Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एवढा उद्योग करायचा असेल तर १
एवढा उद्योग करायचा असेल तर १-२ किलो कशाला सांगायचा? अख्खं लगेज भरून २८- ३२ किलो आमरस आला तर काय बिघडेल

व्हॅक्युम सील वगैरे नाही लागत
व्हॅक्युम सील वगैरे नाही लागत. घरी आंब्याच्या कापा काढून झिपलाॅक (किंवा डबा बिबा) मध्ये भरून लगेच डीप फ्रीज करायचं. अगदी निघायच्या वेळी तो दगड हवं तर एक कॅरी बॅग वगैरे लेयर करून चेक इन बॅगमध्ये आठवणीने टाकायचं. आणल्यावर ऐपतीप्रमाणे फ्रीज फ्रीजर करून साताठ दिवसातसंपवाचा. माझी आई नेहमीच आणायची.
>>>आई बाबा इथे येत आहेत आणी
>>>आई बाबा इथे येत आहेत आणी अनायासे सध्या आंब्याचा सिझन जोरात आहे तर त्यांना पण हा उद्योग करून माझ्यासाठी १-२ किलो आमरस आणता आला तर बघा असं सांगणार होते.<<<
शूम्पी, कुठला एअरलाईन? कारण हे लक बाय चान्स आहे प्रकरण असे दिसतय.
आताच एक ओळखीचे कुटुंबातील वडील डिटेन झाले सहा तास. ४०० डॉलर का काय फाईन झाला, वर ८० वयाच्या काकांना त्रास झाला ते आहेच.
त्यांनी आमरसाचे सहा कॅन आणलेले. तरी फूड आणलय म्हणून पकडलं..
सीक्युरीटी टाईट आहे वेकेशनच्या काळात..
झन्पीशी सहमत! अॅग्रिक्लचर
झन्पीशी सहमत! अॅग्रिक्लचर प्रॉडक्टबद्दल नियम फार कडक आहेत , मला एकदा पावकिलो आन्बेमोहोए तान्दूळासाठी अडवुन सगळ्या फुड असलेल्या बॅगा उसकटल्या होत्या.( बॉस्टन एअरपोर्ट)तान्दुळ फेकुन दिले बाकी सगळ ठेवल.
दोन डझन आंबे नेऊ शकतो असं
दोन डझन आंबे नेऊ शकतो असं इथेच कुठल्गयातरी धाग्यावर मागल्या सिझनमध्ये वाचल्याच आठवतंय....
क्युम सील वगैरे नाही लागत.
क्युम सील वगैरे नाही लागत. घरी आंब्याच्या कापा काढून झिपलाॅक (किंवा डबा बिबा) मध्ये भरून लगेच डीप फ्रीज करायचं. अगदी निघायच्या वेळी तो दगड हवं तर एक कॅरी बॅग वगैरे लेयर करून चेक इन बॅगमध्ये आठवणीने टाकायचं. आणल्यावर ऐपतीप्रमाणे फ्रीज फ्रीजर करून साताठ दिवसातसंपवाचा. माझी आई नेहमीच आणायची.
>>>> हो हो वेका. बारोबरे तुझं. माझ्या आईने पण मागे १-२ वेळेला तसच केलं होतं.
सर्वांना धन्यवाद!
माझी आई पण घरच्या हापुस
माझी आई पण घरच्या हापुस आंब्याचा रस आटवते. मावा सारखा गोळा होतो आणी तो मग घट्ट झाकणाच्या डब्यात घालुन आणलाय तिने पण १-२ वेळा.
घरात भाजी नसताना, ते काहीतरी
घरात भाजी नसताना, ते काहीतरी करतात ना,बेसनाचे गोळे करून , त्याची रेसिपी काय आहे.. मला कढी गोळ्यांची रेसिपी सुद्धा हविये.. देता का कुणी प्लीज
पाटवड्यांची आमटी का?
पाटवड्यांची आमटी का?
एक म़ुंंगोडे प्रकार आहे.
ते काहीतरी करतात ना,बेसनाचे
ते काहीतरी करतात ना,बेसनाचे गोळे करून ,>>> गोळा सांबार?
कढीगोळे इथे आहेतhttps://www
कढीगोळे इथे आहेत
https://www.maayboli.com/node/46521
पाटवड्या
https://www.maayboli.com/node/55913
गोळ्यांची आमटी करतात
गोळ्यांची आमटी करतात आमच्याकडे.पण तो भाजीला पर्याय नाही.
वीणा जामकर (अभिनेत्री) ने
वीणा जामकर (अभिनेत्री) ने एकदा एक गोळवणी नावाचा प्रकार केला होता. कांदा, लसूण , सुकं खोबरं वाटणाच्या उकळलेल्या रश्श्यात भजी च्या पिठासारखे बेसनाचे लहान सांडगे सोडायचे.
मालवणी गोळ्याची आमटी https:
मालवणी गोळ्याची आमटी https://www.maayboli.com/node/37645
कोणीतरी गट्टेका साग सारखी पण
कोणीतरी गट्टेका साग सारखी पण लिहीलेली ना, वाचल्यासारखी वाटते.
गोळवणी
गोळवणी
किसलेलं सुकं खोबरं न भाजता, 4-6 लसूण पाकळ्या, चमचाभर बेसन मिक्सीत वाटून घेणे. चिंच भिजत घालणे. कांदा बारीक चिरुन हिंगावर फोडणीत परतणे. त्यात वाटण टाकणे, हळद, तिखट, मीठ, चिंचेचा कोळ, गुळ टाकावा, पाणी घालून बारीक गॅसवर उकळवत ठेवावं.
4-6 चमचे बेसन, त्यापुरतं तिखट हळद मीठ, चमचाभर तेल घालून घट्ट भिजवावे. आता छोल्यांइतके गोळे करून उकळत्या आमटीत घालावेत. झाकण ठेऊन 8-10 मिनिटं शिजू द्यावं. शेवटी वरून कोथिंबीर.
भाजीला ऑप्शन.
चपाती, भाकरी, भात कशाही सोबत छान लागते.
थोडं जास्तच टाकावं, नंतर आळतं
पाणी थोडं जास्तच टाकावं, नंतर आळतं बरच. गोड आंबट तिखट चव मस्त लागते. गरम भात, गोळवणी, भाजलेला पापड... यम्मि

केश्वि जेवायला बोलव बरं का
अवल छान वाटतेय कृती. वेगळी
अवल छान वाटतेय कृती. वेगळी योजाटा की (लापी समजा हवं तर) जरा सवडीनं करून पाहील नक्की.

विपूत दिली तरी चालेल. नंतर मी विपूतल्या रेस्प्यांचा नंबर वाढवेन...
(No subject)
जेवायला बोलवतोस का तर देते विपुत रेसिपी
इंटरेस्टिंग वाटतेय गोळवणीची
इंटरेस्टिंग वाटतेय गोळवणीची रेसिपी. ( ४-६ दिवस बाहेरगावी जाऊन आल्यानंतर) ताज्या भाज्या नसतील तेंव्हा करायला छान प्रकार आहे
अवल मस्त कृती, करून पाहिली
अवल मस्त कृती, करून पाहिली पाहिजे
सर्वांचे सल्याबद्दल3 धन्यवाद
अवल खरच वेगळा धागा काढून लिही
अवल खरच वेगळा धागा काढून लिही ना. मी हे करणार आहे. विपूत लिहिलीस तर कोनाच्या विपूत ते पण लिही म्हणजे तिथे विपौड्या मारायला बरं.
माझी आई पण एक प्रकार करते
माझी आई पण एक प्रकार करते गोळ्याची आमटी.
हरभरा डाळ आणि उडीद डाळ समप्रमाणात, जिरे धणे थोडे अन्दाजाने हे सगळं खमंग भाजुन मिक्सर वर भरभरीत दळुन घ्यायचं
हे पीठ, कोथिंबीर, ठेचलेला लसुण, मीठ, हिंग, तिखट घालुन भिजवुन घ्यायचं घट्ट्सर. खुप पाणी शोषत हे पीठ.
उभट पातेल्यात हिंग जिरे मोहरी फोडणी करुन, त्यात कांदा ,लसुण बारीक चिरलेला परतुन घ्यायचा आणि मग भरपुर पाणी, चिंच कोळ गुळ मीठ गोडा मसाला. सगळं खळाखळा उकळायला लागलं की भिजवलेल्या पीठाचे सांडग्यापेक्शा थोड्या मोठ्या आकाराचे ओबड्धोबड गोळे त्यात सोडायचे. पाणी उकळतं असायला हवं नाहीतर विरघळतील. हे गोळे शिजले की फुगतात. ही आमटी भाकरी आणी भातासोबत मस्त लागते.
पावसाळ्यातला आमचा लाडका मेनु.
Lokho, golyachi recipee dhaga
Lokho, golyachi recipee dhaga kadhun liha na
वर सोनाली यांनी लिंक दिलीय
वर सोनाली यांनी लिंक दिलीय गोळ्यांच्या आमटीची. दाद यांची रेसिपी.
किल्ली, दाद यांच्या
किल्ली, दाद यांच्या रेसिपीप्रमाणे माझी रेसिपी आहे.
Ok, बघते डिटेल मध्ये
Ok, बघते डिटेल मध्ये
माझ्याकडून चुकून एका चटणीचं
माझ्याकडून चुकून एका चटणीचं भजं झालंय. म्हणजे नवर्याला कुठली “त्यांच्या” पद्धतीची लसूण चटणी हवी होती. त्याने नीट रेसिपी सांगितली नाही आणि मी पण फार विचारलं नाही. जालावर चार पाच लसूण चटणी पाक्रू पाहून म्हटलं ह्यां त्यात काय आणि मग लसूण सोलला अंदाजेच (इथेच चुकलंय बहुतेक) मग एकीकडे सुकं खोबरं आणि लाल सुक्या मिरच्या भाजल्या, मीठ घातलं आणि त्यालाच मिक्सी लाव म्हटलं. तितक्यात तो म्हणाला अगं त्यात शेंगदाणे असतात इथे थांबायला चान्स होता पण मी डोकं चालवून घरी साॅलटेड पीनट्सचा डब्बा होता त्यातले शेंगदाणे घातले आणि हे त्याने कोरडंच भरडलं. आता मुख्य मुद्दा, तर हे इतकं झणकेदार झालंय की चटणी म्हणून तरी खाता येणं अशक्य आहे. मी तर चाखलंही नाही. तो माझा प्रांतच नाही. असो. तर आता हे फ्रीजमध्ये ठेवलंय. मला सांगा की मी ते कशात ढकलू. अजून साखर बिखर घालून चटणीच फिक्स करायला सांगु नका प्लीज. ते खपेल याची खात्री नाही.
अवांतर हे सगळं झाल्यावर उपरती म्हणून मी त्या “त्यांच्या” पद्धतीच्या चटणीची रेसिपी विचारली ती ऐकल्यावर म्हटलं आधी माहित असतं तर चटणी अटेम्प्टच केली नसती.
वेल वेटिंग फाॅर सजेशन्स
आणि आभार.
वांग्याच्या भाजीला मसाला
वांग्याच्या भाजीला मसाला म्हणून घालू शकाल.
दह्यात कालवून डोसा-ईडली बरोबर देऊ शकता.
वाटण म्हणून थोडं थोडं बटाटा वगैरे भाज्यात ढकलता येईल.
क्रीम चीझ, सावर क्रीम किंवा
क्रीम चीझ, सावर क्रीम किंवा मेयो मधे थोडी चटणी मिक्स करुन स्पाइसी डिप किंवा सँडविच स्प्रेड करु शकता
Pages