तुम्ही न पाहिलेल्या माबोकरांच्या व्यक्तीमत्वाची तुमच्या मनातील प्रतिमा

Submitted by अभि_नव on 17 February, 2016 - 03:32

ज्या माबोकरांना तुम्ही प्रत्यक्ष भेटलेले नाहीत किंवा छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्या सदस्यांच्या माबोवावरातुन तुमच्या मनात त्यांच्या व्यक्तीमत्वाची तयार झालेली प्रतिमा साकारायची आहे.

कोणाचाही अपमान करु नका आणि आपल्याबद्दल (सामाजीक संकेत पाळुन) लिहिले असेल तर अपमान वाटून घेऊ नका!

सभ्य शब्दांची मर्यादा पाळा आणि उगाच कोणत्याही उल्लेखामुळे जाती, धर्माची भावना दुखावुन घेऊ नका.

प्रेरणा - लिंक पहिल्या प्रतिसादात दिली आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

महेश कोठारे Uhoh
धन्यवाद Proud

अशी हँडसम आहे प्रतिमा निवडली की ड्युआय आहे असा समज होऊ शकतो. मी काही तरूण बिरूण नाही. सत्तरीला आलेला इसम आहे. अनुपम खेर सारांशमधला इमॅजिन करून पहा.

<<<<अशी हँडसम आहे प्रतिमा निवडली की ड्युआय आहे असा समज होऊ शकतो. मी काही तरूण बिरूण नाही. सत्तरीला आलेला इसम आहे. अनुपम खेर सारांशमधला इमॅजिन करून पहा.>>>>Proud Proud Proud

giphy (1).gif

आशुचैंप भाऊ - मध्यम बांधा भरघोस दाढ़ी अन साइकिलिंग च्या वेशात
>>>>>>
माझे वर्णन...तंतोतंत खरे....सध्या दाढी उतरवलीये..पण काही काळापुरता होतो अशाच वेशात

अगदी भरून आलं ... (मी सहसा माझे फोटो इथे टाकत नाही पण... ) तर हा माझा लेटेस्ट फोटो. ४ दिवसांपुर्वीच दार्जीलिंगच्या हिमालयन मांऊटेनियरींग ईन्स्टीट्यूटच्या आवारात काढलेला.. गाल अंमळ वर आलेत म्हणून डोळे दिसत नाहीत ( फोटो माझा मित्र डॉ. विवेक ने काढलेला आहे. )

DSCN1286.JPG

आणि टोपी मुद्दाम घातलीय... केस आहेत कि नाहीत याबाबत थोडा सस्पेन्स असावा म्हणून.. पण मी भाग्यवान आहे, अनेक मायबोलीकरांना प्रत्यक्ष भेटलो आहे, अगदी कालही एका मायबोलीकराच्या घरीच होतो, चहापानाला.

दिनेशदा छान फोटो. आधीही तुमचा फोटो तुमच्याच एखाद्या धाग्यात वा प्रोफाईलला कुठेतरी पाहिला होता.

आमच्या ऑर्कुटग्रूपवर सभासदांचे ओरिजिनल फोटो टाकायचा एक धागा होता तो आठवला. मी तिथे लोकांना वीट येईपर्यंत माझे फोटो टाकायचो. जणू तो धागा माझा फोटो अल्बमच बनवून टाकला होता.

बेफि : गन्भीर शान्त व्यक्तिमत्व
साति : like Dr.
नन्दिनि : साउथ इन्डियन सार्खि दिसत असावि
ऋन्मेश : शाहिद कपुर

सोन्याबापु : अक्शय कुमार

नन्दिनि : साउथ इन्डियन सार्खि दिसत असावि>>>>:स्मित: नाही, नन्दिनी छान दिसते. पुपुवर की तिच्या ब्लॉगवरच किन्वा मला वाटत यो रॉक्स च्या जन्जिरा सहली च्या फोटोत तिचा फोटो पाहीलाय.

सोन्याबापु= अक्षय्कुमार? चिन्ताता चिता चिता चिन्ताता ता. त्यापेक्षा ते रमेश भाटकर सारखे मॅनली दिसत असतील. अक्षय देखणा आहेच. पण सोन्याबापु मला तसे वाटतात.

नन्दिनि : साउथ इन्डियन सार्खि दिसत असावि>>>>स्मित नाही, नन्दिनी छान दिसते>>>> छान दिसणारे साउथ इन्डियन बरेच असतात हो रश्मी..

<<<आमच्या ऑर्कुटग्रूपवर सभासदांचे ओरिजिनल फोटो टाकायचा एक धागा होता तो आठवला. मी तिथे लोकांना वीट येईपर्यंत माझे फोटो टाकायचो. जणू तो धागा माझा फोटो अल्बमच बनवून टाकला होता.>>>

मग इथेही टाक की तुझे फोटो
तुझा फोटो पाहण्याची उत्सुकता बऱ्याच जणांना आहे

नन्दिनि : साउथ इन्डियन सार्खि दिसत असावि>>>>स्मित नाही, नन्दिनी छान दिसते
>>
आखिर कहना क्या चाहती हो?
साऊथ वाले छान नही होतें?

<<<आमच्या ऑर्कुटग्रूपवर सभासदांचे ओरिजिनल फोटो टाकायचा एक धागा होता तो आठवला. मी तिथे लोकांना वीट येईपर्यंत माझे फोटो टाकायचो. जणू तो धागा माझा फोटो अल्बमच बनवून टाकला होता.>>>

मग इथेही टाक की तुझे फोटो
तुझा फोटो पाहण्याची उत्सुकता बऱ्याच जणांना आहे + ११११

अरे अक्षय कुमार काय रमेश भाटकर काय! मी भाऊ कदम आहे हो दिसायला! अन भाषा भारत गणेशपुरेची आहे माझी, इकडे सेलेक्ट झालो म्हणून बरे कर्मधर्मसंयोगाने नाहीतर ह्या दोघाना बेरोजगार केले असते

बाकी नंदिनी तै - सावळ्याश्या अन रेगुलर मधे कॉटन व् स्पेशल फंक्शनला कांजीवरम चॉइस करणाऱ्या ताई

रश्मी तै - मध्यम ऊंची अन ब्लंट कट केस गव्हाळ वर्ण

दिनेश दादांनी हवाच काढली राव! Proud

दाद - बॉब कट इंटेलेक्चुअल लुक

बाकी आठवतील तसे

Pages