चामडी कडक्क नव्या बुटांना नरम कसे करावे?

Submitted by limbutimbu on 8 July, 2015 - 07:13

नुकतेच माझ्या मित्राने मला एक मिलिटरी टाईप चामड्याच्या बुटांची जोडी भेट दिली आहे.
घालुन बघता असे लक्षात आले की या बुटांचे चामडे खुपच जाड व कडक आहे.
त्यामुळे बुट पायाला चावतो. (म्हणजे त्यास दात/तोंड नसते पण कातडीला घासून घासुन जखमा होतात).
असे कोणते उपाय आहेत की ज्यामुळे चामडे कायमस्वरुपी नरम पडून बुट घालणे/वापरणे सुखकारक होईल?
पाणी वापरले असता (जसे न्हावी दाढी/कटिंग करायचे आधी लावतो) चामडे नरम पडते आहे, पण तात्पुरते. पाणी वाळून गेल्यावर जसेच्या तसे कडक होते.
तेल वापरावे असे वाटते, पण कोणते तेल जास्त उपयोगी होईल? स्व:स्त अन मस्त उपाय हवाय.
बुट कोणत्या प्राण्याच्या कातड्यापासून बनविलेला आहे व कोणत्या प्राण्याच्या कातड्यावर तो चढविला जाणार आहे त्यावरही कडक/नरमपणा अवलंबुन असतो का?
कृपया जाणकार/तज्ञांनी सल्ला द्यावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मित्रांनो नुसते विनोद आणि गप्पा नको, उपायही येऊद्या.. युनिवर्सल प्रॉब्लेम आहे, फायदा सर्वांनाच होईल.

मी काय म्हणतो, कूकरमध्ये लाऊन बघता का?
तीन शिट्ट्यांनी काम नाही झाले तर आणखी एक शिट्टी घ्या..

बूट कूकर मध्ये लावताना त्यावर अर्धा लिंबू कापून चोळा त्याने चकाकी येण्याची शक्यता राहील..

तळटीप - पण चुकूनही हार्ड वॉटर वापरू नका नाहीतर नेमका उलट परीणाम होऊन बूट आणखी कडक होतील.

लिंबु कापुन चोळण्यापेक्षा लिंबु ओवाळले तर फायदा होईल. तु बुटाभोवती फेर्‍या मारल्यास तर फायदा होईल की नाही माहीत नाही. Happy

अय्या ! तुम्ही पन्नास वर्षाच्या आहात? वाट्टत नाही अगदीच. संतूर ब्रान्ड काय ?

पण तुमच्यासारख्या धार्मिक माणसाने त्या बुटांना विरोध कसा काय केला नाही. कोणा पवित्र गोमातेच्या किंवा गोपुत्राच्या आयुष्याचा बळी जाऊन कमावलेल्या चामड्याचे बूट ते!
बिल्कुल ठेऊ नका स्वतःकडे.
कुणा गोमांस भक्षण करणार्‍या पाप्याच्या घरात सोडून या आणि त्याचे पाप वाढवा. तुम्ही असले जोडे नाकारल्याचे पूण्य मिळवा.

लिंब्या,
तु बुट पायात बरोबर घालत नसशील. डाव्या पायातला बुट उजव्या पायात व उजव्या पायतला बुट डाव्या पायात घालुन बघ. Happy

लिम्बु काका, पत्रिका बघा ( तुमची ), साडेसाती तर नाही ना तुम्हाला ?
तसे असेल तर बूट काय, पण रुमाल पण चावतील ....

बुट लहान साईझचेच दिसताहेत.

पत्रिका बुटांचीच पहायला हवी. लिंबुकडे येऊन पोचलेत. Happy

सिरीयसली! त्या बुटाना आतुन स्पन्ज बसवा. आणी थर्मल मोजे घाला. उन्हाळ्यात सुद्धा घाला, त्याने घाम येऊन बुट नरम पडतील.

बुट हा तुम्हाला भेट म्हणुन मिळाला आहे तर आता परतीची भेट देण्याचा पण विचार तुम्ही कराल अशी अपेक्षा...

बुट-पायाचे घर्षण ज्या भागावर होते तेथे १ - २ वेळा कुठलेही तेल लावा.

>>> चामडे नरम पडावे<<< असे साकडेही घालायचे का? <<< LT, साकडे नव्हते घालायचे. घातलेस का? आता साकड्याचा भाग तेवढा undo कर.

>>> लिंबुला चावतांत म्हणजे बी ग्रेडी बूट नसुन 'ब्रिगेडी' असावेत !! <<<
तर्रीच... हे बुट घातल्यावर विनाकारणच पाय आपटत आपटत चालले जातय... !

बुटाना आतुन स्पन्ज बसवा. आणी थर्मल मोजे घाला. उन्हाळ्यात सुद्धा घाला... याने बुटांना घाम येऊन बूट नरम पडतील >> त्यासाठी बुटाना मोजे (बाहेरून) घालावे लागतील.. Proud

Pages