युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अळूवडी बेटर होण्यासाठी घालावे Happy. >>>>> Lol

अळूची पान घशाला खवखवतात म्हणून चिंच आणि जिथे चिंच तिथे गूळ, म्हणून गूळही घालतात. Happy

सस्मित Lol

अळूची पान घशाला खवखवतात म्हणून चिंच आणि जिथे चिंच तिथे गूळ, म्हणून गूळही घालतात. >>> बरोबर.

पानं शून्य खाजली तरी चिंच आणि गूळ वगळला तर चव काय? >>> माझ्या मते, खाज हा एक मुद्दा आहे पण अळूला मुळात काहीच चव नसते.. म्हणून रंगरंगोटी, तळणे इ. अळवाचे फदफदे तरी काय, डाळ, खोबरे टाकून नटवतात.. ओव्हर हाईप्ड भाजी.. नुस्त्या अळूला काहीच चव नाय.. Happy

काही पाने खाजरी नसतात पण लहान असतात त्याच्या कोथिंबीर, कोबी, दुधी वड्या करतो आपण तशा वड्याही छान लागतात त्यात चिंच गुळ वगळला तरी चालतो. मी तरी नाही घालत.

पण अळूची वड्याची मोठी पाने बरेचदा खाजरी असतात त्यामुळे त्यासाठी आणि चवीसाठी असं दोन्हीसाठी चिंच गुळ हवा.

नुस्त्या अळूला काहीच चव नाय >>> हा पण मुद्दा बरोबर.

मला अळूची भाजी फार आवडते. पण ती खाल्ली की माझी जाम वाट लागते, कारण ती फारच पित्तकारक आहे.

अळुच्या वड्या गुज्जु पद्धतीने फार चविष्ट लागतात असे माझे वै मत आहे. Proud

मायबोलीवरच कुठेतरी वाचले होते की अळुच्या वडीत सारणात बेसना ऐवजी थालीपिठाची भाजणी / पीठ घालावे, जास्त खमंग होतात.

अळुच्या वड्या गुज्जु पद्धतीने फार चविष्ट लागतात असे माझे वै मत आहे>>>>> वै मताचा आदर करूनही(की ठेऊन) आपल्याच पद्ध्तीच्या अ.व. चांगल्या लागतात असे माझे स्पष्ट मत आहे. Light 1

मायबोलीवरच कुठेतरी वाचले होते की अळुच्या वडीत सारणात बेसना ऐवजी थालीपिठाची भाजणी / पीठ घालावे, जास्त खमंग होतात. >>> हो, माझी आई कायम भाजणीच्या करायची, खूप टेस्टी होतात.

कोथिंबीर वड्या पण मुटके प्रकारात करायचे असेल तर भाजणीचे खमंग होतात. तळायच्या नाहीत, फोडणी देऊन परतायच्या.

अळुच्या वड्या गुज्जु पद्धतीने फार चविष्ट लागतात असे माझे वै मत आहे>>>>> वै मताचा आदर करूनही(की ठेऊन) आपल्याच पद्ध्तीच्या अ.व. चांगल्या लागतात असे माझे स्पष्ट मत आहे

<<

पात्रा भजी असं या वड्यांना आमच्या खानदेशात म्हणतात. आपली वाफवलेली अळूवडी मस्त खरपूस तळून घेतली की गुजराती पद्धतीची अळूवडी बनते, असे माझे तोकडे ज्ञान आहे.

यात काही चुकतंय का माझं?

माझ्या माहीतीत गुज्जु अळुवड्या जरा जास्तच गोड असतात. जिन्नसांबद्दल एक्सपर्ट्स सांगतीलच. टेस्टसाठी मला मराठी पद्धतीच्या जास्त आवडतात. दीपच्या पण चांगल्या आहेत Wink

आपली वाफवलेली अळूवडी मस्त खरपूस तळून घेतली की गुजराती पद्धतीची अळूवडी बनते>>>>>>> गुजराती पद्धतीच्या अळुवड्या नुसत्या वाफवलेल्या असून त्यावर फोडणी ओतलेली असते.मराठी पद्धतीच्या अ.व.,उकडून घेऊन नंतर तळलेल्या असतात.

फदफदे नावच किती खराब आहे.+११ Lol
अळुचं फदफद बघुनच नको वाटत खायला. Sad

गुजराती पद्धतीत अ.व.ला फोडणी? ट्राय करायला पाहिजे. Happy

आमच्याकडे फरसाणवाल्याकडे मिळणारी अळूवडी वाफवून वरून फोडणी ओतलेली असते. बेसन आपल्या अळूवडीपेक्षा कमी असते.

Yes i order this steamed patra and deep fry them to eat with rice. From gujju halwai

आरारा म्हणतात तशाच गुजराती पद्धतीच्या अळूवड्या मिळतात पात्रा भजी म्हणून.खान्देशला गुजरात बॉर्डर जवळ आहे. भयंकर यममी प्रकरण आहे पात्रा भजी आणि बटाटेवडा ही मस्त असतो तिकडचा.
पुण्यात आल्यावर कोणत्या गोष्टीने निराश केलं असेल तर वड्याने.

पात्रा भजी बॉर्डरवरची वेगळी असतील.. प्रत्यक्ष गुजरातेत मौ, लुसलुशीत, जाड कापलेल्या वरुन फोडणीच्या अळूवड्या रोजच सकाळी नाश्ट्याला मिळतात. हातगाडीवर खमण, ही वडी, सुरळीची वडी (खांडवी) इ.इ. सकाळी ७:३० पासून मिळते. फाफडा, जलेबी, गाठिया सुध्दा.. आमच्याकडे महाराष्ट्रातून पाहूणे आले की आम्ही बाहेरच सकाळी नास्ता करवतो.. मज्जानुं लाईफ.. Happy

अनघाची खरच मज्जा आहे.
देवकी Proud

आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीच्या वड्या जरा झणझणीत असतात, गुज्जु जरा गोड असतात.

Pages