Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे काय मज्जा चालु आहे इथे.
अरे काय मज्जा चालु आहे इथे.
घरात खूप सफरचंदे आहेत..
घरात खूप सफरचंदे आहेत.. कोणीही फळ कापून दिलं तरी खात नाहीये, सफरचंदे संपण्याची काही युक्ती/ पाकृ आहे का? सफरचंदाची खीर किंवा शिरा खपणार नाही
किल्ली, मी सफरचंद खिसून
किल्ली, मी सफरचंद खिसून पॅनकेक्स मध्ये घालते संपायला. इथे कुठेतरी एका स्पर्धेतली रेसिपी असावी. ॲपल क्रंबल्स वगैरे आॅनलाइन शोधून बघ.
आमच्याकडे अॅपल पिकिंगला जाऊन
आमच्याकडे अॅपल पिकिंगला जाऊन आल्यावर अशी सफरचंदं उदंड जाहली होती. आम्ही फ्रेंड्सना वाटून टाकली होती.
तरीही बरीच उरली होती. मला नुसतं खायला बोअर होत होतं म्हणून अॅपल स्लायसेस +पीनट बटर असं स्नॅक खात होते.
स्मूदी किंवा ज्यूसिंग साठीही वापरले.
अॅपल पाय, चॉकोलेट/कॅरामल
अॅपल पाय, चॉकोलेट/कॅरामल कव्हर्ड अॅपल, फ्रुट सॅलड , केक, मफिन्स , अॅपल पुरी ,जाम (विसरलेले)
ओव्हन असेल तर एकदम लो हीट ला
ओव्हन असेल तर एकदम लो हीट ला स्लायसेस डी-हायड्रेट करून ठेवता येतील. बरेच महिने टिकतात आणि कधीही चघळायला म्हणून कामी येतात.
किंवा उन्हातही वाळवता येतील. दोन्हींच्या योग्य कृतीस मात्र माझा पास. वैष्णोदेवी, उधमपूर भागात भरपूर खाल्ले होते असे वाळवलेले सफरचंद.
आंबा/फणस पोळी सारखी याची पण पोळी होईल का?
सध्यातरी हे उपाय सुचलेत बल्क मध्ये सफरचंद संपवायचे.
सफरचंदाचा साखरांबा
सफरचंदाचा साखरांबा
सफरचंदाचे चिप्स, microwave मध्ये होतात.
वाळविलेले सफरचंद सुचवणार होते
वाळविलेले सफरचंद सुचवणार होते रे योकुटल्या पण डिहायड्रॅटर पाहिजे त्याला. अवन मध्ये जळतात. कसे जळतात त्याची कृती आहे माझ्याकडे पण देत नाही मी.
लहान बाळ असतील तर प्युरी पण करता येईल.
सीमा देच आता कृती
सीमा देच आता कृती
सफरचंदाची बर्फी फार मस्त
सफरचंदाची बर्फी फार मस्त होते. आरतीनं कृती लिहिली आहे बहुतेक.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/29864
आमच्याकडे सफरचंद, चिकू
आमच्याकडे सफरचंद, चिकू,द्राक्षे काहीही जास्त असेल तर लगेच मुरांबा करते मी. नवऱ्याला आवडतो, मी नाही खात.
दह्यातली कोशिंबीर, सलादमध्ये
दह्यातली कोशिंबीर, सलादमध्ये
सीमा
सफरचंदाची कोशिंबीर
सफरचंदाची कोशिंबीर
सफरचंद बारीक चिरुन, दही, मिठ, साखर, हिरवी मिरची बारीक चिरुन, जिरे पावडर घालुन मिक्स करायचे.
अळुवड्या करण्यासाठी जी अळूची
अळुवड्या करण्यासाठी जी अळूची पाने वापरतात, ती अळूच्या भाजीसाठी वापरू शकतो का?
म्हणजे कधीच असं केलं नाहीये ना म्हणून विचारलं. (अळुवड्या करूनही पानं उरली आहेत. आणि ती जरा फाटली असल्याने कुणाला देण्याऐवजी भाजीचा पर्याय आहे का ते बघणार. पुन्हा लगेच अळुवड्या करायच्या नाहीत. हुश्श.)
अॅपल रॅलिश बहुधा लालुची
अॅपल रॅलिश बहुधा लालुची रेसिपी आहे, शिजुन आकारमान खुप कमी होते त्यामुळे बरिच खपतिल अॅपल.
@प्राचीन
@प्राचीन
पाने बारीक चिरून बेसन पोळ्यासारखा पोळा करता येतो आणि तू कुरकुरीत खमंग होतो हे नक्की,मी केला आहे,
मात्र भाजीबद्दल माझा पास
धनिआदू.
धन्यवाद आदू.
अळूच्या पानाची भजीही छान होते
अळूच्या पानाची भजीही छान होते पालक भजी सारखी
अळूवडी ढोकळा टाईप जमेल का?
अळूवडी ढोकळा टाईप जमेल का? आवडेल का?
पानं बारीक चिरून बेसनाच्या (हळद, तिखट, मीठ, गूळ, चिंच, काळा मसाला) मिश्रणात घालून थाळीत किंवा कुकर च्या डब्यात अर्ध्या पाऊण इंचाच्या जाडीत वाफवणे गार झाल्यावर हव्या त्या आकारात कापून उथळ तळणीत तळणे. यात खटाटोप बराच कमी होतो असं वाटतंय.
कोथिंबीरवडीच्या पद्धतीने
कोथिंबीरवडीच्या पद्धतीने अळूवड्या.
मी पण हेच लिहिणार होते मगाशी,
मी पण हेच लिहिणार होते मगाशी, याचे मुटके पण करता येतात आणि वड्या किंवा मुटके कापून फोडणी घालून खरपूस परतून पण छान होतात.
मी असे करताना चिंच गुळ नाही घालत, तिखट, मीठ, हळद, जिरे, ओवा, मिरपूड, हिंग, चाट मसाला ऑप्शनल. आलं लसूण मिरची कोथिंबीर ठेचा पण घालते कधी कधी पण तोही ऑप्शनल.
अळू किंचित जरी खाजरे असेल तर मात्र चिंच गुळ किंवा लिंबू रस साखर असं काहीतरी हवं.
सगळ्यांच्या भरगच्च
सगळ्यांच्या भरगच्च रेशिप्यांबद्दल आभारी आहे. आता हे सगळे ट्राय करायला अजून अळू आणायला हवंसं वाटतंय :स्मित :
अमेरिकेत डोकं न वापरता
अमेरिकेत डोकं न वापरता करायच्या उंधियुमध्ये चुकून डोकं वापरलं गेलं. आता काय करू?
भाज्या वापरायच्या असतात ना
भाज्या वापरायच्या असतात ना उंधियोत आणि मसाले, डोकं का वापरलं
.
भेजा उंदियो केला गं अंजू
भेजा उंदियो केला गं अंजू त्यांनी
(No subject)
सा. प्लीज हलके घ्या.
अमेरिकेत डोक वापरलय कि
अमेरिकेत डोक वापरलय कि अमेरिकेत डोक वापरलय ? ते सांगाल का?. त्याप्रमाणे सल्ला बदलेल.
नेमका कुठल्या शब्दावर जोर आहे ?
अमेरिकेत वापरलं
अमेरिकेत वापरलं
डोकं वापरलं
साहित्यात नाही, कृतीत वापरलं,
हुश्श!!
युक्ती विचारली तर पंचनामा करत्यात!
माफ करा. युक्ती सांगता येत
माफ करा. युक्ती सांगता येत नाही ना म्हणून असं.
Pages