युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sonali compound dark chocolate परत दुकानात पाठवायचा विचार केला होता पण आणणार्याचा बिचारा चेहरा पाहून व ' मला वाटले डार्क चॉकलेट हेल्दी असते' या वाक्यानंतरच्या चर्चेअंती (:mini भांडण) रद्द झाला. जर तुम्ही curry road च्या आसपास कुठेही असाल तर सर्व चोकलेट विनामोबदला घेऊ शकता!

अंजली : तुमची कल्पना आवडली, practical वाट्टे. थोड्या प्रमाणात करून पाहते. Next batch HbA1c चा रीपोर्ट आल्यावर करेन Proud

अनु : अंजली म्हणतायत तसेच जास्त कोको वाले कडू आहेत दोन्ही. Almond dark chocolate सोबत (त्याच बिचार्याकरवी) आलेली कमी कडू/ milk chocolates संपली ! ते पाहूनच मला बुद्धि झाली घरी करण्याची.
मग बिचा-याला फक्त चोकलेट साठी US ला पाठवण्यापेक्षा Crawford market ला पाठवले.

स्वाती: ट्रफल्स ची रेसिपी शोधते.

सर्वांना धन्यवाद.

मिल्क चॉकलेट आणा. डबल बॉयलर मेथडने दोन्ही चॉकलेट वितळवून मोल्डमध्ये भरा (मिश्रण). त्याचा कायतरी रेशो आहे. नेटवर भेटेल. त्यात कोकोनट रेझिन आमंड घालू शकता.

मग चॉकलेट शेक / हॉट चॉकलेट टाईप काय ना काय आल्या गेल्या च्या माथी मारायचं >>> Lol

बाय द वे माथी मारायचं की घशात ओतायचं Wink , ढोसा. हलके घ्या.

लोकांकडे चॉकलेट उरतातच कशी ☺️........... Agadee अगदी g! Da.cha. कडवट असते पण ते मस्त लागते.असो संपवा सगळ्यांच्या सल्ल्याप्रमाणे.

मिल्क चॉकोलेट नव्हे व्हाइट चॉकोलेटची स्लॅब मिळते ती मागवा. कारण त्यात फक्त मिल्क सॉलिड्स व साखर अस्ते चॉकोलेट नसते. हे एकत्र करून वितळ वले म्हणजे मिल्क चॉकोलेट लेव्हल ला येइल. ह्या मिश्रणाचे मोल्ड मध्ये घालून चॉकोलेट्स बनवून पातळ सिल्व्हर फॉइल मध्ये रॅप करून ठेवता येइल. केक बनवल्यास त्यावर ही ओतता येइल.

भारतीय पदार्थ - चॉकलेट घालून काजू मोदक, बर्फी . सफरचंदाचा कीस घालून गोड अप्पे करून ते डोनट्स सारखे क चॉकलेटमध्ये बुडवा.

चॉकलेटने माखलेले मखाणे.

हे सगळं मी करून पाहिलेलं आहे. मायक्रोवेव्ह असल्याने चॉकलेट मेल्ट करणं सोपं गेलं.

वाकड- काळाखडक जवळ लाड म्हणून हॉटेल आहे. या हॉटेल मध्ये बनणारा भात मला फार जास्त आवडतो. चिकन/ मटण रस्सा आणि हा भात म्हणजे स्वर्गीय सुख. कितीही प्रयत्न केला तरी तसा भात जमतच नाहीये. कुणाला कल्पना आहे का तो कसा बनवतात? तांदूळ बहुधा इंद्रायणी असतो, अधिक वर्णन करायचे झाल्यास, खूप चिकट, भात काढून घेतल्यावर भांड्यात दुधाळ रंगाचा थर दिसतो.

अजिंक्य, असे करा: इंद्रायणी किंवा आंबेमोहोर तांदूळ घ्या. जितका तांदूळ हवा असेल तो धुवून घ्या व पाण्यात तास भर भिजवून घ्या. मग ते पाणी टाकून द्या व मग एक वाटी तांदुळास दोन वाटी पाणी घालून प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या. दोन शिट्ट्या. भाताची लंगडी वर ठेवा व खाली वरणाचे किंवा तीन बटाटे ठेवुन मग तांदु ळाचे भांडे ठेवा म्हणजे भातात जास्त पाणी जाउन भिजकट होत नाही. शिजवताना पाण्यात अगदी अर्धा छोटा चमचा तेल घाला. कुकर मुरला की झाकण काढून पहिल्या वाफेचा वाढून घ्या. कुकर उघडायच्या आधी सर्व जेवण व्यवस्थित वाढून घेणे, पाणी ठेवणे, वाचायचे पुस्तक किंवा बघायचे व्हिडीओ लाऊन ठेवा व म्हणजे भाताची वाफ वाया जाणार नाही. करून सांगा मला.

घरी "कोम्बडी वडे" मधल्या वड्याच पीठ शिल्लक आहे, पण सध्या चिकन खाण सोडुन दिल आहे, तर वड्या बरोबर कुठला रस्सा - भाजी किंवा उसळ - चांगला लागेल ?

ते श्रावणात काही मंडळी मसुराच veg mutton करतात, ते पण चांगले लागेल बहुतेक. मला कोंकणात veg थाळी मध्ये ह्या वड्याबरोबर काळया वाटण्याची उसळ मिळाली होती.

सोसायटीचे रायआवळे मिळाले आहेत.तर त्यांचे लोणचे कसे करायचे?नुसते सुकवायचे असतील तर उकडून वाळवायचे की नुसते किसून?

मंजूताई, तुम्ही टंकलेला टक्कू पण पाहिला.पण रायआवळे छोटे असतात ना मग किती किसणार?
कुरड्या मस्त झाल्या.लहान केल्या ते चुकलेच.त्यामुळे तुकडे जास्त पडले.कुरड्यांचा दुसरा घाणा ओव्हर कॉन्फिड्न्समधे फ्लॉप.त्याच्या पापड्या केल्या आहेत. गरम पाणी काढून घेताना मोजले नाही.

अबब! एवढे? इकडे पाठवुन द्या थोडे! Lol

अनिश्का, तुम्ही सांगितलंय त्याच पद्धतीने आजी लिंबु मुरवायची मिठात.. आवळेसुद्धा मुरवातात हे माहिती नव्हत..

@देवकी यु ट्यूबवर बिग फ़ुडी चा 'हेल्दी अँड क्विक आमला पिकल ' असा अडीच मिनिट चा व्हिडीओ आहे रायावळे वापरून केलेला. लास्ट इयर हे केले होते तीन एक महिने आरामात टिकते फ्रिजमध्ये. एकदम टेस्टी बनते.

घरी मिश्र डाळींचे वड्यांसाठी करतो ते मिश्रण वाटून फ्रिजमधे ठेवलेले आहे. वडे करायचे नाहियत. दुसरे (तळण सोडून)
काय करता येईल?

Pages