दोनचार जणातही दखल न घेण्यासारखा बाजुला पडीक असेन.... Wink

सस्मित, गोरी आणि उंच मी आहेच, पण शिल्पा तुळसकर :इश्शः
ती खूपच सुंदर आहे गं दिसायला. आणि तिचा स्वभावही शांत असावा.

काही मायबोलीकरांच्या मनात माझी ऑनलाईन प्रतिमा 'खड्डूस' अशी होती, मला भेटायच्या अगोदर, आणि मुग्धानंदसारख्या दुष्ट कुचकट मैत्रिणींनी 'हो, हो, खरंय, आहेच ती खड्डूस!' म्हणत दुजोरा दिला होता Biggrin

>>>> काही मायबोलीकरांच्या मनात माझी ऑनलाईन प्रतिमा 'खड्डूस' अशी होती, मला भेटायच्या अगोदर <<<<
मला वाटते की मंजुडी, मी तुला अजुनही भेटलो नाहीये, बघितले नाहीये..... तेव्हा त्या काही माबोकरात मी देखिल आहेच्चे... Proud
फक्त तू मुम्बैकर असल्याने "अगदीच कै त्या निवडक पुणेरी पेठी स्त्रीपुरुष आयड्यांसारखी प्रत्यक्षातही " खडुस असशील असे वाटत नै बर्का... Wink

भेटण्या अगोदर खडुस अशी प्रतिमा नंतर बदलली का नाही ते सांगा आधी Light 1

मला तर रोज भेटणारे सुध्धा, घरचे दारचे सगळेच बरीच रीजर्व आहे/ थोडी खडुस वाट्टे नै असं म्हणतात.:-)

वाईट काहीच नाही नी Proud

भेटण्या अगोदर खडुस अशी प्रतिमा नंतर बदलली का नाही ते सांगा आधी दिवा घ्या>> सस्मित, यावर नो कमेंट्स! उगाच कशाला ना मला खडूस समजणार्‍यांच्या मनातली प्रतिमा बदलायची Wink

रिया-गहु वर्णिय, तब्यत बरी- म्हणजे जाड हि नाही बारिक ही नाही, पक्की चिकित्सक, सर्व क्षेत्रात- लिखाण, कविता, पाककला, देव धर्म, कला-सगळच येणारी पण मनापासुन ऑफ़िस काम आवडणारी, स्वभाव मिश्र-जे असेल ते समोर पण तरी जरा जपुन- मन जापुन-राखुन
>>>
Lol
यातलं एकही नाही गं Rofl
पाककला वाचून उडून पडले तरी पण धन्स Happy

ऋन्मेष, पोहचलं Wink धन्स

स्मिते Happy

मी कुणाकुणाचा डूआयडी होते एकेकाळी. Proud माझेपण दोन चार डु आयडी येऊन गेले. मग वविला लोकं प्रत्यक्ष माझ्यासकट माझ्या डुआयडीला भेटली होती.

काय धमाल चाललीये या धाग्यावर..
ऋन्मेष... मी श्रीदेवी????????? ऊप्स... मेरेपर ( किंबहुना श्रीदेवीपर Wink ) क्यूं ये जुल्म??
यंदा वर्षाविहाराला हजेरी लाव... सब गलतफहमियोंको दूर कर्नेके लिये Lol

मामी--- लेडी अशोक सराफ... अरारारा... Rofl , ऋ ला नक्कीच नाही मिळणार साजूक तुपातला शिरा.. हीही

"फेरफटका - क्रिकेट तर आहेच. पण आपल्या उपमा उदाहरणे बघून द्वारकानाथ संझगिरी आठवतात. त्यांचे लेखही मी मधूनच वाचायला सुरुवात केली तरी समजते की हा लेख त्यांचाच असणार. आपलीही एखादी उपमा वाचनात आली की मी वर आयडी नाव बघून कन्फर्म करतो की येस्स फेरफटकाच आहेत." - ऋन्मेष, बस, अब रुलायेगा क्या? Wink

बऱ्याच माबोकराना / माबोकरिणीना प्रत्यक्षात भेटलेय. ( ववि त्यासाठीच तर असतो Lol )
इथल्या पोस्ट्स भारी आहेत . गंमत वाटली वाचून .

अभ्यासपुर्ण पोष्टी लिहिणारे अशोक यांना एकदा प्रत्यक्ष भेटायची ईच्छा आहे.
ते दिसायला एक्स मिल्ट्रीमनसारखे असावेत असे वाटते. Happy

>> या नावामुळे तगडी तब्ब्येत, पिळदार मिशा, करारी आणि भेदक नजर, इ. इ. वाटत होते. स्मित

>> नाही, ते साधे आहेत.

तगडी तब्येत, पिळदार मिशा, करारी आणि भेदक नजर असलेली माणसं साधीही असू शकतात की .. Wink

Pages