चामडी कडक्क नव्या बुटांना नरम कसे करावे?

Submitted by limbutimbu on 8 July, 2015 - 07:13

नुकतेच माझ्या मित्राने मला एक मिलिटरी टाईप चामड्याच्या बुटांची जोडी भेट दिली आहे.
घालुन बघता असे लक्षात आले की या बुटांचे चामडे खुपच जाड व कडक आहे.
त्यामुळे बुट पायाला चावतो. (म्हणजे त्यास दात/तोंड नसते पण कातडीला घासून घासुन जखमा होतात).
असे कोणते उपाय आहेत की ज्यामुळे चामडे कायमस्वरुपी नरम पडून बुट घालणे/वापरणे सुखकारक होईल?
पाणी वापरले असता (जसे न्हावी दाढी/कटिंग करायचे आधी लावतो) चामडे नरम पडते आहे, पण तात्पुरते. पाणी वाळून गेल्यावर जसेच्या तसे कडक होते.
तेल वापरावे असे वाटते, पण कोणते तेल जास्त उपयोगी होईल? स्व:स्त अन मस्त उपाय हवाय.
बुट कोणत्या प्राण्याच्या कातड्यापासून बनविलेला आहे व कोणत्या प्राण्याच्या कातड्यावर तो चढविला जाणार आहे त्यावरही कडक/नरमपणा अवलंबुन असतो का?
कृपया जाणकार/तज्ञांनी सल्ला द्यावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol धमाल.
बूट इतके चावतायत म्हणजे त्यांचे दात शिवशिवत असणार. जेव्हा माझे दात शिवशिवत (काही लोक याला सळसळणे पण म्हणतात पण मला ते योग्य वाटत नाही. सळसळणे हे क्रियापद एखाद्या झुळझुळीत वस्त्रासंदर्भात वापरणे अधिक योग्य वाटते. ) तेव्हा माझी आई तिचा हात मला चावू देत असे. किती जखमी केले होते मी तिचे हात! आज आठवले की दु:ख वाटते. पण तिच्या या बलिदानामुळे माझे दात एकसलग व शुभ्र आहेत पन्नासाव्या वर्षीही! आईसारखे दैवत सार्या जगतावर नाही.
तर तुम्ही पायाऐवजी बुटात हात देऊन बसा. तुमचे अनुभव वाचायला आवडतील.
इथे सुचवलेले सर्व उपाय एकसलग लिहून काढायला कुणी स्वयंसेवक मिळेल का?

चिमण्या कीती सुखी ,त्यांना असले प्रश्न पडत नाहीत.आहोच अम्ही भारी सगळीकडे आमचीच भरारी.........चला मी जातो...चिऊऊऊऊऊऊऊऊऊऊ

लिंबूभौ

बाकी सगळ विसरा हो. तुम्हाला एक राम बाण उपाय सांगतो. यक्दम ग्यारंटी.
तुम्ही घ्या पावशेर, बुटांना द्या अर्धाशेर.
तुम्हाला नाही कळणार आणि बूट नाही चावणार. Happy

वाढदिवसादिवशी चावणारे बूट मिळाले तर पुढचं वर्षभर कित्ती चावुन घ्यायला लागेल आपल्याला??>>>> मग चावून चावून चोथा झालेल्या विषयावरपण धागे येतील. Wink

कुत्र्याला खायला द्या , मऊ पडेल चाटून चाटून ....कुत्रा नाही बूट मऊ पडेल >> कुत्रं पाळीव असावं की भटकं?? कुठल्या जातीचं असल्यास लवकर मऊ पडेल. चाटताना (बूट) पायात (लिंबुच्या) असावा की बाहेर काढुन (पायातुन) चाटायला द्यावा (कुत्र्याला) ?

बर... हे सगळं राहू दे. तुम्ही बुटांचा कमीत कमी शब्दांत, जास्तीत जास्त अपमान करुन पाहिलात का?
नक्की नरमतील ते !

हेच बुट घालून या २६ जुलैच्या रेन डान्सला युकेरिझॅाटमध्ये आणि घ्या समाचार चावट सल्ले देणाय्रांचा.

कोणाला तो चार्ली चॅपलिनचा " दि किड् "सिनेमा आणि त्यातला बुट शिजवून खाण्याचा सीन कसा काय आठवला नाही.यानीच शिकवलं बुट उकसवून काट्या चमच्याने कसा खायचा ते ( लॅारेल-हार्डि ने शिकवलं केक खाण्यासाठी नसून भडकावू लोकांच्या तोंडावर फेकून मारण्यासाठी असतो ). आमिरचा पिके पाहून नवीन पिढीने चार्लि चापलिनची कल्पना करावी.

कारवाले मॅन्शन वॅक्स पॅालिश वापरतात ते मी वापरायचो.

जाऊ नरम करायचा पिच्छा सोडा>>>>:अओ: इथे मध्ये द्या असे लिहायचे राहिले का?:फिदी::दिवा:

शंकेला उत्तर दिलंय ना आताच वर---"कारवाले मॅन्शन वॅक्स पॅालिश वापरतात ते मी वापरायचो." याने बुरशी नाही येत आणि छान वास असतो याला.फोटो टाकू का डब्याचा?

पाच वर्षांपूर्वी तू बुटांचा अनुल्लेख केला होतास का लिंब्या? तुझ्या कंपूतल्या कोल्हापुरी चपलांकडेच लक्ष दिले असशील. त्यामुळे ते बूट आता तुला चावतायत.

limbutimbu,

तुमच्या बुटांना माबोवर घेऊन या. म्हणजे ते भुंकायला शिकतील. मग कसले चावताहेत!

आ.न.,
-गा.पै.

Pages