सलमान खान वरील आरोप सिद्ध.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 May, 2015 - 02:53

सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

http://www.ndtv.com/india-news/2002-hit-and-run-verdict-salman-khan-prov...

न्याययंत्रणेचे अभिनंदन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेडरमध्ये "न्याययंत्रणेचे अभिनंदन" हे अजूनही तसेच आहे.
ते बदलता येईल का?
अन्यथा सद्यस्थिती पाहता धागाकर्त्याला अपेक्षित असलेल्याच्या नेमका उलटा अर्थ निघतोय.

ऋन्मेऽऽष,

आनुरोधिक वा औपरोधिक कुठल्यातरी अर्थाने न्यायव्यवस्थेचं अभिनंदन करायला पाहिजे.

आ.न.,
-गा.पै.

न्यायव्यवस्थेचा अपमान झाला असे कोणालाही वाटत असेल तर क्षमस्व.. पण मी वरती म्हटलं आहे की 'मी असे ऐकले आहे'.. हे फक्त एक विधान आहे, माझा दावा नाही.. फक्त ऐकीव माहिती, जी मी इथे मांडली आहे. अर्थात तुम्हाला त्यातला फरक कळला नाही यात काहीच आश्चर्य नाही, बाकीच्यांना कळला त्यामुळे त्यांनी आक्षेप घेतला नाहीये, पण तुमची तर गोष्टच वेगळी आहे केंजळे साहेब.
आणि सलमानच्या अपमानाची काळजी तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे, त्याचे चाहते व नातेवाईक, मित्रमंडळी ( व काही प्रमाणात त्याचे चमचे) यांच्या आंधळ्या प्रेमामुळे सलमानचेच सर्वात जास्त नुकसान झाले आहे... आणि हे सत्यच आहे.
btw तुम्ही कालच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत हो अजून????

कालपरवा केव्हातरी आजतकवर फास्ट सलमान १०० मधे बातम्या दाखवत होते. त्यात पहिल्या ५०-६० पाहिल्या तर फक्त आणि फक्त एकच बातमी त्याच्या विरुद्ध दाखवली. ती म्हणजे, रविना टंडनने त्याच्या विरुद्ध लिहिले होते. तेव्हाही अर्थात त्यावरुन चाहत्यांनी तिला खुप बोल लावले. (सलमान म्हणे शत्रुची डूख धरुन वाट लावतो... आठवा विवेक ओबेरॉय, त्याची तर करीयर बरबाद केली).
मला अचानक रविना टंडन आवडु लागली आहे.
सलमान व वर अजुन जे काय उल्लेख आलेत, म्हणजे अंबानीचा मुलगा वगैरे त्यांना पण शिक्षा होवो हे दिवास्वप्न रंगवत बसुयात आता.

सलमानला शिक्षा झाल्यावर त्याची भेट घेणार्‍यात अनेक लोक होती.

करिश्मा, करिना, शाहरुख... तसेच राज, नितेश.... आश्चर्याची गोष्ट 'सत्य मेव जयते' चा घोष करणारा आणि अनेक अनेक खोट्या गोष्टी सामान्य जनते समोर आणणारा अभिनेता अमिरखानही होता.

एक खोटे झाकण्यासाठी अनेक वेळा खोटे बोलणारा, एक अपघाताचा गुन्हा झाकण्यासाठी अनेकान्चे बळी घेणारा (सुरक्षा रक्षकाची कथा काय आहे? त्यान्ना नोकरी वरुन का कमी केले गेले ?) पळपुटा भित्रा खान याला तो करत आहे ते चुक आहे, गुन्हा केला आहे कबुल कर आणि कायद्यानुसार मिळालेली शिक्षा भोग असे सल्ले हे मित्र मन्डळी देत असतील का ?

अनेक दिग्गज लोकान्नी भेट घेतली. आर्थिक हितसम्बन्ध (राज, नितेशची गणिते गप्प बसायचे किती मिळणार यावर आहे) यान्नाच सर्व प्रथम प्राधान्य असते का ?

माफ करा, पण थोडेसे अवांतरः

सत्यमेव जयतेमुळे आमीर किंवा बीईंग ह्युमनमुळे सलमान प्रत्यक्षातही खूप चांगले'च' असतील असे मानणे हा मला विनोद वाटतो.

(व्हाईल ऑन धिसः असे वाचले आहे की प्रत्यक्ष आयुष्यात खूप चांगले असलेले हिंदी चित्रपट क्षेत्रात तिघे होते. प्राण, धर्मेंद्र आणि केश्तो मुखर्जी. बाय द वे, केश्तोंनी म्हणे प्रत्यक्षात कधीच 'घेतली' नव्हती. अवांतराबाबत दिलगीर!)

<<सत्यमेव जयतेमुळे आमीर>>
---- मान्य आहे... पण सत्य मेव जयते हा काही चित्रपट, किव्वा निव्वळ मनोरन्जनाचा कार्यक्रम नव्हता. चुकीच्या घडत असलेल्या गोष्टीन्ना, अनिष्ट प्रथेला जनतेच्या समोर अघडे करणे हाच उद्देश होता असे बिम्बवले गेले होते. असे करताना 'आपला - तुपला' करत होता हा वादाचा मुद्दा पण झाला होता... त्यानी काही लोकान्ना फाडले होते पण काही लोकासमोर नरम, नतमस्तक होता... असो.

पडद्यावर न्याय मिळवण्यासाठी जिवाचे रान करणारे आमचे अभिनेते... प्रत्यक्ष जिवनात सत्या पासुन लाम्ब लाम्ब पळणारे पळपुटे, भित्रे आणि प्रसन्गी पैशासाठी, व्यावसायिक आर्थिक गणितासाठी स्वतःच्या तत्वान्ना मुरड घालणारे आहेत.

>>>सत्य मेव जयते हा काही चित्रपट, किव्वा निव्वळ मनोरन्जनाचा कार्यक्रम नव्हता<<<

बहुधा 'बीईंग ह्युमन' ही चळवळही तशी नसावी Happy

थोडेसे आवान्तर,
सलमानने किति पैसे खर्च केले असतिल याचा
काही अन्दाज कुनी सांगू शकेल का?
मनाजोगी कोर्टबाजी करायला किती खर्च येतो?

आता हा वकील जर दिवसाला २५ ते ४० लाखाच्या दरम्यान फी घेत होता तर १३ वर्षात किती वेळा केस चालली ह्याचा हिशेब मान्डावा लागेल.

सत्यमेवजयते मध्ये आमिर खानने दारू पिऊन गाडी चाचालवण्याविविरोधात एक एपिसोड आणि किती तरी खोटे अश्रू वाया घालवले होते.आणि आता सलमान खान ला भेटायला जाताना लाज नाही वाटली Sad

पाटील,

आपल्या देशात न्याय स्वस्त नाही. सेशन कोर्टात वकील फारसे पैसे घेत नाहीत पण हायकोर्टात नुसते उभे रहायला एका तारखेला सहज २५ हजार मागतात. सुप्रीम कोर्टात तर मिनिटाच्या हिशोबात व्यवहार होतो.

पण एक नक्की, हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टातही, मे. न्यायाधिश केसचा पुर्ण अभ्यास करून आलेले असतात. त्यांच्याही लक्षात आला नसेल असा एखादा मुद्दा असेल तरच वकिलांना तो मांडायचा असतो, त्यासाठी काही मिनिटांचाच अवधी मिळतो, नाहीतर कोर्टाचे मत बनलेलेच असते. सुप्रीम कोर्टात तर मिनिटा दोन मिनिटात फाईल हातावेगळी केली जाते. ( मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेत )

सलमानच्या केसमधेही वकिलांनी जे मुद्दे काढले आहेत, त्यांच्याकडे खालच्या कोर्टात दुर्लक्षच झालेय.( उदा. कमाल खानची साक्ष ) त्या मुद्द्यावर सलमान सुटू शकेल.

दीवाणी दाव्यात शेकडा ९० टक्के ( माझा अंदाज ) खोट्या म्हणजे निव्वळ सामनेवाले ( प्रतिवादी ) यांना त्रास देण्यासाठीच दाखल केलेल्या असतात. तारखा पडतात त्यातही अनेकदा वादी किंवा प्रतिवादी यांनी केलेली मागणी, दोन्हीपैकी एखादा गैरहजर असणे, वकिलांची अनुपस्थिती, त्यांची तयारी नसणे.. असे अनेक मुद्दे असतात.
प्रत्यक्ष कोर्टाला केस चालवण्यात रस नसतो, असे कधीच होत नाही. फक्त मे. न्यायाधिशांची बदली होणार असेल तर ते नव्या केसची सुनावणी करून घेत नाहीत.

नाट्क चित्रपटात दिसणारे कोर्ट ( कदाचित कोर्ट हा चित्रपट अपवाद असावा ) आणि प्रत्यक्षातले कोर्ट, यात जमीन अस्मानाचा फरक असतो.

पण पोलिसांनी याआधीच कमाल खानची साक्ष घेतलेली आहे, अशी बातमी आत्ताच एका न्यूज चॅनेलवर पाहिली मी...

आता सलमान खान राहिला बाजूला. कमाल खान च्या साक्षी वरून कीस काढत हा खटला चालणार. आणि सल्लू सुटणार . कमाल खान पद्धतशीर रित्या बेपत्ता झाला २००७ मध्ये. आई आणि live in partner ला अंधारात ठेवून ,,

http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/Kamaal-...

Kamaal left India on such a secret note that he didn't even inform his live-in girlfriend or her mother (both lived in the flat with him) . They found out from the broker that the flat had been sold!

बीईंग ह्युमनमुळे सलमान प्रत्यक्षातही खूप चांगले'च' असतील असे मानणे हा मला विनोद वाटतो.
>>>>

सलमान म्हणजे काही ऐतिहासिक किंवा पौराणिक पात्र नाही, जे त्याबद्दल दंतकथा वा खोटे दस्तावेज पसरतील.
जे आहे ते समोर आहे. जर त्याला जवळून ओळखणारे कित्येक लोक त्याच्या चांगुलपणाचे ग्वाही देतात तर ते मान्य करायला काय हरकत आहे.
ते मान्य केल्यास लगेच त्याला सोडून देतील किंवा आपण त्याला सोडून द्यायला सांगतोय असा अर्थ नाही निघत.

अ क्रिमिअल इस क्रिमिनल. त्याला पश्चाताप ही झालेला नाही . अजून त्याचा माज गेलेला नाही. रुन्मेष तुमच्यासारख्या फॅन्स च्या तिकीटाच्या पैशातूनच तो न्यायव्यवस्था विकत घेऊन गरिबांवर अन्याय करतोय. त्याचा चांगुलपण तुम्हीच मान्य करा आम्ही त्याच्याइतकाच तुमचाही तिरस्कार करू . तो आमचा हक्क्क आहे....

तो आमचा हक्क्क आहे.... >>> नक्कीच हक्क आहे. एखाद्याचा तिरस्कार करायचा किंवा एखाद्यावर प्रेम करायचा हक्क प्रत्येकाला असतोच. फक्त त्यातील काय करायचे हे आपापली चॉईस असते.
याउपर एकाच व्यक्तीबाबत वेगवेगळ्या प्रसंगानुरूप हे दोन्हीही करता येते.

कमाल्खान विकिपीडिया पाहिलेतर तो भारतीय नसून ब्रिटिश आहे हे दिसते. वर सध्या तो झुरिक ला राहतोय ही माहितीही मिलते.

आणि त्याने त्याच्या साक्षित सलमान गाडी चालवत होता आणि ताबा सुटून ती फुटपाथवर चढली असे म्हटले हेही नेटवर खुप ठिकाणी आहे. मग आता काय नवे शोधणार त्याच्या साक्षित.

जर हां आणि पोलिस दोघेही एकच साक्ष देत होते तर साक्ष बदलावी हां दबाव फ़क्त पोलिसावरच का घातला गेला? हा तर सल्मानाचा नातलग होता. पण साक्षित तो सलमान ला वाचावनयाचा प्रयत्न करताना दिसत नाही. मग दबाव घालणार्यान्नि याच्यावर पण दबाव का नाही घातला?

What police record in jabani is never accepted by court. The witnesses can always say in court that he was forced by police to say so. What and whatever he says on oath and in the presence of judge, is only considered by the court. Police can not rely on these statements, they should always collect evidence.

At the same time the complainant has to restate his complain to minute details in presence of the judge. He can not make any material improvement to the original complain. If he makes, that goes against him.

हा मिसळपाव वरील नील मोहोर यांचा लेख

रविंद्र पाटील या नावाला स्वतंत्र ओळख नाही पण 'सलमान खान' हा संदर्भ दिला की त्यांची ओळख पटू शकेल.
रविंद्र पाटील हे सलमानचा अंगरक्षक म्हणून नेमलेले पोलिस काँस्टेबल होते, होते म्हटले कारण आता ते या जगात नाहीत. पैसा आणि अधिकार या दोहोंच्या ताकदीने मिळून एका निष्पाप प्रामाणिक माणसाचा कसा बळी घेतला त्याचीच ही कहाणी.

गेले काही दिवस लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनलेल्या चि.कु.सलमान खान खटल्याबाबत माहिती करून घेतांना काही धागे मिळाले. या संदर्भातील काही लेख आंतरजाल तसेच व्हॉटसएप इ.वर उपलब्ध आहेत त्यातील हा एक त्यात असलेल्या तपशीलवार माहितीमुळे इथे देत आहे.

*** बहुचर्चित अशा सलमान खानच्या 'हिट अॅन्ड रन' प्रकरणाचा आज निकाल लागलाय. सलमान या प्रकरणात दोषी आढळलाय... त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय तसंच २५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आलाय. पण, ही शिक्षा रविंद्र पाटीलच्या उद्ध्वस्त आयुष्यासमोर काहीच नाही... रविंद्र पाटीलचा एकच गुन्हा होता आणि तो म्हणजे, या अपघाताच्या वेळी पोलीस कॉन्स्टेबल असलेला २४ वर्षांचा रविंद्र सलमानच्या सोबतच त्याचा बॉडीगार्ड म्हणून उपस्थित होता... आता तो या जगात नाही... ३ ऑक्टोबर २००७ रोजी रविंद्रचा डिप्रेशननं आणि क्षयरोगानं बळी घेतला.

➡रविंद्रनं दाखल केली होती एफआयआर...

याच रविंद्र पाटीलनंच सलमानच्या गाडीच्या अपघातानंतर पहिल्यांदा एफआयआर दाखल केली होती. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रितसर तक्रार दिली होती. मूळचा धुळ्याचा असलेला रवींद्र पाटील १९९८ बॅचचा पोलीस कॉन्स्टेबल.... मुंबई पोलिसांच्या प्रोटेक्शन युनिटमध्ये कार्यरत होता. रवींद्रचे दोन्ही मोठे भाऊसुध्दा पोलीस दलातच कार्यरत होते.

➡रविंद्रनं कोर्टात दिली होती खरी साक्ष...

रविंद्र हा या प्रकरणातला महत्त्वाचा साक्षीदार होता... रविंद्रनं वांद्रे कोर्टात, सलमाननं जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलहून घरी जाण्यासाठी गाडी काढली आणि वेगाने वांद्रेच्या दिशेने निघाला... यावेळी तो मद्य प्यायलेला होता... आपण त्याला याबद्दल जाणीव करून दिली होती, अशी साक्षही दिली होती.

➡रविंद्रवरचा दबाव वाढला...

यानंतर, 'हिट अॅन्ड रन' प्रकरणामुळे रविंद्रवरचा दबाव वाढला होता. तो कोर्टात वकिलांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायलाही घाबरत होता. त्यामुळेच तो डिप्रेशनमध्ये गेला...

➡पोलिसांचीच रविंद्रला वाटत होती भीती...

सीनिअर पोलीस अधिकाऱ्यांनी नोकरीवर अनुपस्थित राहिल्याचा आरोप लावून रविंद्रला नोकरीवरून काढलं होतं. त्यानंतरही पोलिसांनी त्याचा पिच्छा पुरवला... त्यामुळे रविंद्रच्या डिप्रेशनमध्ये अजूनच वाढ झाली. त्यानं मुंबई सोडली आणि दुसरीकडे निघून गेला.

➡कुटुंबीयांपासूनही दूर झाला रविंद्र...

मुंबई सोडल्यानंतर रविंद्र अनेकदा चोरून लपून आपल्या पत्नीला आणि कुटुंबीयांना भेटण्यासाठी एक-दोन दिवसांसाठी मुंबईला येत होता. कुटुंबीयांनीही त्याला या प्रकरणातून काढता हात घेण्याचा सल्ला दिला होता पण रविंद्रनं त्यांचं ऐकलं नाही...

➡साक्ष बदलण्यासाठी दबाव...

रविंद्रसोबत जे काही मोजके लोक होते त्यांच्या म्हणण्यानुसार सलमान खान प्रकरणातील साक्ष बदलण्यासाठी रविंद्रवर खूप जास्त दबाव होता. परंतु, रविंद्रनं शेवटच्या श्वासापर्यंत आपली साक्ष बदलली नाही. कुठलीही लाच त्यानं स्वीकारली नाही. धमक्यांना भीक घातली नाही.

➡कोर्टात अनुपस्थित राहण्यासाठी तुरुंगवास...

सलमान खान प्रकरणात कोर्टात अनुपस्थित राहण्याच्या आरोपाखाली रवींद्रला जेलमध्ये धाडण्यात आलं. आपल्याला तुरुंगात वाईट वागणूक मिळत असल्याचं सांगत रविंद्रनं आपल्याला तुरुंगात सीरियल किलर्सपासून दूर ठेवण्याची विनंती कोर्टात केली होती. पण, त्याची ही मागणी फेटाळण्यात आली.

➡भीक मागण्याची वेळ...

कुटुंबापासून वेगळा झाल्यानंतर रविंद्र बेपत्ता झाला होता... त्याचा ठावठिकाणा कुणालाही माहीत नव्हता. या काळात त्याला रस्त्यावर भीक मागताना अनेकांनी पाहिल्याचं सांगितलं जातं.

➡रविंद्रचे अखेरचे काही क्षण...
दारूचं व्यसन... आणि क्षयरोग

२०००७ मध्ये तो सेवरी म्युनिसिपल हॉस्पीटलमध्ये सापडला. खूप दारू प्यायल्याचा परिणाम म्हणून रविंद्रला क्षयरोग (टीबी) झाला होता. त्यामुळे, त्याच्यावर औषधांचा कोणताही परिणाम झाला नाही... आणि खंगून खंगून रविंद्रनं याच हॉस्पीटलमध्ये ३ ऑक्टोबर २००७ रोजी अखेरचा श्वास घेतला. यावेळी, त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबीयांपैकीही कुणी उपस्थित नव्हतं.

➡न्यायालयानं रविंद्रची साक्ष ग्राह्य धरली...

रविंद्रच्या मृत्यूनंतर २०१४ साली जेव्हा सलमान खानवर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला पुन्हा सुरू झाला तेव्हा रविंद्रनं वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टात दिलेली साक्ष ग्राह्य धरण्याची सरकारी वकिलांची मागणी मान्य करण्यात आली...

सलमान खान ला पाच वर्षाची सजा झाली. सेशन कोर्ट जवळ बरेच सेलिब्रिटी सपोर्ट करीता आले होते. ब-याच जणांनी टीव्ही चॅनेल समोर चमकून घेतले. काहींनी अकलेचे तारे तोडले.

या सर्व केसचा उत्कृष्ट तपास करणा-या पोलीसांसाठी एकाही व्यक्तीने किंवा मिडीयाने प्रशंसा उद्गार काढलेले दिसले नाही.
सिनेस्टार ला शिक्षा झाली म्हणून सगळे चवीने चर्चा करतात. मिडीया टी.आर.पी. वाढवत बसली. हिरोला आणखी सूपरस्टार बनवतील.
जर हि शिक्षा झाली नसती तर पोलीसांचे वाभाडे मिडीयाने काढले असते आणि पोलीस तेव्हा बदनामीच्या किताबातील हीरो झाले असते. ***
सौजन्य: zeenews.india.com

या बाबतची आणखी माहिती खालील दुव्यांवर मिळू शकेल.

१. http://m.indiatimes.com/news/india/even-death-didnt-shake-his-conviction...

२. https://patil.wordpress.com/2013/07/08/ravindra-patil-salman-khan-hit-ru...

३. http://lighthouseinsights.in/blogger-soumyadipta-banerjee-deletes-his-po...

दि. ०७/०५/२०१५ च्या मटा मध्येही याबद्दल बातमी आली आहे.

या शिवाय अजूनही बरेच दुवे गुगल वर 'रवींद्र पाटील' या नावाने शोध घेतल्यास मिळू शकतात.
या खटल्यामुळे त्यांची माहिती थोडीफार वर येत आहे नाहीतर ज्या एका माणसाच्या साक्षीमुळे मुख्यत्वे सलमानवर खटला दाखल झाला आणि तो दोषी ठरून शिक्षा ही झाली, त्याचं जगणं आणि मरण दोन्ही अंधारातच राहिलं असतं.

एका धडधाकट देखण्या तरुणाचे केवळ पाच वर्षांच्या कालावधीत झालेले विदारक परिवर्तन मनाला चटका लावून जाते. त्यांची शोकांतिका वाचून कोणाही संवेदनशील माणसाचे मन हेलावून जाईल. सगळ्यात वाईट गोष्ट ही की एका होतकरू तरूणाच्या आयुष्याची परवड होत असतांना कोणीच त्याची मदत केली नाही, स्वत: त्याचं कुटुंब, त्यातही २ भाऊ पोलीस दलातच असतांनाही असं बेवारस मरण एखाद्याला यावं याहून दुर्दैव ते काय?

पोलिस खातं आपल्या रक्षणासाठी आहे असा आपला समज आहे पण हे पोलिसच जेव्हा काही पैशांसाठी विकले जातात आणि अधिकारांचा गैरवापर करून आपल्याच एका सहकाऱ्याच्या जिवावर उठतात तेव्हा कायदा आणि न्यायाची अपेक्षा आपण कोणाकडून करायची ?

'बीइंग ह्यूमन' ही संस्था काढणाऱ्या चि.कु.सलमानच्या माणूसकी बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे.
स्वत: गुन्हा करूनही तो कबूल न करता सुटकेसाठी कोणत्याही थराला जाऊन, गुन्हा आपल्या ड्रायव्हरवर ढकलू पाहणारा आणि कोर्टात शपथ घेऊन निर्लज्जपणे खोटं बोलणारा हा माणूस ढोंगीपणाचा कळस आहे.
त्याची बाजू घेणारे फिल्म इंडस्ट्रीतील लोक आणि बथ्थड बिनडोक चाहते त्याला डोक्यावर घेऊन नाचताएत, त्याच्या नावावर अजूनही बरेच गुन्हे जमा आहेत हेही ते सोयिस्कर रित्या विसरतायत. चित्रपटात अन्यायाविरुध्द पेटून उठणारा, वाईट प्रवृत्तिंचा विनाश करणारा हा 'हिरो' प्रत्यक्ष आयुष्यात किती खलप्रवृत्तिचा निघाला हे कळूनही लोक त्याला सपोर्ट करणे सोडत नाहीत !!

अपघातानंतर सलमानने स्वत:हून जखमींची मदत करायला हवी होती, पोलिसांना कळवायला हवे होते, पण त्याने तिथून पळ काढण्यात धन्यता मानली, तेव्हा त्याची ह्यूमैनिटी कुठे गेली होती ?
नंतरही झालेली चूक सुधारण्याचा त्याने प्रयत्न केला नाही, उलट हे प्रकरण कुठल्याही प्रकारे दडपण्याचाच त्याचा आणि संबंधितांचा प्रयत्न होता. त्याने सरळ मार्गाने गुन्हा कबूल केला असता तर केव्हाच कायद्यानुसार मिळालेली शिक्षा भोगून आज एक प्रामाणिक नागरिक म्हणून तो उजळ माथ्याने फिरू शकला असता, पण एवढा उदात्त विचार त्याने केला असता तर काय होते..

या खटल्यातील अजुन एक दुर्लक्षलेली व्यक्ति म्हणजे कमाल खान, सलमानचा गायक मित्र/चुलत भाऊ, अपघाताचा दुसरा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार !! त्याला ह्या पूर्ण खटल्यातून पध्दतशीरपणे वगळण्यात आलं, तो कधीच समोर आला नाही जेव्हा खरंतर पहिली साक्ष त्याची असायला हवी होती.
१ साक्षीदार ज्याला साक्षीला कधी बोलावलेच गेले नाही
२ रा साक्षीदार ज्याला साक्षीदार संरक्षण (witness protection) मिळायला हवे होते ते दिले नाही, तो देशोधडीला लागून हाल हाल होऊन गेला तरी कोणाला काही पत्ता नाही.

हे सर्व आपल्या देशात, आपल्या कायद्या अंतर्गतच होऊ शकते, कोणी कसा विश्वास ठेवायचा अशा कायदा आणि न्यायव्यवस्थेवर !!

सलमानला शिक्षा झाली नाही झाली तरी त्याच्यामुळे हकनाक गेलेले दोन जीव परत येणार आहेत थोडीच, फक्त त्यांना न्याय मिळाला तरी ठीकच म्हणायचं.

यातील दुवे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून लोकांनी सलमानचा मुखवट्या आडचा चेहरा ओळखून त्याचा उदो उदो करणं बंद करावं यासाठी हा एक छोटासा प्रयत्न..

हा धागा रवींद्र पाटील यांना एक श्रध्दांजली म्हणून ...
त्यांच्या आत्म्याला शांति लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करण्याशिवाय अजून आपण काय करू शकतो ?

0000rpatil.jpg

दिनेशदा,

वरील मजकुराबद्दल कृपया शंकासमाधान करावं. तक्रारदाराने तक्रार बारकाईने करावी अशी अपेक्षा आहे. मात्र काही भाग नंतर आठवला तर ते त्याच्या विरोधात जातं, बरोबर?

अर्थात वकील ही तक्रार मांडणार, बरोबर? शिवाय ही तक्रार ज्याअर्थी इतक्या बारकाईने द्यायची आहे त्याअर्थी ती लेखी असलेली बरी, बरोबर? मग न्यायपीठासमोर काय सांगायचं असतं?

आ.न.,
-गा.पै.

Gama, the public prosecutor will give clues to the complainant as to the facts of the case, but he is not allowed to show the complainant paper itself to the complainant at that time. The court records the statements separately. While giving the verdict the judge will compare the original complain and the recorded statement for discrepancy. The advocate of accused may also point out the discrepancy in his arguments.

In criminal cases, the judge reads out the charge sheet to the accused and asks him if the charges are acceptable to him. The case is heard only if he denies the charge. It is the responsibility of the complainant to prove the charge. The accused are given all opportunities to defend. They can produce any evidence or witness till the matter is decided. In fact before giving the verdict the judge will always ask to the accused if they are satisfied with the hearing, was all the hearing was conducted in their presence. Only when they confirm, the judgment is given. Even after giving judgment and if the charges are proved, the judge guides them as to the procedure of appeal and the time limit for the same

सलमानच्या शिक्षेसंबंधात नीधप यांच्या आणि त्यंाना अनुमोदन देणा-या सर्व पोष्टींशी सहमत.
रविन्द्र पाटील यांची झालेली परवड आणि दुर्दैवी अंत या विषयी वाचून फार क्लेश झाले. पैसा आणि वरपर्यंत असलेली पोच याच्या जोरावर सगळी व्यवस्था वाकवता येते हे पुन्हा अधोरेखित झाले. काही दिवसांनी 'रविंद्र पाटील की कहानी' किंवा तत्सम -समाजव्यवस्थेचे भेदक (इत्यादि !) वास्तव दाखवण्या-या चित्रपटाची निर्मिती करून सलमानला पाठिंबा देणा-यांनीच स्वतःचे गल्ले भरले आणि अॅवार्डस मिळवली तर नवल नको वाटायला

Pages