Submitted by दिनेश. on 15 March, 2015 - 15:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१.५ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
कपाच्या आकारानुसार दहा ते बारा फज होतील.
माहितीचा स्रोत:
अफगाणिस्तानमधला पारंपरीक प्रकार आहे. नेटवर आहेच.
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रश्मी..>> धन्यवाद.. रीया>>
रश्मी..>> धन्यवाद..
रीया>>
दिनेशदा च प्रेझेन्टेशन जबरी असतं.. माझ आपलं थातुरमातुर
. विचार केला कि नुस्त सांगावच कि केलाय जमलाय पदार्थ म्हणून पन दिल पे पत्थर रखके डालदिया 
दिनेशदा धन्यवाद .. मला वाटत रंग बहूधा मिल्क पावडर मूळे वेगवेगळे दिसत असणार.. भयंकर गोड प्रकार पण माझ्या मावशीची मुलगी आणि दादा वहिनी हे तिघेही गोडखाऊ आहे सो सपातून जाईल.. मी गोडापासून दोन हात लांबच रे बा
मस्त
मस्त रेसिपी!
https://www.youtube.com/watch?v=o71M3W0JAY0
ह्याच पदार्थाला शीरपेराही म्हणतात असे दिसते. मराठीत पेढा म्हणतो तो ह्या शब्दापासून आला असावा अशी मला शंका आहे. अफगाणी भाषेत पारा वा पेराला काही अर्थ आहे का?
शीर म्हणजे दूध हे क्षीरशी साधर्म्य बाळगणारे आहे. पण शीर हा शब्द पर्शियनमधेही आहे. संस्कृत आणि पर्शियन ह्या दोन्ही प्राचीन भाषा असल्यामुळे आणि त्या बहिणी असल्यामुळे कुणी कुणाकडून घेतले हे सांगणे कठिण आहे.
मंजूडी आणि वत्सला धन्यवाद
मंजूडी आणि वत्सला धन्यवाद तुम्हालापन.. इथ प्रतिसाद देईपर्यंत दुसर्या पेजवर चाल्ली गेली मी..
जीव जळला.भूक लागली असताना हे
जीव जळला.भूक लागली असताना हे फोटो पहाणे म्हणजे शिक्षा होय.
दिनेशदा च प्रेझेन्टेशन जबरी असतं>>>>> +कितीतरी
नेसलेच्या मिल्कपावडरमधे आधीच साखर असते,तर कुठली मिल्कपावडर वा.परावी?
देवकी, मग साखर थोडी कमी
देवकी, मग साखर थोडी कमी वापरावी लागेल. आपण उकळता पाक मिल्क पावडरच्या मिश्रणात टाकतो, त्या उष्णतेने मिल्क पावडरमधली साखरही वितळेल.
इथे साखरेच्या पाकातला ओलावा हा एकमेव बाईंड करणारा घटक आहे. यात तूपही नाही. म्हणून पाकावर लक्ष द्यावे लागते.
धन्यवाद दिनेशदा!
धन्यवाद दिनेशदा!
कातील... मला जमे ल का हो दा?
कातील... मला जमे ल का हो दा?
टीना खूप छान जमलाय. मस्तच.
टीना खूप छान जमलाय. मस्तच.
फोटो कातिल आहे. पण पास.
फोटो कातिल आहे. पण पास. पांढरी साखर ठरवून कमी करतोय (मुलांना सुद्धा जमेल तसं)
फजचं अमेरिकेत टुरिस्ट ठिकाणी प्रस्थ आहे म्हणून कसा करतात ते पाहायचं होतं. मिट्ट गोडपणा असतो फजला तसाच या डिशलादेखील असेल. फजचे प्रचंड व्हेरियेशन्स विस्कॉंसिन डेल्सला पाहिले होते. शिवाय बीचला बोर्ड वॉक असेल तर तिकडे एखादं फजचं दुकान नसेल तर तो फाउल समजतात
मस्त फोटो! पण करुन बघायचे
मस्त फोटो! पण करुन बघायचे धाडस नाही होणार. पाक बिघडतोच माझा!
टीना, _/\_ . छान दिसतोय.
शिवाय बीचला बोर्ड वॉक असेल तर
शिवाय बीचला बोर्ड वॉक असेल तर तिकडे एखादं फजचं दुकान नसेल तर तो फाउल समजतात >>+ १००
केप कॉडला एका दुकानात सन्त्रा बर्फी अतिगोड कशी लागेल तसा फज होता... मला वेगळी चव म्हणून आवडला पण तरी एवढ गोड खाववत नाही!
मी केला. तुमचा दिसतो आहे
मी केला. तुमचा दिसतो आहे तितका कोरडा नाही झाला माझा. पण टिपीकल फजचे texture वाटते आहे. चवीला चांगला लागतो आहे.
मी त्यात एक चमचा एव्हरेस्टचा दुधाचा मसाला पण घातला. त्यामुळे चव एकदम ओळखीची वाटली. रंग मात्र नाराळाच्या वडी सारखा पांढराच आला. झटपट प्रकार आहे पण.
आरती मस्तच दिसतोय.
आरती मस्तच दिसतोय.
मस्त फोटो!!
मस्त फोटो!!
मस्तच .. करून बघावंसं वाटत
मस्तच ..
करून बघावंसं वाटत आहे ..
आरती, गुलाबी झाक कसली दिसते आहे? बोल ची का?
भारी फोटो. खावासा वाटतोय.
भारी फोटो. खावासा वाटतोय.
सशल, हाच फोटो फेबुवर पांढरा
सशल,
हाच फोटो फेबुवर पांढरा दिसतो आहे.
नेहमीप्रमाणेच तोंपासू रेसिपी
नेहमीप्रमाणेच तोंपासू रेसिपी .... पहिला फोटो तर एकदम कातील आलाय दिनेशदा ....
रेसिपी सोपी आहे करावीशी वाटतेय पण पाक करायचा असल्यामुळे जरा भीती वाटतेय
एका इराणी मैत्रीणिने इराण
एका इराणी मैत्रीणिने इराण मधून आणलेली एक अशीच मिठाई खायला दिली होती ती आठवली. ते दूध मात्र उंटीणीचे असल्याने जबरी भयाण वास होता त्याला. दिनेशदांची रेस्पि मात्र करून बघणार. कुडुम कुडुम वडीपेक्शा जरा मउसर वडी जास्त चांगली वाटेल ह्याची. श्रिखंडाची वडी असते तशी.
आरती मस्त ..
आरती मस्त ..
जौदे बै...............आता
जौदे बै...............आता करतेच! :स्मितः
छे छे!! असल्या गोष्टी अजिबात
छे छे!!
असल्या गोष्टी अजिबात खाउ नयेत, वजन वाढते.
:द्राक्ष आम्बट कोल्हा स्मायली:
अप्रतिम
अप्रतिम
टीना, आरती - छानच दिसतोय फज
टीना, आरती - छानच दिसतोय फज तुमचाही
कातिल फोटू आणि रेसिपी तिकडे
कातिल फोटू आणि रेसिपी

तिकडे फेसबुकावर आरती ने फोटू टाकला आणि न राहवून इकडे आले
आरती, मस्तच जमलीय.. मला पण
आरती, मस्तच जमलीय.. मला पण हे साखरेचे प्रमाण जास्त वाटले पण साखर फार कमी केली तर मिश्रण एकत्रच होणार नाही, असे वाटले. या कृतीत साखरेला पर्याय नाही.
वेका, सुक्रोज (साधी
वेका, सुक्रोज (साधी साखर)पेक्षा ग्लुकोज मध्ये करुन बघ साखर टाळत असशील तर. Fructoseचे तोटे टाळू शकशील.
दिनेश, साखर कमी करुन किंचीत डिंक पावडर भुरभुरवली तर एकत्र येण्यासाठी? गुळपापडीमध्ये काही लोक घालतात डिंक पावडर.
अश्विनी, चांगली आयडीया आहे.
अश्विनी, चांगली आयडीया आहे.
पाक करायचा आहे , काय होईल ते
पाक करायचा आहे , काय होईल ते चालेल पण करुन बघणारच.
टीना , आरती मस्तच जमलयं दोघीनाही.
अश्विनी के, ग्लुकोज कसा विकत
अश्विनी के, ग्लुकोज कसा विकत घेतात. सौंड्स फनी हो पण मी ग्लुको बिस्किट सोडलं तर कुकींगसाठी ग्लुकोज वगैरे वापरलं नाही आहे. फॉर दॅट मॅटर साखर वापरली असती समजा तरी पाक हा एक कधी न ट्राय केलेला प्रकार आहे. सो आमची आप्ली धाव कुंपणापर्यंत पण नाही आहे खरं
पण शिकायला आवडेल.
Pages