कॅनडा गीझ : स्थलांतर व्हीडीयो (Migration of Canada Geese)

Submitted by rar on 23 November, 2015 - 14:11

नोव्हेंबरच्या दुसर्‍या - तिसर्‍या आठवड्यात आकाशात काळ्या-पांढर्या रंगाचे पट्टे उमटायला लागतात आणि अचानक कॅनडा गीझचा आवाज आसमंत भरून टाकायला लागतो. कॅनडाहून दक्षिणेला प्रयाण करणारे हे कॅनडा गीझ मजल दरमजल प्रवास करताना काही काळासाठी आपल्या भागात मुक्कामाला आल्याची जाणीव होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं या पक्षांचं चाललेलं ट्रेनिंग पाहणं हा विलक्षण अनुभव. त्यांचं एकत्र येणं, विविध गट करणं, आवाजातून आणि पंख फडफडवून संदेश देणं, फिजीकल कपॅसीटी आणि वयानुसार वेगवेगळे ग्रुप्स करून सगळ्यांना एकत्र घेऊन उड्डाण करणं हे सगळंच अचंबित करणारं. ह्या ट्रेनिंगमधे आधी त्यांचा लिडर पुढे जाऊन त्यांना ' मार्ग' दाखवतो, मग त्यानंतर गटागटानं उरलेले पक्षी उड्डाण करतात. जमिनीवरून उडून पाण्यावर उतरणं आणि पाण्यावरून उडून जमिनीवर उतरणं अशा त्यांच्या ट्रेनिंग राऊंडस पाहताना निसर्गामधे अशी किती रहस्य दडली असतील ह्याचं कमालीचं कुतुहल वाटल्याशिवाय रहावत नाही. कोणत्या आंतरीक उर्मीनं हे पक्षी असे मैलोनमैल प्रवास करत असतील हा प्रश्न मनात गडद होतो. अजून २ आठवडे हे पाहुणे या भागात असतील. मग निघून जातील त्यांच्या मार्गाने..... परत एप्रिल, मे च्या सुमारास अशीच भेट देण्यासाठी.
गेले २ वर्ष मी ह्या पक्षांचं निरीक्षण करतीये. काल फायनली मला ही घटना, हा अनुभव व्हीडीयोमधे कॅपचर करण्याची संधी मिळाली. हा सगळा अनुभवच विलक्षण होता. डोक्यावर घिरट्या घालणारे हजारो पक्षी आणि त्यांचा आवाज .. मनात अर्थातच हिचकॉकच्या 'द बर्ड्स' चित्रपटाची आठवण !
Heres the video : Birds of a feather fly together

व्हीडीयो लिंक : https://youtu.be/HIDfW6vsjos

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हिडिओ मस्त. मला वाटतं ऑक्टोबरच्या आसपास मी असंच कुठल्यातरी पक्षांचं मायग्रेशन पाहिलं आहे. आकाराने कावळ्यापेक्षा छोटे आणि चिमणीपेक्षा मोठे काळ्या रंगाचे पक्षी. गीझ नक्कीच नव्हते. पण झुंडीने मायग्रेट करत होते.

मस्त निरीक्षण. Happy

पुढच्या वेळी नविन कॅमेरा घेऊन जा. तसेच जमल्यास एक हाईड पण घे किंवा Camouflage कपडे घालुन जा. त्यामुळे आणखी जवळुन बघता येतील पक्षी व डिटेल्स टिपता येतील. भारतात असाच Bar Headed Geese चा थवा येतो. यावर्षी जमले तर व्हिडीओ काढायचा विचार आहे.

धन्यवाद सगळ्यांना. इट ऑज टोटल फन टू वॉच...
हा व्हीडीयो २ मिनीटाचा असला तरी २ तासापेक्षा अधिक काळ मी तिथे निरीक्षण करत होते. रेकॉर्ड करत होते.
हे साध्या फोनवरचे रेकॉर्डींग आहे. पण त्याक्षणी तो मोमेंट कॅपचर करता आला ह्यातच समाधान.
बायलॉजीकल सीस्टीम मधे ' मोमेंट' महत्त्वाचा.
सगळ्यात धमाल म्हणजे ह्या गीझच्या कलकलाटाने आणि त्यांनी आकाश भरुन टाकल्याने २ मोट्ठे 'ग्रेट ब्लू हेरॉन' बिथरले. आणि एका चिंचोळ्या टनेल मधे मी आणि समोरून २ हेरॉन्स उडत येताहेत . मी खाली वाकले नसते तर धडकच व्हायची... हा मोमेंट कुठेही कॅपचर झाला नाहीये. पण जबर्‍या अनुभव होता.

केप्या, अजून जवळ म्हणजे मला पाण्यातच उतरावे लागले असते Lol
आणि त्यातले पक्षी मला पाहून उडून गेलेले नाहीत. हा सुद्धा त्यांच्या ट्रेनिंग ड्रीलचाच एक भाग. त्याचाही एक पार्ट माझ्याकडे आहे. आधी फक्त 'पेरीफेरीचे ' पक्षी जागच्या जागी उडून सिग्नल देतात.
शिवाय दरवेळी कंडीशन्स फेवरेबल असतीलच असं नाही (मोस्टली त्या नसतातच असा माझा अनुभव ). पल्बीक पार्क आहे हे. मुळात ही जागा कॅमोफ्लाज साठी नाहीच. कुत्री ह्या गीझच्या पाठी धावतात. अश्या वेळी कॅमोप्लाजचा काय उपयोग !!
पण कॅमेरा मात्र आता घ्यायलाच हवाय !

आरती कळले. तरी कॅमो घेऊन बघ. मज्जा येते. मोबाईलने काढले असतील तर भारीच. घ्याच आता कॅमेरा. Happy

एका चिंचोळ्या टनेल मधे मी आणि समोरून २ हेरॉन्स उडत येताहेत . मी खाली वाकले नसते तर धडकच व्हायची... हा मोमेंट कुठेही कॅपचर झाला नाहीये. पण जबर्‍या अनुभव होता>> आयला हे भारीच. डोळ्यासमोरच आले एकदम. Happy

रार हा तुझा व्हिडिओ पाहून मला वाटतंय की माझेही एक दोन व्हिडिओ(कॅनडा गीजचे) इथे डकवावेत की काय!
अर्थातच हे अगदी सर्व सामान्य माणसाच्या उत्सुकतेने घेतलेले आहेत.
एका चिंचोळ्या टनेल मधे मी आणि समोरून २ हेरॉन्स उडत येताहेत . मी खाली वाकले नसते तर धडकच व्हायची... हा मोमेंट कुठेही कॅपचर झाला नाहीये. पण जबर्‍या अनुभव होता>>>>>>> भारीच!

Manushi, pl go ahead. I would love to watch. Any observation is good observation and one step towards better understanding nature Happy

मस्तच. ह्यावेळी आमच्याकडे कॅनडा गीज आलेच नाही. अगदी दोन आठवड्यापुर्वी 80°F होते आणि दोन-तीन दिवसात 25°F पर्यन्त खाली आले त्यामुळे ते ब्रेक न घेता साउथ ला गेले असतिल आता एप्रिल पर्यन्त वाट बघावी लागेल.

कॅनडा गीज बद्दल काही माहिती
१> कॅनडा गीज ताशी ७० माईल (१०० किमी) पर्यन्त वेगात उडु शकातत आणी एका दिवसात १००० किमी चे अंतर पार्क करु शकातात.
२> ३०-४० वर्षापुर्वी याची संख्या खुप कमी झाली होती म्हणुन आमच्या राज्यात सरकार ने त्याच्या घरट्यातिल अंडी चोरुन अनैसर्गिक पणे ब्रीड केली होती. त्यामुळे ह्या गीस मधे knowledge transfer नाही झाले आणि ते कायाहोगा रिव्हर च्या परिसरात स्थायिक झाले. ही ब्रिड जमात 10°F ला पण राहु शकते आणि हे गीज स्थलांतर करत नाहीत.
३> आमच्या भागात एकटा गीस कधीच गाडीखाली येऊ शकत नाही अशी म्हण आहे. कारण ते नेहमी ग्रुप मधेच असतात.