दापोलीची भटकंती

Submitted by माधव on 30 January, 2017 - 01:14

दापोली , बस नाम काफी है! मायबोलीवरचे धागे वाचूनच (आणि थोडी इतरांकडून माहिती घेऊन) दापोलीची सहल आखली होती. त्यामुळे प्रवास वर्णन असे काही नाहीये. फक्त मला दिसलेला आणि भावलेला दापोली परीसर तुमच्यापुढे सादर करतोय...

सांज ये मुरुडी सावळी सावळी...

जाईन विचारीत करवंद फुला, भेटेल तिथे गं केशवराज मला...

भूमी परशुरामाची

डोल डोलतय वार्‍यावर

इंद्रधनुष्य

जेथे सागरा खाडी मिळते...

लेहरों पे नाचे किरनों की परीया ...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो माधव.
कधी गेला होतात ? मी डीसेंबर मध्ये होतो इथे २-३ दीवस. मुरुड, कर्दे, लाडघर, वेळणेश्वर, ई. सुंदर किनारे आहेत इथले !

सगळ्यांना धन्यवाद!

प्रकाश, मी जानेवारीत गेलो होतो.

सई, सर्व सुंदर स्थळांना न्याय अजीबात देता येत नाही कॅमेर्‍याने. याच ट्रीपमध्ये शिवथरघळला पण गेलो होतो. कॅमेरा सरसावलाच. पण मग जाणवले की केमेरा टिपतोय ती केवळ एक शुष्क घळ आणि काचेमागची समर्थांची आणि कल्याणस्वामींची मूर्ती. ती शिवथरघळ नव्हे. मग कॅमेरा म्यान केला आणि नतमस्तक (तसेही नतमस्तक व्हावेच लागते घळीत) होऊन शांतपणे उभा राहिलो. मग तिथेच बोर्डावर लिहिलेली 'धबधबा' ही समर्थांची रचना दिसली. ती वाचताना (आणि स्मरताना) पौष महिन्यात ऐन आषाढातला तो घळीतला धबधबा जाणवून गेला. शाळेपासूनच ती रचना आवडती होती आता तर मनावर कोरली गेली आहे. तो खरा फोटो Happy

सई, सर्व सुंदर स्थळांना न्याय अजीबात देता येत नाही कॅमेर्‍याने. याच ट्रीपमध्ये शिवथरघळला पण गेलो होतो. कॅमेरा सरसावलाच. पण मग जाणवले की केमेरा टिपतोय ती केवळ एक शुष्क घळ आणि काचेमागची समर्थांची आणि कल्याणस्वामींची मूर्ती. ती शिवथरघळ नव्हे. मग कॅमेरा म्यान केला आणि नतमस्तक (तसेही नतमस्तक व्हावेच लागते घळीत) होऊन शांतपणे उभा राहिलो. मग तिथेच बोर्डावर लिहिलेली 'धबधबा' ही समर्थांची रचना दिसली. ती वाचताना (आणि स्मरताना) पौष महिन्यात ऐन आषाढातला तो घळीतला धबधबा जाणवून गेला. शाळेपासूनच ती रचना आवडती होती आता तर मनावर कोरली गेली आहे. तो खरा फोटो Happy >>>>>क्या बात है!!!

सई, सर्व सुंदर स्थळांना न्याय अजीबात देता येत नाही कॅमेर्‍याने. याच ट्रीपमध्ये शिवथरघळला पण गेलो होतो. कॅमेरा सरसावलाच. पण मग जाणवले की केमेरा टिपतोय ती केवळ एक शुष्क घळ आणि काचेमागची समर्थांची आणि कल्याणस्वामींची मूर्ती. ती शिवथरघळ नव्हे. मग कॅमेरा म्यान केला आणि नतमस्तक (तसेही नतमस्तक व्हावेच लागते घळीत) होऊन शांतपणे उभा राहिलो. मग तिथेच बोर्डावर लिहिलेली 'धबधबा' ही समर्थांची रचना दिसली. ती वाचताना (आणि स्मरताना) पौष महिन्यात ऐन आषाढातला तो घळीतला धबधबा जाणवून गेला. शाळेपासूनच ती रचना आवडती होती आता तर मनावर कोरली गेली आहे. तो खरा फोटो >>> वाहवा, सुंदर शब्दचित्र.

Pages