मित्रहो,
शिवशक्ती संगमच्या निमित्ताने काढलेल्या धाग्यावर अतिशय सुंदर आणि संयत शब्दात चर्चा झाली. अनेक प्रश्न तेथे उपस्थित करण्यात आले आणि त्याला सगळ्यांनी मिळून आपापल्या परीने उत्तरे दिली.
मुख्य कौतुक म्हणजे कोणीही विखारी प्रतिसाद न देता एक एक गोष्ट समजून घेतली.
या निमित्ताने विचारांची/माहितीची जी देवाणघेवाण झाली ती अप्रतिम होती. मायबोली सारख्या संकेतस्थळाचा याहून सुंदर उपयोग तो काय असू शकतो.
तोच धागा पकडून कैपोचे यांनी सुचवल्याप्रमाणे हा नवीन धागा येथे काढत आहे. याचा उद्देश मी खाली स्पष्ट करतो.
तत्पूर्वी एक स्वानुभव मला सांगावासा वाटतो.
मी सावरकरांचा निस्सीम भक्त होतो आणि आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांनी स्वतः लिहिलेले बरेच लिखाण मी वाचले. स्वातंत्र्य संग्रमातल्या इतर अनेक महापुरुषांबद्दल पुढे वाचनात आले.
यामधून एक विचारधारा निर्माण होत गेली ज्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातल्या जहाल मतवादी विचारांशी जास्त जवळीक होती.
याच बरोबर अजून एक विचारधारा नकळतपणे डेव्हलप होत गेली ज्यात मवाळ गट, गांधीजी यांच्याबद्दल तिरस्कार होता.
यातला 'तिरस्कार' हा शब्द महत्वाचा आहे. हा तिरस्कार उगाच आपला मनात येऊन बसलेला होता.
यावर घरात अनेकदा वडिलांशी वादविवाद करताना ते मला गांधीजींचे महात्म्य सांगण्याचा प्रयत्न करत. लाखो लोक त्यांच्या मागे गेले यात नक्कीच फार मोठा अर्थ आहे असे ते सांगत.
त्यावेळी मला ते फारसे पटत नसे.
पुढे जशी जशी प्रगल्भता वाढत गेली तसतसे मी एका थर्ड आय ने जगाकडे पाहू लागलो. ज्यामुळे मला हे लक्षात यायला लागले कि प्रत्येक माणूस हा त्या त्या वेळेला त्याच्या झालेल्या जडणघडणी प्रमाणे विचार करतो आणि निर्णय घेतो. अर्थात, त्याच्या जागी तो बरोबरच असतो.
सावरकर असो वं गांधीजी, कोणीहि मुद्दाम हून चला आता आपण भारत देशाला खड्ड्यात घालू म्हणून काम केले आहे का.? अर्थातच नाही. दोघांनी कार्य तर भारताच्या उन्नतीसाठीच केले. त्यांची कार्यपद्धती वेगळी होती. इतकेच..
मग आपल्या मनात 'तिरस्कार' असण्याचे कारण ते काय.?
यामध्ये असहमती असू शकते. मतभेद असू शकतात. पण तिरस्कार हा एक बिनगरचेचा घटक आहे.
तिरस्कार अज्ञानातून येतो. आणि मतभेद अभ्यासातून येतात.
या विचारातून मग मी गांधीजींचे चरित्र वाचण्याचे ठरवले. लकीली याच दरम्यान एकदा काकांच्या घरी गेलेलो असताना त्यांच्याकडे मला गांधीजींचे आत्मचरित्र मिळाले. मी ते त्यांच्याकडून घेऊन वाचायला सुरुवात केली.
लवकरच माझे गांधीजींबद्दल असलेले मत पूर्णपणे बदलले.
त्यांच्या काही गोष्टी मला पटल्या, काही नाही पटल्या. पण मनातला गांधीजींबद्दलचा आदर मात्र खूप वाढला. त्यांच व्यक्तिमत्व परिपूर्ण होतं. असं व्यक्तिमत्व जगात पुन्हा होणे नाही या मताला मी आलो.
मनातील पूर्वग्रह बाजूला ठेऊन त्यांच्या चष्म्यातून जग पाहताना खूप छान वाटले. (अजूनही माझे वाचन सुरु आहे. खंड पडलाय जरा, पण लवकरच पूर्ण होईल.)
अशा प्रकारे माझ्या मनातून तिरस्कार हद्दपार झाल्यावर मला एक मानसिक शांतता मिळाली. कोणीही काहिही बोलले तरी राग येईनासा झाला. मन शांत झाले. मी समोरच्याला माफ करायला शिकलो.
अस समोरच्याला एकदा अनकंडीशनली पूर्णपणे माफ करून टाकले कि आपल्या मनातली negativity जाते, याचा मी अनुभव घेतला. माफ करणे हे समोरच्या करता नव्हे तर आपल्या स्वतः करता गरजेचे असते असे मला लक्षात आले.
असो. तर या धाग्यावर हा अनुभव सांगण्याचे प्रयोजन असे कि आपण येथे परस्परविरोधी विचार असलेले लोक एकत्र येऊन, शांतपणे चर्चा करून समोरची बाजू समजून घेऊ. समोरच्याचे मत जसे आहे तसे का आहे त्यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जेणेकरून आपल्या मनातील तिरस्कार दूर होईल. एकमेकांकडून माहित नसलेल्या गोष्टी कळतील. जाणीवा वाढतील. सहिष्णुता वाढेल. आभ्यास वाढेल. आपल्या पैकी बहुतेकांनी कोणत्या तरी एकाच बाजूचा पण सखोल आभ्यास केलेला असेल. त्याचा एकमेकांना फायदा होईल.
दोन्ही बाजूंची सहमती बऱ्याच बाबतीत शक्य नाही हे तर आपल्याला माहितच आहे. हे गृहीत धरूनच आपण बोलूया. तिरस्कार नाहीसा होत गेला तरी या धाग्याचा उद्देश सफल होईल.
आपण एकमेकांशी असहमत असू, पण तरी एका बाजूने असू
या धाग्यावर सावरकर, गांधी, आंबेडकर, कॉंग्रेस, भाजप, हिंदू, मुसलमान, इसाई कोणताही विषय वर्ज्य नाही.
फक्त हा धागा नावाप्रमाणे सहिष्णू राहू द्यावा. (या दोन वाक्यांवरून हा प्रयोग फारच धाडसी वाटतोय मला)
असो. वरून देव बघत आहे. जो आयडी असहिष्णुता दाखवेल त्याचा मृत्यू अटळ आहे.
कोणीही असहिष्णूता दाखवल्यास त्याला कृपया कोणतेही उत्तर देऊ नका. शांतता राखा.
याच उपक्रमाचाच एक भाग म्हणून आपण जमेल तसे आपापल्या आवडत्या नेत्यावर लेख लिहूया. म्हणजे माहितीची देवाण घेवाण होईल आणि विषय निघतील ..
धाग्याच्या विषय व्यवस्थापन
धाग्याच्या विषय व्यवस्थापन विषयाशी मर्यादित आहे. >> तो धागा वायला , हा वायला
जुन्या विषयीच बोलतोय.आणि इथला
जुन्या विषयीच बोलतोय.आणि इथला विषय तरी वायलाच ए
पगारे, तुम्ही दिलेल्या
पगारे, तुम्ही दिलेल्या तोकड्या प्रतिसादावरून काहीबी कळंना. जरा सविस्तर स्पष्टीकरण देणार का?
बाकी, प्रत्येक जातीजमातीमध्ये त्यांच्या रूढीपरंपरेनुसार विधी केले जात असतीलच. मुख्य प्रश्न होता जाती निर्मुलनाचा इथे तर तुम्ही स्वत:च जातींचा बाऊ निर्माण करता आहात. ह्या जातीत असे का आणि ह्या वर्णात असे का असे प्रश्न विचारण्यापेक्षा जातीनिर्मुलनासाठी तुमच्याकडून करण्यात आलेले कार्य किंवा तुमच्या मनात त्यासंबंधी असलेले विचार हे इथे सांगितलेत तर ते धाग्याच्या विषयाला धरून असेल.
माने +१
माने +१
विज्ञानदासु, धागाकर्त्याला
विज्ञानदासु, धागाकर्त्याला कुठलाही विषय व्यर्ज नाही हे त्यांनी धाग्यात स्पष्ट केलेले आहे.
हिंदु धर्मात मुलिंवर उपनयन
हिंदु धर्मात मुलिंवर उपनयन संस्कार होत नाहित त्यामुळे होणारी विषमता. >> मुलींवरही संस्कार होतात. माझ्या प्रत्यक्ष माहितीतील ५ जणींवर झाले आहेत. अजूनही मुलींवर झाले असतील. ज्ञानप्रबोधिनीतर्फेही जात पात न मानता होतात. जरुर चौकशी करावी.
हे असंच चाललं तर फाटे फुटत
हे असंच चाललं तर फाटे फुटत जातील.
आता इथे संघाचा विषय चाललाय तर, ज्यांना माहीत आहे त्यांनी संघाची एकेका मुद्द्यावरची भूमिका लिहून त्यावर चर्चा केली तर बरं होईल. उदा: संघ समरसता असा शब्द वापरतो. म्हणजे सर्व जातींनी मिळून मिसळून राहावं असा त्याचा अर्थ होत असावा. समता हा एक शब्द असताना हा वेगळा कन्सेप्ट घ्यायची गरज त्यांना पडली का? तर त्यावरून संघाची जातिभेदाबद्दल, जातिनिर्मूलनाबद्दल, समानतेबद्दल काय भूमिका आहे हे माहितगारांनी लिहिलं तर बरं होईल.
तसंच पगारेंना विनंती. त्यांनी एकामागून एक प्रश्नांचे बाउन्सर टाकण्याऐवजी त्यांचं म्हणणं एक सविस्तर पोस्ट लिहून मांडावं.
चिनूक्स च्या पोस्ट्शी सहमत.
चिनूक्स च्या पोस्ट्शी सहमत.
माझे मत आहे कि उपनयन सारखे
माझे मत आहे कि उपनयन सारखे संस्कार करुन ब्राह्मण समाज हा इतर समाजापासुन स्वताला वेगळे काढतोय.
..
..
तरीही प्रत्येक क्षेत्रात आपला
तरीही प्रत्येक क्षेत्रात आपला सहभाग असावा आणि आपलीच धोरणं >>> चिनुक्स हे मोघम विधान आहे. फक्त संघालाच नाही तर तुला , मला प्रत्येकाला वाटत असत की आपला सहभाग असावा महत्वाच्या माहितीच्या क्षेत्रात.
शास्त्रज्ञांनी 'नव्या शासनाच्या ध्येयधोरणांशी सुसंगत' असंच संशोधन करावं, अशा 'अपेक्षा' व्यक्त केल्या जात आहेत. >>> उदाहरणं देणार का ? नवं शासन नक्की असं काय जगावेगळं संशोधन करायला सांगत आहे. आणि ते संशोधन केल्याने ' हिंदु' अजेंडा पुढे केला जाईल असं काही आहे का ?
गेल्या दोन सायन्स काँग्रसांमधून विज्ञानक्षेत्रातल्या संघविचारामुळे काय नुकसान होऊ शकतं, हे अनेक शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं आहे. >>> हे परत एक मोघम विधान आहे , उदाहरणं देऊ शकशील का ?
'दोनच वर्षांत इतकं, तर अजून तीन किंवा आठ वर्षांत किती?' हे त्रैराशिक आता अनेकजण मांडू लागले आहेत. >>> खरा प्रॉब्लेम इथे आहे तर , मोदी निवडुन आल्यापासुन सगळे पक्ष मिळुन हल्ला करत आहेत , अरे जरा त्यांना काम तरी करु द्या , जर ते देशोपयोगी निर्णय घेत असतील ( जरी ते कटु असतील तरी) तर उगाच फक्त विरोधासाठी विरोध करणे सोडुन द्या. अर्थात इतर पक्षांना दोष देण्यात अर्थ नाही कारण जर मोदींनी चांगल काम करुन दाखवलं तर इतरांना परत सत्तेवर यायची संधी कशी मिळणार म्हणा. सॉरी जरा जास्तच अवांतर झालं.
संघात शिस्त , निष्ठा तर आहेच पण जातीयवाद ही शिकविला जात नाही. कुठल्याही आपत्तीच्या वेळेस मदतीला धावुन जाण्यात संघ नेहमीच आघाडीवर असतो हे पण नाकारता येणार नाही.
ब्राम्हण समाज व इतर काही
ब्राम्हण समाज व इतर काही जातिंत जानवे का घालतात?जानवे हा जातदर्शक प्रकार का केला जातो.
सकुरा प्रत्यक्ष हिंसा आणि
सकुरा प्रत्यक्ष हिंसा आणि अप्रत्यक्ष हिंसा असं काही साधर्म्य पाहताय का आपण
मला असे दिसतेय की सकुरा आणि
मला असे दिसतेय की सकुरा आणि सचिन पगारे मुद्दाम धागा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याची धागाकर्त्याला सुध्दा जाणीव होती की असे होणार त्यामुळे अश्या लोकांच्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करणे उत्तम.
विज्ञानदासू, तुम्हिच ठरवा
विज्ञानदासू, तुम्हिच ठरवा भरपुर उदाहरणे आहेत की समोर.
...
<फक्त संघालाच नाही तर तुला ,
<फक्त संघालाच नाही तर तुला , मला प्रत्येकाला वाटत असत की आपला सहभाग असावा महत्वाच्या माहितीच्या क्षेत्रात.> सॉरी, मला ज्या क्षेत्रात गती नाही, अनुभव नाही त्या क्षेत्राची धोरणं ठरवायला मी जाणार नाही. दुसरं क्षेत्र कशाला, माझ्या अभ्यासाच्या विषयातसुद्धा मी असं करणार नाही. माझ्याकडे रिव्ह्यूसाठी 'कार्बन नॅनोट्युबां'वरचा एखादा पेपर आला, तर तो मी परत पाठवेन / पाठवतो. 'कोलायडल नॅनोकण' हा माझा विषय आणि मी त्याबद्दलच भाष्य करेन. अनेक जर्नलांचे संपादकही 'अमूक एक विषय नवा आहे, रिव्ह्यू कोणी करायचा हे तुम्ही सुचवा' असं लेखकांनाच विचारतात आणि ते योग्यही आहे. मला 'फिजिकल केमिस्ट्री'मध्ये पदवी आहे, म्हणजे सर्व पीएचडीधारकांनी काय आणि कसं संशोधन करावं, हे मी अनुभवाशिवाय, ज्ञानाशिवाय सांगू किंवा ठरवू शकत नाही. आपल्या वैयक्तिक आवडीनिवडीचा काय परिणाम होणार आहे, हे प्रत्येकाला ठाऊक असावं अशी अपेक्षा आहे.
< नवं शासन नक्की असं काय जगावेगळं संशोधन करायला सांगत आहे. आणि ते संशोधन केल्याने ' हिंदु' अजेंडा पुढे केला जाईल असं काही आहे का ?>
काही महिन्यांपूर्वी देहरादूनला 'चिंतन शिबीर' अयोजित केलं गेलं होतं. ३५-४० सरकारी प्रयोगशाळांचे संचालक, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातले अधिकारी, सीएसआयआरचे प्रतिनिधी आणि संघाचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. या वेळी जो जाहीरनामा निघाला, त्यात 'विद्यमान सरकारच्या ध्येयधोरणांशी सुसंगत अशाच प्रकल्पांना मंजुरी आणि आर्थिक मदत मिळेल' असं स्पष्ट लिहिलं आहे. ही ध्येयधोरणं म्हणजे गंगेचं शुद्धीकरण, स्वच्छ भारत इत्यादी. प्रयोगशाळा फक्त पगार देतात, संशोधनांचा खर्च शास्त्रज्ञांनी प्रोजेक्टांमधून मिळवायचा, ही पद्धत पूर्वीपासून आहे. पण पूर्वी सरकारी प्रोजेक्ट्स होते. या मदतीतून संशोधन सुरू राहत असे. आता नॅनोतंत्रज्ञानासारख्या विषयात नवीन प्रोजेक्ट येणं बंद होण्याची लक्षणं आहे. आता बजेटमध्ये कपात करून केवळ 'सुसंगत' प्रोजेक्टांना पैसा मिळणार. बाकीच्यांनी संशोधनासाठीचा पैसा स्वतः मिळवायचा आहे.
भारतात इनोव्हेशन करण्याच्या नादी उद्योग लागत नाहीत. म्हणूनच आपण एकीकडे स्वदेशीचा नारा देतो आणि दुसरीकडे 'इनोव्हेट इन इंडिया' न म्हणता 'मेक इन इंडिया' म्हणतो. भारतातलं इनोव्हेशन जपण्यासाठीची दूरदृष्टी नाही. सगळा भर 'आपण पूर्वी किती महान होतो' यावरच.
<गेल्या दोन सायन्स काँग्रसांमधून विज्ञानक्षेत्रातल्या संघविचारामुळे काय नुकसान होऊ शकतं, हे अनेक शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं आहे. >>> हे परत एक मोघम विधान आहे , उदाहरणं देऊ शकशील का ?>
यात मोघम काय ते कळलं नाही. मुंबई आणि मैसूर इथे वाचले गेलेले पेपर, प्रदर्शनात मांडलेली पुस्तकं याबद्दल चिक्कार लिहिलं गेलं आहे.
सायन्स काँग्रेस ही एक जत्रा असते, हे मान्य केलं तरी 'भारतीय विज्ञान पुढे न्या' हा आदेशही आहेच. 'प्राचीन भारतीय विज्ञान' या विषयावर त्यामुळे अनेक विद्यापीठं आणि प्रयोगशाळा सेमिनार इत्यादी आयोजित करत आहेत. 'प्राचीन भारतीय विज्ञान' भारतातले शास्त्रज्ञ आभ्यासत होतेच. पण केवळ तेच कसं कोण करणार बाकीच्याकडे दुर्लक्ष करून?
< खरा प्रॉब्लेम इथे आहे तर , मोदी निवडुन आल्यापासुन सगळे पक्ष मिळुन हल्ला करत आहेत , अरे जरा त्यांना काम तरी करु द्या , जर ते देशोपयोगी निर्णय घेत असतील ( जरी ते कटु असतील तरी) तर उगाच फक्त विरोधासाठी विरोध करणे सोडुन द्या. अर्थात इतर पक्षांना दोष देण्यात अर्थ नाही कारण जर मोदींनी चांगल काम करुन दाखवलं तर इतरांना परत सत्तेवर यायची संधी कशी मिळणार म्हणा. सॉरी जरा जास्तच अवांतर झालं.>
हे खरंच अवांतर आहे आणि माझ्या विषयाशी / मुद्द्याशी / संशोधनाशी काहीही संबंध नाही.
<संघात शिस्त , निष्ठा तर आहेच पण जातीयवाद ही शिकविला जात नाही. कुठल्याही आपत्तीच्या वेळेस मदतीला धावुन जाण्यात संघ नेहमीच आघाडीवर असतो हे पण नाकारता येणार नाही.>
संघानं कुठे आणि कशी मदत केली, याचा प्रयोगशाळांमधल्या संशोधनाशी संबंध नाही.
<महत्वाच्या माहितीच्या क्षेत्रात.>
हे मी आत्ता वाचलं. विज्ञान आणि संशोधन अनेकांसाठी त्यांच्या आयुष्याचा ध्यास आणि उपजीविकेचं साधन आहे. फक्त माहितीचं क्षेत्र नव्हे. मी सिनेम्याच्या सेटवर केलेली लुडबूड आणि संशोधन यांत फरक आहे. सिनेमा हे माझ्या माहितीचं / आवडीचं क्षेत्र आहे, इतरांना त्रास न देता मी तिथे काही काम करू शकत असेन तर करतो. पण सिनेमाही अनेकांच्या आयुष्याचा ध्यास आणि उपजीविकेचं साधन आहे. माझ्या लुडबुडीमुळे, माझ्या आवडीमुळे त्यांना त्रास होऊ नये, त्यांच्या कामाच्या दर्जावर परिणाम होऊ नये, ही काळजी मी घेणं अपेक्षित आहे. केवळ आवड आहे म्हणून मी निर्मात्याला - दिग्दर्शकाला सिनेमा कसा तयार करावा हे सांगणं गाढवपणाचं आहे. मी टीका करू शकतो किंवा स्वतः सिनेमा काढू शकतो. तू असाच सिनेमा तयार कर, हे मी सांगणार नाही.
<<'मूलभूत विज्ञान कुचकामी
<<'मूलभूत विज्ञान कुचकामी आहे', हा विचार केंद्रस्थानी ठेवून केवळ 'सामान्य जनतेला उपयुक्त असं विज्ञान सरकारी प्रयोगशाळांमधून बाहेर यावं' अशी धोरणं आखली जाऊ लागली आहेत. >>
------ मूलभूत विज्ञान कुचकामी आहे असा विचार रुजणे म्हणजे आत्मघात आहे.... माझ्यासाठी मोठा धक्का आहे. दोन्ही प्रकारचे सन्शोधन महत्वाचे आहे.
मूलभूत विज्ञान हा इमारतीचा पाया आहे, पायाचे महत्व कमी लेखल्यास जनतेला उपयुक्त असणार्या विज्ञानाची इमारत उभारता येणार नाही (मजबुत होणे अशक्यच आहे...).
संघाने ते जातियवादी नाहीत हे
संघाने ते जातियवादी नाहीत हे सिद्ध करण्यासाठी आंतरजातीय विवाह का घडवुन आणायचे?
ज्यांना करायचे ते करतील. त्यांच्या वैयक्तीक आयुष्यात संघाने का ढ्वळाढवळ करावी ?
संघाने जाती नष्ट
संघाने जाती नष्ट कराव्यात.आंतरजातिय, जातिय हा प्रश्नच मिटेल.सारे हिंदु एक होतील.
कुठल्याही धार्मिक बेस
कुठल्याही धार्मिक बेस असलेल्या अथवा शिस्तशीर वगैरे ग्रूपने विज्ञान क्षेत्रा लक्ष घातल्याने नाविन्यपूर्ण हाती लागेल अशी अपेक्षा चुकीचीच आहे. संघाने आपले कर्यक्षेत्र मर्यादित ठेवावे.तसे ते सगळीकडे असल्यास त्यातून काय हाशील होणार हा वर्ज्य मुद्दा. संघनिष्ठ वैज्ञानिक असल्यास नोबेल मिळेल असे कुणाला वाटू नये.
चिनूक्स कदाचित भारत संशोधनात मागे पडतो हा बेसिक मुद्दा कळकळीने मांडण्याचा संघाच प्रयत्न आहे.
भारतात इनोव्हेशन करण्याच्या नादी उद्योग लागत नाहीत<< हे मान्य.या सुसंगत सरकारही तेवढेच उदासीन आहे.
वेदामधून विज्ञान लपले म्हणत वेद अभ्यासक्रमात आणू नयेत म्हणजे मिळवलं. (अवांतर,क्षमस्व)
<चिनूक्स कदाचित भारत संशोधनात
<चिनूक्स कदाचित भारत संशोधनात मागे पडतो हा बेसिक मुद्दा कळकळीने मांडण्याचा संघाच प्रयत्न आहे.>
मग ही कळकळ चुकीच्या पद्धतीनं वापरली जात आहे. मुलांना प्रश्न विचारायला शिकवा, विज्ञानवादी दृष्टिकोन रुजवा. इथे ही कळकळ ज्यांना आहे, त्यांच्यात प्रश्न विचारत नाहीत आणि प्रश्न विचारले तर उत्तरं मिळत नाहीत. यांच्या दृष्टीनं पाश्चिमात्य ते सर्व वाईट, भारतीय काय ते उत्तम. कसा जाणार भारत संशोधनात पुढे? '१८५४ सालानंतरची शिक्षणपद्धती वाईट' वगैरे विधानांमुळे शास्त्रज्ञ बिचकले आहेत.
पगारे, सकुरा- यांचा इथे
पगारे, सकुरा- यांचा इथे उद्देश काही वेगळा दिसतोय.त्यांच्या प्रक्षोभक ,खोडसाळ पोस्ट सर्वांनीच दुर्लक्षित कराव्यात अन्यथा इथेही धाग्याची वाट लागेल. आयसिस वगैरे इथे आणणार्यांना पन्नास पाने समजावूनही काही फरक पडेल असे खरेच वाटत नाही.
इथे कोणताही अजेंडा न घेता संघावर टीका करणार्या वा प्रश्न विचारणार्या पोस्ट अपेक्षित आहेत. चिनूक्स, मयेकर यांच्या पोस्ट अतिशय आवडल्या. त्याअनुषंगाने चर्चा व्हावी.
मलाही एक टीका करायची आहे- फुल टायमर किंवा प्रचारक असल्यास विवाह करता येत नाही. पूर्णवेळ संघ कार्यास वाहून घ्यावे लागते. या जाचक अटी नाही का वाटत? एका परिचित कुटुंबातील संघाची शाखा चालवणार्या तरुण मुलावर संघाकडून दबाव आणला गेला होता की त्याने प्रचारक व्हावे. घरच्यांनी त्याला समजावले की २०-२२ हे वय असा निर्णय घेण्याचे नाही. तू आणखी ७-८ वर्षांनी हा निर्णय घे. ७-८ वर्षांनी त्याने लग्न करण्याचा, करीयर करण्याचा निर्णय घेतला व आता स्वयंसेवक म्हणून काम करतो आहे. अलीकडेच वाचलं की प्रचारक पदासंबंधी या जाचक अटी बदलण्याचा विचार संघ करत आहे. तसे असल्यास ते स्वागर्ताह आहे.
उत्कृष्ट चाललेल्या धाग्यावर
उत्कृष्ट चाललेल्या धाग्यावर मा. सकुराजी आणी मा. सचिनजी पगारेजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
http://rss.org/Encyc/2015/4/7
http://rss.org/Encyc/2015/4/7/1254694.aspx
इथे संघाच मिशन स्टेटमेंट वाचल.
बरेच प्रश्न पडले. काही वाक्यरचना मुलभूत बदल करणारी वाटली.
१. For the welfare of entire mankind, Bharath must stand before the world as a self-confident, resurgent and mighty nation.
>> ह्यात काहीही वावग अस वाटत नाही, पण सगळ्यांच भल कराव अस संघास का वाटत आणि ही उठाठेव का बरे, असाही प्रश्न पडला.
२. The Rashtriya Swayamsevak Sangh has resolved to fulfill this age-old national mission by forging the present-day scattered Hindu Society into an organized and invincible force both on the plane of Adhyaatma and on the plane of material life.
>> भारतीय इतिहासातले किंवा हिंदू समाजातले नेमके कोणते मुद्दे संघ उचलणारे? हिंदू धर्माची चिकित्सा, कर्मकांडे आदिक संघास मान्य आहेत का? एकीकडे आध्यात्मिक आणि दुसरीकडे भौतिक असा समतोल साधायचा संघाचा प्रयत्न दिसतोय, स्तुत्य आहे. कदाचित चिनुक्स ह्यांनी मांडलेल्या सध्याच्या संशोधनीय ढवळाढवळीच मूळ येथे असावे.
वरील बऱ्याच प्रतिसादात वाचले की संघात जातीपाती मानत नाहीत. तर एकुणात, हिंदू चिकित्सा संघास मान्य असावी असा अर्थ काढू शकतो का?
३. Our one supreme goal is to bring to life the all-round glory and greatness of our Hindu Rashtra. हे नेमकं काय म्हणायचं आणि कसकाय संघ अचिव्ह करणारे? all-round glory and greatness ला काहीही प्रोब्लेम नाही, पण भारताला Hindu Rashtra मध्ये संघ नेणारे का? मग त्याची संघीय व्याख्या कुठे मिळेल? दुसरा मुद्दा म्हणजे संघास सध्याची सेक्युलर घटना बदलवून तीत हिंदूच्या राष्ट्राची घटना बनवणे अपेक्षित आहे का? मग इतर धर्मियांचे त्यात काय स्थान असेल? इंग्लंड अमेरिका धर्माधारीत नसली, तरी तेथील सरकार देवावर विश्वास दाखवून सर्व धर्मियांना उपासनेचे स्वातंत्र्य देते. हिंदू राष्ट्रात नेमकी काय भूमिका असेल?
४. In order to take our nation to the pinnacle of glory, the first and foremost prerequisite is the invincible organized life of the people without which even the highest national prosperity will crumble to dust in no time.
>> ह्यातले invincible organized life of the people हा वाक्यप्रयोग मला जरा डेंजर वाटतो. संघाला लोकांची जीवनपद्धती नियंत्रित करायचीय का? म्हणजे कदाचित संघास मान्य असलेल्या गोष्टीच लोकांनी कराव्या असा अर्थ निघू शकतो का? अर्थात माझ इंटरप्रीटेशन चुकीच असू शकेल.
वरील प्रश्नांची उत्तरे मी माझ्या परीने शोधण्याचा प्रयत्न करीत आहेच.
जाणकारांनी अधिक माहिती पुरवावी.
चिनूक्स फार छान मुद्दे मांडत
चिनूक्स फार छान मुद्दे मांडत आहेत मी वाचन मात्र..
माझ्या पोस्ट बद्दल गैरसमज करुन घेतले जात आहेत असो....
एक मिशन स्टेटमेंट आलंय तर आता
एक मिशन स्टेटमेंट आलंय तर आता हे विज्ञान भारतीचं
The foundation principle of VIBHA is made
As a vibrant movement for the development of Swadeshi Sciences
As a dynamic Science Movement with a Swadeshi Spirit, interlinking traditional and modern sciences on the one hand, and natural and spiritual sciences on the other hand
As a Swadeshi Movement with modern sciences adapted to national needs.
चिनूक्स म्हणताहेत ते सगळं यातूनच आलेलं दिसतंय.
मुंज, उपनयन, आंतरजातीय विवाह, अविवाहित राहणं, गणवेश या सगळ्या सुपरफिशल गोष्टी आहेत. त्यांना नक्की काय घडवून आणायचंय, त्यांचा त्यामागचा मूलभूत विचार काय हे समजणं अधिक महत्त्वाचं आहे.
प्रकु धागा आवडला, त्यात
प्रकु धागा आवडला, त्यात व्यक्त केलेले विचार आवडले.
<<अशा प्रकारे माझ्या मनातून तिरस्कार हद्दपार झाल्यावर मला एक मानसिक शांतता मिळाली. कोणीही काहिही बोलले तरी राग येईनासा झाला. मन शांत झाले. मी समोरच्याला माफ करायला शिकलो.
अस समोरच्याला एकदा अनकंडीशनली पूर्णपणे माफ करून टाकले कि आपल्या मनातली negativity जाते, याचा मी अनुभव घेतला. माफ करणे हे समोरच्या करता नव्हे तर आपल्या स्वतः करता गरजेचे असते असे मला लक्षात आले.>>
----- अनकंडीशनली माफ म्हणजे काय ? असे केल्याने आपल्या मनातली negativity कशी जाते ? येथे काही अपवाद आहेत का किव्वा कुठल्या अपराधाबद्दल माफी करायची याच्या काही सिमा आहेत का ?
उदा: दिल्ली मधे निर्भया प्रकरणातले आरोपी, किव्वा कसाब आदी ज्यान्नी अनेक निरपराध्यान्ची निर्घुण हत्या केली अशा घटनात आपण समोरच्या व्यक्तीला माफ करणार का ?
१९८४ दिल्ली मधे हजारो निरपराधी लोकान्ना जिवन्त जाळले गेले, आजतागायत अनेक कमिशने आलीत पण पिडीत व्यक्तीन्ना न्याय मिळालेला नाही. अनेक सरकारे आली- गेली.... पिडीतान्नी कोर्टाच्या चकरा मारल्या... अशा घटनात अपराध्यान्ना अनकंडीशनली माफी देणे अपेक्षित आहे का ?
माझा उद्देश काहीही वेगळा
माझा उद्देश काहीही वेगळा नाही.जानवे हे चिन्ह जातदर्शक आहे.ते घालुन हिंदु समाजापासुन वेगळे अस्तित्व का दर्शवले जाते ह्याबद्दल प्रश्न विचारले तर ते खोडसाळ का ठरवले जात आहेत हे अनाकलनिय आहे.स्वताच्या रुढी कायम ठेउन भेदभाव कसा मिटणार.तथाकथित उच्चवर्णियांनी स्वता जुन्या रुढी सोडुन समाजाला आदर्श देणे महत्वाचे आहे इथे तर प्रश्न विचारणेही खोडसाळपणाचे मानले जाते.
उदय, ते वाक्य वेगळे उचलून
उदय, ते वाक्य वेगळे उचलून वाचलंत का?
<कोणीही काहिही बोलले तरी राग येईनासा झाला. मन शांत झाले. मी समोरच्याला माफ करायला शिकलो.
अस समोरच्याला एकदा अनकंडीशनली पूर्णपणे माफ करून टाकले कि आपल्या मनातली negativity जाते, याचा मी अनुभव घेतला. माफ करणे हे समोरच्या करता नव्हे तर आपल्या स्वतः करता गरजेचे असते असे मला लक्षात आले.>
हे सगळं बोलण्यापुरतंच.(म्हणजे जे बोललं जातं त्याबद्दल, बोलाचीच कढीसारखं असं नाही म्हणत) आणि आपल्यातुपल्यातलं आहे.
भरत - मी व्यावस्थित वाचले
भरत - मी व्यावस्थित वाचले नाही. खुलाशाबद्दल धन्यवाद.
Pages