युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योकु यांची शिरा रेसीपी वाचून धक्का बसला. आम्ही शिरा क्वचित वर्षातून एखादं दोन वेळेस करत असू, पण वर्षानुवर्षे करत असलेली कृती भलतीच वेगळी आहे आणि ती चुकीची आहे हे आज एवढी वर्षं गेल्यावर कळलं आहे. मी करते त्या स्टेप्स अशा -
तुपात रवा खमंग भाजून घ्यायचा
त्यामध्ये ड्रायफ्रुट्स, केशर, वेलदोडे पावडर घालायची
मग साखर घालायची आणि सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं. अजूनही हे कोरडंच असतं.
सर्वात शेवटी उकळतं दूध घालून भरभर हलवायचं आणि झाकण घालून वाफ येऊन द्यायची.

कधी चवीत फरक वाटला नाही. पण मग कदाचित ते रवा फुलणे प्रकरण आम्हाला अनुभवता आलं नसेल. (खाताना तर हलका आणि खमंग तर लागतो)

वाटीभर तूप गरम करून त्यात रवा भाजायला घ्यायचा, चांगला सोनेरी रंग आला की थोडं, थोडं गरमच दूध घालून फुलवायचा. नीट शिजल्या सारखा झाला की केळ्याचे काप, सुकामेवा (हा आधी तुपात तळून निराळा ठेवून यावेळी घालता येइल), केशर मंडळींना प्रवेश द्यावा. नीट हलवून साखर घालावी. आणि झाकून ठेवून एक दणदणीत वाफ येऊ द्यावी. सुरेख शिरा होईल.>>>>>

कसली जबरदस्त रेसिपी आहे.... भरपेट जेवलेल्याच्या पोटात परत शिर्याच्या भुकेने खड्डा पडेल आणि उपाशी तर बिचारा तोंडातल्या लाळेने गुदमरून मरेल.

उद्या करायलाच हवा......

मलई बर्फी पाहिली मी, पण मिल्क पावडर नाहिये, आणि तेवढंच आणण्यासाठी बाहेर जायला नको वाटतयं, म्हणुन अजुन ऑप्शन्स विचारले. धन्यवाद तरी.

Dulce de leche
सोपं, साधं, कमी कटकटीचं?
माहीत नाही.

शिर्‍यासाठी, रवा डबल परतावा, एकदा कोरडाच भाजावा , मग तुपात परतुन घ्यावा. आणि कंजुषीप्रमाणे पाणी न वापरता ‘दूधच’ घ्यावे.

लाँग अँड बोअरिंग पोस्ट अलर्ट .........................

प्रश्न - शिरा बनवताना शिर्याचा रंग थोडा brownish कसा येईल कोणी सांगेल का >>>>
उत्तर - अर्र इत्कं काही. सकाळी ब्रेफाला शिरा करताना रवा मंदाग्नीवर भाजायला घेतला की त्याच वेळी लंचला काय करायचं बरं? असा विचार करून थोडावेळ पँट्रीत मूग (किंवा पटकन करू शकणारे कुठलेही अन्य मेन कोर्स रॉ मटेरिय्ल) शोधणे, तितक्यात कोणीतरी म्हणेल "मूऊऊऊउग नाही... भ्याआआआ(पायाची आदळाआपट इ. लक्शात ठेवा ही अजून ब्रेफा न केलेली मंडळी आहेत) मला मीट पाहिजे" मग पटकन फ्रीज आणि नंतर फ्रीजर मध्ये मीट शोधणे.

तितक्यात रवा भाज्तोय हे आठवेल की एकदा दणादण वरखाली मोठ्या दांड्याच्या चमच्याने ढवळून "अरेच्या, अजून तर काहीच भाज्ला नाहि", म्हणून पुन्हा फ्रीजरम्ध्ये शोधाशोध करत होतो हे आठवून तिथे जाणे. तिथे तुम्ही किती आस्व्पू किंवा लेफ्टोव्हर फ्रीजर मध्ये टाकणे, हे करता त्याप्रमाणे तुम्हाला तळलेले मसाले, इं.ग्रो मधल्या असाव्यात म्हणून आणलेल्या पण तळाला गेल्यामुळे उपेक्षित राहिलेल्या भाज्या अशा काही गोष्टी दिसल्यामुळे तुम्ही इन जनरल काय करत होता ते विसरलेले असालच

तेवढ्यात मागच्याच्या मागच्या आठवड्यात जास्त प्रमाणात करून ठेवलेली पावभाजी दिसेल. "अरे वा, जेवणाचा प्रश्न सुटला", असं मनात येईल आणि त्याचवेळी तुम्हाला तो रवा आठवेल. अर्र बिर्र काही म्हणायचं नाही. ती भाजी काढून काउंटर वर ठेवा पहिले. म्हणजे लंचला काय हा प्रश्न पडणार नाही. मग कसला तरी वास येईल थोडा तुपट, थोडा गोडूस टाइप.. (लब्बाड लोकं करपला का म्हणून कुठून तरी ओरडतील... जस्ट इंग्नोर)

"ओह नो रवा...." असं म्हणून धावा त्या रव्याकडे आणि तो (म्हणजे रवा) चांगल्या मूडमध्ये असेल तर छान तपकिरी रंग खालून आला असेल. आता पुन्हा लांब दांड्याचा चमचा घेऊन वरचा भाग खाली करा. कदाचीत भांडं इतकं तापलं असेल की खालचे रवाकण क्षणात तांबूस-तपकिरी रंग धारण करायला सुरुवात करतील.

हाच तो क्षण आहे इतर फलंदाज बॅटिंगला उतरवण्याचा. पटापट साखर, दूध (की पाणी ...ऐपतीनुसार किंवा कॅलरी काउंट/कार्ब्/लॅक्टोस इ.इ. चा विचार करून) टाकून झाकण लावलं की विजयी भवं. यासाठी रवा भाजतानाच हे फलंदाज बर्नरच्या एका अंगाला काढून ठेवावे. अतिचशय सुंदर रंगाचा शिरा मिळेल. मग त्या पांढर्ञाला मारा गोळी Happy शिवाय लंचची पण सोय झाली आहेच (लेफ्टओव्हर लाइक पावभाजी) त्यामुळे लंचच्या वेळेस, वॉक्/सोमीवर टीपी किंवा घरच्याच सकाळी शिरा खाऊन तृप्त झालेल्या लोकांना वेवेळेस,, यातलं हवं ते करता येईल.

Light 1 दिवा लागेल का माहित नाही पण देऊन ठेवते. अगदी साधारण असाच घडलेला प्रसंग आठवला आणि राहावलं नाही हो. Happy वरचे मोलाचे सल्ले आधी वाचा. मी स्वतः शिरा (म्हणजे साधा) फार आवडीने खात नाही. मला तो आंब्याचा शिरा खायला आवडेल पण ते जाऊदे आता इथे काही तसा आंबा किंवा त्या देसाईबंधूचा टीनमधला आंबा मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही ब्राउन शिरा ट्राय या मेथडने करायचंच ठरवलं तर करा पण अर्थातच तुमच्या जबाबदारीवर Wink

झंपी दूध वापरून केलेला सफेद दिसतो असा अनुभव आहे.. मे बी मी रवा ब्राउन भाजून घेतला नसेल तेव्हा..
वेका Proud सध्या लॉकडाऊन मुळे सामान जपून वापरावे लागतेय सो सध्या असे प्रयोग करून रिस्क नको Proud Rofl

अहो ती पोस्ट झंपींची आहे. पाणी का दूध महत्त्वाचं नसून कंजूषी का त्या पोस्ट मधला की वर्ड आहे. Rofl Wink

आणखी एक प्रश्न आहे Happy
एक ओळखींच्यांनी आंबे आणि चिकू दिले आहेत.. आंबे तर संपतील Proud पण चिकू मी खात नाही.. सामान असते घरात तर ice cream बनवलं असतं पण ते ही नाहीये.. चिकू फ्रीझर मध्ये ठेवून दिले तर राहतील का खूप दिवस?

चिकू freezer madhe राहणार नाहीत.त्यांची टेस्ट खराब होईल.त्यापेक्षा शेजारी पाजारी द्या.
बाकी वड्या वगैरे करतात की नाही ते माहीत नाही.

दूध आहे का? चिकू मिल्कशेक करता येईल. तोच मिल्कशेक फ्रीझ केलात तर ice cream. चिकू एकदम गोड असतील तर साखर पण लागणार नाही.

कोणालातरी द्यावे लागतील बहुतेक... मिल्कशेक or ice cream बनवायला condensed milk milk powder नाहीये..
नाहीतर ते सोप्पे icecream बनवून बघितले असते

महालक्ष्मी सरस मध्ये चिकूचे वाळलेले काप मिळतात. बहुतेक चिकू कापून त्याच्या चकत्या डी हायड्रेट करत असावेत. चवीला छान लागतात.

चकत्या उभ्या कापून ताटात ठेऊन, पातळ फडक्याने झाकून उन्हात ठेऊन बघा. कडकडीत वाळल्या तरी चिकूची चव राहते.

चिकू फ्रिजला दाद देत नाही. पूर्ण उतरून पाणी होणार. फेकून द्यावे लागणार.

चिकू असेच ठेवले बाहेर तर किती दिवस राहतील>>>
पिकले की लगेच खराब होतात.

चिकूच्या वड्या मस्त होतात. पण मला प्रमाण, कृती वगैरे माहिती नाही. तुम्ही एरवी कॉन्फिडन्टली इतर वड्या करत असलात तर तेच प्रमाण घेऊन पहा.

किती मोठे चिकू आहेत त्यावर एक ग्लास मिल्कशेकसाठी - 2 चिकू चा गर (बिया, साल काढून) , एक कप दूध, 1 चमचा साखर एकत्र करुन मिक्सरमध्ये घुसळा. चव आवडली तर तसाच मिल्कशेक प्या आणि नाही आवडली तर फ्रीझरमध्ये ते मिश्रण ठेवा, आईस्क्रीम होईल. थोडं सेट झाल्यावर परत एकदा मिक्सरमध्ये घुसळून घेतलं आणि परत फ्रीज केलंत तर soft होईल, crystals लागणार नाही.

चिकू मिल्कशेक करताना एका वेलदोड्याचे दाणे घालायचे, छान चव येते. वेलदोडा नको असेल तर मिल्क चॉकलेटचे २ तुकडे किसून घालायचे. दोन्ही प्रकार मस्त लागतात एकदम.

एक बेसिक प्रश्न ,
जुई रागावू नका पण चिकू आवडत नाही पण आईसक्रीम आवडेल का ?
नाहीतर ज्याला आवडतात त्या कोणाला तरी देउन टाकणे उत्तम

राजसी एवढ्या थोड्या ingredints ने नक्की होईल ना icecream?
नाहीतर स्वस्ति नी म्हंटल्याप्रमाणे ज्यांना आवडतात त्यांना देऊन टाकते

कारण मुग्धा यांच्या धाग्यावर icecream साठी दूध पावडर, साय पण लागते दिलेय म्हणून थोडी शंका आहे फक्त दूध आणि साखर घालून icecream होईल याची..
सॉरी खूप प्रश्न पडलेत मला Happy पण मी दुधाचे पदार्थ फार कमी बनवते नेहमी घरी मम्मी च बनवते गोड पदार्थ

प्रोफेशनल नाही होणार कदाचित (दुधातील पाण्याचे प्रमाण, मिक्सर मध्ये फिरवलं का) पण घरगुती नक्की होईल.

चिकू दिलेत तरी छानच, दिल्याचा आनन्द मिळेल आणि घेणारा खुश !

US मध्ये राहणारी लोकं आंबे कुठून आणतात? पटेल भावांच्या आंब्यांचा अनुभव बेकार आहे. अगदी इथल्या 2 3 जणांची अशीच मतं आहेत.

आम्ही काॅस्टकोमध्ये एक मेक्सिकोहून येणारे आॅरगंनिक आंबे मिळतात ते आणतो.
https://www.costcobusinessdelivery.com/ataulfo-mangos%2C-6-ct.product.10...

इस्ट कोस्टला असताना काही ठिकाणी मॅरेथाॅन मॅंगोज म्हणून मिळायचे. बाॅक्स असतो साधारण डझनाचाा. जर्सीत राहिलो नाही त्यामुळे तसा आंब्यासाठी पटेलचा अनुभव नाही.

दुध नासलं (सायीसाठी चांगलं फुल क्रिम घेतलं होतं) , नासलय तर काय करु? आत्तापर्यंत इतक्या रेसिपीज बघितल्यात पण आज हवी आहे तर नेमकं काय करू सुचत नाहीये, प्लिज चांगली रेसिपी सुचवा

Pages