युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाचणीची भाकरी कशी करायची? ज्वारीचे पीठ दळून आनतो तसेच नाचणीचे पीठ दळून आणायचे की , त्यावर काही प्रक्रिया करायची असते?

Same

गोड चवीचे आवडत असेल त्याला गुज्जू अळूवडी, बटाटेवडे आवडतील. वड्यात पण साखर असते.

इथे एकीकडे गोडसर अळूवडी मिळते, पण ते गुज्जू नाहीत. इथे बाहेर सगळीकडे ढोकळयात साखर असते जरा जास्तीच म्हणून मी घरीच करते ढोकळा. मला बडोद्याचे खमण खूप आवडतं, सॉलिड टेस्टी, गोडसर नसायचं. आता खूप वर्ष गेले नाही तिथे, बदल झाला असेल काही तर माहिती नाही.

बडोद्याला खाल्लेली पात्रावडी पण फक्त उकडलेली आणि वरती फोडणी दिलेली होती. त्यामुळे बहुदा तशीच गुजराथी पद्धत असावी.

दादरला सुरती फरसाणवाल्याकडे मिळणार्‍या पात्रावडीला तिळाची फोडणी असायची आणि वर ओला नारळ आणि कोथिंबीर पेरलेली असायची.

विरार / नालासोपारा भागात नारळाच्या दुधात बेसन भिजवून अळूवड्या करतात त्या अफाट लागतात. कुणाला रेसिपी माहिती असल्यास योजाटा.

मुंबईत पण फरसाणवाल्याकडून अळूवडी घेतली तर वाफवून फोडणी घातलेली व त्यावर कोथिंबीर पेरलेली असते. घरी केली तर कापून तळली जाते.

नारळाच्या दुधातली अळूवडी
https://www.youtube.com/watch?v=M-7LU_PHugM
https://www.youtube.com/watch?v=fWq9F7-JeFU
मी टीव्हीवर पाहिली होती. कोणा अ भि नेत्रीने किंवा अभिनेत्याच्या पत्नीने दाखवली होती. ही त्यांच्या समाजातच केली जाणारी पाककृती आहे, असंही सांगितलं होतं.

माझ्या बहिणीच्या सासूबाई करतात आणि मी tv वर मकरंद अनासपुरेने दाखवली होती ती बघितली होती.

स्वत: खाल्ली नाहीये कधीच आणि करणे तर दूरच.

ओल्या आमसूलांवर आतल्या बाजूला पांढरे पांढरे असे काहीतरी दिसते. ती बुरशी असते का? एरवी एखादे असे आमसूल दिसते. पण या वेळेस बरणीत काढलेल्या सगळ्या आमसूलावर तसे पांढरे आहे. नुसते धूवून चालेल का? का टाकून द्यावे लागेल?

मला पण ते साकळलेलं मीठ असावं असं वाटतंय .. तरी पण नीट बघा बुरशी असेल तर शक्यतो नका वापरू ..
थोडी आमसुले पाण्यातून हलकेच धुऊन कडक उन्हात वाळवून बघा

सालाची मुगाची डाळ+ तान्दुळ अस खिचडी साठी धुवुन निथळत ठेवल होत पण एनवेळेस डोस्यावर काम भागल आणि खिचडी कमी प्रमाणात केली तर उरलेल डाळ्+तान्द ळ ताटलित पसरवुन वाळवलेत, त्याची पुन्हा खिचडी चान्गली होइल का? की मिक्सर वर बारिक करुन घावन पिठ टाइप करुन ठेवु ( मला वाटल होत आन्बट वास वैगरे येत असेल पन तस काही नाही)

गुजराथी लोकांसारखा (म्हणजे त्यांच्या खिचडी सारखा) खिचडीचा चिखल होईल त्याच्या बरोबर कढी करुन ती एक योजलेली कृती आहे असा आव आण. चवीला चांगली लागेल.

धूउन सुकवलेले डाळ तांदूळ असतील तर थोड्या तुपावर, मंद आचेवर खरपूस परतून मग खिचडी केली तर एकदम भारी लागते. चिल्लर पार्टी सॉलिड फूड खायला लागल्यावर त्यांच्या करता करत असे मी. ( त्यांच्या खिचडीत अगदी थोडे मीठ आणि त्याहूनही कमी भाजक्या जिर्‍याची पूड)

मेधा, काय मस्त वाटतीये खिचडीची कृती. उद्या सुकवायला टाकते. तसेही हल्ली इथे इतकं गरम आहे की लगेच सुकावे.

त्या खिच डी सारखाच वेन पोंगल व बरोबर मेदु वडा चटणी अशी भरपेट ब्रेक फास्ट डिश होते. त्याला पोंगल वडा म्हणतात. खिचडी घट्ट करून त्याची मूद दोन वडे व चट णी असे द्यायचे.

Pages