चामडी कडक्क नव्या बुटांना नरम कसे करावे?

Submitted by limbutimbu on 8 July, 2015 - 07:13

नुकतेच माझ्या मित्राने मला एक मिलिटरी टाईप चामड्याच्या बुटांची जोडी भेट दिली आहे.
घालुन बघता असे लक्षात आले की या बुटांचे चामडे खुपच जाड व कडक आहे.
त्यामुळे बुट पायाला चावतो. (म्हणजे त्यास दात/तोंड नसते पण कातडीला घासून घासुन जखमा होतात).
असे कोणते उपाय आहेत की ज्यामुळे चामडे कायमस्वरुपी नरम पडून बुट घालणे/वापरणे सुखकारक होईल?
पाणी वापरले असता (जसे न्हावी दाढी/कटिंग करायचे आधी लावतो) चामडे नरम पडते आहे, पण तात्पुरते. पाणी वाळून गेल्यावर जसेच्या तसे कडक होते.
तेल वापरावे असे वाटते, पण कोणते तेल जास्त उपयोगी होईल? स्व:स्त अन मस्त उपाय हवाय.
बुट कोणत्या प्राण्याच्या कातड्यापासून बनविलेला आहे व कोणत्या प्राण्याच्या कातड्यावर तो चढविला जाणार आहे त्यावरही कडक/नरमपणा अवलंबुन असतो का?
कृपया जाणकार/तज्ञांनी सल्ला द्यावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजचा उपाय -

पायात बूट घातल्यावर जर ते चावत असतील,
तर आपण बूटात पाय घालून त्यांना चावायचे..

बुटांना हा धागा वाचायला द्या. ते बुटच काय अख्या दुनियेतील बुट कधीच कोणाला चावणार नाहित.

एक अवांतर प्रश्न आहे, बुटांचे उपाय चपलांनाहि लागु होतात का ?
का तेच उपाय चपलांना लागु केले तर बुट चिडुन अधिकच चावतील ? की चपला चिडुन अधिक चावतील ?

सर्वांच्या सूचना, उपाय, सहानुभूती करता धन्यवाद.

अस तर नसेल? ज्या प्राण्याच्या कातड्याचा बूट आहे त्या मृत/मारलेल्या प्राण्याचा आत्मा (भूत-पिशाच्च?) बुटाद्वारे चावून चावून छळत असेल? Uhoh तसे असेल तरीही उपाय काय मग?

प्लँचेट करून त्या प्राण्याच्या आत्म्याला बोलवा आणि छळण्याचे कारण विचारून त्याचे निवारण करा.

अंनिस्/बुप्रावाद्याना बोलवा. तुमचा धागा असुन त्यांचा एकदाही उल्लेख नाही.

बुट चावले नसतील ईतके माबोकर चावलेत लिंबुला. Proud

आजचा उपाय -

नेस्टले कंपनीचे चॉकलेट फ्लेवर पॉलिश वापरा.
त्याने बूटांचे दात किडतील आणि पडतील.
आणि दातच गेले तर मग चावणार कुठून.
फार फार तर चाटतील.

बूटात आत्मा वगैरे आला असेल तर रात्री मोजे बूटातच ठेवा... कोकणातली भूतं मोज्याच्या वासांनी दूर पळतात म्हणे. ( देशावरची माहीत नाहीत. )

हिदुत्ववादी लिंब्या ख्रिस्ती लोकांची पादत्राणे वापरतो..........धर्म बुडाला.....त्यापेक्षा पादुका वापर........(पादुका वास मारायला लागल्यास .......कायमचुर्ण द्यावे.....मालकाला...real culprit....)
यावरुन एक जोक आठवला .....पन अवतारकार्यसमाप्तीभयास्तव इथे देत नाहि

हिंदुंचा देव सुर्य देव हा बुट वापरायचा त्यामुळे ह्या आदिदेवा मुळेच मानव जातीत बुटांच्या वापराचा प्रसार झालेला आहे

मोढेराच्या सुर्य मंदिरात सुर्य देव गुढघ्यापर्यंत बुट व कमरेला बेल्ट घातलेला असा आहे.

http://tinaindia2010.blogspot.ae/2010/12/modhera-sun-temple-warning-pict...

http://undiscoveredindiantreasures.blogspot.ae/2011/07/modhera-sun-templ...

बुट चावले नसतील ईतके माबोकर चावलेत लिंबुला>>
लेकी बोले सुने लागे आहे रे. माबोवरच्या चावर्‍या बुटांसाठी आहेत हे उपाय. अर्थात बहूतेक कुत्राच्या कातडीचे असावे बुट त्यामुळे वाकडेच. Proud

>>> बूटांचा कडकपणा कमी झाला की नाही अजून.. <<<<
नाही.... आता वविलाच घालुन येतो...! मग बघु कसे नरम पडत नाहीत ते.. Proud

कुठे? कुठे?... कान्द्या... लिन्क दे Proud
ओह... ओके ओके.. नको देऊस, मिळाली...
आता बुटांचा विकास झाल्याखेरीज्/केल्याखेरीज मला चैन नाहि पडणार.

असे लष्करी बुट वयस्कर माणसांना चालत नाही. एकतर ते वजनदार जास्त असतात आणि आतून पायाला घासून जखमा होण्याची शक्यता देखील जास्त असते. मधुमेह असलेल्या लोकांनी अशी रिस्क अजिबात घेउ नये. आपल्याला झेपेल परवडेल असेच "कॅनव्हास"चे अथवा स्पोर्टस शुज घालावे. फुकाची शायनिंग मारण्यात अर्थ नाही.
चार आण्याची कोंबडी अन् बारह आण्याचा मसाला अशी गत होईल

हेअरड्रायर वापरुन बघा. बुटांवर जिथे जास्त घासत असेल त्याजागी १० ते २० मिनट ड्रायर चालू ठेवा

येस्स रश्मी.... तेच सांगणार होतो....
पण याचा अर्थ माणुस१ यांनी सर्व पाने/प्रतिक्रिया वाचलीच नाहीत असे दिसते...!

Pages