महेंद्रसिंग धोनी उर्फ माही ... एका पर्वाचा अस्त ??

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 June, 2015 - 17:02

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर धोनीने कसोटीमधून तडकाफडकी एक्झिट घेतली तेव्हाच मनात सतराशे साठ प्रश्न उठले होते.

ज्या लढवय्या कर्णधाराने आपल्याला ५०-५० आणि २०-२० चा विश्वचषक जिंकून दिला, चॅम्पियन करंडक मिळवून दिला, क्रिकेटच्या ईतिहासात प्रथमच भारताला कसोटीत अव्वल क्रमांकावर विराजमान केले,. त्या कर्णधाराने ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट पराभूत स्थितीत सोडून तडकाफडकी पळ काढला. ते देखील ऐन विश्वचषकाच्या आधीच्या दौर्यात. संघाच्या मनोधैर्यावर याचा विपरीत परीणाम होऊ शकतो याची शक्यताही लक्षात न घेता..

खरे तर ही घटना फार विलक्षण म्हणावी लागेल, पण तिचे फारसे पडसाद उमटले नाहीत. वा कदाचित तसे उमटू नयेत याची काळजी घेण्यात आली असावी.
कारण त्याच वेळी आणखी एक लक्षणीय घटना घडत होती.

रवी शास्त्रीचा ठसठसून जाणवावा असा भारतीय संघाच्या कारभारात अधिकृतरीत्या हस्तक्षेप सुरू झाला होता. त्याने नवनिर्वाचित कर्णधार विराट कोहलीच्या स्वागताबरोबरच अप्रत्यक्षपणे धोनीच्या जाण्याचे समर्थन केले. त्यामुळे अर्थातच धोनीच्या कसोटीतून अकाली एक्झिटच्या मागे काही राजकारण तर शिजत नाही ना, आणि त्यामागे (कोहली+शास्त्री) ही जोडगोळी तर नाही ना अशी क्रिकेटरसिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. बघता बघता एकीकडे (फ्लेचर + धोनी) तर दुसरीकडे (शास्त्री + कोहली) असे चित्र उभे राहू लागले.

योगायोगाने म्हणा वा दुर्दैवाने, ऑस्ट्रेलियाच्या त्या कसोटी मालिकेनंतर झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या तिरंगी मालिकेत कोहली अपयशी ठरला. खास करून कसोटीतील त्याच्या तुफान फॉर्ममुळे त्याचे हे अपयश उठून दिसले. परीणामी भारत त्या स्पर्धेत चारही सामने हरला आणि कोहली हा मुद्दाम धोनीचा पत्ता कट करायला खराब खेळ करतोय अश्या वावड्या उठू लागल्या.

पण ऐन विश्वचषकाच्या तोंडावर कर्णधार बदल होण्याची संभावना शून्यच होती. कर्णधार धोनीच राहिला!

विश्वचषकात मात्र भारतीय संघ पुन्हा एकजूट दाखवत अतीव कौतुकास्पद खेळ करत ऊपांत्य फेरीत पोहोचला.
तिथे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडला मात देत विश्वचषकावर आपले नाव कोरणे म्हणजे सलग दोन विश्वचषक भारताला मिळवून देण्याचा बहुमान.
धोनीच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोचला जाणार होता.
त्यानंतर २०१९ च्या विश्वचषकापर्यंत धोनीचे कर्णधारपद गृहीत धरले गेल्यास वावगे ठरले नसते.

पण ईथे पुन्हा माशी शिंकली !
ऊपांत्य सामन्यात आपण हरलो..
त्या दिवशी कोहलीने ११ चेंडूत १ धाव करत आपली विकेट हाराकिरी करत फेकायच्या आधी.. कोहली आपला पहिला चेंडू खेळायच्याही आधी.. आमच्या ऑफिसातील काही विघ्नसंतोषी रसिकांनी ही भविष्यवाणीच केली होती की कोहली काही हा विश्वचषक धोनीला जिंकायला मदत करणार नाही. त्यानंतर जे घडले ते सर्वांना माहीत आहेच, पण ज्या पद्धतीने कोहली बाद झाला ते पाहता ऑफिसमधील ईतर कोणाला त्यांचे वक्तव्य ‘हा निव्वळ योगायोग आहे’ म्हणत खोडता आले नाही.

एव्हाना भारतीय क्रिकेटमध्ये काहीतरी शिजतेय याबद्दल कोणाला काही शंका उरली नव्हती. तर उरल्यासुरल्यांच्या शंकाही नुकत्याच आटोपलेल्या बांग्लादेश दौर्‍यानंतर दाट झाल्या असतील.

बांग्लादेश सारख्या तुलनेत दुय्यम संघाशी आपण कधी नव्हे ते सलग दोन सामने हरत पहिल्यांदाच मालिका हरलो आणि या नामुष्कीच्या पराभवानंतर पुन्हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले.
कोहलीचा परफॉर्मन्स पुन्हा एकदा त्याच्या लौकिकाला साजेसा झाला नाही. संघात अनाकलनीय बदल झाले. रहाणेला डच्चू देत बाहेर बसवले गेले. जणू धोनीचा त्याच्यावरचा विश्वासच उठला होता. खुद्द धोनी आपला सहावा क्रमांक सोडून चौथ्या क्रमांकावर खेळायला आला, जणू त्याचा आता कोणावरच विश्वास उरला नव्हता. तरीही दुंभगलेल्या या संघाचा पराभव हा अटळ होताच. अन तो झालाच.

आणि मग ज्याची भिती होती तेच घडले, धोनीचे स्टेटमेंट आले,
जर माझ्या कर्णधारपदावरून पायऊतार होण्याने भारतीय क्रिकेटचे भले होणार असेल तर मी कर्णधारपद सोडायला तयार आहे.

मुळात काही महिन्यांपूर्वीच, नव्हे नुकत्याच झालेल्या विश्वचषकात ज्याने भारताला विदेशी भूमीवर सर्व सामने जिंकवून दिले होते, उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले होते, त्याच्या कॅप्टन्सीवर कोणाला शंका घेण्याचे काही कारणच नव्हते.
मग तो नक्की काय दबाव असावा ज्याखाली येत धोनीने असे स्टेटमेंट द्यायची हाराकिरी केली?

आणि मग कोहलीचा काल पाहिलेला ईंटरव्ह्यू,
यानंतर उरल्यासुरल्या शंकाही लुप्त व्हायच्या मार्गावर आल्या.

कोहलीने धोनीचे नाव न घेता, पण अर्थात धोनीलाच उद्देशून म्हणाला, "त्याने असे काही निर्णय घेतले की आम्ही सारे प्लेअर कन्फ्यूज स्टेटमध्ये होतो, कोणाला काय करायचे सुचत नव्हते, आम्हाला एक टीम म्हणून खेळता आले नाही. मी हे असे ईंटरव्यूमध्ये बोलणे योग्य नाही पण पब्लिकला सर्व दिसतेच आहे आणि एक्स्पर्ट सुद्धा यावर बोलत आहेतच."

उपकर्णधाराने थेट कर्णधारालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले.

याच्या नेमकी उलट भुमिका आश्विनने घेतली आहे.
धोनीने मला मैदानावर जीव देण्यास सांगितले तरी मी तयार आहे - ईति आश्विन.
रैनानेही धोनीला समर्थन दाखवले आहे.

थोडक्यात संघात दुफळी माजली आहे.

याच गोंधळात धोनीचे अजून एक स्टेटमेंट कानावर आले - कोचच्या निवडीबाबत - निव्वळ जागा रिकामी आहे म्हणून कोणालाही कोच म्हणून आणू नका - हा ईशारा वा टोमणा नक्की कोणाला उद्देशून असावा?

जे एवढे दिवस धोनीचे कौतुक करताना थकत नव्हते, ते क्रिडा पत्रकार देखील अचानक पारडे बदलत धोनीच्या विरुद्ध बोलू लागले आहेत,
उदाहरणार्थ, टिव्हीवर पाहिले, बांग्लादेश पराभवाची कारणमीमांसा करताना द्वारकानाथ संझगिरी धोनीवर सडकून टिका करत होते. एवढे वर्षे सहाव्या क्रमांकावर खेळलेल्या धोनीला अचानक चौथ्या क्रमांकावर खेळायची इच्छा झाली आणि त्याने रहाणेचा बळी घेतला. धोनीचा हा डावपेच कातडीबचाव होता. वगैरे वगैरे. वगैरे वगैरे.

माजी कर्णधार सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि सुनिल गावस्कर या दिग्गजांनी मात्र धोनीची पाठराखण केली आहे.

मध्यंतरी पेपरात बातमी वाचली होती - आयपीएल संदर्भात - धोनीच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे - कदाचित त्याचे हात तिथेही कुठेतरी दगडाखाली अडकले असावेत.

एकंदरीतच जे वारे वाहत आहेत ते पाहता येत्या काळात भारतीय क्रिकेट संघात बरीच काही उलथापालथ अपेक्षित आहे.
याआधी खुद्द धोनीवर देखील संघनिवडीचे राजकारण केल्याचे, सिनिअर खेळाडूंचा पत्ता कापल्याचे, गंभीर-सेहवाग-युवराज-हरभजन यासारख्या खेळाडूंची कारकिर्द संपवल्याचे आरोप झाले आहेतच.
कदाचित या व यातील काही आरोपात तथ्य असेलही, पण एकंदरीत धोनीच्या कारकिर्दीत भारतीय क्रिकेटचे भलेच झाले आहे हे नाकारता येत नाही.
त्यामुळे येत्या काळात धोनीसारखा लढवय्या कर्णधार आपण नाहक गमावला, तर तो भारतीय क्रिकेटसाठी फार मोठा फटका असेल. यातून काहीही भले होणार नाही.

.........

यावर ईतर क्रिकेटरसिकांची मते वाचण्यास उत्सुक !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे इत्तपर मान्य आहे का रे ? >>> हो हे मान्य आहे, असेच व्हायला हवे.
पण तरीही माझा हा मुद्दा वॅलिड राहतोच. राजकारण धोनीने खेळले असावे अशी शंका आपण घेतो तर त्याच्याशीही खेळले जात असावे ही शक्यता लक्षात घ्यायला हवीच. आणि मग जर तसे खरेच होत असेल तर इथे त्याच्या कॅप्टनशिप क्षमतेबद्दल घेतलेल्या सर्व शंकांना एक वेगळाच आयाम प्राप्त होईल.

राहिला प्रश्न त्याच्या फलंदाजीच्या क्षमतेचा आणि तो आपली भुमिका बदलून खेळू शकतो का .. तर ते कठीण असले तरी धोनीसाठी नसावे. त्याची अ‍ॅडजस्टमेंट खूप चांगली आहे. ईंग्लंड-ऑस्ट्रेलिया येथील कसोटीमध्येही आपले गावठी तंत्र घेऊन फक्त अ‍ॅडजस्टमेंटच्या जीवावर त्याने तग धरलेला. एकदिवसीयमध्ये तर त्याने बरेचदा सामना सावरला आहे, ते फटकेबाजीच्या नाही तर टेंपरामेंटच्या जीवावर.. इनफॅक्ट तो आला आणि काऊंटर अ‍ॅटेक करून सामना फिरवला असे क्वचितच दिसलेय.. तो निव्वळ मोठे फटके खेळणारा नाहीये, इनिंग बिल्ड करणे, स्ट्राईक रोटेट करणे हे त्याला सहज जमते. फक्त या आधी आपल्याकडे फिनिशर नव्हताच म्हणून ती भुमिका तो पार पाडायचा ईतकेच.

आधी तो बेस्ट होता.. आता उपलब्ध पर्यायांमध्ये बेटर आहे..

फक्त प्रॉब्लेम असा आहे, की त्याला कर्णधार बनून आता कोणी जगू देणार नाही, आणि निव्वळ खेळाडू म्हणून कोहलीच्या हाताखाली खेळणे त्याला जमणार नाही. त्यामुळे त्याचे आता कर्णधारपद आणि संघातील स्थान एकसाथच जाणार..

@ धोणी नी द्रविडला वन-डे टीम मधून काढंलं नाही?
कर्णधारपद सोडल्यावर इंडिया-ऑस्ट्रेलिया ७ मॅच सीरीजमधे पहिल्या ६ सामन्यांमधल्या द्रविडच्या धावा: DNB, ३१, ०, १३, ० आणि ७. यानंतर सातव्या सामन्यात बाहेर बसवून नंतर थेट टीम बाहेर.
द्रविडच्या कॅलिबरच्या फलंदाजाला आणखी संधी देणं गरजेचं होतं.

पण हाच न्याय धोनी नी जडेजा, रैना, रोहित, धवन आदींना लावलेला दिसत नाही.
तसंच सीएसके अन ईंडिया सीमेंट्स यात फक्त श्रीनीमामांचीच कॉन्फ्लिक्ट ऑफ ईंटरेस्ट्स होती का?

श्रीनी : बीसीसीआय सर्वेसर्वा, ईंडिया सीमेंट्स चे मालक
ईंडिया सीमेंट्स : सीएसकेची मालक
धोणी : भारताचा कर्णधार, सीएसके कर्णधार, ईंडिया सीमेंट्सचा व्हाईस प्रेसिडेंट, र्‍हीती स्पोर्ट्स चा पार्टनर
र्‍हीती स्पोर्ट्स : सुरेश रैना अन रवीन्द्र जडेजा ची मीडिया मॅनेजर कंपनी, सीएसके चं मार्केटिंग करणारी कंपनी
सुरेश रैना अन रवीन्द्र जडेजा : भारतीय संघातले अमरपट्टा असलेले खेळाडू, सीएसके चे खेळाडू, ईंडिया सीमेंट्सचे एंप्लॉई

अँकी नं.१, का can of worms उघडता? किती कटाक्षानं हे मुद्दे बाजुला ठेवले होते! द्रविड च्या वन-डे मधल्या गच्छंतीबद्दल तर मी बोलायचं नाही असंच ठरवलं होतं.

राजकारण धोनीने खेळले असावे अशी शंका आपण घेतो तर त्याच्याशीही खेळले जात असावे ही शक्यता लक्षात घ्यायला हवीच. >> जरुर घेऊ. फक्त त्याआधी तू माझ्या आधीच पोस्ट मधील 'नक्की काय राजकारण आहे ज्याने धोनीच्या खेळावर परीणाम झाला आहे ?' प्रश्नाचे उत्तर दिलेस तर मलाही कळेल. सध्याचा दौरा वगळता अजून तरी धोनीला हवा तसा संघ नेहमीच मिळत आला आहे. ३००-३०० धावा काढल्यामूळे पहिले ४ बॅट्स्मन कुठेही कमी पडले आहेत असे म्हणतात येणार नाही. 'अष्टपैलू खेळाडू मुळात आडात नाही तर पोहर्‍यात कुठून येणार ?' अशी स्थिती आहे. बॉलर्स - सध्याचे बेस्ट बॉलर्स बरोबर आहेत. एव्हढे सगळे असूनही धोनी ची कप्तानशिप uninspired आहेच. ते कमी असेल तर मिडिया मधे तो सरळ प्लेयर्स बद्दल जे बोलून मोकळा होतोय त्या नंतर त्यांच्या confidence चे काय होत असेल ? ह्या सगळ्याचा दोष राजकारणावर कसा जातो ? (कुठले ते माहित नसले तरीही)

वयोमानानुसार खेळावर परीणाम होणे साहजिक आहे नि धोनी सारख्या रिफ्लेक्स वर अवलंबून असणार्‍या खेळाडूवर त्याचा परीणाम अधिक होणार. ह्याची पेनल्टी संघाने का चुकवावी ? टेंपरामेंट जीवावर तो खेळतोय असे तू म्हणत असशील तर वयानुसार वाढत्या अनुभव ते अधिक शार्प व्हायला हवे, कमी नाही. "आता उपलब्ध पर्यायांमध्ये बेटर आहे.." हे जे तू म्हणतोस ते खरे आहे का ? तो 'बेटर' आहे हे बघायला त्या क्रमांकावर अजून इतर कोण सलग खेळले आहे ? तर हि तुलना करता येईल ? पांडे, रायुडु ह्यांना कधीच सलग run मिळाला नाहिये. श्रेयस अय्यर सारख्या होतकरु in-form खेळाडूला हि संधी का नाकारली जावी ? ते तरूण आहेत नि अधिक वर्षे संघत खेळून एकजिनसी संघ निरंआण होउ शकतो वगैरे तर बाजूलाच ठेव.

आता किपिंग बद्दल, मी मागे क्रिकेट बाफावर लिहिलेले कि best keeper is the one who does no get noticed. धोनी तसा होता. अगदी फास्ट बॉलर्स ना किपिंग करताना उड्या न मारता बॉल उडवण्याचा त्याचा अट्टाहास लक्षात घेऊनही. आत्ता ची परिस्थिती बघ. फ्लॅट विकेट्स वर ३ फास्ट बॉलर्स ज्यांचा लाईन लेंग्थ वर अजीबात कंट्रोल नाही, त्यांनी एखादी edge induce केली तरी ती पकडायला कीपर तयार नाही. ह्याच उलट वेड ने रिचर्ड्सनच्या गार्बेज बॉल्स वर घेतलेले दोन कॅच बघ. That is the difference keeper can make to the ordinary balling. आपले बॉलर्स सुधारण्याची शक्यता शून्य आहे. आता आहे ह्या पेक्षा धोनीची किपिंग सुधारणार नाही हे नक्की आहे. त्यामूळे निव्वळ किपिंग च्या जोरावर धोनी राहू शकत नाही. त्याला त्याचा फिनिशर रोल जमवल्याशिवाय value addition नाही नि हे ह्या तिन्ही रोल्स मधे त्याची घसरण सुरू आहे.

असामी, ईतकी उदाहरणं, अ‍ॅनालॉजीज, आकडेवारी मांडल्यावर तर कोर्टात सुद्धा तुमचं आर्ग्यूमेंट मान्य होईल. Happy

अगदी सहमत आहे तुमच्याशी.

असामी,
धोनीने पांडे, रायडू, श्रेयस अय्यर यांना कुठे अडवलेय..
धोनी गेला तर कीपर येईल ना त्याच्या जागी..

'नक्की काय राजकारण आहे ज्याने धोनीच्या खेळावर परीणाम झाला आहे ?' प्रश्नाचे उत्तर दिलेस तर मलाही कळेल.
>>>>>>>>
लेख एकदा वाचून घेतला तरी त्यात माझ्या शंका मांडल्या आहेत. पुरावे मागाल तर कठीण होईल Happy
एकदा ते राजकारण मान्य केले तर धोनीच्या अपयशी होण्याच्या सर्व लिंका धडाधड लागतील.
पण जर तसे काही मान्य नसेल तर काही काळापूर्वी जिगरबाज खेळाडू आणि कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू अचानक कसा घसरत गेला हे कोडेच बनून राहील, आणि याचे उत्तर त्याला हाकला एवढे देऊन हा प्रश्न निकालात काढला जाईल.

अरे कुठला लेख ? तुझ्या शंका नकोत काहितरी substantial दाखव, नुसत्या पुड्या सोडू नकोस.

काही काळापूर्वी जिगरबाज खेळाडू आणि कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू अचानक कसा घसरत गेला हे कोडेच बनून राहील >> हे अजिबात कोडे वाटत नाहीये नि अचानक झाले नाहिये. मी वर त्याच्या खेळाच्या तिन्ही पैलूंबद्द्ल लिहिले आहे. त्यातले "मैदानावर काय चालते हे बाहेर बसून कंट्रोल कसे करता येईल ?" हे मला कळत नाही. असे कुठले राजकारण आहे ज्यामूळे एकदम helicopter shot चे timing कोळसा झाले ? temperament गंडले ? timing off व्हायला लागले ? आता असे म्हणून नकोस कि राजकारण खेळून धोनीचे reflex कमी झालेत नि stamina कमी झाला.

रच्याकाने जर राजकारण (जे आहे असे मी क्षणभर ग्रुहित धरतो) एव्हढे distracting होत असेल तर खरतर श्रेयस्करच आहे कि धोनी ने स्वतःहून कप्तानपद सोडून देणे नि खेळावर लक्ष केंद्रित करणे (ते का होत नाहीये ह्याचा उत्तर उघड आहे कि त्याला स्वतःलाही त्याच्या कमतरतेची जाणीव झालेली आहे)

धोनीने पांडे, रायडू, श्रेयस अय्यर यांना कुठे अडवलेय..
धोनी गेला तर कीपर येईल ना त्याच्या जागी.. >> अरे तू त्याला चौथय किंवा पाचव्या क्रमांकावर खेळवा (त्याचे टेक्निक बदलून) त्याबद्दल बोलत होतो. किपर म्हणून त्याला हात लावला नव्हता. तिथे limited cricket पुरते ओझा, सॅमसन असे दोन पर्याय तरी आहेत नक्कीच जे फिनिशर नसले तरी decent batsmen नि keeper आहेत. ओझा तर मागच्या down under India A tour मधे जबरदस्त खेळला होता प्रत्येक मॅच मधे.

ऋन्मेऽऽष | 25 October, 2015 - 05:43

ह्या पोस्टीमध्ये - "धोनीला उद्याच्या उद्या हाकला असे न म्हणता transition plan बनवा म्हणतोय." ह्या म्हणण्यावर ऋने म्हटलेय - "हे योग्य आहे. तो बनायला हवा."

आणि

ऋन्मेऽऽष | 21 January, 2016 - 14:14

ह्या पोस्टीमध्ये - "वर्षभराचा प्लॅन आधीच जाहीर केला हे काय कारण झाले?
ऊलट धोनीचे ‘बघू कसे काय होते ते’ हा अ‍ॅटीट्यूड मग चांगला वाटतोय" हे ऋने म्हटलेय.

आता ह्यातला खरा ऋ कसा ओळखावा? Wink

माझ्या १५ जानेवारीच्या पोस्ट्मधे मीं धोनीच्या कारकिर्दीला सलाम ठोकला आहेच. पण या धाग्यावरच्या प्रस्तावनेत व चर्चेत अधिकाधिक भर धोनी हा खरंच राजकारणाचाच तर बळी पडत नाही ना , असाच होत आहे असं जाणवतं. या अंतस्थ बाबींबद्दल केवळ तर्क काढूनच बोलतां येतं व त्यावर कितीही चर्चा झाली तरी निश्चित उत्तर मिळणं कठीणच.; मला वाटतं, धोनी अजूनही यष्टीरक्षक, फलंदाज व कप्तान म्हणून संघांत महत्वाचं स्थान टीकवूं शकतो का, हा खरा प्रश्न आहे.
. धोनीला त्याच्या कारकिर्दीत योग्य वेळीं संधी मिळाली. त्याने त्याचं सोनं केलं. त्यामुळें आपल्या क्रिकेटला उभारी आली, त्याचं खूप कौतुक झालं, बराच काळ त्याला मानाने नेतृत्व करतां आलं. आपल्या आवडीच्या क्रमांकावर फलंदाजी करतां आली व तिथंही तो बहरला. त्याला प्रसिद्धी व पैसा दोन्ही भरपूर मिळाली. आतां कोणत्याही कारणानं कां असेना [ वय, ताण, अंतस्थ राजकारण इ.इ.], त्याच्या कामगिरीला उतरती कळा लागली असेल तर , त्याच्या निवॄत्तिबद्दल बोलण्याने त्याच्यावर निश्चितच अन्याय होणार नाही. शिवाय, कर्णधार म्हणून तो असामान्य ठरला असला तरीही 'कॅप्टन इज अ‍ॅज गुड अ‍ॅज द टिम ही लीड्स' या उक्तीनुसार कर्णधार म्हणूनही त्याचं यश व अपयश तोललं जावं, हेंही उचित.
तात्पर्य : धोनीची कारकिर्द दैदिप्यमान आहे, क्रिकेटप्रेमी त्याच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या भरीव यशाबद्दल कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात/करतीलच, क्रिकेटने धोनीला 'जें तो वांच्छिल' तें सर्व कांहीं दिलंय व आतां त्याच्या कारकिर्दीचा कधींतरी व्हायचाच तो शेवट जव़ळ् आलाय, हें धोनीने व सर्वानीच आनंदाने स्विकारणंच योग्य. त्याच्या विरुद्ध राजकारण शिजतंय का, 'सचिनपेक्षां त्याला वेगळी वागणूक मिळतेय का', त्याला योग्य असा पर्याय उपलब्ध आहे का, हे सर्व प्रश्न उपस्थित करून क्रिकेटमधल्या एका छान, अविस्मरणीय कारकिर्दीवर व क्रिकेटच्या कालखंडावर उगीचच रेघोट्या का ओढाव्या ?
.

आजची मॅच जर हारली तर ती केवळ आणि केवळ धोनी मुळेच... >> नाही हो. धोनी राजकारण करतोय. त्याला मनिष पांडे ची सेंचुरी करून द्यायची आहे. (अर्र् र्र् पण राजकारण तर धोनीच्या विरूद्ध सुरु आहे ना?)

---
कानडा

धोनीने निवृत्ती घेउन सन्माननीय रजा पत्करावी
अपमानास्पद हकलून लावण्यापेक्षा हे चांगले

जो ८ रन्स २२ चेंडूत करतो त्याला फिनिशर म्हणने हे मायकल बेव्हनला शिवी देण्यासारखे आहे

फेफ, असामी, भास्कराचार्य, कधी कधी मी म्हणणारा केदार,
यांना काहीच कामं दिसत नाहीत असं दिसतयं. Wink

एक बार बोल दिया ना ऋ ने बस्स फिर वो काळे दगडवरकी रेषच हो गयी ना. धोनी हय तो हय.

ऋ, मस्त रे चालु दे तु बाप्पु !

आणी हो चान्स मिळालाय तर स्वतःलाच १ स्कोर देवुन घेतो....खि खि खि.

अरे कुठला लेख ? तुझ्या शंका नकोत काहितरी substantial दाखव, नुसत्या पुड्या सोडू नकोस.
>>>>
अहो हाच लेख. हेडरमधील..

आणि शंका नकोत काहितरी substantial दाखव हे तर धोनीने कधीकाळी राजकारण केलेय वा तो काही खेळाडूंना फेवर करतो वगैरे याबाबतही शक्य नाही. अश्या गोष्टींबद्दल जे दिसतेय त्यावरूनच शंका घेऊ शकतो. बाकी माझ्या शंका म्हणजे जवळजवळ सत्यच असते. तेव्हाच ठामपणे मांडतो. आणि धोनीनेही असे काही केलेय हे आरोपही मी नाकारत नाही, कारण तिथेही शंका येण्याजोगे बरेच काही आहेच.

असो, बाकी राजकारणाचा परीणाम कॅप्टनशिपवर तर नक्कीच होऊ शकतो. तसेच फलंदाजीवरही मानसिक स्थिती गंडल्याने, हतबलता आल्याने परीणाम होणारच.
राहता राहिले त्याचे हेलिकॉप्टर शॉट वगैरे मोठे फटके रिफ्लेक्सेस कमी झाल्याने गंडलेत, हे तर मी सुद्धा मान्य करतच आहे की आता तो तेवढा धडाकेबाज फिनिशर राहिला नाही.
पण ओवरऑल फलंदाज म्हणून गंडलेला नाही हे त्याचे २०१५ चे रेकॉर्ड मी त्या दिवशी एका पोस्टमध्ये टाकले होते. पण आपल्याला तो फिनिशर म्हणूनच हवाय.

ओझा, सॅमसन असे दोन पर्याय तरी आहेत नक्कीच >>>> ओके, मग याच दोघांची धोनीशी तुलना करूया. हे दोघे धोनीपेक्षा सरस ठरले तर धोनी बाहेर. मी चौथ्या-पाचव्या क्रमांकावर म्हटले तरी पुर्णवेळ फलंदाज म्हणून नाही तर कीपर-फलंदाज म्हणूनच म्हणतोय. आणि तसाही फिनिशर कोणीच भेटत नसेल तर धोनीच सहाव्या क्रमांकावर खेळणे तरी काय वाईट आहे.. जर तुम्हाला एखादा नवीन फिनिशर संधी देऊन चेक करायचा असेल तर धोनीला चौथ्या-पाचव्याला आणा आणि त्याला सहाव्याला खेळवा हा पर्यायही हातात राहिल.

भास्कराचार्य,
अहो ते मी transition plan बद्दल योग्य आहे म्हटले होते. पण सचिनने स्वताच्या करीअरचा वर्षभराचा प्लान बनवलेला.. अमुक तमुक सामन्यात विश्रांती घेणे, अमुक तमुक सामन्यात खेळणे, मात्र आयपीएलमध्ये विश्रांती न घेता खेळणे.. हा कसला प्लान होता?

सचिनचा काही संबंध नाही बुवा. तू एकीकडे म्हणतोस, की धोनीला ट्रान्झिशन प्लॅन हवा, आणि दुसरीकडे म्हणतोस, प्लॅन कशाला? बघू कसे काय होते ते, हा धोनीचा अ‍ॅटीट्यूड चांगला आहे.

ट्रान्झिशन प्लानच तर सुचवतोय मी..
आता तो फटकेबाज फिनिशर नाही राहिला तर एखाद दुसरा नंबर पुढे यावे..
या काळात नवा फिनिशर शोधावा..
पण तिथून त्याला संघाबाहेर काढायची किंवा त्याने स्वताहून निवृत्ती घोषित करायची घाई का..
बघू कसे काय होते हे त्याने फिटनेसबद्दल म्हटले आहे.. म्हणून ते सुद्धा योग्य आहे.. कारण जर वयोमानानुसार किमान अपेक्षित फिटनेसच गंडला तर कुठलाही प्लान गेला डब्यात..
सचिनच्या बाबतीत त्याचा ट्रान्जिशन प्लानचीही वेळ चुकली होती.. आधीच उशीर झालेला.. म्हणून म्हटले की त्याचा ट्रान्झिशन प्लान संघासाठी कमी आणि त्याची करीअर लांब खेचायला जास्त वाटत होता..

आजची मॅच बघितलीस तर पांडे कसा खेळला ते बघ नि धोनी कसा ते बघ नि काय ते ठरव. Happy

अहो हाच लेख. हेडरमधील.. >> हेडरमधे तुझी मते आहेत. ती नकोत. ते जे काही तुला वाटते तेव्हढेचव्हढेच्तुला जे वाटते त्याच्या बरोबर विरुद्ध इथे किमान चौघांना वाटते आहे. त्यामूळे he says, she says शिवाय त्याला काहि अर्थ नाही.

हा एक विषय असा आहे ज्यासाठी माबो वर येऊन टाईपावेसे वाटते..
(असामी, you too..?) Wink

तर, all good things come to an end.. तसच धोनी चे हे अंतीम पर्व आहे. ते किती टीकेल हे फक्त त्याच्यातला खरा प्रामाणिक खेळाडू सांगू शकतो. When needed he has taken some bold decisions, and as his 'fan' I would expect him to do the same now. आजवराच्या भारतीय क्रिकेट च्या इतीहासात, माझ्यासाठी तरी धोनी हा १ क्र. चा कर्णधार असेल. परफॉरमंस च्या बाबतीत जे सन्नी, कपिल, सचिन, द्रविड सारख्या दिग्गजांना चुकलं नाही ते धोनी ला देखिल चूकणार नाही... the degradation is obvious! पण performance oriented selection, transition plan, merit rewards... वगैरे गोष्टींवर आधारीत संघ चालवायला आपण काही ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड नव्हे. तेव्हा ते मुद्दे चघळण्यात अर्थ नाही. हेलिकॉप्टर मधिल हवा का गेली आहे या मागे 'ईतर' काही कारणे शोधण्यात ज्यांना स्वारस्य आहे त्यांनी थोडी कळ काढली तर धोनी च्या बायोग्राफी पुस्तकात ते सर्व येईलच.. Happy त्याच्यावर चित्रपट येऊ घातलाच आहे म्हणे, तो प्रदर्शित होण्यापूर्वीच धोनी साहेब निव्रुत्ती घेतील आणि जाता जाता त्या निमित्ताने चित्रपट देखिल यशस्वी करून जातील अशी ऊगाच शंका मनात येते. Happy
तूर्तास, 'the best finisher in the game' हे बिरूद आता धोनी वर चांगलेच ऊलटले आहे. खरे तर त्याची कारकीर्द निव्वळ एक उत्क्रूष्ट फिनीशर या पेक्षा खूप यशस्वी आहे... तरिही आताच्या संघात वयापरत्वे त्याची एकूण क्षमता आणि स्थान या दोन्ही वर खूप मोठे प्रशण चिंन्ह आहेच..! त्याला यथोचित सन्मानपूर्वक निरोप सामना व समारंभ मिळावा ही अपेक्षा आहे, किमान त्या बाबतीत तरी त्याने स्वताचा सेहवाग होऊ देऊ नये असे माझ्यातील त्याच्या पंख्या ला वाटते.

भविष्यात तो भारतीय संघाचा सर्वात यशस्वी 'कोच' ठरू शकेल यात मला शंका नाही...!

Rather than degrading perhaps the best and most successful captain we have ever seen in Indian Cricket, let us get ready to say one final good bye to this 'cool captain' MSD. He certainly deserves to pick his day and time.

तूर्तास, 'the best finisher in the game' हे बिरूद आता धोनी वर चांगलेच ऊलटले आहे. खरे तर त्याची कारकीर्द निव्वळ एक उत्क्रूष्ट फिनीशर या पेक्षा खूप यशस्वी आहे...
>>>
+ ७८६
असे खरेच झाले आहे.

आजची मॅच बघितलीस तर पांडे कसा खेळला ते बघ नि धोनी कसा ते बघ नि काय ते ठरव.
>>>
उद्याच्या सामन्यात जर पुन्हा धोनी खेळला तर मत बदलाल..
पांडेचे तर मी सुद्धा क्रिकेटच्या धाग्यावर कौतुक केले आहे.. वन ऑफ द बेस्ट इनिंग .. आणि एका अर्थी धोनीलाही त्याने वाचवले.. धोनीचा दिवसच बेकार होता, फॉर्म टायमिंगशी झुंजत होता.. असे होऊ शकते. फक्त जेव्हा असे तिशीच्या आत होते तेव्हा आपण फॉर्म गेलाय असे म्हणतो तर कारकिर्दीच्या दुसर्‍या टप्प्यात होते तेव्हा खेळाडूच संपलाय असा निष्कर्श काढून मोकळे होतो..

एक गंमत - त्या सामन्यात २२ बॉल ८ होते तर तिसर्‍या सामन्यात ८ बॉल २३ होते Happy

एक गंमत - त्या सामन्यात २२ बॉल ८ होते तर तिसर्‍या सामन्यात ८ बॉल २३ होते>>>>> पूर्ण सीरीज मधला तोच एक सामना धोनी जरातरी नीट खेळला.

उद्याच्या सामन्यात जर पुन्हा धोनी खेळला तर मत बदलाल.. >> नाही हाच तुझ्या नि किमान माझ्यात फरक आहे. मी एका मॅचवर निष्कर्ष काढत नाहिये. तू क्रिकेट बाफवर वाचलेस तर सुमारे दोन वर्षांपर्यंत मी केदार नि योग शी धोनीवरून भरपूर वाद घातले आहेत, धोनीच्या बाजूने. अजूनही त्याच्या त्या काळातल्या कामगिरीबद्दल मला अजिबात शंका नाही पण ह्याचा अर्थ त्याला आंधळा सपोर्ट करणे मला पटत नाही. तू वर लिहिलेल्या दुसर्‍या सामन्यानंतरच एखाद दुसर्‍या सामन्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ट्रेंड बघ हे कमीत कमी मागच्या दोन पानांवर तरी मी नि फे फे ने बरेचदा लिहिलेले आहे (तू वाचले असशील असे मी ग्रुहित धरत होतो) "तरिही आताच्या संघात वयापरत्वे त्याची एकूण क्षमता आणि स्थान या दोन्ही वर खूप मोठे प्रशण चिंन्ह आहेच." हे जे योग म्हणतो आहे तेच आम्ही तुला सांगायचा प्रयत्न करतोय नि तू 'राजकारणामूळे असे झालय, त्याचा फॉर्म नाही आहे, कोहली त्याचा गेम करतोय, तो अ‍ॅडजस्टमेंट करून चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो" ह्यामधे अडकला आहेस. तुला हे पटणार नाही पण कालची सामना संपल्यावरची धोनीची मुलाखत ऐकली असशील तर त्यानेही पांडे नं. ५ साठी उत्क्रुष्ट प्लेयर आहे असे म्हटले आहे. हे माझे खयाली पुलाव किंवा विचार नसून धोनीचे शब्द - "The kind of innings he has played, it gives you extra 15 games to settle in and start to do what you need to do. And adapt to the demands of the game. Because a lot will also change when you play in the subcontinent. As of now he looks good at No. 5.""
(ह्याचा अर्थ धोनीने स्वतःसाठी सहा आकडा मान्य केला आहे. .... किंवा चार वरची राहणे ची जागा धोक्यात आहे Wink ) . पांडेचा उल्लेख (तुला त वरुन ताकभात कळावी अशी अंधिक आशा होती रे) ह्यासाठी होता कि 'तो जसा खेळला तसा धोनी करत असे पण त्याला हे जमत नाही' नि 'ह्याच मॅचच्या आधी पांडे, रायुडू, श्रेयस अय्यर ह्यांची नावे लिहून त्यांनी काय घोडे मारले आहे कि त्यांना सलग संधी धोनीच्या ४-५ क्रमांकाच्या अट्टाहासामूळे मिळू नये हे मी लिहिले होते '. माझे दोन्ही मुद्दे कालच्या पांडेच्या खेळीने सुस्पष्ट झाले आहेत अशी आशा करतो.

पण performance oriented selection, transition plan, merit rewards... वगैरे गोष्टींवर आधारीत संघ चालवायला आपण काही ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड नव्हे. तेव्हा ते मुद्दे चघळण्यात अर्थ नाही. >> योग उम्मीद पे दुनिया कायम है Wink

त्याच्यावर चित्रपट येऊ घातलाच आहे म्हणे, तो प्रदर्शित होण्यापूर्वीच धोनी साहेब निव्रुत्ती घेतील आणि जाता जाता त्या निमित्ताने चित्रपट देखिल यशस्वी करून जातील अशी ऊगाच शंका मनात येते>>>

त्याच्याच र्‍हीती स्पोर्ट्स मीडिया कंपनीनी प्रोड्यूस केला आहे तो सिनेमा.

भविष्यात तो भारतीय संघाचा सर्वात यशस्वी 'कोच' ठरू शकेल यात मला शंका नाही...!>>>
रवीन्द्र जडेजा, सुरेश रैना, मोहित शर्मा, आर अश्विन, शिखर धवन, अंबाटी रायुडू, एन श्रीनिवासन, गुरुनाथ मैय्यप्पन, ईंडिया सीमेंट्स, र्‍हीती स्पोर्ट्स, के श्रीकांत, सीएसके, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, विंदू दारासिंग, साक्षी धोणी लाईक्ड धिस

सुरू होणारी T-20 series पुढच्या टीमची lower middle order ठरवण्यासाठी उपयोगी ठरेल. युवी, धोनी, रैना, पंड्या .. बघूया कोण आपापल्या जागा नक्की करते ते. पंड्या नि बुमराहला सगळ्या सामन्यांमधे नक्की संधी द्यायला हवी त्यांचा एकून फॉर्म बघता.

सुरू होणारी T-20 series पुढच्या टीमची lower middle order ठरवण्यासाठी उपयोगी ठरेल
>>>
मिडल ऑर्डर बीस-बीस वरून??

बाकी बुमराहने मजा आणलेली त्या दिवशी.. सॉर्ट ऑफ मिस्ट्री बॉलर ठरलेला तो ऑस्ट्रेलियन्सना.. त्याला आधी खेळवला असते तर असे नक्की वाटले असेल धोनीला..
हार्दिक पंड्या या लेवलला खेळू शकला सातत्याने तर तो येत्या काळात नक्कीच एक असेट ठरू शकेल..

पण तरीही आता २०-२० ची मालिका आणि त्यापेक्षाही विशचषक हा धोनीसाठी खूपच महत्वाचा आहे..
समजा आपण धोनीच्या नेत्रुत्वाखाली विश्वचषक पुन्हा एकदा आणला तर .... बरीच समीकरणे चटक्यात बदलतील !

ते तसे ठरवणार्‍यांची मजबूरी असते वा स्वार्थ, कधी राजकारण तर कधी अर्थकारण, कोण कोणाचा लाडका तर कोण वशिल्याचा.. पण मायबोलीवर एक्सपर्ट कॉमेंट अश्या आल्या नाही ना पाहिजे Happy

असेच काही नाही. T-20 मधल्या खेळावरूनही अंदाज येतो कि कितपत टिकाऊ माणूस आहे, temperament कसे आहे वगैरे. It is not just use and throw piece of information if you know what to look for.

ओके information तर कुठलीही फुकट जात नाहीच.
पण तरी तिन्ही फॉर्मेटमधील टेकनिक जसे भिन्न असते तसेच टेंपरामेंटही भिन्न असते. कारण तिघांमध्ये उद्भवणार्‍या सिच्युएशन भिन्न प्रकारच्या असतात, डिमांड वेगळ्या असतात.
आयपीएलच्या २०-२० मध्ये कित्येक जण असे चमकतात की त्यांच्यात आणि विराट कोहलीसारख्यामध्ये फारसा फरक वाटत नाही, पण तेच ५०-५० मध्ये गेले की कोहली त्यांच्या बराच पुढे निघून जातो.
बाकी शॉर्टलिस्ट नक्कीच करू शकतो, पण ईंडियाची कॅप कोणालाही सहज देऊ नये, आणि एकदा दिल्यास सहज काढून घेऊ नये.

"रवीन्द्र जडेजा, सुरेश रैना, मोहित शर्मा, आर अश्विन, शिखर धवन, अंबाटी रायुडू, एन श्रीनिवासन, गुरुनाथ मैय्यप्पन, ईंडिया सीमेंट्स, र्‍हीती स्पोर्ट्स, के श्रीकांत, सीएसके, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, विंदू दारासिंग, साक्षी धोणी लाईक्ड धिस " - Happy Happy

धोनीने आज पहिल्याच चेंडूला सिक्स मारला Happy

पण महत्वाचे म्हणजे शेवटच्या ओवरला युवराज, पांड्याला पुढे न करता तो स्वतः आला. जिथे हिरो बनायचा चान्स नव्हताच पण झिरो बनायचाच चान्स नक्की होता. जर तो फेल गेला असता तर टिका ठरलेलीच. पण आल्या आल्या सिक्स फोर मारूनही कोणी कौतुक करणार नव्हते.
अर्थात ईट्स पार्ट ऑफ गेम, यात काही विशेष नाही. पण सध्याची त्याच्या कारकिर्दीवरचे प्रश्नचिन्ह पाहता त्याची सकारात्मकता भावली.

युवी नि पांड्याला फक्त एकच नेट प्रॅक्टिस मिळालेली असल्यामूळे त्यांना पिचची कल्पना नाही त्यामूळे तो वर आला असे त्याने सांगितले.

हो, ते ही मी आज सकाळी वाचले. ते एक कारण झाले, पण कृती सकारात्मक होतीच. अन्यथा तो संधी साधून हिरो बनायला पुढे येतो असे आरोप त्यावर नवीन नाहीत.

तख्त सलामत, ताज सलामत
धोनी तेरा, राज सलामत Happy

आजचा सामना मी पाहिला नाही, वरची लाईनही बातम्यांमधून चोरली आहे. त्यातच धोनीचे कौतुक वाचले.

आजही यष्टीरक्षणात चुणूक दाखवली त्याने असे ऐकले, तसेच कप्तानी करताना पत्तेही योग्य फेकले असे समजलेय.

तर आजच्या सामन्यातील किंवा सामन्यातील का, या ऑस्ट्रेलियातील विजयी मालिकेतील धोनीच्या कामगिरीचे मूल्यमापन कसे कराल?

ऋन्मेष, असं एखाद्या सामन्यावरून वगैरे मुल्यांकन करण्याची वेळ आली असेल, तर that just proves my point.

by the way, उल्लेख केलाच म्हणून सांगतो, आज धोनी ने एक स्टंपिंग ची संधी दवडली आणी फॉकनर चं स्टंपिंग मटका होता.

तर आजच्या सामन्यातील किंवा सामन्यातील का, या ऑस्ट्रेलियातील विजयी मालिकेतील धोनीच्या कामगिरीचे मूल्यमापन कसे कराल? >> मी क्रिकेट बाफावर लिहून आलोय तसे.

<< ... धोनीच्या कामगिरीचे मूल्यमापन कसे कराल? >> >> धोनीच्या सध्याच्या कामगिरीचं कितीही कांटेकोरपणे मूल्यमापन झालं, तरीही यंदाच्या टी-२० विश्वचषकासाठी तो कर्णधार नसणं व ४ वर्षांनंतरच्या पुढील वन-डे व टी-२०साठी संघात असणं , दोन्हीही गोष्टी अशक्यप्राय व अहितकारी वाटतात ! [ अर्थात, हें धोनीच्या कारकिर्दीला मनःपूर्वक सलाम ठोकूनच !!]

फेरफटका, एखाद्या सामन्यावरून मूल्यमापन करणे मलाही रुचत नाही म्हणून त्या दिवशी त्याला बेकार दिवस गेल्याने मी इथे त्यावरून चर्चा टाळली.
मालिका संपल्यावर मूल्यमापन करूया किंबहुना येत्या दोन महिन्यातील 20-20 चा लगातार धमाका होऊ द्या, मग करूया.

जे गेले वर्ष त्याला वाईट गेलेय वा धोनी संपलाय असा ओरडा झाला त्या वर्षभरातले त्याचे आकडे पाहिले तर त्यात तसे फारसे काही रिफ्लेक्ट होत नाही. बहुतेक सचिनसारखेच धोनीकडूनही आपल्या अपेक्षा अवास्तव असतात त्यामुळे तो स्टॅन्डर्ड नाही राखता आला तर लगेच फेल गेला म्हणून ओरडा होतो. असे मला वाटते.

एक मात्र नक्की, विश्वचषकासारखी मोठी स्पर्धा जिंकवून द्यायला धोनीच हवा Happy

इथे धोनीला पर्याय नाही... हे चुकीला माफी नाही असे वाचले तरी चालेल

<< तेव्हा तर सरकारही बदललेले असेल >> वा: ! हें मात्र या सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन न करतांच ठरवून मोकळे !! आणि सरकार ठरवायला घेतात तशी निवडणूकच घेतली, तर इथल्या चर्चेनुसार धोनीला पुढच्या विश्वचषकासाठी एकच मत मिळण्याचीच दाट शक्यता आहे !! Wink

Pages