दाल में कुछ केसरी है!

Submitted by साती on 22 January, 2016 - 05:55

आम्ही डॉक्टरकी शिकत असताना आम्हाला "अन्नधान्ये बघून ओळखणे' असा एक प्रश्न प्रात्यक्षिक परीक्षेकरता होता,
यात तूरडाळ आणि केसरी डाळ यांच्यातील फरक स्पष्ट करणे जरा अवघडच.
नाजूकशी गोलसर तूरडाळ आणि चौकोनी जरा जाडसर केसरी/ लाखी डाळ.

image_70.jpg

(फूड सेफ्टी गेटवे डॉट कॉमवरून )

अधिक सुस्पष्ट चित्रे-

तूरडाळ-
image_76.jpg

लाखीडाळ/ केसरी डाळ
image_77.jpg

(वरिल दोन्ही चित्रे मायबोलीकर 'साधना' यांच्या सौजन्याने)

का बुवा इतक्या किचकट डाळी ओळखायला लावतात याचे उत्तर लगेच थिअरी क्लासात मिळाले.
"न्यूरोलॅथरिझम." म्हणजेच लॅथिरस सटायवम उर्फ केसरी डाळीमुळे होणारा मज्जासंस्थेचा एक आजार.

या आजारात केसरी डाळीतल्या एका विशिष्ट अमिनोअ‍ॅसिडमुळे आपल्या पायांकडे जे मेंदूकडून जाणारे पिरॅमिडल ट्रॅक असतात (पायांच्या हालचालींकरिता) ते मरण पावून पायामध्ये अपंगत्व येते. पाय हळूहळू शक्तिहीन तसेच कडक होत जातात.(याला वैद्यकीय भाषेत अप्पर मोटार न्यूरॉन साईन्स असे म्हणतात.) अशा दोन्ही पाय शक्तीहीन आणि कडक होण्याच्या आजाराला स्पास्टिक पॅराप्लेजिया म्हणतात.
आम्ही शिकायला येईपर्यंत हा आजार भारतातून जवळपास नष्टच झाला होता. त्यामुळे औषधोपचार किंवा इंटर्नल मेडिसीन या विषयाअंतर्गत हा आजार शिकायला मिळाला नाही फारसा.
या आजाराच्या उद्भवाची कारणे तसेच तो आजार नष्ट होण्याची कारणेही औषधोपचारांपेक्षा आर्थिक आणि सामाजिक अधिक होती. त्यामुळे आम्ही हा आजार शिकलो पी एस एम म्हणजे 'रोग प्रतिबंध आणि सामाजिक वैद्यकशास्त्र' या विषयात.

तर , भारतात हरितक्रांती होण्यापूर्वीची गोष्ट आहे.शेती उद्योग अत्यंत बेभरवशाचा. सिंचनाची भक्कम व्यवस्था नाही. अश्या परिस्थितीत त्यावेळी बर्‍याच राज्यांत केसरी डाळ्/लाखी डाळ किंवा ग्रास पी (Lathyrus sativum) चे उत्पादन घेतले जायचे. या डाळीला पाणी कमी लागत असल्याने तसेच भर उन्हाळ्यातही टिकून रहाण्याची या रोपाची क्षमता असल्याने शेतकर्‍यांना दुष्काळात हमखास मदतीचा हात देणारे पीक म्हणून याची ख्याती होती.अल्पभूधारक शेतकरी तर यावरच अवलंबून होते. त्याहून थोडे मोठे शेतकरी बाकीच्या पिकाबरोबर एक - दोन दळे हे पीकही लावत.बाकीची पीके पावसाअभावी बुडली तरी हे पीक वाचत असे. त्यामुळे गरज पडल्यास वापरता येई, पण त्याहून महत्वाचे म्हणजे जे भूमिहीन शेतकरी, आदिवासी इत्यादी लोक हे मोठे शेतकरी आपल्या शेतात राबवून घेत असत, त्यांचा पगार पसापसाभर या डाळीच्या रूपात व्हायचा.

गोरगरीब लोकांना दुष्काळाच्या काळात, बाकीच्या डाळी आणि अन्नधान्यांची टंचाई असेल त्या काळात ही डाळ हा एकच पर्याय . ही डाळ विस्तवावर जराशी उकडून त्यात थोडे मीठ आणि पाणी घालून वरण करणे किंवा डाळ दळून आणून त्या पीठाच्या जाडसर रोट्या करणे अश्या दोन पद्धतीने गोरगरीब ही डाळ खायचे.
श्रीमंत लोक मात्र यात इतर पिठे मिसळून त्याच्या लाडू, मिठाया बनवून खात. किंवा मस्त खदखद उकळून ,आमटी बनवून मग छान लिंबू पिळून भात किंवा गव्हाच्या रोटी/पोळीबरोबर खात.

एकदा काय झालं, खूप मोठा दुष्काळ पडला. बिहार, मध्यप्रदेश ,महाराष्ट्र इत्यादी राज्यांतल्या काही जिल्ह्यांत अचानक या दुष्काळाच्या काळात पायांमध्ये पक्षाघात झालेले रूग्ण दिसू लागले. काही काही वाड्या-वस्त्यांतून या एकाच आजाराचे खूप रूग्ण दिसू लागले. कंबरेखाली कडक झालेला पाय, बसता उठता येत नाही, नितंबांवरिल स्नायू अगदी कृश होऊन आतली हाडे दिसू लागलेली अश्या अवस्थेतले रूग्ण.

१. सुरूवातीच्या काळात एका काठीच्या आधारावर चालणारे रूग्ण

image_71.jpg

(ही इमेज डॉक्टर्स हँगाऊट . कॉम या संस्थळावरून घेतलीय.)

image_72.jpg
(ही इमेज लुकफॉर डायग्नोसिस .कॉम या संस्थळावरून घेतलीय.)

२. नंतर दोन्ही पायांतली ताकद जाऊन दोन काठ्या घेऊन चालणारा रूग्ण.
image_73.jpg

( ही इमेज लुकफॉर डायग्नोसिस . कॉम या संस्थळावरून घेतलीय.)

३. एकाच गावातले अश्या प्रकाराने बाधित झालेले अनेक लोक.
image_74.jpg

(ही इमेज इंडियनएनवॉयर्नमेंट पोर्टल .ऑर्ग.इन या संस्थळावरून घेतलीय.)

अचानक असे रूग्ण कसे काय दिसायला लागले याचा विचार करताना लक्षात आलं की हे सगळे रूग्ण आहारात अक्षरश: तिन्ही त्रिकाळ या केसरी डाळीचे पदार्थ खातायत.

मग या डाळीचे आणि या रूग्णांचे अ‍ॅनालिसिस सुरु झाले. तेव्हा एक भयावह बाब समोर आली. या डाळीत एक प्रकारचे अमिनो अ‍ॅसिड असते. B -n-oxalyl-L-a-B diaminopropionic acid नावाचे.(आम्ही शिकताना याला BOAA असे संक्षिप्त रूप होते. आता B-ODAP हे रूप वापरतात. आता आपण तेच वापरू.) तर हे अमिनो अ‍ॅसिड ही डाळ खाणार्‍याच्या आतड्यांतून शोषून रक्तात मिसळल्यावर तिथून स्पायनल कॉर्डसच्या पायाला हालचालींचे सिग्नल देणार्‍या मज्जातंतूंकडे म्हणजे पिरॅमिडल ट्रॅक्सकडे जात होते. काही वेळा तिथून मेंदूमध्ये जे पिरॅमिडल ट्रॅकचे मज्जारज्जू निघतात तिथेही जाऊन ते नष्ट करत होते.
आता हे अमिनो अ‍ॅसिड याच पेशींना का नष्ट करते, पायाचेच मज्जारज्जू का डॅमेज करते ही एक मोठी बायोकेमिकल स्टोरी आहे. ते समजून घेणे हा या लेखाचा उद्देशही नाही तेव्हा ते इथेच सोडू.
हे नेमके कारण जरी १९६४ साली वैज्ञानिकांनी शोधून काढले तरी त्याआधीच केसरी डाळ आणि न्यूरोलॅथरिझमाचा संबंध लक्षात येऊन १९६१ सालापासूनच ह्या डाळीची पैदास करणे, विकणे आणि खाणे यांवर भारतात निर्बंध आले होते.

पण आपण भारतीय अतिहुशार! बंदी आली म्हणजे ती गोष्ट दुप्पट उत्साहाने करायची अशी आपली सवय. त्यामुळे बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातही कित्येक दुष्काळी जिल्हे हे पीक घेत राहिले. आणि दिसण्यात असलेल्या साधर्म्यामुळे तूरडाळीत या स्वस्त डाळीची भेसळ करत राहिले.
आता वाचायला गंमत वाटेल पण काल एक १९८८ सालची पेपरातली बातमी वाचली 'तूरडाळीचे भाव किलोला १५ रु असे गगनाला भिडल्याने तूरडाळीत विषारी केसरी डाळीची भेसळ. गरीबांना ४ रु किलोवाली केसरी डाळ खाण्याशिवाय पर्याय नाही.' ही बातमी होती मध्यप्रदेशातील.
अश्या अनेक ठिकाणी बातम्या येतच होत्या. त्यामानाने न्यूरोलॅथरिझमचे रूग्ण काही नव्याने दिसत नव्हते. मग कुणीतरी शहाण्याने 'खरेच हा पक्षाघात केसरी डाळिमुळेच होतोय की आपली उगीच एक अफवा?' असा प्रश्न काढला.
खूप प्रयत्न करूनही हा आजार प्रयोग शाळेतील प्राण्यांत घडवून आणायचे शास्त्रज्ञांना इतकेसे स्पष्ट साधले नव्हते.
मात्र २०१२ साली हैद्राबादेतल्या आय सी एम आर ने कोकरांना ही डाळ खायला घालून त्यांच्यात हा आजार 'नि:संदिग्धपणे ' घडवून आणला.
आणि मग या आजाराबाबत संशोधनाचे एक नवे क्षितिज उघडले.
पुढल्याच वर्षी महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्यात प्रत्यक्ष ही डाळ खाणार्‍या लोकांमध्ये केस स्टडी झाला. १०५ घरांतील ५९६ लोकांचा अभ्यास झाला. हे लोक केसरी डाळ बर्‍यापैकी नियमितपणे खात होते. मात्र मागच्या वीस पंचवीस वर्षांत यांपैकी कोणालाही हा आजार झाला नव्हता. अगदी कसून मज्जासंस्थेची तपासणी केली गेली तरी हा आजार झाला नव्हता. गंमतीची गोष्ट म्हणजे दोन आजोबा असे सापडले की ज्यांना त्यांच्या तरूणपणी हा आजार झालाय. पण नव्याने कुणालाही नाही.
या गावात असलेल्या केसरी डाळीच्या प्रजातीत हे विनाशक अमिनो अ‍ॅसिडच नसेल अशी कुणीतरी शंका काढली. तर त्याचीही चाचणी अगोदरच केली गेली होती. या गावात असणार्‍या डाळीच्या प्रजातीतही तेवढ्याच प्रमाणात हे अमिनो अ‍ॅसिड होते जेवढे फार पूर्वी न्युरोलॅथरिझमचे पेशंट्स सापडले तेव्हा खाल्ल्या जाणार्‍या डाळीत असायचे.

तेव्हा या आणि अश्या अनेक अभ्यासांतून लक्षात आलेली महत्त्वाची माहिती अशी-
१. केवळ केसरी डाळ खाण्याने हा आजार होतो असे नाही तर त्याबरोबरच अनेक इतर कारणे याला जबाबदार आहेत.
२. प्रत्येक प्रजातीच्या केसरी डाळीत असणारे घातक B -ODAP ह्या अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण वेगवेगळे आहे.
३.जर आपल्या आहाराच्या १/४ इतका भाग किमान ५० ते ६० दिवस ही डाळच असेल तर हा आजार होण्याची शक्यता वाढते.
४. ही डाळ कमीतकमी अर्धा तास भरपूर पाण्यात उकळून , ते पाणी फेकून मग डाळ खाल्ल्यास या डाळीतील घातक अमिनो अ‍ॅसिड नष्ट होते.
५.या डाळीत इतर डाळी मिसळून खाल्ल्यास आणि त्या मिसळलेल्या डाळींत गंधक असणारी अमिनोअ‍ॅसिड्स असल्यास या डाळितल्या विषाचा प्रभाव तर कमी होतोच पण त्यबरोबर शरीरास मिळणार्या एकंदर प्रथिनांची गुणवत्ता (quality of proteins) वाढते.
६. व्हिटॅमिन सी ची कमतरता असल्यास या डाळीतल्या विषारी अमिनो अ‍ॅसिडचे योग्य विघटन होत नाही.
७. काही व्यक्तींमधील पचनशक्ती आणि काही विशिष्ट एंझाईम्सच्या कमतरतेमुळेप्रत्येक व्यक्तीवर होणारा या विषारी द्रव्याचा प्रभाव वेगवेगळा आहे.

आता या माहितीचा उपयोग पाहूया.
१. केवळ केसरी डाळ खाण्याने हा रोग होत नाही- बरोबर. गरिबी, खायला दुसरे काहीच उपलब्ध नसणे, ही डाळ योग्य प्रकारे न शिजवणे ही कारणेही तितकीच महत्त्वाची आहेत.
२. प्रत्येक प्रजातीत असणारे B-ODAP चे प्रमाण-- आपल्या घरात येणार्या डाळीतल्या या अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण किती आहे याचा अंदाज केवळ डाळ पाहून करणे शक्य नाही. शेतकरी फक्त अश्या प्रमाणित जातींचीच लागवड करतायत का यावर लक्ष ठेवणे भारतात या घडीला तरी अवघड आहे. इथे भांगेची शेतीसुद्धा गुपचूप केली जाते .
३.आहाराच्या १/४ भाग सलग ५०-६० दिवस-- हे टाळणे आपल्याला सहज शक्य आहे. पण गोरगरीबांना एकदा स्वस्त डाळ मिळायला लागली की ती पावभागच खाऊन बाकी महागडी डाळ खा म्हणून सांगणे कठिण आहे. उपाहारगृहांत/ मेसमध्ये/ खानावळीत हे तंत्र पाळलेच जाईल याची खात्री आपण बाळगू शकत नाही.
४.डाळ भरपूर पाण्यात , अर्धा तास उकळणे- गोरगरीबांना/ आदिवासी लोकांना दुष्काळाच्या काळात नेमके मुबलक पाणी आणि चुलीला इंधनच मिळत नाही. अक्षरशः जराशी मऊ झाली कि ही डाळ खातात.
तसेच उपाहारगृहांत/ खानावळीत/मेसमध्ये ही दक्षता घेतली जाईलच असे नाही.
५.या डाळीत इतर डाळी मिसळणे- ते शक्य झालं असतं तर काय महाराजा! तूरडाळ मिळत नाही आहे सध्या म्हणून तर ही डाळ प्रकाशात आलीय. दुसर्‍या डाळी खाणे शक्य असताना ही डाळ मुद्दाम खाऊन कोण पाहिल?
६.व्हिटॅमिन सी ची कमतरता-योग्य प्रमाणात लिंबू इळून ही डाळ खाल्ल्यास त्या अमिनो अ‍ॅसिडचे विघटन होईल. पण प्रत्येक वेळी लिंबू पिळायचे लाड पुरवायला गोरगरीबांना/ दुष्काळी गावातल्या/आदिवासी पाड्यातल्या लोकांना जमेल का?
७. व्यक्तिगणिक वेगळे इफेक्ट- या शक्यतेची चाचणी करणारी कुठलीही सोपी पद्धत उपलब्ध नाही. तुमच्यावर परिणाम दिसले तरच मागाहून कळणार. कोण मुद्दामहून हे परिणाम होतात का हे पहायला जाईल ?

असे आहेत या केसरी डाळीचे प्रताप. संशोधन करणं, त्यातून वेगवेगळे निष्कर्ष काढणं शास्त्रद्यांचे कामच आहे. मात्र त्यातून बाकीच्या सामाजिक / आर्थिक परिस्थितीचा विचार न करता आपल्याला सोयीस्कर भागाचेच अर्थ काढून धोरण राबवणे हे राजकारण्यांचे काम आहे.
केसरी डाळीवर संशोधन , केसरी डाळीचे दुष्परिणाम कमी करण्याबाबतचे संशोधन, एवढेच नव्हे तर केसरी डाळीतल्या औषधी घटकांवर संशोधन( हो, ते ही या डाळीत आहेतच) हे मागच्या अनेक सरकारांच्या काळात चालतच आलंय.
मात्र आत्ता इतर डाळींच्या किंमती गोरगरीबांच्या आवाक्याबाहेर गेल्या असताना, बाजारात लोकांच्या आहारात असलेल्या तूरडाळीचा कृत्रिम किंवा खरा तुटवडा जाणवत असताना, भारतातल्या मुख्यत्वे तूरडाळ उत्पादन करणार्‍या प्रदेशात सलग तिसर्या वर्षी दुष्काळ पडलेला असताना मुद्दाम या केसरी डाळीच्या उत्पादनाला आणि विक्रीला राजरोस परवानगी देणं मलातरी चुकीचं वाटतंय.
तुम्हाला काय वाटतं?

......................................................................................
तळटीप-
१. चित्रे आंतरजालावरून घेतली आहेत. त्या मध्ये हा लेख वाचणार्‍यांच्या माहितीत भर पडावी इतकाच उद्देश आहे.
त्या त्या चित्राखाली कुठून घेतली याची लिंक दिली आहे.
२. हा लेख कुठेही शेअर केला तरी चालेल मात्र लेख 'मायबोलीवरिल डॉ.साती यांनी लिहिला आहे हे कृपया लिहा.
३. वेळ मिळेल तसा टाईप केल्याने व्याकरणाच्या असंख्य चुका आहेत , त्या हळूहळू निस्तरल्या जातील.
४. प्रतिसादांत जमेल तसे शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करेन.

(समाप्त)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सकुरा, नाही.
हा शोधही चांगल्या नावाजलेल्या संशोधकांनीच लावलाय.
खरेतर केसरी डाळीइतके संशोधन कुठल्याच डाळीवर झालेले नाही.

आणखी एक गंमत म्हणजे विषारी/कमी विषारी कोणत्याही जातीची केसरी डाळ असो, मुबलक पाणी आणि कमी उन्हाळा असेल तेव्हा तयार होणार्‍या विषाचे प्रमाण हे दुष्काळात तयार होणार्‍या वीषापेक्षा कमी असते.
म्हणजे तयार होणारे वीष या वनस्पतीला दुष्काळात तगून रहायला मदत करते.

मग नेमके लोकांणी काय करावे
डाळ खावी की नको?
बिपी शुगरवाल्यांनी खावी असे काही आहे का?
ते मोगा म्हणतायत ते ही खरे वाटत आहे.

बघा बुवा तुम्हीच!
मी आपली असलेली माहिती सांगितली.
जशी आपल्या शास्त्रज्ञांनी मोदीकाकांना सांगितली.
पुढे काय करायचे तो निर्णय तुमचा तुम्ही घ्या.
Wink

मग "नमो केसरी डाळ" यानावाने बाजारात विका. इथले भक्त आवडीने खातील आणि ती डाळ कशी चांगली पौष्टीक रुचकर आहे यावर धागा काढतील खरतर या डाळीला केंद्रसरकारने हिरवाकंदील दिल्यावर खास नमो डा़ळ पाककृती असा एक विभाग मायबोलीवर काढावा लागेल इतकी लोकप्रिय होईल आहात कुठे.

मग "नमो केसरी डाळ" यानावाने बाजारात विका. इथले भक्त आवडीने खातील
<<<

हां, आता कशी चर्चा योग्य मार्गावर वळवलीत!!
विषय कुठलाही असो. अड्डेकरांचा हिंदु, बीजेपी व मोदिंना शिव्या घालायचा एक कलमी कार्यक्रम इथे देखिल सुरु केलेला पाहून अजिबात आश्चर्य वाटले नाही.

पुढील चर्चेसाठी इथल्या सदस्यांना शुभेच्छा!

चांगली माहिती. लिंक नावासह ओळखींच्यामध्ये शेअर केली आहे तसेच घरातील कामवाल्यांना बायकांना वगैरे ह्या डाळीबद्दल आणि आजारांबद्दल माहिती देण्यास सांगितले आहे. कारण सुशिक्षितांपेक्षाही अश्या लोकांपर्यंत ही माहिती जाणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.

आता गरीबांचे रक्षण ते मोदीच करोत >>>>> शास्रिय महिती देता देता शेवटी सातीनेच मोदींना ह्या बाफावर आणले. त्यामुळे आगाऊ आयडीच्या भाषेत म्हणायचं तर "अब आया ऊंट पहाड के निचे.." Happy

केसरी डाळीवर संशोधन , केसरी डाळीचे दुष्परिणाम कमी करण्याबाबतचे संशोधन, एवढेच नव्हे तर केसरी डाळीतल्या औषधी घटकांवर संशोधन( हो, ते ही या डाळीत आहेतच) हे मागच्या अनेक सरकारांच्या काळात चालतच आलंय.
मात्र आत्ता इतर डाळींच्या किंमती गोरगरीबांच्या आवाक्याबाहेर गेल्या असताना, बाजारात लोकांच्या आहारात असलेल्या तूरडाळीचा कृत्रिम किंवा खरा तुटवडा जाणवत असताना, भारतातल्या मुख्यत्वे तूरडाळ उत्पादन करणार्‍या प्रदेशात सलग तिसर्या वर्षी दुष्काळ पडलेला असताना मुद्दाम या केसरी डाळीच्या उत्पादनाला आणि विक्रीला राजरोस परवानगी देणं मलातरी चुकीचं वाटतंय.
तुम्हाला काय वाटतं?>>

या शेवटच्या पॅरातच उंट पहाडके नीचे आलेला आहे.
धन्यवाद नविन वाचक आणि पराग!
Happy

योग्य वेळेत पोचलो वाटते इथे!!! Proud
फूड रिलेटेड क्लेम्स शास्त्रिय दृष्ट्या सिद्ध करणे किती जिकिरीचे असू शकते याचे हे एक उत्तम उदाहरण किंवा केस स्ट्डी आहे.

तो पॅराग्राफ योग्यच होता असं मी म्हणेन. एखाद्या क्षेत्रातली आपल्याला अधिक माहिती आहे (आणि व्यवसायामुळे ती मांडण्याचा एखाद्याला अधिकारही आहे) आणि सरकार त्याक्षेत्रात काही चुकीची धोरणं राबवत असेल तर योग्य ती बाजू लोकांसमोर मांडणे आणि त्यावर आपलं मत व्यक्त करणे हे ह्यात काहीच गैर नाही आणि सुमारे तीन पाने चर्चाही व्यवस्थित झाली होती. पण मी कोट केलेला प्रतिसाद हा नेहमीच्या शैलीतल काडीघालू प्रतिसाद होता. ("झालेली चांगली चर्चा पुरे झाली, आणारे नेहमीचे यशस्वी विषय!" अशी हाळी घालणारा..) त्यानंतर नेहमीची टोळ धाड आलीच. त्यामुळे इथून पुढे चर्चा कुठल्या दिशेला जाणार हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. फक्त प्रॉब्लेम एव्हडाच आहे की जर पुढे हा धागा अ‍ॅडमिनांना वहाता करावा लागला तर आधी आलेले माहितीपूर्ण प्रतिसाद वाहून जातील, तेव्ह्डी काळजी घ्या म्हणजे झालं.
असो !

त्यानंतर नेहमीची टोळ धाड आलीच.
<<
कुठे? कोणती? टोळधाड आली म्हणजे नक्की कोण आले? अन तुमचे प्रतिसाद म्हणजे वसंताची रोमांचक चाहूल लावणारे कोकिलकूजन आहेत काय?

मत व्यक्त करण्याचे प्रकार असतात. असहमती व्यक्त करण्यासाठी अबोला धरण्यापासून डोक्यात लाटणे मारण्यापर्यंतचा स्पेक्ट्रम वापरता येऊ शकतो. तुम्ही तुमची वापरता, तसे बाकी त्यांची फ्रिक्वेन्सी वापरतात. जोपर्यंत अल्ट्राव्हायोलेट (हो मोदींचा आवडता रॉयल पर्पल Wink त्या पलिकडची ) फ्रिक्वेन्सी गाठली जात नाही, तोवर उग्गं धागा वाहता करा, असं अ‍ॅडमिन यांना आडून आडून सुचवण्याचं नेमकं कारण कोणतं?

'मोदी रक्षण करोत' हे साती यांनी सांगितल्यावर तुम्हाला दिसावं, अशी वाईट वेळ यावी हेच दुर्दैवी आहे. तिथे सरकारात बसलेल्यांना जास्त डेटा उपलब्ध असतो. एकंदरितच या लाखी डाळ प्रकाराबद्दल मी आधी कट्ट्यावर लिहिलेला प्रतिसाद इथे क्वोट करतो. या प्रतिसादाआधी नव्या रिसर्चनुसार 'तुलनेने सेफ' अशी डाळ तयार झाली आहे. घातक केमिकलचे प्रमाण कमी आहे. इ. प्रतिवाद झालेले होते.

तर तो प्रतिसाद पुन्हा एकदा :

>>
तो डाळीबद्दलचा रिसर्च बोलताना मूळ गम्मत बाजूला पडते आहे.

हा सगळा गोंधळ असा उठवायचा प्रयत्न सुरू आहे की, जणू काही लाखी डाळीचे डोंगरचे डोंगर पिकून तयार आहेत, अन बॅन उठण्याचाच अवकाश, तूरडाळीला पर्याय म्हणून ही डाळ लगेच तुमच्या ताटात, अन अख्ख्या भारताची प्रोटीन नीड खतम.

तुरीचे भाव का वाढलेत याबद्दल बोलणे = शून्य.
तुरीचे प्रॉडक्शन कमी झाले का? याबद्दल बोलणे = शून्य.
डाळीचे भाव कमी करण्यासाठी काय केले याबद्दल बोलणे = शून्य.
तुरीचे प्रॉडक्शन वाढवण्यासाठी काय करता येईल याबद्दल बोलणे = शून्य.

बेसिकली येडी घालणे हा उद्योग सुरू आहे.

लाखी डाळ धोकादायक आहे, म्हणजे आहे.

धोका कमी आहे म्हणजे काय आहे? तुरीने असा पॅरालिसिस होण्याचा धोका शून्य आहे. ("कमी" नाही, शून्य.)

फरक ध्यानी येतोय? कमी धोका वि. शून्य धोका.

पूर्वी लाखात ४० ना होई, आता लाखात दोघांना पॅरालिसिस होणार असेल, तरीही ती वाईटच. आपल्या घरात असा पॅरालिसिस झालेला चालेल का आपल्याला?
<<

धन्यवाद.

केशरी डाळीवर भगवे आले तर प्रतिसाद लिहीन असे सुरुवातीलाच बोललो होतो. Wink

. फक्त प्रॉब्लेम एव्हडाच आहे की जर पुढे हा धागा अ‍ॅडमिनांना वहाता करावा लागला तर आधी आलेले माहितीपूर्ण प्रतिसाद वाहून जातील, तेव्ह्डी काळजी घ्या म्हणजे झालं.>>

हे आव्हान आहे की अ‍ॅडमिनना आवाहन?
Happy

तुमचे प्रतिसाद म्हणजे वसंताची रोमांचक चाहूल लावणारे कोकिलकूजन आहेत काय? >>>> Lol

इब्लिस, तुम्हांला आदळापट करण्याच्या नादात समजलं नसेल तर माझं पोस्ट परत वाचा. ती डाळ विकणं किंवा त्यावरील बंदी उठवणं हे योग्य आहे असं मी कुठेही म्हटलेलं नाही किंवा सरकारचं समर्थनही केलेलं नाही. सातीने रिसर्चचा आधार घेऊन मांडलेले मुद्दे आहेत, त्याबद्दल बोलण्याची किंवा प्रतिवाद करण्याची माझी पात्रता नाही. ती त्या क्षेत्रात काम करणार्‍या तज्ञाने मांडलेली मते आहेत आणि शिवाय इंटरनेटवरही बरच काही आहे त्यामुळे योग्यच असतील. माझा मुद्दा हा फक्त धाग्याला विशिष्ठ वळण लावणार्‍या काडीघालू पोस्टीबद्दल होता.

Avahan, avhan kahi nahi. Anubhav khatri vishwas ubag asa sagla asava. ☺

माझा मुद्दा हा फक्त धाग्याला विशिष्ठ वळण लावणार्‍या काडीघालू पोस्टीबद्दल होता.
<<
ती पोस्ट धागाकर्त्यांनीच लिहिली होती.
हा धागा स्पेसिफिकली डाळ धोरणाबद्दल 'विरोधकांनी काही केलं पाहिजे' या हेतूने तयार केलेला आहे, असे म्हणतो. (संदर्भ : वाहत्या धाग्यांवर झालेली 'विरोधक याबद्दल कसे काहीच बोलत नाहीत?' ही चर्चा)
तेव्हा, वळण आधीपासून सुस्पष्ट आहे.
अन आदळआपटही Wink

>>
ती डाळ विकणं किंवा त्यावरील बंदी उठवणं हे योग्य आहे असं मी कुठेही म्हटलेलं नाही किंवा सरकारचं समर्थनही केलेलं नाही.
<<

ते आपले हे देखिल असंच करतात. उदा. दादरी योग्य आहे असे म्हणत नाहीत अन त्याचा निषेधही करत नाहीत. वेमुला मेला त्याबद्दल योग्य अयोग्य काहीच म्हणत नाहीत, निषेध करीत नाहीत, फक्त त्याच्या आईच्या दु:खाबद्दल मला वाईट वाटतं असं म्हणतात. दरम्यानच्या काळात ज्युनियर स्वयंसेवक घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांना होस्टेलातून हाकलून देतात... एकंदर बगल देणे, व बगलेत काही वेगळेच असताना तोंडाने रामनाम घेणे, ही ट्याक्टीक लय भारी प्रकाराने वापरली जाते. Wink

असो.

मला तुमचा प्रतिसाद पकडून मला हवे ते लिहिता आल्याबद्दल आनंद आहे, व त्याबद्दल तुम्हाला धन्नेवाद!

पराग , माझ्या धाग्यात पुरेश्या काड्या असताना आणखी काडीघालू वळणे आणण्याचे काम मी का बरे करू?

शेवटच मूळात पॉलीटीकल प्रश्न होता आणि 'तुम्हाला काय वाटते?' असा प्रश्न विचारला होता.
Happy

Anubhav khatri vishwas ubag
<<

"यांचा" अनुभव येऊन खात्री पटून उबग येऊन विश्वास उडेल तोपर्यंत देशाचं पूर्णच वाट्टोळं नको व्हायला, असं सगळं आहे Wink

'तुम्हाला काय वाटते?' या प्रश्नाची उत्तरे येऊ देत पटापटा.

मला असे वाटते की सरकारने बंदी उठवायला नाही पाहिजे होती

साठा करणार्‍या डाळ व्यापार्‍यांच्या दलालांच्या मुसक्या आवळायला पाहिजे होत्या.

तुरडाळ आयात करुन लोकांना उपलब्ध करुन द्यायला पाहिजे होती

हे सगळे करायचे सोडुन लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा सरकारला काय अधिकार?

साती दन्डवत स्वीकारावा. कारण अतीशय् उपयोगी व उत्तम माहिती, ती पण फोटोसकट दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. कारण फोटोमुळे १०० टक्के फरक उघड दिसतोच. या लाखी डाळीवर बन्दी होतीच, पण ती आता उठवली आहे की अजून बन्दी आहे हे मी वाचले नाही पेपरमध्ये. मात्र साधनाने जे सान्गीतले आहे, त्यावरुन स्पष्ट होतेच आहे की गरीब लोक ही डाळ वापरतात. जे भयानक आहे.

तूर डाळ एवढी महाग का व्हावी याचे कारण मला अजूनही कळलेले नाहीये. ( मी खरच सान्गतीय की ही डाळ एवढी महाग का झाली? या मागे कोण आहे ते मी नीट वाचलेले नाहीये) नशीबाने ही डाळ ( तूर) परवडतीय म्हणून खातोय.

ऋन्मेष म्हणतो ते पण खरे आहे की डाळी व्यतीरीक्त बाकी पर्याय आपल्याला असतात. माझ्या माहेरी पातळ भाजी ( पालकाची, मेथीची, चाकवत वगैरेची, तसेच बटाटे वगैरेचा रस्सा असेल तर ) असेल तर त्या दिवशी डाळ जेवणात नसतेच. पण सासरी रोज साधे वरण आणी भात ही डोकेदुखी आहे, जो मला वैताग वाटतो. माणसाने पर्याय शोधावेत या मताची मी आहे, पण आता सासरी घरातले ज्येष्ठ ऐकत नसल्याने पर्याय शिल्ल्क नाहीत. पण मुग डाळ पण वापरात असते.

दिनेशजी म्हणतात ते पण खरे आहे, कारण रेल्वे स्टेशनवरचे बटाट वडे ज्यानी खाल्ले असतील त्याना माहीत असेलच की त्याचे कव्हर फार मस्त लागते. पण ही लाखी डाळ त्यात वापरतात हे माहीत नव्हते, जेव्हा बन्दी आली तेव्हा कळले.

मला असे वाटते की सरकारने बंदी उठवायला नाही पाहिजे होती

साठा करणार्‍या डाळ व्यापार्‍यांच्या दलालांच्या मुसक्या आवळायला पाहिजे होत्या.

तुरडाळ आयात करुन लोकांना उपलब्ध करुन द्यायला पाहिजे होती>>>>> हे तिन्ही मला हवे होते, पण होत नाहीये याचे वाईट वाटतेय.

हे सगळे करायचे सोडुन लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा सरकारला काय अधिकार?>>>>> सकुरा, तुमच्याशी एकदम सहमत.

रश्मी, तुम्ही जे पर्याय लिहिले आहेत त्यात मूगडाळीचे वरण वगळता बाकी रश्श्यांमधून, पातळ भाज्यांतून दिवसभराची प्रोटीन्सची गरज भागत नाही.
जर तुम्ही पूर्ण शाकाहारी असाल तर डाळी / कडधान्ये आणि दूध इतकेच पदार्थ तुमच्या प्रोटिन्सची गरज भागवतात.

त्यामुळे पातळ पालेभाज्या किंवा बटाट्याची रस्साभाजी हा वरणाला पर्याय होऊ शकत नाही.
पीठ पेरून भाज्या केल्या तरी फार थोडे प्रोटीन्सच मिळतील.

बेसनाचे/कुळथाचे पीठले, पनीर, हरभर्‍याची/काळ्या वाटाण्याची आमटी, पातळ बिरडे, अख्ख्या/सोललेल्या मसूराची आमटी, उडदाची आमटी असे विविध पर्याय तुम्ही वापरायला हवेत.

ODAP - ०.०७ ते ०.१०% हे प्रमाण समजा नीट शिजवले नाही (उकळुन) आणि आहाराच्या २०% प्रमाण असेल तर खायला सेफ आहे का? किती प्रमाण असेल तर ते अनसेफ होते?>>>>>>याचे उत्तर मिळाले नाही..

म्हणजे १००० ग्रॅम डाळ घेतली तर सात ते दहा ग्रॅम विषारी पदार्थ - B-ODAP असेल.

आत्तापर्यंतच्या अभ्यासांत एकंदर आहाराच्या २५ टक्केपेक्षा जास्त भाग ५०-६० दिवस सलग ही डाळ असेल तर हा आजार होतो.
त्यामुळे तुम्ही चार पाच दिवसांत एकदा वाटीभर ही नीट शिजलेली डाळ घेतलीत तर (कदाचित) हा आजार होणार नाही.

आता 'कदाचित' या शब्दाला किती महत्त्व द्यायचे हे प्रत्येकाने ठरवायचे.

उत्तर मिळाले नाही : अभ्यास वाढवा Wink
इतरही लिंका आहेत.
असो.
*
तुरीबाबत.

अ‍ॅव्हरेज ८ हजार रुपयांनी दालमिलला विकलेल्या तुरीची २०-३० हजार रुपये प्रति किवंटल किमतीची तूरडाळ तयार होते. तूर डाळ बनवण्याची ही इतकी महागडी प्रोसेस आपल्याला परवडते का?

याबद्दलचे उत्तर देणार का? @ मनस्मी.

आपल्या सरकारला अन खरे तर भगतांना मनसोक्त लाज वाटली पाहिजे. अ‍ॅबसोल्यूट निर्ल्लज आहेत हे लोक. वरती सकुरा यांनी घरी डाळ बनवायची ती महागडी प्रोसेस एक्स्प्लेन केलेली आहे. ती पहा जरा.

(लिंक जुनी असल्याने बदलली आहे)

राजकीय पक्ष नेहेमीच आपल्याला देणग्या देणार्‍या बेपार्‍यांचं हित पाहतात. पूर्वापारचे राजेमहाराजेही नगरश्रेष्ठींकडून कर्ज घेत असत.

हित जरूर पहा.

पण किती???

प्रजा पांगळी झाली तरी चालेल?

मेंदूला लकवा मारलाय का ऑल्रेडी?

अगदी अगदी
ही लाखी डाळ काय १-२ महिन्यात तयार नाही झालीय.
आधी हिचं पीक घेऊन मग तुरडाळ शिताफीने गडप केली.
जेणेकरुन ४०-५० किलो वाली लाखी २०० ने विकता यावी.

हाईट तर ही की बंदी असुन देखिल बाजारात खुलेआम विक्री चालली आहे.

Pages