'कोकणमय'

Submitted by जिप्सी on 16 February, 2012 - 13:20

सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण
राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन

अशा या तळकोकणाची/नंदनवनाची आठवण होण्याचे कारण कि नुकताच करून आलेलो कोकणचा दौरा. तसा मूळचा मी देशावरचा त्यामुळे कोकणात जाण्याचा योग फारच कमी आला. अगदी ७-८ वर्षापूर्वी माझ्यासाठी कोकण म्हणजे अलिबागच. साधारण ८ वर्षापूर्वी एका मित्रासोबत रत्नागिरी-कुणकेश्वर-निवती भटकंती करण्याचा योग आला आणि त्या दिवसापासुन कोकणाच्या प्रेमात पडलो ते आजतागायत. त्यानंतर कोकणात भटकण्याचा योग बर्‍याचदा आला (किंबहुना जुळवुनच आणला). रत्नागिरी, चिपळुण, दापोली, हरीहरेश्वर, श्रीवर्धन, गुहागर, मालवण आणि आताच्या भेटीत वेंगुर्ला असा बराचसा प्रांत भटकुन झालाय. प्रत्येक वेळेस त्याचे रूप निरनिराळे भासले.

आताच्या कोकण दौर्‍यात कुडाळ, धामापूर, वालावल, नेरूरपार, निवती, भोगवे, मालवण, आंगणेवाडी, सिंधूदुर्ग किल्ला, तारकर्ली, देवबाग, रेडी, अरवली, कुणकेश्वर, विजयदुर्ग किल्ला असा भरगच्च कार्यक्रम पार पाडला. मी आधीही म्हटल्याप्रमाणे माझी पहिली आवड म्हणजे भटकंती आणि दुसरी फोटोग्राफी. या कोकण दौर्‍याच्या वेळेस मी "कोकण पाहण्यापेक्षा अनुभवणार जास्त होतो". काहि काही गोष्टी कॅमेर्‍यात बंद नाही करता येत. त्या अनुभवायलाच पाहिजे. कोकणी माणसांचा आदरतिथ्य, वडेसागोतीचा स्वाद, बांगड्याचे तिखले, निसर्गाची साद, सागराची गाज, काजू/आंबा मोहराचा सुवास या गोष्टी कॅमेर्‍यात नाही बंद करू शकत. या भटकंतीत अस्मादिकांनी कोकण फक्त पाहिला नाही तर तो अनुभवला.

तरीही माझ्या नजरेने टिपलेला कोकण तुमच्या समोर मालिकेच्या स्वरूपात आणत आहे. याच मालिकेचा पहिला भाग हि "प्रस्तावना". प्रकाशचित्रे तुम्हाला आवडली तर ती कोकणच्या सौंदर्याची किमया आणि नाही आवडली तर तो माझ्या फोटोग्राफीचा दोष. Happy

कोकणाबद्दल मी एकच बोलु इच्छितो — "तेरा मुझसे है पहले का नाता कोई, युंही नही दिल लुभाता कोई..."

अशा या कोकण दौर्‍याने भारावून मी चार-पाच ओळी खरडण्याचा (पहिल्यांदाच) प्रयत्न केला आहे. प्रकाशचित्रांप्रमाणे याही तुम्हाला आवडतील अशी आशा आहे.

"कोकणमय"
कोकण म्हणजे लाल मातीतली वाट, कोकण म्हणजे निसर्गाचा थाट
कोकण म्हणजे भरलेला पापलेट, कोकण म्हणजे वडे सागोतीच ताट
कोकण म्हणजे बांगड्याचे तिखले, कोकण म्हणजे जीभेचे चोचले
कोकण म्हणजे अबोलीचं फुल, कोकण म्हणजे जीवाला भूल
कोकण म्हणजे देव रवळनाथ, कोकण म्हणजे देवापुढे जोडलेले हात
कोकण म्हणजे सारवलेलं अंगण, कोकण म्हणजे तुळशी वृंदावन
कोकण म्हणजे मालवणचा खाजा, कोकण म्हणजे फळांचा राजा
कोकण म्हणजे चहा आंबोळ्या, कोकण म्हणजे दारावरच्या रांगोळ्या
कोकण म्हणजे निळी खाडी, कोकण म्हणजे माडाची झाडी
कोकण म्हणजे सागराची गाज, कोकण म्हणजे रूपेरी वाळुचा साज
कोकण म्हणजे दशावतारी खेळ, कोकण म्हणजे भावभक्तीचा मेळ
कोकण म्हणजे वाळुची पुळण, कोकण म्हणजे घाटाचे वळण
कोकण म्हणजे फणस काजू आंबा, कोकण म्हणजे आंबटगोड रातांबा
कोकण म्हणजे मामाचं कौलारू घर, कोकण म्हणजे आजीच्या मायेचा पदर
कोकणातली माणसं वाटतात आपली, मैत्रीची हि नाती कायम मनात जपली
कोकण म्हणजे लोकसंगीतातली लय, झालो मी पुरता "कोकणमय"
कोकण म्हणजे तांदळाची पेज आणि चुलीत भाजलेला मासा
म्हणुनच तर म्हणतंय "येवा कोकण आपलोच आसा"

प्रचि ०१
( गिर्ये येथील रामेश्वर मंदिरातील श्री मूर्ती,रेडीचा गणपती, जयगणेश मंदिर (मालवण), लक्ष्मीनारायण (वालावल), सातेरी देवी (सरंबळ-कुडाळ), मानसीश्वर (वेंगुर्ला), वेतोबा (आरवली), श्री देवी भगवती (धामापूर) )

प्रचि ०२
सरंबळ (कुडाळ)

प्रचि ०३
कांदळगाव (मालवण)

प्रचि ०४
नेरूरपार

प्रचि ०५
श्री कलेश्वर मंदिर (नेरूरपार)

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९
नेरूरपार

प्रचि १०
नेरूरपार

प्रचि ११
निवतीचा समुद्रकिनारा

प्रचि १२
निवतीचा समुद्रकिनारा

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५
निवती बॅकवॉटर

प्रचि १६
निवती

प्रचि १७
भोगवे

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०
निवती

प्रचि २१
देवबाग बॅकवॉटर

प्रचि २२
किल्ले सिंधुदुर्ग

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५
मालवण

प्रचि २६
किल्ले विजयदुर्ग

प्रचि २७
वाडातर

प्रचि २८

प्रचि २९
वाडातर पूल

प्रचि ३०
वाडातर

प्रचि ३१
नेरूरपार

प्रचि ३२
नेरूरपार

प्रचि ३३
देवबाग समुद्रकिनारा

प्रचि ३४
(क्रमशः)

गुलमोहर: 

भरपूर प्रकाशचित्रे असल्याने त्यातील काहि प्रचि मी कोलाज स्वरूपात येथे प्रदर्शित करत आहेत.
शेवटच्या खादाडी कोलाजमधील काही प्रचि हे मालवणातील "चैतन्य हॉटेल" मधील आहेत.

प्रस्तावना आणि कविता सुंदर. आता फोटो बघतो. Wink आणि झब्बू पण देतो.. Lol

प्रत्येक प्रचिमधल्या जागांची नावे लिही जमल्यास... Happy

३४ नंबर खास... Wink

जिप्स्या ह्याचीच वाट बघत होते.. प्रस्तावना, फोटो आणि कविता. १०० पैकी २०० Happy
प्रचि २३ आणि ३४ (अर्धा भाग)... शब्द सुचत नाहीयत रे Proud

प्रचि ३२ कुठला आहे तो तर अफलातून आलाय.

जीवाचं कोकण केलस की रे !!!

प्रचि २ आणि ३.. मी पोचलय गावाक रे Happy

Khasach ! Happy

क्या बात है दोस्त. दिल जित लिया तुने.
सगळे प्रचि एक से एक Happy
आणि क्रमशः बघुन तर मस्तच वाटल. लवकर येउ दे पुढचा भाग.

सगळेच मस्त.. कोकणचे फोटो पाहायचा कंटाळा कधीच येत नाही! Happy और भी आने दो!

पहिल्या फोटोत

वरच्या ओळीत १. माहिती नाही (प्रत्यक्ष गणपतीचं स्थान नसून एखाद्या शंकराच्या देवळातली गणपतीची मूर्ती असावी) २. रेडीचा गणपती, ३. मालवण-मेढ्यातलं जयगणेश मंदीर ४. वालावलचा लक्ष्मीनारायण आहे कदाचित.
शिळास्वरूप स्थान आहे ते कुठलंय ते ठाऊक नाही.
खालच्या ओळीत १. मानसीश्वर, वेंगुर्ला. २. वेतोबा, आरवली (दिसतंच आहे.) ३. धामापूरची भगवती आहेत.

बरोबर?

क्रमशः बघून खरंच मस्त वाटलं! Happy

नावं हि द्या ना कुठे घेतलीत ते कमीत कमी. मग कळते भाग कुठलाय ते जर सीरीज बनवणार असाल तर.:)

आम्ही हल्लीच हरचिरीला घर घेतलय.. आता तिथे जावून शेती करणार काही वर्षाने. Happy

आहाहा ....
व्वा सुरुवात तर झक्कास Happy
कविता छान लिहिलिस.. तुझ्या फोटुग्राफीला मुजरा ... काही फोटु अफलातुन सुंदर ..

जिप्स्या..फोटोंवर नजर ठरत नाहीये..
मामा असला तर त्याचं गाव हेच असावं,दुसरं कोणतही चालणार नाही Happy
ता.क. - शेवटच्या फोटूबद्दल तुला जाहीर माफी!!! Proud

जिप्सी, तुस्सी ग्रेट हो.... अफलातुन कविता आणि प्रचि... वेळ मिळाल्यावर प्रत्येक प्रचिबद्दल थोडं फार लिही ना....

प्रचंड आवडलं हे कोकणमय Happy Happy Happy

प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स Happy

प्रत्येक प्रचिमधल्या जागांची नावे लिही जमल्यास...>>>>डन रे Happy

जीवाचं कोकण केलस की रे !!!>>>>>नीलू, अगदी अगदी Happy

मासा घेऊन जाणार्‍या पाठमोर्‍या बाबाचा फोटो तर फारच आवडला.>>>>माझ्याही आवडत्या फोटोपैकी एक. Happy

@देवचार
१. माहिती नाही (प्रत्यक्ष गणपतीचं स्थान नसून एखाद्या शंकराच्या देवळातली गणपतीची मूर्ती असावी)>>>>गिर्ये येथील रामेश्वर मंदिरातील श्री मूर्ती आहे.

४. वालावलचा लक्ष्मीनारायण आहे कदाचित.>>>>>बरोबर Happy

शिळास्वरूप स्थान आहे ते कुठलंय ते ठाऊक नाही.>>>>कुडाळ मधील सरंबळ गावातील श्री देवी सातेरी
बाकी देवस्थान अगदी बरोब्बर ओळखलीत. Happy Happy

नावं हि द्या ना कुठे घेतलीत ते कमीत कमी.>>>झंपी ठिकाणांची नावे दिलीत. Happy

काही फोटु अफलातुन सुंदर ..>>>>धन्स रोमा Happy

मामा असला तर त्याचं गाव हेच असावं,दुसरं कोणतही चालणार नाही>>>>>अगदी अगदी

ता.क. - शेवटच्या फोटूबद्दल तुला जाहीर माफी!!! >>>>>>वर्षूदी Proud

वेळ मिळाल्यावर प्रत्येक प्रचिबद्दल थोडं फार लिही ना...>>>>नक्कीच चिमुरी Happy यातील प्रत्येक ठिकाणाबद्दल पुढच्या सिरीजमध्ये लिहिणार आहे. हि फक्त प्रस्तावना असल्याने जास्त लिहिले नाही. Happy

जिप्स्या तु कवीही झालास की रे.. कोकणाची भूल इतकी पडली की तिने तुला कविताही सुचवली Happy

फोतो सगळे पाहिले नाहीत, नंतर पाहते निवांतपणे.

आणि तु ज्याचा समाचार घेतलास त्या माशाचा फोटु कुठाय???? त्याचा तर आधी काढायला हवा, तुझ्या पोटात जाणारा पहिला मासा म्हणुन...

तु कवीही झालास की रे.. >>>>>>नाही नाही Happy तो प्रांत माझा नाही Wink

कोकणाची भूल इतकी पडली की तिने तुला कविताही सुचवली>>>>हां हे मात्र आहे. Happy
आणि तु ज्याचा समाचार घेतलास त्या माशाचा फोटु कुठाय???? त्याचा तर आधी काढायला हवा>>>> आहे आहे Happy निवतीच्या भागात त्याचे फोटो आहेत. रच्याकने प्रचि ३४ मध्ये दुसर्‍या लाईनीतला दुसराच फोटो. Proud

कोकणाबद्दल मी एकच बोलु इच्छितो — "तेरा मुझसे है पहले का नाता कोई, युंही नही दिल लुभाता कोई..."

आधीच्या जन्मातले नाते आठवायची आवश्यकता नाहीय, तुला या जन्मातही नाते जोडायचा एक चान्स आहे अजुन... त्याचा योग्य तो वापर करावा Wink

केव्वळ अ प्र ति म!!!!!

१८ मधला काजु, २४ मधली गोंडस मुलं खास Happy .... बाकी सीनरीचे फोटो तर मस्तच!

कविता ही छान्च रचलियेस... Happy करत जा अधुन मधुन एखाद दुसरी कविता Happy

जिप्स्या तू फोटो अप्रतिम काढतोसच पण ही कविता! काय समर्पक शब्दांत कोकण उभं केलंस रे!! क्या बात है! भटकंती, फोटोग्राफी, कविता... ही यादी अशीच वाढू दे! मस्त!
फोटो खूप छान आलेत (आता माझ्याकडचे शब्द संपले. काय तेच तेच लिहायचे ना प्रत्येक वेळेस! तुला, दिनेशदांना आणि जागू अशा लोकांना मी स्टँडिंग इंस्ट्रक्शन देतात तसे कायमचे अप्रतिम, भन्नाट असे शब्द लिहून ठेवलेत!! :स्मित:)

ह्या हे काय फोटो आहेत... आपल्याला नाय आवडले बुवा..... यांच्या पेक्षा आमचा योग्या बरा काढतो फोटो.... सध्या माझ्याकडेच शिकतोय पण पोर हरहुन्नरी आहे Proud

जिप्स्या जिप्स्या जिप्स्या लेका काय बोलु रे आता................

कोकणातले फोटो दाखवुन जळवसेल म्हणु की आवडत्या ठिकाणाचे अप्रतिम फोटो पाहुन डोळे निवले म्हणुन धन्यवाद म्हणु...........

अप्रतिम कोकणाचे अप्रतिम फोटो. Happy
आणि फ्रेमिंगची तुझी कला अफाट. ( त्याच कोकणातल्या मातीतल्या "अफाट" बापुमधला "अफाट" असा अर्थ रे भावा)

आपली भेट कधी होइल काय माहित. थोडीफार फोटो काढताना किंवा फ्रेम पकडताना तुझ्या मनातील थिन्कीन्ग प्रोसेस जाणुन घ्यायला आवडेल. थोडाफार माझ्या जाणीवा विस्तारतील. Happy

Pages