युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे कोणी तरी त्या रामसे ला बोलवा - पाव कसा कापायचा ते सांगायला <<<<<
गॉर्डन रामसे, रामसे बोल्टन की शाम, तुलसी,इ. हॉरर ब्रदर्समधले रामसे?

सूर्यास्ताच्या सुमारास उत्तरेस तोंड करून उभे राहावे.हातात पाव धरून त्याचे बूड स्वतःकडे (म्हणजे दक्षिणेकडे) आणि तोंड उत्तरेकडे करावे.कात्री हातात धरताना आपले कोपर आग्नेय दिशेला आणि कात्री ईशान्येकडे हलेलं असे पाहावे.ज्यांना पाव द्यायचे ते पाहुणे पश्चिमेला तोंड करुन पूर्वेला बसवता आल्यास उत्तम.इतके सगळे पाहून दमल्यावर बाल वोशिंग्टन ने झाडं कापली होती तसे भसाभसा पाव वेडेवाकडे कापायला चालू करावे.मध्येच कंटाळा आल्यास ' पाव कापल्याने त्यातला पोषक यीस्ट आणि बीव्हिटामिन चा अंश नष्ट होतो असे त्यापुढे आलेल्या पाहुण्यांना सांगून बिन कापलेले पाव द्यावे.
(कात्रीने आधी 3डी लसूण वगैरे कापलेले नसावे.)

एके काळी मराठ्यांच्या बायका तलवारीने हवेतलं लिंबू कापत. आजच्या बायकांना सुरीने पाव कापता येत नाहीत...
#आजकालच्या मुली

इतके सगळे पाहून दमल्यावर बाल वोशिंग्टन ने झाडं कापली होती तसे भसाभसा पाव वेडेवाकडे कापायला चालू करावे. >> आप के पाव देखे, बहुत हसीन है, इन्हे जमिन पर मत उतारियेगा....
(फॉर दि अनैनिशियेटेडः पाकिजा)

गॉर्डन रामसे, रामसे बोल्टन की शाम, तुलसी,इ. हॉरर ब्रदर्समधले रामसे? >> गोवर्धन रामसेंना बोलवा, नाही तर उगीच विरानावाल्यांना बोलवाल आणि ते त्या चुडैल वगैरेंची नखे आणतील पाव कापायला Lol

Sword of gryffindor आणायला पाहिजे पाव कापायला. व्हॅलीरियन स्टील नको त्याने wight कापले जातात.

वीराना वाले उलटे पावच आणतील अ‍ॅक्चुअली. कापायचं काय ते तुम्ही बघून घ्या<<< Lol

आत्ताच वडापाव वाल्याला सुरीने पाव कापताना बघितले अन नकळत कधीच न पाहिलेल्या इथल्या माबोकरणी त्याला पाव कसे कापायचे शिकवताना दिसल्या Proud

शेवया खूप शिल्लक आहेत. खीर व उपमा सोडून काय करता येईल ? किंवा कमी साखर वापरून चॉकोलेट खीर साठी वापरता येईल का ?

चार चार पाने पावावर चर्चा... मायबोली का पाव भारी हो गया... Wink Happy

सध्या शेवईबद्दल काही विचारू नका. आंध्र प्रदेशासारखे तिचे कसेपण तुकडे होतात. एक अक्साई चीन आणि दुसरा मायबोलीचा पाव... आंतरराष्ट्रीय जिव्हाळ्याचे प्रश्न... Wink Happy

धमाल Rofl

Lol
काल माझ्या नवर्‍याने Croissant पण कात्रीनेच कापला आणि छान कापला गेला म्हटला. इथली चर्चा आठवून फिस्सकन हसूच आले एकदम.

Pages