Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कांदा , बटाटा दोन्ही आहेत >>
कांदा , बटाटा दोन्ही आहेत >> पन्जाबी कढी करता येइल
राईस बुलेट्स करायचे >>> हे
राईस बुलेट्स करायचे >>> हे काय असतं? कसं करायचं? सध्या आमच्याकडे इंद्रायणी तांदूळ आहे आणि तो ही नवीन. फार चिकट होतो त्यामुळे नाकारला जातो आहे. हे राईस बुलेट नाव आवडलं एकदम. शिळा भात खपवताना याचा उपयोग होईल
इंद्रायणी तांदुळ म्हणजे
इंद्रायणी तांदुळ म्हणजे स्टिकी राईस का?
इंद्रायणी तांदुळ म्हणजे
इंद्रायणी तांदुळ म्हणजे स्टिकी राईस का? >>>> अगदीच. अतीच.
कधी तरी साधं वरण-भात किंवा मेतकूट भात खायला ठीक आहे, पण रोजच्या साठी अतीच बोअर. ओळखीच्या कोणी पहिल्यांदा शेती केली, म्हणून आग्रहाने 20 किलोची बॅग घ्यायला लावली. आता संपवायचा कसा हा प्रश्न आहे. आम्ही महिन्याला 1 ते दीड किलो तांदूळ भातासाठी आणि अजून एखादा किलो इडली डोसा यासाठी वापरतो. 20 किलो येता जाता पाहूनच टेन्शन आलं आहे. तरी मेडला 3-4 किलो दिले.
मीरा, नवा तांदूळ सहसा
मीरा, नवा तांदूळ सहसा गणपतीनंतर खायला सुरुवात करावी. इंद्रायणी, आंबेमोहोर चिकट असतात. आम्ही जास्त कोलम आणि थोडा आंबेमोहोर घेतो आणि रोजच्या डब्यात दोन्ही मिसळून ठेवतो. कोलम 3:आंबेमोहोर1 प्रमाणात. मऊ खिचडी, मऊभाताला नुसताच आंबेमोहोर वापरतो.
इंद्रायणी तांदूळ जुना असेल तर
इंद्रायणी तांदूळ जुना असेल तर भात फार उत्तम होतो. सॉर्ट ऑफ क्रिमी पण तरीही दाणा सुटा असं तयार भाताचं टेक्षर येतं. आमटी, पिठलं यांबरोबर खायला उत्तम. मला फारच आवडतो पण घरातल्या नाकार्ड्यांना तो चिकट'च' वाटतो सो नेहेमी आणल्या जात नाही.
आइला इथे आली तेव्हा बासमती
आइला इथे आली तेव्हा बासमती अजिबात आवडला नाही तिला सारखी इन्दायणिची आठवण यायची, रोजच्या आमटी-भात, मेतकुट भाताला त्याना तोच आवडतो.
तरी मेडला 3-4 किलो दिले. >>
तरी मेडला 3-4 किलो दिले. >> जास्त देवू नका बरं "ह्या वैनी इंद्रायणी देतात" म्हणून काम सोडून जायची

इबे वर विकेल की ती! काम कशाला
इबे वर विकेल की ती! काम कशाला सोडेल?
इंद्रायणी तांदळाचा भात कित्ती
इंद्रायणी तांदळाचा भात कित्ती सुरेख होतो. मऊ भात तुप. मीराम, इथे मिळत नाही. पाठवून दे.
इंद्रायणी तांदुळ म्हणजे स्टिकी राईस का?>>> नाही नाही. इंद्रायणी आंबे मोहोर सारखा असतो बराचसा. स्टिकी राईस म्हणजे थाई स्टिकी राईस ना? तो नव्हे. मीरा बहुदा, मऊ होतो म्हणुन स्टिकी म्हणत असावी.
कधी तरी साधं वरण-भात किंवा
कधी तरी साधं वरण-भात किंवा मेतकूट भात खायला ठीक आहे, पण रोजच्या साठी अतीच बोअर. >>>>> +१.
माझा एक कलीग त्याच्या गावच्या इंद्रायणीचा भात आणायचा.एकदम सुवासिक,पण मोकळा.विचारल्यावर म्हणाला,त्यात दुसरे तांदूळ मिक्स करतो.
देवकी, मीरा तुरीची डाळ किंवा
देवकी, मीरा तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ मिक्स करून बघा. प्लेन खिचडी. आवडेल कदाचीत.
प्राजक्ता, हल्ली आंबेमोहोर मिळु लागलाय पटेल कडे . बघ मिळतोय का. माझ्याकडे पण रोज बासमती आवडत नाही. सोना मसुरी नाही आवडत. आता आंबेमोहोर मिळु लागल्यापासून रोज भात खाल्ला जातोय.
तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ
तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ मिक्स करून बघा>>>>>> मला आवडतो,तरीही रोज नाही आवडणार.कडधान्यांची/ माशाची आमटी याबरोबर हा भात चांगला नाही लागत.
इंद्रायणी तांदळाचा भात कित्ती
इंद्रायणी तांदळाचा भात कित्ती सुरेख होतो. >+१
पुण्यामध्ये शेवया करुन
पुण्यामध्ये शेवया करुन विकणारे आहेत का? नागपूर, नाशिकला ऑर्डर देउन किंवा कच्चा माल देउन २५/३०/५० रुपये किलोने शेवया करुन देणारे आहेत म्हणे.
तसे पुण्यात आहे का? रेट काय असावा?
कसल्या शेवया?
कसल्या शेवया?
कसल्या शेवया? >> हात शेवया.
कसल्या शेवया? >> हात शेवया. (की मशीनच्या असतात ते माहीत नाही.)
मी आत्तापर्यंत बाजारात मिळणाऱ्या शेवया घेत होते.
https://www.bigbasket.com/pd/100015894/bambino-vermicelli-roasted-900-gm...
पण मध्यंतरी एका नाशिकच्या मैत्रिणीकडे कच्चा माल देऊन (म्हणजे गहू धुवून, वाळवून, दळून वगैरे) बनवून घेतलेल्या शेवया पाहिल्या. त्या बाजारात मिळणाऱ्या शेवायांपेक्षा जास्त आंबूस आणि पातळ आहेत. त्यांचा उपमा फारच मस्त होतो. तशा शेवायांचा फोटो माझ्याकडे नाही.
हात शेवया लहान प्रमाणात
हात शेवया लहान प्रमाणात पाटणकर, अग्रज वगैरे सारख्या ठिकाणी मिळतात.अर्थात किमतीत फरक पडत असेल बराच.
एका छोट्या दुकानात होत्या. ६५
एका छोट्या दुकानात होत्या. ६५ रुपये पाव किलो. फारच मोह झाला म्हणून घेतल्या. पण ही किंमत नेहमीसाठी परवडणारी नाही.
आणि मुळात तो दुकानदार कमिशन घेतो. म्हणजे ज्याचा माल, ज्याची खरी मेहनत त्याला यातले किती मिळतात तेही माहीत नाही. म्हणून अशी घरगुती कामे करणाऱ्या लोकांकडून डायरेक्टली घ्यायची आहे. थोड्या जास्त किमतीला घ्यावी लागली तरी हरकत नाही.
पाटणकर, अग्रजकडे चौकशी करते.
किंमत नेहमीसाठी परवडणारी नाही
किंमत नेहमीसाठी परवडणारी नाही>>>>>>> नेहमी काय करतात ह्या शेवयांचं?
मी रोज नाश्ता करते. त्यामुळे
मी रोज नाश्ता करते. त्यामुळे चटकन होणारे पोहे, रव्याच्या उपमा सारखा शेवयाचा उपमा पण दोन-तीन आठवड्यातून एकदा होतोच.
बरेचदा विकेंडला हेवी लंच होतो मग रात्री हलकं म्हणून भाताचे प्रकार वगैरे नको वाटले तर शेवयाचा उपमा चालून जातो.
सांगली साईडला , आसपासच्या
सांगली साईडला , आसपासच्या खेडेगावात शेवयाचे मशिन खुप कॉमन आहे. गेलात तर जरुर ट्राय करा. अत्यंत स्वच्छ आणि सुरेख शेवया मिळतात. हातावरच्याही त्यांच्याकडे मिळु शकतात. कुणी ओळखाचे नसले तरी , एखाद्या दुकानात विचारलत तर पत्ता देतील.
भट्टीवरची नानकटाई बिस्कीट आणि शेवया प्रचंड कॉमन आहे. एकदा त्याची सवय झाली तर सुपर मार्केट मधल्या शेवयांना हात पण लावणार नाही.
नेहमी काय करतात ह्या शेवयांचं?>>> शुभकार्यासाठी, लग्नात, पुजेला, दिवाळीला,वास्तु शांतीत, दुपारी शिजवून फक्त साखर्/दुध घालुन खायला, उपमाइ,खीर.
शेवया, सांडगे पापड मस्ट आहे घरात आमच्याकडे.
नेहमी काय करतात ह्या शेवयांचं
नेहमी काय करतात ह्या शेवयांचं?>>>सगळ्या शुभकार्यात , महालक्ष्मिच्या नैवद्यात शेवयाची खिर असतेच , दुध शेवया, साखर शेवया ( शेवया वेळुन घेवुन म्हणजे तुपावर परतुन दुध किवा पाणि घालुन शिजवुन घ्यायच्या)आमरस शेवई .
खान्देश वैगरे भागात किवा वाणी समाजात रुखवतात हात शेवयाची वेणी देतात , हात शेवई पापड मसाले याचा वानवळा अजुनही नाशिक वैगरे भागात एकमेकाना दिला जातो.
हातशेवई करणे ही डेलिकसी आणी ग्रुप वर्क आहे.
फोटो टाकते लवकरच ,आहे माझ्याकडे.
सीमा ! इकडे पटेलच नाही ग!
सीमा ! इकडे पटेलच नाही ग! शोधला होता मी आन्बेमोहोर पण नव्हता मिळाला.
प्राजक्ता, बे-एरिआत त्रिनेत्र
प्राजक्ता, बे-एरिआत त्रिनेत्र/ इंडिआ कॅश अँड कॅरीला मिळतो बरेचदा आंबेमोहोर.
थॅन्क्स अमित , तिकडे चक्कर
थॅन्क्स अमित , तिकडे चक्कर झाली तर बघते नक्कि
मस्त शेवया प्राजक्ता.
मस्त शेवया प्राजक्ता.
थॅन्क्स अन्जु! मी खरतर
थॅन्क्स अन्जु! मी खरतर शेवयाच्या बाबतित न्युट्रल आहे पण वहिनिकडे कामाच्या बाया लावुन हे सगळ घाउक बनत मग माझा वाटाही आठवणीने छान पॅक करुन बाजुला ठेवलेला असतो
एकदा त्याची सवय झाली तर सुपर
एकदा त्याची सवय झाली तर सुपर मार्केट मधल्या शेवयांना हात पण लावणार नाही. >>
खरंय सीमा. मी कमी वेळा खाल्ला आहे पण त्याची ती आंबूस चव डोक्यात अगदी फिट बसली आहे. मी ३-४ वेगवेगळ्या ब्रॅण्डचे करून बघितले पण ती खास चव कुठल्याच शेवयांना नाही. माझ्या मैत्रिणीला भारतातून अशा पदार्थांचे कुरिअर येते. पुण्यात कोणी असं बनवून देणारं असतं तर मलाही मागवून घेता येईल. इथे पापड, कुरडया, मिरगुंड, भाजणी, चकली वगैरे करणारे मिळाले. पण शेवया करून देणारे कोणीच नाही.
बघू. अजून चार ठिकाणी विचारते.
घरी भरपूर टोमॅटो आहेत.
घरी भरपूर टोमॅटो आहेत. आमच्याच शेतावरची आहेत. हल्ली साबा विकायला जात नाहीत, त्यामुळे घरच्यापुरतीच लावली होती. पण सध्या आठवडाभर जरा जास्तच झालीत. आज सकाळीच ८-१० किलो घेऊन आल्या साबा. आता कोणाकडे तरी विकायला द्यावी लागतील.
पण एवढे टोमॅटो आहेत, तर एखादी टोमॅटो स्पेशल रेसिपी सांगेल का कुणी? किंवा केचप घरी करता येईल का? टिकाऊ म्हणून.
Pages