चामडी कडक्क नव्या बुटांना नरम कसे करावे?

Submitted by limbutimbu on 8 July, 2015 - 07:13

नुकतेच माझ्या मित्राने मला एक मिलिटरी टाईप चामड्याच्या बुटांची जोडी भेट दिली आहे.
घालुन बघता असे लक्षात आले की या बुटांचे चामडे खुपच जाड व कडक आहे.
त्यामुळे बुट पायाला चावतो. (म्हणजे त्यास दात/तोंड नसते पण कातडीला घासून घासुन जखमा होतात).
असे कोणते उपाय आहेत की ज्यामुळे चामडे कायमस्वरुपी नरम पडून बुट घालणे/वापरणे सुखकारक होईल?
पाणी वापरले असता (जसे न्हावी दाढी/कटिंग करायचे आधी लावतो) चामडे नरम पडते आहे, पण तात्पुरते. पाणी वाळून गेल्यावर जसेच्या तसे कडक होते.
तेल वापरावे असे वाटते, पण कोणते तेल जास्त उपयोगी होईल? स्व:स्त अन मस्त उपाय हवाय.
बुट कोणत्या प्राण्याच्या कातड्यापासून बनविलेला आहे व कोणत्या प्राण्याच्या कातड्यावर तो चढविला जाणार आहे त्यावरही कडक/नरमपणा अवलंबुन असतो का?
कृपया जाणकार/तज्ञांनी सल्ला द्यावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाण्याने वाट लागते बूटाची एवढे नक्की.

कॉटनचे जाडजूड सॉक्स घातले की कमी काचतात हा स्वताचा अनुभव.

पायाला अक्खे बूट न लागता काही विशेष भाग लागत असेल तर तिथे बॅन्डेज लावावे. पण हल्ली ते लसपशीत मिळते तसले नाही तर खाकी जाडजूड. त्याने तीन फायदे होतात.

१. जखम भरते
२. दुखर्‍या भागाला तात्पुरते प्रोटेक्शन मिळते.
३. त्यावर बूटाचा तो लागणारा भाग घासून घासून लेव्हल सेवल होऊन जातो.

माझ्या अनुभवानुसार एका दुखर्या जागी जास्तीत जास्त २ बँडेज प्रत्येकी दोन दिवस असे फार तर चार दिवस वापरावे लागतात.

एक अलवकिक उपाय आहे पण आपण कराल की नाही आपल्या चॉईस वर,

एखादी रात्र बूटांना मायेने कुशीत घेऊन झोपा, बघा नरम पडतात का..

बूटांना अगोदर रॉकेल लावून ठेवा ते सुकलं की त्याला वरुन आणि आतुन खोबर्याचं तेल लावा हमखास नरम पडतील
एन. सी.सी च्या बूटांना आम्ही असच करत असु.
तरीही कडक राहिलेत तर खोबर्याचं तेल लावत राहा. तेल जिरे पर्र्यन्त बूट घालू नका.

आपण कपडे वापरतो म्हणजे आपण निसर्गनियमांच्या विरुद्ध तर जात नाही ना?
बाकी प्राणी बघा, त्यांना असतात का धोतर आणि उपरणे?

तर कपडे घालणे म्हणजे आपण काही चूकिचे तर करीत नाही ना? तसे असेल तर सांगा. म्हणजे मी व माझे समविचारी कपडे घालणे बंद करतील.

मित्राने तुम्हालाच का भेट दिली ? गिनती करायला तर नाही ना ? तुम्ही त्याची पुणेरी style ने कळ तर नाही काढली ना ?

कारण हे बूट मी घातले होते पण त्यावेळी मी अभियांत्रिकीचा विद्यार्थी होतो. सुटलो नसल्याने शरीर मजबूत होते ,त्यावेळी मी मिलिटरी बूट नेवी नगर जावून कॅन्टीन स्टोअर मधून घेतले होते.
मऊ करायला - जिकडे बूट दुरुस्त करायचे सामान मिळते तिकडे क्रीम पोलिश ची मोठी डबी मिळते ( पोलिश वाले वापरतात) गोरेगाव मध्ये स्टेशन जवळ अशी दुकाने होती . त्यातील न्युट्रल क्रीम पोलिश ( सफेद रंगाचे) मी २ दिवस आतून चोपडले . मी तसे पण बूट रोज पोलिश करीत असे तर ते वापराने मऊ पडले . तसा discomfort होता पण ते दिवस तसेच होते . आम्हा ३ मित्रा कडे हे बूट होते आणि त्यावेळी शरीर दणकट असल्याने ह्या बुटांचा भयंकर प्रभाव पदय्च. मला वाटते कि मी एकदा मल्हार उस्त्ववात ( संत झेविअर्स ) तर हे बूट अर्ध्या चड्डीवर घालून आम्ही गेलो होतो.
हे बूट "जमावे" लागतात . हे घातल्यावर माझ्या सारख्या ५'१०" माणसाला पण सहा फुटावर उंच झाल्यासारखे वाटायचे! आणि उगाच aggression वाढीस लागायचे

पण हे बूट "झेपावे" पण लागतात … आज मला कोणी दिले तर ……. मला नाही म्हणावे लागेल …। कारण ते दिवस वेगळे होते ……. आख्खी No १ दोन जणात संपवण्याचे . रात्री पार्टी करून न झोपता submission लिहिण्याचे …… ते बूट येतील पण ते दिवस नाही

एकदा मामारीची वेळ आली होती तेव्हा हे भयानक बूट आणि त्यावर दोन तगडे लोक बघूनच समोरचे मागे हटले होते ( याची लाथ भयंकर बसू शकते )

असो तर चामड्याला ( लेदर ) मेण उत्तम … पोलिश हि द्रवरूप मेण असते .
आणि हे घालायला माणूस पण "तसा" लागतो … मला वाटते कि मित्रा ने "गिनती" करायला हि भेट दिली असावी .

- मित्रच काढतात XXवर चित्र …… मुंबईतील जुनी म्हण .

असेच काहीसे बूट माझे होते - दर्जा फार वाईट आसतो .

http://i1304.photobucket.com/albums/s530/hemantwaghe/army-boot-rubber-so...

यासाठी जे मेण ( वॅक्स ) वापरतात ते Carnuba wax एका पामसारख्या झाडापासून ( याच नावाचे) मिळते ते फारच दुर्मिळ झाले आहे.दुसरा पर्याय मधमाशांच्या पोळ्याचे मेण जे इजिप्तमधिल स्त्रिया मेकपसाठी वापरत तेही अप्राप्य झाले आहे. तिसरा जवळचा पदार्थ ब्लुव्हेल देवमाशाची चरबी वापरू लागल्यावर देवमासे ही देवाघरी लवकर जाऊ लागले आहे.

थोडक्यात इथे वर दिलेले गोडेतेल ,मोहरी राइतेल आणि कायकाय खाद्यतेले वापरून बुरशिला आमंत्रण देण्यापेक्षा आपली तब्येत सुधारून पाय बळकट आणि कोडगे करून सैन्यात भरती व्हावे. आता गो/म्हैस हत्ये बंदी आल्याने चामडेही दुर्मिळ होणार आहे

Lol

लिखाणाची स्टाईल चोरलीय>> Rofl

टण्या SRD.. Proud

कछुवा छाप खडे मीठ लावल्यावर बघा काही फरक पडतो का? कोकणाच्या हवेत नरम पडतील. अगदीच नाही जमले तर अष्टविनायक दर्शन पायी करा. आपोआप जोडे झिजतील व नविन घ्याल. ते पण चावले तर नविन बी बी उघडा.

रच्याकने बुट चावल्यावरही पोटात इंजेक्शन घ्यावे लागते का? Proud

लिंब्या,

बुट सदाशिव पेठेत रस्त्यावर ठेवुन ये !

सदाशिव पेठेत एकटे पडल्याने बुट चांगलेच नरमतील !

Wink Wink Wink

Light 1

असले बूट N.C.C.मध्ये ३ वर्षं वापरले आहेत. पॉलिश रेग्युलर करावे लागे पण मऊ बिऊ करायचं डोक्यातच आलं नाही. जसे होते तसेच वापरले. आपल्या मापाचे दिलेच जात नाहित बहुतेक वेळा. मला मिळालेले बूट तीनही वर्षं एक दोन साईझ मोठे असायचे. रस्त्याच्या कडेने जिथे उतार असतो तिथून चालताना घोट्याला खूप लागायचे. पण सांगणार कुणाला? N.C.Cचा मिलिटरी खाक्याच तसा असे. फायरिंग रेंजवर पहिल्यांदाच नेलं होतं तेव्हा ३०३ घेवून पालथं पडल्यावर चुकून पायांची पोझिशन चुकली आणि इन्स्ट्रक्टरच्या मिलिटरी बुटांची सणसणीत लाथही पायावर खाल्ली आहे. इतकी भयानक वेदना झाली होती पण भोकाड पसरायची सोय नसल्याने कसंबसं सहन केलं होतं. फायरिंग झाल्यावर टारगेटला किती गोळ्या लागल्या बघायला एक छोट्या तलाव सदृश डबक्यापलिकडे धावत जायचं होतं कडेकडेने. मुकाट्याने तिकडे धावत सुटले दुखरा पाय घेवूनच. नाहितर अजून एक लाथ बसेल असा धसका घेतला होता. ते बूट आणि ती लाथ अजून विसरले नाही.

>>>> एखादी रात्र बूटांना मायेने कुशीत घेऊन झोपा, बघा नरम पडतात का.. <<<<
खरच असे होऊ शकेल का? काही ज्ञानी लोक सांगुन गेलेत की वर वर पहाता निर्जीव वाटणार्‍या प्रत्येक भौतिक गोष्टीतही चेतनारुपि जीव असतोच. तसाच तो बुटातही असेल का?
पण कुशित घेउन झोपा म्हणजे काय करायचे?
बुटान्ना थोपटून झोपवायचे का? की त्यांच्याशी अंगाई गीत गात संवाद साधायचा?
अन तसे करताना त्यांना सागायचे का हळूच की उद्यापासून मला चावू नका? ऐकतिल का ते?
कुणी मायबोलीकरांनी असे करुन बघितले आहे का आधी? त्यांचा काय अनुभव आहे?
यावर काही शास्त्रीय संशोधन झालेले असेलच ना, तर कुणीतरी मला त्याची लिन्क द्या.

>>> मित्राने तुम्हालाच का भेट दिली ? गिनती करायला तर नाही ना ? <<<<
हेमन्त, गिनती करायला म्हणजे नेमके काय हो? मला तर काहीच कळले नाही.
बाकी तुमच्या पोस्टमधील मजकुराशी सहमत असलो तरी आता या वयात काय मी ते बुट घालुन कुणावर लाथा/दुगाण्या झाडायला जाणार नाही हे नक्की. पण तुम्ही म्हणता तसाही उपयोग होत असेलही.
एक शंका आहे, की बुट घालुन वा न घालुनही कुणालाही लाथ मारणे हे पाप आहे ना? मग तरीही लोकं लाथा का मारतात?
मला तर ते डब्ल्युडब्ल्युएफ/बॉक्सिंग वगैरे मारामारीचे खेळ टीव्हवर बघुन अगदि कीळस येते.

बुटान्ना थोपटून झोपवायचे का? की त्यांच्याशी अंगाई गीत गात संवाद साधायचा?
अन तसे करताना त्यांना सागायचे का हळूच की उद्यापासून मला चावू नका? ऐकतिल का ते? >>>>

लिम्बुकाका , स्लीपटॉक की कायसं म्हणतात त्याला .
लहान मुलांसाठी वापरतात ही थेरपी .
स्नुपावस्थेतल्या मेन्दुला ट्रेन करण्यासाठी .
बाकीचे जाणकार सांगतील .

कदाचीत बुट चावणे कमी करतील . Happy

आणि 'लाथोंके "बूट" बातोंसे नही मानते ' वाला सीन असेल तर एका पायात बूट घालून दूसर्या बूटावर लत्ताप्रहार करून बघा . तुम्हाला योग्य वाटत नसेल तर कोणातरी उत्साही आणि जाणकाराला हाताशी ( की पायाशी ?? ) धरा .
कदाचित नरमतील ही बूट .

Rofl

बुट चावलेला माणुस इतर माणसांना पण चावतो का? आमच्या गावाकडे अशा माणसांना चपलेने मारताना बघीतल्याचे काही जाणकार सांगतात तेव्हा सांभाळुन. त्यांनी म्हणे शेवटी त्याची मिठमोहर्‍या घेऊन दृष्ट काढली.

दृष्ट काढताना जो मंत्र\कविता म्हणतात तो कुणाला माहीत असेल तर इथे लिहाल का?

>>>> स्लीपटॉक की कायसं म्हणतात त्याला . लहान मुलांसाठी वापरतात ही थेरपी . <<<
ओह, स्वस्ति बरे झाले तुम्ही सांगितले मला.
अहो पण बुटांबरोबर स्लिपटॉक करताना आपण जसे लहान मुलांशी बोबडे बोलतो तसेच बोलायचे की मोठ्या माणसाशी बोलतो तसे?
मोठ्या माणसांन्शी कुशीत घेऊन स्लिपटॉक केल्याचा इथे कुणाला अनुभव आहे? असेल तर प्लीज प्लीज मला डॉयलॉग्ज लिहून द्याना. मी आजच प्रयोग करतो बुटांन्ना कुशीत घेऊन त्यांच्याशी बोलायचा.

सगळेच प्रतिसाद Rofl

बुट चावतात म्हणजे त्याचे दात लागत असणार. अश्यावेळी डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन घ्यावे लागते का?

एवढ्या पोस्टी झाल्या पण विषय अजुन चावर्‍या बुटांनाच धरुन आहे. दुसरा कोणी असता तर एवढ्यात ४-५ नविन धाग्यांचे सुतोवाच केले असते. Wink
श्श्या, शो ना हो. Proud Lol

Pages