युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांचे धनवाद, फोडी वगळून sauce खाणे एवढाच उपाय आहे म्हणजे.>>चव काय आलीय? मला असं वाटत सालीचा तुरटपणा उतरला असेल.
आंबट गोड चव असेल तर ठीकय
तुरट असेल तर मग गोड +आंबट + तुरट अशी चव असेल तर कसं खाणार.
माझ्या आईनी लिंबाचा गोड़ लोणचं घालून दिलाय.
लोणचं फारच यम्म झालंय
चटण्या, लोणची म्हणजे आईच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय.

इन्स्टंट यीस्टच्या डब्यावर लिहिले असेल. तरी साधारणपणे जितकी वाटी पावाचे पीठ असेल त्याच्या निम्म्या वाटी पाणी घ्यायचे, त्यात चमचाभर साखर घालायची आणी यीस्ट घालून ते ढवळायचे. विरघळले कि झाकून ठेवायचे. दहा मिनिटात पाणी फुगलेले दिसेल, वर फेस दिसेल. ते तसेच पावासाठीच्या पिठात ओटायचे. पाण्याच्या जागी दूध वापरता येते. दूध/पाणी थोडे कोमट असले तर उत्तम. साखर मात्र विसरू नये॥

येत्या गणेश जयंतीला आमच्याकडे दोन दिवस गणपती बाप्पा येणार आहेत. रात्री ऐंशी ते शंभर लोक जेवायला असतील. चपाती,डाळ, भात, मिक्स व्हेज फ्लॉवर मटार वगैरे घालून, तळलेल्या मिरच्या, लोणचं, पापड आणि गुलाबजाम असा मेनू आहे. याआधी एवढ्या प्रमाणात स्वयंपाक बनवला आहे पण आता जरा साहित्याचे प्रमाण विसरले आहे. तर जरा प्रमाणाचा अंदाज द्या ना.

पण मेन मुद्दा हा नाहीये तर मी रविवारी दुपारी म्हणजे दोन दिवस आधीच गुलाब जामुन बनवून ठेवण्याचे ठरविले आहे कारण नंतर अजिबात वेळ नाहीये. तर मला असे विचारायचे होते की दोन दिवस गुलाब जामून फ्रिजच्या बाहेर खराब होणार नाहीत ना? आणि हो चितळ्यांचे इन्स्टंट मिक्स वापरून गुलाबजामून बनविणार आहोत. इतर वेळी गुजा बनवताना मी नेहमी त्यात थोडासा खवा मिक्स करते त्यामुळे मस्त चव येते पण यावेळेस नाही करणार कारण की खव्यामुळे खराब होतील असं वाटतयं. तयार गुजा स्टीलच्या डब्यात भरून ठेवले तर राहतील ना व्यवस्थित?

गुजा तळून कोरडेच डब्यात ठेवा.पाक करून ठेऊ नका.>> पण नंतर ते पाकात मुरतील का?

त्यापेक्षा गुजा तयार करून घरच्या फ्रिजमधे जागा नसेल तर शेजारच्यांकडे (त्यांच्या फ्रिजमधे) ठेवा.

तयार गुजा स्टीलच्या डब्यात भरून ठेवले तर राहतील ना व्यवस्थित?>>हो ठेवा बिनधास्त नाही होणार काही.
मी मागच्या फेब्रुवारी मध्ये मुलाच्या वाढदिवसाठी जवळपास अर्धा kg चे गुलाबजाम बनवले होते 2 दिवस आधी.
काही नाही झालं
व्यवस्थित राहिले उलट पाक छान मुरला
माझे तर खव्याचे होते. सध्याचा मौसम बघता काही होणार नाही

गुलाबजाम करा आरामात दोन दिवस आधी. फक्त तळून ठेवा
पाक पार्टीच्य दिवशी करायच्याआधी, फ्रीजमधून गुजा काढून ठेवायचे.
आधी सगळे गुलाबजाम मोदकपात्रात एक पाच मिनिटेच वाफ काढायला ठेवायची, एकेक बॅच वाफवून काढायची मग कोमट पाकात टाकायचे व झाकण ठेवायचे. मस्त होतात. माझ्या आईची टिप आहे. आई एकटीनेच दर दिवाळीला करते आमची घरगुती दिवाळी पार्टीला १०० एक गुजा. खव्याचेच असतात.

प्रतिसादासाठी सगळ्यांना धन्यवाद.
@ सस्मित, हो गुजा घरीच बनवायचे आहेत. फक्त गुजाच नव्हे तर इतर स्वयंपाकसुद्धा. Happy

@ देवकी, झंपी, तुमची आयडीया चांगली आहे पण गणपतीच्या दिवशी अजिबातच वेळ मिळणार नाही. सकाळचा मोदकाचा, नैवद्याचा स्वयंपाक असणार आहे. तेव्हापण २०-२२जण असतील जेवायाला. दरवेळी दुपारचे ३-३.३० तरी वाजतात आवरायला मग लगेचच रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेतो.
गेल्यावर्षी शेवयांची खीर केली होती. तेव्हाही दोन दिवस आधीपासून दूध आटवून घेतले होते. आदल्या रात्री सुद्धा आटवले होते त्यामुळे खराब झाले नाही. नंतर गणपतीच्या दिवशी दुपारी शेवया आणि ड्रायफ्रुट्स तूपावर भाजून दूधात घातले. १५ मिनीटात खीर तयार झाली होती.
२००-२५० गुजा बनवावे लागतील, तेव्हढे फ्रिजमध्ये मावणार नाहीत. शेजारी एकच घर आहे त्यांच्या फ्रिजमध्येपण नाही मावणार Wink

@रुचा, मलाही तसेच वाटत होते की या हवामानात टिकतील म्हणूनच बेत केलेला पण भितीही वाटतेय खराब झाले तर..

सोप म्हणजे लाडु, बर्फी असा आयटेम करुन ठेवा, टिकायची अजुन खात्री, घोळ आणी कष्ट दोन्ही कमी.
दुधाचाच पदार्थ हवा असेल तर फ्रुट सॅलेड पण जमु शकेल फक्त सगळ्या फळाची चिराचीरी करायला एक डेडिकेटेड पर्सन असला की झाल.

निल्सन, मोदकपात्र असेल तयार म्हणून म्हटलं.

इतका मोठा इतर जेवणाचा प्लॅन आहे तर गुजाएवजी मुगाचा शीरा आधीच करून वगैरे जमेल का?
गुजा खुपच कटकटीचे काम आहे( अ. आ. मा. म.) , बाकी तुम्हाला जे जमेल ते. शुभेच्छा.

@ सस्मित, हो गुजा घरीच बनवायचे आहेत. फक्त गुजाच नव्हे तर इतर स्वयंपाकसुद्धा.>>>>> सगळा स्वयंपाक घरी करताय म्हणून तर गुजा मागवता येउ शकतात का असं मला म्हणायचं होतं.. Happy
असो शुभेच्छा.

गुलाबजाम हा मस्त आणि सोपा आहे, चितळे चा रेडिमिक्स वापरले तर दीड तासात सगळे होऊन जातील, प्रत्येकी चार अशा हिशेबाने गुजा करा, एक किलो चितळे मध्ये माझ्या अंदाजाप्रमाणे 160 च्या आसपास गुजा होतात, दोन किलो रेडिमिक्स वापरा, हवे असेल तर एक एक किलो असं करता येईल.
गुलाबजाम खराब होणार नाहीत, 28 तारखेला गणेश जयंती आहे, 26 ला रात्री करू शकाल का? फ्रिज शिवाय नीट राहतील आणि छान मुरतील.

गुलाबजामचा पाक बर्‍यापैकी तयार असतो (रसगुल्ल्यांसारखा कच्चा नसतो). तर पूर्ण तयार गु जा दोन दिवस सहज राहतील बाहेर फ्रिजशिवाय. उलट पाकात असगदी मस्त मुरतील. गरम गरम झाकू नका फक्त. आणि ठेवतांना बेताच्या डब्यांत ठेवा म्हणजे वाढतांना सोयीचं होईल.

मी चितळे मिक्सचे ८० गुलाबजाम हल्लीच केले होते. पटकन होतात, सोप्पे आणि टेस्टला एकदम छान. (करायला पाहिजेत परत!)

मी आदल्या दिवशी करुन फ्रिजमध्ये ठेवले होते. सर्व्ह करायच्या आधी पातेलं परत गॅसवर ठेवलं. मस्त झाले. पार्टीनंतर उरलेले आम्ही २ दिवस खाल्ले तेही फ्रिजमध्ये ठेवून जेवायच्या आधी बाहेर काढून ठेवायचे.

पाकात असगदी मस्त मुरतील.>>हो खूप छान मुरतात.
इथलं डिस्कशन वाचून गुजा खायची इच्छाहोतीय. but not चितळे मिक्स actual खव्याचे. माझी आई फार मस्त गुलाबजाम बनवते.
निल्सन तुमच्या गुलाबजाम चे फोटोस इकडे टाका.
आम्ही खाल्ले असं समजू Happy

Compound dark chocolate (500 g) milk chocolate ऐवजी चुकून आणले गेले आहे.
Almond dark chocolate चा एक बार अगोदरपासून होता.
मला डार्क चॉकलेट ची विशेष आवड नाही. असती तरी इतके खपणार नाही. नेट वर recipe पाहिल्या. पण डार्क चॉकलेट संपवण्यासाठी खूप कष्ट घेऊ शकत नाही तसेच घरी मैदा व कोको पावडर नाही. अगदीच लागले तर आणेन.
तर या डार्क चॉकलेट चे काय करावे याबाबत जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

तसेही अर्धा किलो चॉकलेट लगेच संपणार नाहीच . मिल्क चॉकलेट ऍड करून वेगवेगळ्या आकाराचे मोल्ड वापरून माईल्ड चॉकलेट बनवून ठेऊ शकता..
याच माईल्ड चॉकलेट(चॉकलेट वितळलेले असताना) मध्ये फुगा बुडवून करतात तसल्या चॉकलेट च्या वाट्या बनवून ठेवायच्या आणि त्याच्यात आईस्क्रीम स्कुप ठेऊन वाटीसकट खायचे .. किंवा वेगवेगळी फ्रुटस घालून खायचे ..
मग चॉकलेट शेक / हॉट चॉकलेट टाईप काय ना काय आल्या गेल्या च्या माथी मारायचं Wink Light 1

लोकांकडे चॉकलेट उरतातच कशी ☺️☺️आमच्याकडे चॉकलेट सदृश कोणत्याही वस्तूवर लगेच सर्व आबालवृद्ध तुटून पडतात.मागे एकदा एका नातेवाईकांनी आणलेले अंमळ खमंग नाचणी लाडू पण बच्चे मंडळींनी चॉकलेट लाडू म्हणून खाल्ले.

लोकांकडे चॉकलेट उरतातच कशी>>> Compound dark chocolate म्हणतायत ना पण त्या .. ते कदाचित कडसर असते थोडे ७० पेक्षा जास्त % cacao असेल तर जरा तुरट कडसर लागते .. तसे असेल कदाचित ते ..
त्यातले थोडे किसून ठेवा .. आणि आईस्क्रीम / पॅनकेक यावर टाकून खा .. ब्रेड भाजून गरम असताना भुरभुरवा..

Pages