रामराम दोस्तांनो,
वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. " या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .
सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..
सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्यांचा मित्र असणार्या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.
वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.
त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
.. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..
वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
बघतो मोठा फोटो किंवा
बघतो मोठा फोटो किंवा आजूबाजूचे फोटो आहेत का ते...
साधना, फुल, बी, पानं पाहाता
साधना, फुल, बी, पानं पाहाता तरी हे Hollyhock (Alcea) चाच प्रकार वाटतोय. जाणकार सांगतिलच.
माझ्या माहितीप्रमाणे टिटवी
माझ्या माहितीप्रमाणे टिटवी आहे मानुषी. >>> येस, टिटवी...
ओक्के व्हीटी आणि शशांक
ओक्के व्हीटी आणि शशांक धन्यवाद.
तर फायनली दुसर्या पानापर्यंत
तर फायनली दुसर्या पानापर्यंत पोचले म्हणायचे प्रतिसाद.. प्रचि आणि माहिती मस्त..
जागु आणि वेबमास्तर. . गुड जॉब
हा नेमका कोण ?
कुणाला ओळखता येईल का इथं ?
घराजवळच्या नालीत निघाला होता..
White Checkered Keelback
White Checkered Keelback (दिवड)
पाण्याजवळ रहाणारा आणि
पाण्याजवळ रहाणारा आणि मुख्यत्वे मासे आणि बेडकांवर गुजराण करणारा साप...
धन्यवाद निरु
धन्यवाद निरु
बापरे कसला आहे तो साप. वरचे
बापरे कसला आहे तो साप.
वरचे सर्वांचे फोटोपण छान.
लहानपणापासून कुठे कुठे ते वेगवेगळे मश्रुम बघितलेत तेव्हा त्यांना कुत्र्याची छत्री म्हणायचो. त्यामुळे मी मश्रुम खात नाही. मला नाही आवडत.
त्यामुळे मी मश्रुम खात नाही.
त्यामुळे मी मश्रुम खात नाही. >>>> मस्त लागतात.अपनी अपनी पसंद है.
Behold
Behold
खुळ्खुळ्या साप (रॅटल
खुळ्खुळ्या साप (रॅटल स्नेक)
आमचा पाय पडणार होता ह्याच्यावर... एकतर एव्ह्ढं उन होतं त्यात अश्या माती/खडी मध्ये दिसलाच नव्हता.
टीना, दुसरा साप Zoo मधला आहे
टीना, दुसरा साप Zoo मधला आहे का...?
नमस्ते, निगकर्स!
नमस्ते, निगकर्स!
साप ही साप. देवकी . हम्म्म
साप ही साप.
देवकी :). हम्म्म मीच नाही खात. नवऱ्याला आवडतात, बहिण भावाला आवडतात.
वरती जाणकारांनी सांगितले
वरती जाणकारांनी सांगितले आहेच.टिटवी आहे.तिचे ओरडणे कातरवेळेला नकोसे वाटते.
एक प्रश्न विचारला होता पण
एक प्रश्न विचारला होता पण गुगलून बघितल्यावर उत्तर मिळाले म्हणून एडीट करते इथे.
रॅटल स्नेक, डेडली विषारी
रॅटल स्नेक, डेडली विषारी असतात ,, फोटोत किती इनोसंट दिस्तोय गुंडाळी करून पडलेला.. अॅक्चुअल लांबी दिसत नाहीये.. आमच्या ओळखीची ३,४ वर्षाची पोरगी रॅटल स्नेक बाईट मुळे अगदी पाचच मिनिटात गेली काही वर्षांपूर्वी.
टीना , घराजवळ दिसलेला साप.. ऊप्स!!!
अगा, साधना ही मशरूम्स
अगा, साधना ही मशरूम्स खाण्यालायक नसतील.. कारण इथल्या वेट मार्केट मधे नाही दिसली ही वरायटी विकायला..
सु प्र
वर्षू, तो वरचा मासा
वर्षू, तो वरचा मासा खाण्यालायक आहे का? आमच्या ऑफिसात एका इन्डोअर तळ्यात खुप असले मासे आणुन सोडलेत . त्यांचे फोटो काढायला मात्र बंदी आहे. एक बाबा उभाच असतो नजर ठेऊन. मासे मात्र दिड फुट लांब, मस्त जाडजुड आणि रंगीबेरंगी. एक रंग वरच्या सारखा, एक वरचीच जात पण पांढरा रंग आणि काही माशांना चक्क मोठी लेस.
मला आधी खोटेच वाटलेले ते मासे. पण एकदा तळे साफ करुन पाणी भरत होते तेव्हा त्यांचे हाल पाहुन खात्री पटली की हे खरे खुरे जिवंत मासे आहेत. तळे साफ करताना थोडेसे पाणी टाकुन त्यात मासे टाकले गेले. बिचा-या माशांवर तडफडाय्ची वेळ आली. काही मोठे मासे अर्धे पाण्यात आणि अर्धे बाहेर असे झालेले तेव्हा ते धावपळ करुन जिथुन पाणी येत होते तिथे जाऊन पाण्यात डोके बुडवत होते.
साधना, हे कोई मासे आहेत
साधना, हे कोई मासे आहेत बहुतेक. नितळ पाण्यात सुंदर दिसतात. जपान मधे यांना समृद्धीचे प्रतिक का काय मानले जाते म्हणे. तिथे छोट्या तळ्या डबक्यात असतातच.
यांचा फोटू काढायला बंदी काहुन??
त्या वरच्या लिंकमधे असेही आहे.
<<<
In many areas, they are considered an invasive species and pests. They greatly increase the turbidity of the water because they are constantly stirring up the substrate. This makes waterways unattractive, reduces the abundance of aquatic plants, and can render the water unsuitable for swimming or drinking, even by livestock. In some countries, koi have caused so much damage to waterways that vast amounts of money and effort have been spent trying to eradicate them, largely unsuccessfully.[21]>>>
साप भारी आहेत
मगरी,सुसरी,साप,मासे अधन मधन
मगरी,सुसरी,साप,मासे अधन मधन फुले पक्षी संपुर्ण निसर्गच अवतरला धाग्यावर मस्त...
आसाकुसा मंदिरा बाहेच्या छोट्या तळ्या डबक्यात मस्त आहेत मासे.
यांचा फोटू काढायला बंदी
यांचा फोटू काढायला बंदी काहुन??
माहित नाही.
दोन दिवस वेळ मिळाला नाही इथे
दोन दिवस वेळ मिळाला नाही इथे नीट यायला.
ज्या कोणाच्या पहिल्या पोस्ट गेल्या असतील त्यांची मी मनापासून क्षमा मागते व त्यांनी आपल्या माहितीपुर्ण असलेल्या पोस्ट शक्य झाल्यास पुन्हा इथे प्रकाशीत कराव्या अशी माझी विनंती आहे. चुक माझ्याकडूनच झाली होती. चुकून नविन धागा च्या ऐवजी नविन गप्पांचे पान सिलेक्ट केले होते.
सापाचे फोटो अजुन माझ्याकडे लोड झाले नाहीत. नंतर पहातेच.
साधना फोटो काढताना तू पटकन पकडून पळवून नेशील अस वाटत असेल त्याला.
मागे मी विचारल्या प्रमाणे
मागे मी विचारल्या प्रमाणे लेखनाचा धागा आणि गप्पांचे पान यात काय फरक आहे..?
कोणते जास्त चांगले ह्या ग्रुपसाठी..?
हो निरु, राजीव गांधी नॅशनल
हो निरु, राजीव गांधी नॅशनल पार्क.. किंग कोब्रा होता..
शँकी, रॅटल स्नेक कुठ दिसला ?
गप्पांचे पान ह्या धाग्यावर
गप्पांचे पान ह्या धाग्यावर एकावेळी फक्त २५-३० कमेंटी राहतात. बाकीच्या पहले आये पहले गये या बेसिसवर वाहुन जातात.
रॅटल स्नेक फक्त अमेरिका
रॅटल स्नेक फक्त अमेरिका खंडाच्या वाळवंटात आहेत. आणि वर्षूने लिहिलेय तसे ते अतिजहाल विषारी आहेत. शँकीचा पाय त्याच्यावर पडला नाही हे त्याचे (शॅंकीचे) नशिब.
साधना ताई, धन्यवाद....
साधना ताई, धन्यवाद....
साधना फोटो काढताना तू पटकन
साधना फोटो काढताना तू पटकन पकडून पळवून नेशील अस वाटत असेल त्याला.
मासा दिसला की पहिला विचार ह्याला तळले तर किती छान लागेल हाच असतो बहुतेक.
दुकानात जिलबी पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटते ते याच्यात किती साखर असावी बरे या विचाराने थोडेच??? 
Pages