Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्टीलचा कॉफी फिल्टर लागेल
स्टीलचा कॉफी फिल्टर लागेल त्या कॉफीचे अर्क बनवायला मग ती कॉफी छान लागेल. आपण मराठी करतो तशी दुधात उकळून, जायफळ घालून केलेली कुर्ग कॉफी चांगली लागत नाही.
रोज थोडा भात उरतोय, काय करावे
रोज थोडा भात उरतोय, काय करावे
इतकुसा भात फोडणी कसा देउ
उरतोय म्हणून कमी प्रमाण घेतल तरी तेव्हढा भात उरतच आहे
(लावताना प्लान करून बरोबर प्रमाण घ्यावे हा सल्ला देउ नये, कळते पण वळत नाही)
दहीभात खायचा हाकानाका
दहीभात खायचा हाकानाका
फ्रीजमध्ये दोनतीन दिवसाचा जमवून फोडणीला द्यायचा. राईस बुलेट्स करायचे. आता उन्हाळा आहे चांगला वाळवायचा तळून चिवडा करायचा.
थालिपिठात, इडलीच्या पिठात
थालिपिठात, इडलीच्या पिठात वगैरे ढकलायचा.
धन्स मंजुताई, स्वाती
धन्स मंजुताई, स्वाती
एखादा दिवस अज्जीबात भात करू
एखादा दिवस अज्जीबात भात करू नकोस . किंवा बरोब्बर दुप्पट किंवा दीड पट भात लाव .. मग खूप जास्त उरेल सो एक दिवस गॅप घेता येईल
इतकुसा भात फोडणी कसा देउ >
इतकुसा भात फोडणी कसा देउ > आमटी / भाजीसाठी फोडणी करताना थोडी जास्त करायची. आणि वरून भातावर घालायची. आणि मीठ घालाय्चं. शेवटची पोळी झाल्यावर तव्यावर सुद्धा केलेला सुरेख लागतो; पण तवा तेलकट करायला आवडत नाही म्हणून करत नाही (मला रोज सुद्धा आवडेल फो.भा.
)
रोज थोडा भात उरतोय, >> एक
रोज थोडा भात उरतोय, >> रोज राहिललेला भात उंद्रांना घालावा - खुप उंदीर झाले की मग खालील धागा रेफर करावा -
घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे?
https://www.maayboli.com/node/44433
धनि, व्हॉट्स अप?
धनि, व्हॉट्स अप?
असल्या युक्त्या तू देशील असं वाटलं नव्हतं
धन्स गर्ल्स धनि
धन्स गर्ल्स

धनि
भाकरी करताना त्या पिठात मिक्स
भाकरी करताना पिठात मिक्स करायचा.
भाजी करताना एक चमचा फोडणी भाताच्या डोक्यावर घालणे व मिठ घालणे. कच्चा फोभा म्हणतो आम्ही त्याला.
पिठं मिसळून धिरडं करताना मिक्सरमधे आत ढकलून द्यायचा
थालिपिठात तर ब्येशच लागतो.
इडली पिठात
दहीदूधभात कालवून
धन्स मेधावी, बरेच मार्ग
धन्स मेधावी, बरेच मार्ग सांगितलेत..
मेधावि आत तुमचा उन्दीर वाला धागा वाचला,
अ श क्य
अरे उंदरांना का द्यायचा ?
अरे उंदरांना का द्यायचा ? चिमण्यांना का नको ? चिमण्यांच्या ऐवजी कबुतर खायला आले तर कुठला धागा ? सांगा पाहू
माझी आई गच्चीत ठेवते. कबुतरे
माझी आई गच्चीत ठेवते. कबुतरे यायच्या आधीच कावळे तो खाऊन टाकतात.
माझा उंदराचा धागा अजुनही
माझा उंदराचा धागा अजुनही वाचायचा राहिलाय.
मदत करा, मेथी दाणी पेरले होते त्याकडे दुर्लक्ष झाले होते. आता मेथी झाड २ फूट वाढले आहे. भरपुर पाने आहेत पण ती आता वापरु की नको कळत नाहीये. काय करु म्हणजे ती वापरण्यायोग्य आहेत की नाही कळेल? काही पाने हिरवी आहेत, काहीवर किंचीत पांढरे डाग आहेत. काधीकधी बारीक किडे म्हणा , तत्सम असू शकते हे ऐकले आहे.
एखाद डाग नसलेल पान खावुन बघ,
एखाद डाग नसलेल पान खावुन बघ, मेथि कडु असल्याने जरा जज करण कठिण आहे पण हिरविगार ताजी दिसणारी पान खाण्यायोग्य असावित.
मेथी जुनं झाली असेल तर नाही
मेथी जुनं झाली असेल तर नाही चांगली लागणार. तेल, गॅस, मीठ सगळ वाया . परत लाव.
अॅरिझोना ना? लगेच येईल कि मग आता. 
सीमा, हो
सीमा, हो
प्राजक्ता, थँक्स.
मेथी जुनं झाली असेल तर नाही
मेथी जुनं झाली असेल तर नाही चांगली लागणार >> मेथीची पानं खुडून झाली की उरलेला भाग कॉम्पोस्ट करायला विसरू नका. मुळांवर नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिआचे नॉड्युल्स असतात. भाजीपाल्याच्या वाफ्यात नुसतेच इकडे तिकडे खड्डे खणून त्यात ढकलून दिलात उरलेला भाग तरी फायदाच होइल.
ओके.
ओके.
पुन्हा झाडले तर मग काही नव्हते. गेली माझी मेथी वाया 
मी एक मोठी फांदी जरा आपटुन पाहिली तर त्यातुन १-२ हिरवे बारीक प्राणी पडले.
>> गेली माझी मेथी वाया Sad
>> गेली माझी मेथी वाया Sad
ती तोडून, खुडून न टाकता तशीच ठेवली तर कालांतराने मेथीचे दाणे मिळतील काय?
माहिती नाही मलातरी.
माहिती नाही मलातरी.
जाणकार सांगा.
फुल लागली असतील तर लागतील
फुल लागली असतील तर लागतील शेंगा मेथीच्या. किती १० बीया मिळतील का शंका आहे .
मेथीवर चर्चा चालली आहे लिहिते,:
आत्या कडे मेथी शेतात भरपुर होते. ताजी कोवळी असताना ती ,ती उन्हात वाळवून ठेवते. हरभर्याच्या वाळविलेल्या पानाची भाजी जशी करतात तशी भाजी करायची.
ती कोवळी कोथिंबीर आणि पुदीना पण वाळवून बारीक दळुन ठेवते. दही वड्यावर वगैरे घालायला जबरी लागतात दोन्ही. हिरवागार रंग एकदम मस्त दिसतो.
मेथीच्या दान्डीला शेवटी
मेथीच्या दान्डीला शेवटी मूळाकडे दोन गोल पान असतात .
साबा , ती पानं वेगळी काढून धुवून वाळवतात .
ती कसूरी मेथी म्हणून वापरतात . जबरी चव आणि वास असतो .
ती कसूरी मेथी म्हणून वापरतात
ती कसूरी मेथी म्हणून वापरतात >>>>सावलीत वाळवतात का?
यूट्यूबवर पाहून मी पुदिना मावेत सुकवायचा अयशस्वी प्रयत्न केला होता.सर्व करपला.नंतर सावलीत वाळवला.
भजी उरलीत काय करता येईल
होळी सणासाठी भजी केली आहे . सकाळी त्यांचं काय करता येईल?
भजीभात. भातात कुस्करून खायची
भजीभात. भातात कुस्करून खायची
पकोडावाली कढी.
कसली भजी आहेत
कसली भजी आहेत
कांदा भजी नसतील तर भजी कुस्करून पकोडा चाट नेहमीच्या चटण्या वापरून करता येईल वर कांदा टोमॅटो कोथिंबीर शेव
आणि सुटसुटीत हवं तर कढी किंवा आमटीत ढकलंपंची
मला सांगा आधी भजी उरलीच कशी ?
मला सांगा आधी भजी उरलीच कशी ?
हलके घ्या...
कढी पकोडा करता येईल, पकोडा चाट किंवा सरळ टॉमेटो बेस ग्रेव्ही करून त्यात ही भजी घालू शकाल ..
कांदा , बटाटा दोन्ही आहेत
कांदा , बटाटा दोन्ही आहेत .लगेच प्रतीसाद दिल्याबद्द्ल धन्यवाद
Pages