Submitted by limbutimbu on 8 July, 2015 - 07:13
नुकतेच माझ्या मित्राने मला एक मिलिटरी टाईप चामड्याच्या बुटांची जोडी भेट दिली आहे.
घालुन बघता असे लक्षात आले की या बुटांचे चामडे खुपच जाड व कडक आहे.
त्यामुळे बुट पायाला चावतो. (म्हणजे त्यास दात/तोंड नसते पण कातडीला घासून घासुन जखमा होतात).
असे कोणते उपाय आहेत की ज्यामुळे चामडे कायमस्वरुपी नरम पडून बुट घालणे/वापरणे सुखकारक होईल?
पाणी वापरले असता (जसे न्हावी दाढी/कटिंग करायचे आधी लावतो) चामडे नरम पडते आहे, पण तात्पुरते. पाणी वाळून गेल्यावर जसेच्या तसे कडक होते.
तेल वापरावे असे वाटते, पण कोणते तेल जास्त उपयोगी होईल? स्व:स्त अन मस्त उपाय हवाय.
बुट कोणत्या प्राण्याच्या कातड्यापासून बनविलेला आहे व कोणत्या प्राण्याच्या कातड्यावर तो चढविला जाणार आहे त्यावरही कडक/नरमपणा अवलंबुन असतो का?
कृपया जाणकार/तज्ञांनी सल्ला द्यावा.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झाले का बुट नरम?
झाले का बुट नरम?
अद्याप नरम झाले नसल्यास: बूट
अद्याप नरम झाले नसल्यास:
बूट जिथे चावतात ती नमेकी जागा मार्क करुन (बुटांवर, पायावर नव्हे) बूट चांभाराकडे घेउन जावेत.
आणि ती मार्क केलेली जागा व्यवस्थित आकारात कापून घ्यावी. दोन्ही बूंटांना सारखे आकार कापून घ्यावेत आणि त्यावर शोभेल अशा टाक्यांनी शिवण मारुन घ्यावी.
याने बूट चावण्याचा त्रास थांबेलच शिवाय पुढील भागात हवा खेळती राहील.
बूट घालून अति थंड प्रदेशात जायचे असल्यास मात्र हे चालणार नाही.
आम्ही एकदा रोहतंग पासला मनालीवरुन बाईकने गेलो होतो. माझा उजवा बूट पुढे किंचीतसा उसवला होता. पण तेवढ्याने पाय अर्ध्या तासात गारठला.
तेव्हा अशा ठिकाणी बूट घालून जायचे असल्यास हा उपाय चालणार नाही.
चामडी कडक्क नव्या बुटांना नरम
चामडी कडक्क नव्या बुटांना नरम कसे करावे?
चालते व्हा ! १०,००० स्टेप्स अ डे
चामडी कडक्क नव्या बुटांना नरम
चामडी कडक्क नव्या बुटांना नरम कसे करावे? >>>
त्याच्या जबड्यात हात घालावा आणि आतडीतून मेलेला उंदीर बाहेर काढावा.
बघीरा:
बघीरा:
तो बूट पंचामृतात मंदाग्नीवर
तो बूट पंचामृतात मंदाग्नीवर शिजवावा ....
तो बूट पंचामृतात मंदाग्नीवर
तो बूट पंचामृतात मंदाग्नीवर शिजवावा ....
<<
पंचगव्य म्हणायचे आहे का तुम्हाला?
रच्याकने, गोमूत्र (किंवा कोणतेही मूत्र) हे टॅनिंगच्या अर्थात, चामडी 'कमवण्याच्या' कामी येते. अर्थात, गोमूत्राच्या अनेकानेक औषधी, लोकोपयोगी वगैरे उपयोगांपैकीचा हाही एक उपयोग लिंबूरामांना ठाऊक असेल की नाही, नो आयडिया
http://www.google.co.in/paten
http://www.google.co.in/patents/US6410059
http://timesofindia.indiatimes.com/india/Indian-scientists-patent-cow-ur...
http://www.technology-patent.com/nl5.html
>>>> चामडी कडक्क नव्या
>>>> चामडी कडक्क नव्या बुटांना नरम कसे करावे?
>>>> चालते व्हा ! १०,००० स्टेप्स अ डे <<<<<
नुस्ता चाललो नाही, दोन दिवस ४०० मीटरच्या दोन फेर्या (८०० मीटर) पळालो ही.
बुट बर्यापैकी नरमलेत आता, शेवटी पायीची वहाण पायीच बरी, ती काय डोक्यावर घेऊन नाचायचे नसते ना...
तरी बुट नरमले तरी पळण्याने पाठी-कमरेत उसण गेलि ती गेलीच... आता बरे आहे.
.
.
बूट नरम झाल्याने ह्या बीबीचे
बूट नरम झाल्याने ह्या बीबीचे प्रयोजन संपले असल्याने हा बी बी बंद करण्यास अॅडमिन याना सांगावे काय?
>>>> बूट नरम झाल्याने ह्या
>>>> बूट नरम झाल्याने ह्या बीबीचे प्रयोजन संपले असल्याने हा बी बी बंद करण्यास अॅडमिन याना सांगावे काय? <<<<

काय म्हणता रॉबिनराव? तुम्ही अॅडमिनना ऑर्डर सोडणार धागा बंद करा म्हणून?????/
ग्रेटच्च बोवा तुम्ही.... उग्गाच न्नाय तुमची आयडी "रॉबिनहूड" अशी आहे...
(No subject)
>>चामडी कडक्क नव्या बुटांना
>>चामडी कडक्क नव्या बुटांना नरम कसे करावे?
मी आधी शिर्षक वाचले तेव्हा बुटांनी असे वाटले होते
हायला महेश. लिंटी पोलीसात
हायला महेश.
लिंटी पोलीसात भरती होतायंत की काय?
>>>> लिंटी पोलीसात भरती
>>>> लिंटी पोलीसात भरती होतायंत की काय? <<<<

सगळी डिपार्टमेंटा आपलीच आसां......
>>>> बूट नरम झाल्याने ह्या
>>>> बूट नरम झाल्याने ह्या बीबीचे प्रयोजन संपले असल्याने हा बी बी बंद करण्यास अॅडमिन याना सांगावे काय? <<<<


नजर, हो हो, नजरच लागली कुणा मेल्यांचि माझ्या बुटांना....
शनिवारी घराबाहेरुन रात्री कधीतरी चोरीला गेले ते बुट
आता सांगा म्हणांव अॅडमिनना हा धागा बंद करायला....
शनिवारी घराबाहेरुन रात्री
शनिवारी घराबाहेरुन रात्री कधीतरी चोरीला गेले ते बुट>>>>>> चोरीला जाण्यापुर्वी नरम झाले होते काय? नाहीतर चोराला पण चावतील की तो पण काय लक्षात ठेवेल कोणाचे बुट चोरले म्हणून.........
नरेश भाऊ, मी इथे बुट
नरेश भाऊ, मी इथे बुट गेल्याच्या घनघोर दु:खात अन तुम्हाला पडलीये काळजी चोराच्या पायांची..... वा रे व्वा....
वाट्टोळे होईल त्या चोराच्या पायांचे..... माझे बुट चोरुन घालतो काय?
माझे चोरलेले बुट घालुन नै पाय मुरगळवुन घेउन फ्रॅक्चर होऊन सहा महिने अंथरुणावर पडला तर बघा...
लिम्बु, पायतले जोडे हरवणे
लिम्बु, पायतले जोडे हरवणे चोरी जाणे म्हणजे 'पनवती' गेली!!
तसाही त्या बुटांचा चावून चोथा झालेला ना??
तुम्ही कश्याला शिव्याशाप देताय तुमच्या उपकारकरत्याला?
बुट चोरीला जाणे पत्रिकेत होते
बुट चोरीला जाणे पत्रिकेत होते काय??
कोणाच्या पत्रिकेत
कोणाच्या पत्रिकेत लिंबुभाऊंच्या की बुटांच्या?
माझ्या पत्रिकेत भरपुर
माझ्या पत्रिकेत भरपुर चोर्यामार्या हरवणे लिहीलेले आहे.



कित्तीतरीवेळा प्रवासात /घरातुन मौल्यवान वस्तु चोरीला गेल्यात्/पडुन हरवल्यात
अन माझे कोमल हृदय तर कितीवेळा चोरिला गेलय तुकड्यातुकड्यात त्याची गणतीच लागत नाहीये
माझ्या हृदयाच्या गरिब बिचार्या तुकड्यांनो, जिथे कुणाकडे असाल तिथे खुशित र्हावा...
आयला लिंब्या
आयला लिंब्या
दिल के टुकडे टुकडे
दिल के टुकडे टुकडे करके
मुस्कुराते चल दिये
.......
गीत कार लिम्बु का?
अन माझे कोमल हृदय तर कितीवेळा
अन माझे कोमल हृदय तर कितीवेळा चोरिला गेलय तुकड्यातुकड्यात त्याची गणतीच लागत नाहीये >> भारीये, पण ईतकं पिळल्या गेलेल्या लिंबात् लईच रस शिल्लक आहे म्हणायचा
अन माझे कोमल हृदय तर कितीवेळा
अन माझे कोमल हृदय तर कितीवेळा चोरिला गेलय तुकड्यातुकड्यात त्याची गणतीच लागत नाहीये >> भारीये, पण ईतकं पिळल्या गेलेल्या लिंबात् लईच रस शिल्लक आहे म्हणायचा डोळा मारा >>>> पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा... गाणे चालू आहे
म्हंजे बुट नरम कसे झाले हे वाचायला आले तर इथे भलतच चाल्ल्य..:)
नरम झाले नसतील तर चोर लवकरच
नरम झाले नसतील तर चोर लवकरच माबोवर वाचायला येईल हा बाफ..
पण ईतकं पिळल्या गेलेल्या
पण ईतकं पिळल्या गेलेल्या लिंबात् लईच रस शिल्लक आहे म्हणायचा >>
बूटाबद्दल ओपन फोरम मधे माहीती
बूटाबद्दल ओपन फोरम मधे माहीती ? लिंबूभाऊ मागच्या धाग्यातले स्वतः केलेले उपदेश कॅन्सल का ?
त्या चोरीला गेलेल्या हृदयाचं लोणचं घातलं की मिसळीच्या रश्शावर पिळून सालीने भांडी घासली याचं काही ट्रॅक रेकॉर्ड ठेवलंय काय ?
Pages