तुम्ही न पाहिलेल्या माबोकरांच्या व्यक्तीमत्वाची तुमच्या मनातील प्रतिमा

Submitted by अभि_नव on 17 February, 2016 - 03:32

ज्या माबोकरांना तुम्ही प्रत्यक्ष भेटलेले नाहीत किंवा छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्या सदस्यांच्या माबोवावरातुन तुमच्या मनात त्यांच्या व्यक्तीमत्वाची तयार झालेली प्रतिमा साकारायची आहे.

कोणाचाही अपमान करु नका आणि आपल्याबद्दल (सामाजीक संकेत पाळुन) लिहिले असेल तर अपमान वाटून घेऊ नका!

सभ्य शब्दांची मर्यादा पाळा आणि उगाच कोणत्याही उल्लेखामुळे जाती, धर्माची भावना दुखावुन घेऊ नका.

प्रेरणा - लिंक पहिल्या प्रतिसादात दिली आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> ६०-६५ वर्षाचे आजोबा, स्वच्छ सदरा-लेन्गा आणि सोनेरी काड्यांचा चश्मा घालणारे. >>> मला भेटू नका रे कुणी ! हार्ट अ‍ॅटॅकने काही तरी व्हायचं <<<<<<
क्का? अगदी अस्वच्छ गचाळ सदरा लेन्गा पट्ट्यापट्ट्याचा मागे ठिगळ लावलेला पायजमा, तुटक्या काडीचा जाड तडकलेल्या भिंगाचा चष्मा असे रुप जरी प्रत्यक्षात समोर आले, तरी त्यामुळे "हार्ट अ‍ॅटॅकनेच काही तरी होईल" हे कशावरुन? Wink Proud

नंदिनी : पुरात्ची थलैवी डॉ डॉ डॉ जयललितांप्रमाणे करारी पण प्रेमळ व्यक्तीमत्व. मायबोलीकर घरी आले तर कधीतरी दिलेल्या प्रतिसादावरून झाप झाप झापणार( जयललिता आमदारांना झापतात तसे) पण राग निवळल्यावर मिळाग रसम, कांजीवरम इडली, हयग्रीव असे पदार्थ खायला देणार.

आस्चिग : शेल्डन कूपर प्रमाणे भौतिकशास्त्रात अत्यंत हुषार पण मितभाषी व्यक्तीमत्व. एखाद्या सुंदर मुलीने फोन नंबर मागितला तरी लँबडा, पाय, ई,आय वगैरे राक्षस असलेले एक इंटिग्रल सांगणार. त्या इंटिग्रल चे उत्तर म्हणजेच फोन नंबर.

एखाद्या सुंदर मुलीने फोन नंबर मागितला तरी लँबडा, पाय, ई,आय वगैरे राक्षस असलेले एक इंटिग्रल सांगणार. त्या इंटिग्रल चे उत्तर म्हणजेच फोन नंबर.>> Rofl

ते चिनुक्स बद्दल पण भारी लिहिलय.
या निमित्ताने ते हार्टलेस चिनुक्स प्रकरण आठवलं. Happy

१. बेफि - थोडा अस्पष्ट असा फोटो पाहिलाय. स्वभावात - लगेच राग येत असावा. थोडे रीजर्व असावेत. तोंडदेखलं सगळ्य्यांशी छान वागत हसत असतील पण त्या माणसाशी चांगले संबंध असतीलच असं नाही. असं व्यक्तीमत्व. बेफी रागावु नका हं. Happy
२. दीमा- इजी गोइंग, सारासार विचार करणारे, हुशार, दिसायला मला हर्शा भोगले आठवतो.
३. ऋ- थोडा थोडा राज मल्होत्रा :-), थोडा खिलाडी सीरीजच्या वेळचा अक्की, थोडा वात्रट मुलगा पण तेवढाच विचारी आणि गंभीर असेल. दिसायला श्रेयस तळ्पदे.
४. रीया - फोटो पाहिलाय. स्वभावात - खेळकर पण विचारी आणि आपल्या मतांवर ठाम राहणारी मुलगी.
५. मंजूडी - गोरी, उंच, नीटनेटकी रहाणी, नो भपकेबाज पणा. दिसायला शिल्पा तुळसकर आठवते.
६. नंदीनी - फोटो पाहिलाय. रोखठोक पण एमोशनल असावी.
७. साती - दिसायला कदाचित मधली अश्विनी भावे आठवते. स्वभाव संयमी. समजुन घेणारी पण वेळेला परखड.
८. दक्षिणा - फो पा. स्वभाव रोखठोक. जे काय असेल ते फट्याक, आहे हे असं आहे बघ जमतंय का Light 1 Happy
९. रश्मी - दिसण्यत मुक्ता बर्वे. शांत समंजस स्वभाव असेल.
१० नीधप - फो पा. जे काय असेल ते फट्याक, आहे हे असं आहे बघ जमतंय का Light 1 Happy

फो पा तर मग काय गंमत या खेळात. Wink
त्या जुन्या माबोवरच्या ना आ प्र बाफवर माझ्याबद्दल काहींनी बांधलेले आडाखे परत वाचले आणि परत हसून हसून मेले.

शर्टची वरची दोन तीन बटन उघडे आणि कॉलर उभी केलेली. बारीक चेक्सचा नेहरु शर्ट. अक्षय कुमार सारखी शरिरयष्टी. त्याच्या समोरुन जाणारी प्रत्येक मुलगी त्याला एकदा तरी निरखून बघते. असे रुप उभे राहते ऋन्मेशचे >>>> वा बी. तरूणपणीचा अक्की . बरोब्बर थोडं फार असच मलाही वाटतो .

! हार्ट अ‍ॅटॅकने काही तरी व्हायचं <<<<<<
क्का? अगदी अस्वच्छ गचाळ सदरा लेन्गा पट्ट्यापट्ट्याचा मागे ठिगळ लावलेला पायजमा, तुटक्या काडीचा जाड तडकलेल्या भिंगाचा चष्मा असे रुप जरी प्रत्यक्षात समोर आले, तरी त्यामुळे "हार्ट अ‍ॅटॅकनेच काही तरी होईल" हे कशावरुन?>>> देवा !!! बाबूराव आपटे आठवले .

>>>>>> देवा !!! बाबूराव आपटे आठवले . <<<<<< येस्स येस्स...... कापोचेकाकांकरता हीच उपमा अगदी योग्य आहे........ Happy माझ्याही नजरेसमोर हेच्च चित्र उभे रहात होते.

शॉवामावईविक = शॉफॉ वापरताना माझ्यासारख्या वयस्कर ईसमाचा विचार करावा

यानिमीत्त एक मुद्दा:
माणसाची ऑनलाईन निर्माण केलेली प्रतिमा आणि प्रत्यक्ष माणूस यात कधीकधी बराच फरक असू शकतो.
उदा. एकदम विनोदी लिहीणारा माणूस नाकावरची माशी पण न उडेल असा गंभीर.
राजकारणावर प्रचंड आक्रमक आणि अरेतुरेवर येऊन लिहीणारा माणूस प्रत्यक्षात अगदी सिस्टम वर विश्वास ठेवणारा प्रेमळ माणूस.
आंतरजालावर केअरिंग वाटणारा माणूस प्रत्यक्षात प्रचंड आत्मकेंद्रित आणि मगरुर.

एकदम विनोदी लिहीणारा माणूस नाकावरची माशी पण न उडेल असा गंभीर. <<
माशी न उडेल असा नाही पण प्रत्यक्षात फा तसा गंभीर व्यक्तिमत्वांच्यात मोडतो. Happy

माझ्या लिस्टीत अजून एक भर.
नीधप - शबाना आझमी

@ रीया, तू अनुष्का शर्माच्या तिप्पट का चौपट असशील. दिसण्यावरून नाहीयेच ते.
तशी तू गोड मुलगी आहेस. पण अध्ये मध्ये कचाकचा भांडायला येतेस Proud माझ्याशी तरी.. म्हणून तुझ्यावर पिक्चर काढला तर ती भुमिका मी अनुष्काला देईन Happy
काल की परवा रात्री ईकबाल बघत होतो. त्यातील ईकबालची बहीण हे कॅरेक्टर सुद्धा चालेल. अशी बहीण असली की ईतर भावंडांना सुरक्षित फील होते Happy
तळटीप - जे कॉम्प्लिमेंट म्हणून वाटेल ते तसेच घेशील. नाहीतर दिवा घेशील Happy

फेरफटका - क्रिकेट तर आहेच. पण आपल्या उपमा उदाहरणे बघून द्वारकानाथ संझगिरी आठवतात. त्यांचे लेखही मी मधूनच वाचायला सुरुवात केली तरी समजते की हा लेख त्यांचाच असणार. आपलीही एखादी उपमा वाचनात आली की मी वर आयडी नाव बघून कन्फर्म करतो की येस्स फेरफटकाच आहेत.

सस्मित भारी.. मी तसा आहे तरी किंवा तसे बनायच्या प्रयत्नात तरी असतोच Happy
मानव पृथ्वीकरजी .. लंच बॉक्स बघायचा योग न् आल्याने नो कॉमेंटस. पण स्वभावगुण सांगितलेला कर्रेक्ट!

नीधप - शबाना आझमी <<
हे नवीन आहे..
कायतरी चुकेला है मेरा. रेप्युटेशन गडबड रेला है मेरा. कितनी मेहनत करी थी रेप्युटेशनमे कुछ भी पॉझिटिव्ह ना रहे इस्के वास्ते.. अब कुछ और आयड्याची कल्पना लढवनी पडेगी.

कायतरी चुकेला है मेरा. रेप्युटेशन गडबड रेला है मेरा. कितनी मेहनत करी थी रेप्युटेशनमे कुछ भी पॉझिटिव्ह ना रहे इस्के वास्ते.¦>>>>>> Rofl

माणसाची ऑनलाईन निर्माण केलेली प्रतिमा आणि प्रत्यक्ष माणूस यात कधीकधी बराच फरक असू शकतो.
>>
अगदी करेक्ट . आपल्याकडे नाही का एक संवेदनाशील कवी एक नंबरचे बेवडे आणि रंडीबाज आहेत ते.

Pages